Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

अवनी हम शरमिंदा है...

स
सतिश पाटील
Tue, 11/13/2018 - 13:14
🗣 84 प्रतिसाद
वाघिणच होती ती , त्यात २ पिलांची आई, कुत्री न्हवे, प्रत्येक वाघाची एक स्वतःची हद्द असते , सहसा दुसऱ्या कुठल्या हिंस्त्र प्राण्याला तिच्या हद्दीत येण्याची परवानगी नसते, २ बछडे सांभाळायचे त्यांचे रक्षण करायचे आणि या जगात उद्या एकटे जीवन जगण्यासाठी तयार करायचे, शिकार शिकवायची, आत्मरक्षण शिकवायचे, लाड करायचे प्रसंगी कठोर व्हावे लागते हे सगळे करताना. आणि या वाघिणीवर आरोप काय तर १३ लोकांचे प्राण घेतले म्हणे.. त्यातील ३ लोकांचे शवचिकित्सा केल्यावर त्याच्या जखमेवर अवनीची थुंकी आढळली. म्हणजेच तिने ठार केले. पण खाल्ले नाही. खाल्लेही असेल बहुदा. पण बाकी १० जणांच्या मृत्यूचे कारण काय ? माहित नाही. तरीही १३ लोकांच्या हत्येचे आरोप. बरं मारलेही असतील तिने १३ जण , पण काय ती तुमच्या घरात घुसून हल्ला करत होती? अरे तुम्हीच वनक्षेत्रात शेती सुरु केलीत वनरक्षकांना हाताशी धरून, तेंदूपत्ते गोळा करायला तिच्या हद्दीत शिरलात..मग २ पिल्लांची आई असलेली वाघीण ती तिला धोका वाटल्यावर काय करणे अपेक्षित होते तिने? वन्यप्राणी आणि वनसंपदा सांभाळण्यासाठी आपल्याकडे एक स्वतंत्र विभाग आहे, त्यासाठी एक मंत्री, एक राज्यमंत्री, आणि एक आय ए एस अधिकारी देखील नेमलाय . पण या प्रगत राज्याच्या वनविभागाला एक वाघ जिवंत पकडता आला नाही हि शरमेची नाही तर संताप आणणारी बाब आहे. तुम्हाला १३ महिने पाठलाग करून २ पिलांच्या आईला जिवंत पकडता आले नाही? खरंच प्रामाणिक प्रयत्न झाले का? अवनीला मारल्यानंतर आता तिच्या २ पिलांचे काय ? जगातील का ती? बरं या सगळ्या मोहिमेत संशय घेण्याला बरीच जागा आहे, १३ महिन्याचा शोध, रात्री केलेली कारवाई, त्यात दाट मारण्यासाठी पशुवैद्याचिकिसक असावा लागतो, तोही नव्हता सोबत, मग दाट कोणी मारला? नक्की दाट मारला का? आज शवविच्छेदन करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगतिले ते म्हणजे अवनीला पाठमोरी असताना गोळी घातली गेलीये, दाट मारल्यावर तिथून रक्त निघणे अपेक्षित असते ते निघाले नाहीये., आणि महतवाचे म्हणजे शिकारी असगर अलीने गोळी नाही तर त्याच्या मुलाने शिकार केली आहे .....वर तो शिकारी असगर अली म्हणे तिची २ पिल्लेही नरभक्षक होऊ शकतात..म्हणजे याला हौस पूर्ण करण्याची अजून २ संधी.. अरे १३ महिन्याची पिल्ले माणसाची सोड, सशाची तरी शिकार करू शकतात का? आणखी एक चीड आणणारी गोष्ट म्हणजे तिथली गावकऱ्यांनी अवनीची हत्या झाल्यावर गावात फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला.. कहर आहे .. गावातील, घरातील व्यक्ती ठार झाल्यावर दुःख हे होणारच पण या गावकऱ्यांना समुपदेशनाची गरज होती, जेणे करून हि घटना टाळता अली असती. वन आणि वन्य प्राण्याचे महत्व समजावून सांगून गावकऱ्यांच्या मदतीने हातात हात घालून काम करता आले असते. त्याच कसंय ना कि असे वाघ मारल्याने सरकारला कधी धक्का लागत नाही, जेमतेम मंडळी सोशल नेटवर्किंगवर विरोध निषेध करतात पण चिंता नसावी , आपले सरकार सुरक्षित आहे. आणि हो जेव्हापासून मुनगंटीवार वनमंत्री झालेत तेव्हापासून ३ वाघ, १२ बिबटे, आणि २००च्या वर रानडुकरे मारण्याचे आदेश गेलेत आणि अमलात देखील आलेत. सलाम मुनगंटीवार आपल्याला.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 27757 views

🗣 चर्चा (84)
ग
गामा पैलवान Wed, 11/14/2018 - 13:11 नवीन
सतिश पाटील, तुमचा उद्वेग पोचला. शासनावर दोष येतो तो अवनीस जिवंत न पकडण्याचा आहे. वाघांची संख्या वाढली, पण त्यांना राहायला जंगलं नाहीत. अतिरिक्त वाघ मोजून, त्यांना पकडून इतरत्र सोडायची कुठलीही यंत्रणा दिसंत नाही. एकंदरीत वन्यजीव व्यवस्थापनाचा पूर्णत: अभाव दिसतो आहे. जास्तीचे वाघ पकडून त्यांना प्राणीसंग्रहालयात ठेवता येईल का याची चाचपणी व्हावी. पिंजऱ्यातला एक वाघ किती लोकांना रोजगार देऊ शकेल याची आकडेमोड जाहीरपणे व्हायला हवी. अर्थात हा आकडा जंगलावर अवलंबून असलेल्या लोकांच्या तुलनेने लहानंच असणार आहे. तरीपण लोकांची सुरक्षा, रोजगार एकीकडे आणि दुसरीकडे व्याघ्रसंरक्षण यांचा ताळमेळ साधण्यासाठी ही आकडेमोड आवश्यक आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ल
लोनली प्लॅनेट Wed, 11/14/2018 - 13:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा Wed, 11/14/2018 - 13:20 नवीन
न रहावून विचारतोय. पोटतिडिकीने लिहिणार्‍या सर्वच लोकांनी वरचा परेश देशमुखांचा इंग्रजीतला लेख वाचलात का ? त्यातल्या स्पष्टीकरण अथवा मताबद्दल आक्षेप/दुरुस्त्या असतील तर मग त्याबद्दल बोलले जाईल का ? सोशल मिडिया आणि इतर मिडिया वगैरे या सगळ्या गदारोळात ती पोस्ट एकच संयत आणि लॉजिकल वस्तुस्थिती मांडणारी आढळली (मलातरी) आणि नक्कीच अशा मतांना चर्चेत वरचं स्थान असावं असं वाटतं. किमान मी तरी बरंचसा शांतपणे विचार करु शकतोय ते वाचल्यावर.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 11/14/2018 - 14:14 नवीन
अवनी मॅन ईटर होतीच, पृव्हन विथ डाऊट का असेना. प्रश्न तिला कस मारलं ह्याचा आहे. अन तिथच सरकारनं कायदा मोडलाय.
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा Wed, 11/14/2018 - 16:23 नवीन
नाही हो नाही वाचला
वाचावा असं म्हणेन. तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगने चांगलं विवेचन आहे. आणि सरकारपेक्षा पण एक व्यवस्था म्हणून भाष्य असल्याने जास्त नीट मांडलंय त्यांनी.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 11/14/2018 - 16:51 नवीन
त्यानी १. रात्री का मारलं २. शिकार्‍याच्या मुलानं परवानगी का मारलं ३. ओपन जीप्सीतुन का जंगलात गेले रात्रिच्या वेळी ४. परवानगी नसतांना लोकं जंगलात का गेले हया प्रश्णाना उत्तरच दिलेलं नाहिये. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा Wed, 11/14/2018 - 17:10 नवीन
मला वाटतं, मी अथवा ते लेखक कोणत्याही प्रश्नांना उत्तर द्यायला पाहतायत असं नाहीय. फक्त भावनिक उद्रेकापेक्षा मुद्देसूद वस्तुस्थिती मांडायचा प्रयत्न आहे असं मला वाटलं. लेख वाचला असेल तर प्रश्न २ आणि ४ याची उत्तरं दिली आहेत. प्रश्न १ आणि ३ बद्दल मी शिकारी, वन अधिकारी अथवा या विषयातला तज्ञ, माहितगार नसल्याने काही सांगू शकणार नाही. पण हे प्रश्न असतील तर पर्याय चर्चेत अपेक्षित असावे. अन्यथा 'दिवसा अथवा रात्री, ओपन जिप की बंदिस्त जीप' हे माझ्यासाठी तरी परस्पर-संबंध न समजणारे प्रश्न आहेत (का मारले हा प्रश्न माझ्यासाठी तरी मोठा आहे.) असो.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 11/15/2018 - 04:54 नवीन
रात्री जंगलात जाणं अन त्यात रात्री ओपन जीप्सी वापरण हे सरळ सरळ कायद्याच उल्लंघन आहे म्हणुन तर गोंधळ. जर रात्रीच जायच होत तर बंद जीप घेऊन गेले असते तर किमान गोळी घालुन जीव घ्यायची वेळ आली नसती. असो.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 11/14/2018 - 18:33 नवीन
वाघिणच होती ती , त्यात २ पिलांची आई, कुत्री न्हवे
कुत्री नव्हे हा भाग नकोसा वाटला. वाघ वाघच असतो हे मान्य पण या विशिष्ट तुलनेसाठी कुत्र्यासारखा जिवाभावाचा उमदा मित्र प्राणी वापरायला नको असं वाटलं. अर्थात पूर्ण वैयक्तिक मत. लेखाचा कंटेंट समयोचित आणि आवश्यक विषयावरच आहे.
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील गुरुवार, 11/15/2018 - 06:40 नवीन
वाघिणच होती ती , त्यात २ पिलांची आई, कुत्री न्हवे हे उपरोक्त वाक्य मी यासाठी वापरले कि, कुत्र्याला जेव्हा पिल्ले होतात आणि माणूस त्यांच्या जवळ जातो तेव्हा मुळातच कुत्रा हा माणसाला आपला मित्र समजत असल्याने कौतुकाने त्याची पिल्ले आपल्याला दाखवत शेपटी हलवत असतो, फारच क्वचित वेळा कुत्रा गुरगुरतो तेही तो माणूस जर अनोळखी असेल तर. पण वाघ आपल्या पिलांची काळजी घेताना असे वर्तन करू शकत नाही, समोर माणूस असो कि आणखी कोणीही, तो हल्लाच करणार. कुत्र्याला मारले तर चालते पण वाघाला नको असे मला म्हणायचे न्हवते. चूभूदेघे .
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 11/15/2018 - 06:58 नवीन
माझा गैरसमज झाला. आता लक्षात आलं.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश गुरुवार, 11/15/2018 - 03:03 नवीन
अवनीचे बछडे शोध घेउनही अद्याप सापडले नाहीत. अवनीला बेशुद्ध केले असते, कींवा पिंजर्‍यात पकडले असते तर ती काय या बछड्यांचा पत्ता सांगणार होती काय? अवनीला जीवंत पकडुनही तीचे बछडे सापडले नसतेच ना? नरभक्षक वाघाबरोबर त्याचे बछडेही नरभक्षक होणार नाहीत काय? नरभक्षक वाघ कीतीही घनदाट जंगलात सोडला तरी बाहेर येउन माणसे मारणारच. त्या वाघीणीला बेघुद्ध करायचे खुप प्रयत्न झाले होते असे ऐकले आहे. काही जनावरे अशा सापळ्यात फसत नाहीत. रात्रीच बाहेर फीरतात. (म्हणुनच बहुतेक अद्याप बछ्डे सापडले नाहीत). त्यांना मारातला रात्रीच जावे लागते. वनवीभागाचे कर्मचारी काही कसलेले शीकारी नसतात. तुमचा आमच्या सारखेच जीवाला जपणारे सरकारी नोकर असतात. सरकार त्यांना नरभक्षक प्राण्यांची शीकार करायला भाग पाडु शकत नाही. त्यासाठी शीकारीच बोलवायला लागतात. इतक्या जवळ आलेल्या वाघाला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःचे मरण ओढाउन घेण्यासारखे आहे. आणी शीकारी ते चांगलेच जाणुन असतात. तेव्हा वाघाला गोळी कुणी मारली (शीकार्‍याने की त्याच्या मुलाने) यावरुन गोंधळ घालणे मुर्खपणाचे आहे. त्यांना वाघाला गोळीघालुन मारायची परवानगी मिळाली होती, त्यांनी ती कामगीरी बजावली. जे लोक कधीही घनदाट जंगलात गेले नाहीत, (कर्नाळा, नॅशनल पार्क, आणी अभयारण्य नव्हे, खरे जंगल जीथे माणसाचा वावर जवळ जवळ शुन्य आहे असे)त्यांना या शीकारीतल्या अनेकवीध धोक्यांची कल्पनाही येणे शक्य नाही. कीतीही पुस्तके वाचुन तो अनुभव येणार नाही. नरभक्षक वाघ आसपस फीरत असताना शीकर्‍यांनी व वनविभागाने त्याच्या बछड्यांना शोधत फीरावे, त्यांना आधी पकडावे, मग वाघाला पकडावे कींवा मारावे अशी अपेक्षा केवळ मुर्ख कींवा अज्ञानी माणुसच करु शकतो. जे अवनीसाठी ईथे गळा काढत आहेत, कींवा मेणबती मोर्चे काढत आहेत, त्यांना एवद्गेच सांगणे की तुम्हाला वाघांचा खरच कळवळा व अंगात हींम्मत असेल तर त्या जंगलात जाउन अवनीच्या बछड्यांचा शोध घ्या. अन्याथा ज्यांनी आपल्या जीवावर खेळुन गावकर्‍यांना सुरक्षीत केले त्यांचे आभार मानुन गप्प बसा.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 11/15/2018 - 04:56 नवीन
तुम्ही सरकारी परमीशन काढुन द्या. सगळंच ऐकीव माहितीवर विसंबुन फुकटचे सल्ले देत सुटतात सगळे आजकाल.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश गुरुवार, 11/15/2018 - 06:07 नवीन
परमशीनची गरज नाही, अवनी फीरत असले ले क्षेत्रसंरक्षीत नाही आहे. उद्याच जा.
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील गुरुवार, 11/15/2018 - 06:50 नवीन
नेत्रेश भाऊ , सरकारी परवानगीची जर गरज नाही तर तुम्हीही चला ना सोबत, आम्ही बछडे शोधतो आणि तुम्ही मेलेल्या लोकांचे सांत्वन करा, किंवा १३ लोक मेले तेव्हा तुम्ही त्यांना वाचवायला का नाही गेलात हे हि सांगा, उगाच अवसान आणू नका कसं? जमलेच तर १३ लोक कसे मेले याचा शोध तुम्ही घ्या , आणि अवनीला मारणे याची खरंच गरज होती का याच्या शोध आम्ही घेतो. येताय का?
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश गुरुवार, 11/15/2018 - 08:06 नवीन
१३ लोक वाघीणीने मारले, शीकार्‍यांनी वाघीणीला मारले, मी तीथे जाउन काय करणार? ज्या लोकांना आंतरजालावर बसुन, नरभक्षक वाघीणीची हत्या न करता जीवंत पकडायला हवे होते, व बछड्यांना आधी पकडायला पाहीजे होते असे वाटले, त्यानी जरा बछड्यांना शोधायला जाउन तीथल्या परीस्तितीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 11/15/2018 - 09:38 नवीन
बर झालं सांगितलत! बाय द वे बछडे सापडलेत अन सुखरुप आहेत. काळजी बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ गुरुवार, 11/15/2018 - 03:22 नवीन
एकदम सहमत
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 11/15/2018 - 05:35 नवीन
कोणत्याही वादात न पडता आणि मानवी आयुष्य हे प्राण्याच्या आयुष्यापेक्षा अनमोल आहे हे तत्व मान्य करून मी काही मुद्दे मांडतो आहे. वाघ हा अन्न साखळीतील( भक्ष्य आणि भक्षक) सर्वात वरचा दुवा आहे. ( वाघ हा कुणाचे अन्न/ भक्ष्य नाही). अन्न साखळीतील एक दुवा निखळला तर संपूर्ण अन्न साखळी अस्ताव्यस्त होते हि वस्तुस्थिती. इथे वाघ शिकार करतो तेंव्हा तो तृणभक्षी प्राण्यांपैकी सर्वात अशक्त किंवा रोगी प्राण्यांना आणि लहान बछड्याना सर्व प्रथम नाहीसे करतो. त्यामुळे या प्राण्यांची संख्या नियंत्रणात राहते. अन्यथा यातील रोगी प्राण्यांमुळे तुमच्या गाईगुरांना रोग होण्याचा मोठा धोका असतो. तृणभक्षी प्राणि अति झाले कि जंगलाच्या बाहेर येऊन तुमच्या शेतीचे नुकसान करतात. राजस्थान गुजरात आणि मध्यप्रदेश या भागात जेथे वाघ (किंवा सिंह) नाहीत तेथे नीलगाय ( हि एक हरणाची जात आहे) या प्राण्याने शेतीवर उच्छाद मांडला आहे. गाय नाव असल्याने लोक तिला(/ त्याला) मारत नाहीत आणि नैसर्गिक भक्षक नसल्यामुळे त्यांची संख्या अफाट वाढली आहे आणि त्यामुळे शेतीचे जबर नुकसान होत आहे. बिबळे एवढ्या मोठ्या प्राण्याला मारू शकत नाहीत. गीर अभयारण्याच्या आसपासच्या भागात नीलगायींचाच काय पण हरिणांचा शेतीला त्रास बराच कमी आहे आणि तेथे सिंह माणसांच्या मदतीने (होय हे सत्य आहे) हरिणांची शिकार करतात याची एक आश्चर्यकारक फिल्म ऍनिमल प्लॅनेटवर दाखवली गेली होती. असे तृणभक्षी प्राणी अफाट वाढले तर ते जंगलात असलेले कोणतेही खाद्य भुकेपोटी खातात. त्यामुळे हरिणासारखे प्राणी झाडाच्या साली सुद्धा खाऊ लागतात ज्यामुळे मोठे वृक्ष सुद्धा नष्ट होऊ लागतात आणि याने जंगलाची अपरिमित हानी होते. वृक्षाचे बीज, लहान रोपटी खाल्ली गेल्यामुळे जंगलाचा ऱ्हास होऊ लागतो आणि वाळलेले वृक्ष माणसे सरपणासाठी तोडू लागतात. वृक्ष नष्ट झाले कि जमिनीची धूप होऊन तेथे पूर येणे सारखे प्रकार होतात किंवा जमिनीची ओलावा धरण्याची क्षमता कमी होऊन जमीन उजाड होऊ लागते आणि अशी अख्खी पर्यावरण सृष्टी (ecosystem) नष्ट होऊ लागते. जेथे वाघ नाहीत तेथे माणसांनी सुद्धा जंगलाची अपरिमित हानी केली आहे कारण जंगलात केंव्हाही जाऊन निर्भयपणे काहीही घेऊन जावे. शिवाय जंगलाच्या बाजूने शेती करण्यास सुरुवात होते आणि जंगल आक्रसत जाते. विस्तारभयामुळे मी येथेच थांबतो. परंतु वाघ मेले तर काय बिघडते माणसाचे पोट भरले पाहिजे असे (गैर)समज असलेले असंख्य लोक आहेत. जंगलाच्या जवळ राहणाऱ्या माणसाला दुसरा पर्याय उपलब्ध करून दिला तर माणूस जंगलाचा आणि पर्यावरणाचा नाश करणार नाही. हे काम सरकारचे आहे यात वादच नाही. सध्या वाघ कि माणूस हा विषय ऐरणीवर आला आहे त्यासाठी कोणतीही बाजू न घेता किंवा भावनेच्या आहारी न जाता वस्तुस्थिती मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न --/\--.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 11/15/2018 - 05:57 नवीन
प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 11/15/2018 - 06:05 नवीन
योग्य शब्दात छान प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 11/15/2018 - 08:47 नवीन
Ecosystem खुप सोप्या शब्दात मांडलीत.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 11/15/2018 - 08:49 नवीन
उत्तम संतुलित प्रतिसाद डॉक्टर.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 11/15/2018 - 09:16 नवीन
वा डॉक मस्त प्रतिसाद . सौ सोनार की तो एक लोहार की . आता हा धागा वामा करा म्हणावं सं. मंडळाने.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर गुरुवार, 11/15/2018 - 09:38 नवीन
अवनीला का ठार मारले, तिला वाचवता आले असते का, माणसाचा जीव महत्वाचा की वाघाचा...बरेच प्रश्न आहेत. मला या घटनेची पूर्ण माहिती नसल्याने त्यावर मला सध्या तरी मत नाही. मुळात ही चर्चा (की हमरीतुमरी?) इथे करून काय होणार आहे मला खरंच कळत नाही पण काही प्रतिसाद बघता एक गोष्ट जाणवते, आपण आपल्या प्रतिसादांमध्ये लगेच हमरीतुमरीवर येतो आणि उद्धट वाटावेत असे प्रतिसाद टाकतो. आपण "तुला काय कळतंय? आलाय मोठा! कवडीची अक्कल नाही आणि चालला इतरांना शिकवायला!" असा छुपा सूर असलेले, वैयक्तिक उणीदुणी काढणारे, समोरच्याची लगेच लायकी काढणारे, भलताच मुद्दा पकडून मूळ मुद्द्यापासून कुठल्याकुठे भरकटत जाणारे आणि त्यावरून समोरच्याची अकारण अक्कल काढणारे असे प्रतिसाद टाकून चर्चेला भांडणाचे रूप देत आहोत का हे तपासून बघायला पाहिजे. वाघाचा मृत्यू किंवा अजून कुठलीही चर्चा असो, वैयक्तिक दुश्मनी करावी असे काही हे विषय नाहीत. किंबहुना कुठल्याच चर्चा तशा नाहीत/नसाव्यात. आपल्या इथल्या कडाक्याच्या भांडणाने हे प्रश्न सुटणारदेखील नाहीयेत. मग अकारण दुसर्‍या व्यक्तीला मूर्खात काढून आपणच कसे श्रेष्ठ आहोत हे अपमानास्पदरीत्या दाखवून देण्याने काय साध्य होत असावे? ते ही अशा विषयांवर ज्याच्याशी आपला थेट संबंध येण्याची सुतराम शक्यता नाही किंवा ज्यांवर आपल्या इथल्या भांडणाचा कणभरदेखील परिणाम होणार नाही! बरे, अशा विषयांतली आपल्याला संपूर्ण माहिती असते का? बहुधा नाही. अशा घटनांमध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग असतो का? अजिबात नाही. मग इथे ज्यांच्याशी आपण इतकी वर्षे संवाद साधतो त्यांच्याशी अशा विषयांवरून वितुष्ट करण्याने काय समाधान मिळत असेल? सहज आठवले. परवा कॅबने कुठूनतरी घरी येत होतो. पौड रस्त्यावर मेट्रोचे काम चालू असल्याने वाहतूकीचे प्रश्न आहेत. एक दुसरी कॅब डाव्या बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. काही कारणामुळे त्याला पुढे जायला अर्ध्या मिनिटाचा उशीर झाला. कारण काय होते माहित नाही. तो जसा पुढे गेला, त्याने खिडकीतून मान बाहेर काढून माझ्या कॅबच्या दिशेने बघत कचकचीत शिवी दिली. "का रे ****द, दिसत नाही का **व्या?" आमचा कॅबचालकदेखील मुरलेला होता. "ये ***द! तुला दिसत नाही का पुढे गाडी आहे ते, ***ल्या?" पुढे जाणार्‍या कॅबला किती उशीर झाला? अर्धा मिनिट! पण संवादाची पातळी बघा, दर्जा बघा! हा संवाद असाच व्हायला पाहिजे का? इतका मोठा प्रॉब्लेम खरंच होता का? पण भारतीय लोकांची ही मानसिकताच आहे. कुणाला म्हणून आपणहून रिस्पेक्ट दिला तर आपली रेषा, आपली वट, आपला जोर कमी पडेल...आणि ते तर अजिबात नकोय! कालपरवाच्या इकॉनॉमिक टाईम्समध्ये नारायण मूर्तींचा सुंदर इंटरव्ह्यू आला आहे. त्यांनी आपल्या या मानसिकतेवर अचूक बोट ठेवले आहे. https://economictimes.indiatimes.com/markets/expert-view/one-cant-hold-modi-responsible-for-faulty-execution-of-reforms-narayana-murthy/articleshow/66616473.cms असो. विषयाला धरून नाहीये पण सांगावसं वाटलं म्हणून सांगीतलं. चुकलं असल्यास माफ करा आणि सोडून द्या. (आधीच माफी मागीतलेली बरी!)
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 11/15/2018 - 09:44 नवीन
तुम्ही तेलाचा तवंग आलेल्या तर्रीवर ताक ओतताय. कृ. ह. घेणे!
  • Log in or register to post comments
स
समीरसूर गुरुवार, 11/15/2018 - 09:51 नवीन
ताक चालेल...मिरचीपूड नको! ;-) नाहीतर आधीच जहाल, मिरचीपूड टाकली तर मग कानातून धूर!
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 11/15/2018 - 10:26 नवीन
हा इफेक्ट सर्व ऑनलाईन न्यूजपेपर्सच्या बातम्यांखाली प्रतिसादांतून उफाळताना दिसतो. लोक सुरुवातीपासूनच थेट आयमाय काढणे, घोडा लावणे, कोणाची माता कोणासोबत आणि एकूणच एकमेकांवर थेट व्यक्तिगत अत्यंत तीव्र हल्ले करतात. हे जवळजवळ सर्वत्र आहे. परस्परांना, बातमीदाराला, संपादकाला, नेत्यांना, लेखकांना सर्वांना लाखोली वाहिली जाते आणि त्यात सर्वात तीव्र कटुता दाखवण्याची स्पर्धा असते. याहून डिटेल उदाहरणं देणं इथे शक्य नाही पण कोणालाही सहज वाचता येईल ऑनलाईन वृत्तपत्रांत. वाचलंच असेल. कदाचित याच कारणाने लोकसत्ताच्या कॉमेंटस अचानक दिसेनाश्या झाल्या आहेत. अमोनिमस होणे याचा पहिला इफेक्ट म्हणजे मनातलं साठलेलं जहर बाहेर टाकणे इतकंच असतं का? त्याचं प्रमाण भयंकर मोठं आहे आणि अस्वस्थ करणारं आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक खदखदत आहेत. फार काही करता येणार नसलं तरी यावर एक वेगळ्या धाग्यात चर्चा व्हावी.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर गुरुवार, 11/15/2018 - 12:42 नवीन
न्यूजपेपर्समध्ये समजू शकतो; तिथे कुठलाच विधिनिषेध नसतो. सगळ्या जगातली शंभर वेगवेगळ्या भाषा बोलणारी, अनोळखी, निरनिराळ्या संस्कृतीची, पार्श्वभूमीची लोकं वावरत असतात. तिथं बातम्या कधी-कधी संताप आणणार्‍या असतात. मिपासारख्या संस्थळावर फक्त मराठी, काहीशी चांगली पार्श्वभूमी असलेली, वाचन-कला यांचा आस्वाद घेणारी/घेऊ शकणारी, जग फिरून पाहिलेली अशी सुज्ञ मंडळी असताना असे व्हावे हे जरा विचित्र वाटते. बरीचशी मिपाकर मंडळी एकमेकांना वैयक्तिकरीत्या ओळखतातदेखील, अगदी मित्र म्हणावेत अशी! शिवाय कट्टे होतात; एकत्र खाणं-पिणं होतं. अशा एका संस्थळावर असे होत असेल तर ते थोडं खटकतं. अमोनिमस होणे याचा पहिला इफेक्ट म्हणजे मनातलं साठलेलं जहर बाहेर टाकणे इतकंच असतं का? त्याचं प्रमाण भयंकर मोठं आहे आणि अस्वस्थ करणारं आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक खदखदत आहेत. मला नेमका हाच प्रश्न पडतो, कसलं आहे हे जहर? लोकं इतकी का खदखदत आहेत? असं काय महाभयंकर घडलेलं आहे यांच्या आयुष्यात? छान एसी खोलीत भरल्या पोटी बसून कुठली खदखद बाहेर निघते आहे? ज्यांच्या मनात जहर किंवा खदखद असायला हवी किंवा असेल ते तर बिचारे ऑनलाईनपासून कितीतरी दूर आहेत. मग हे विनाकरण अहंगंड कुरवाळत इतरांना फालतू म्हणून हिणवणारे नक्की कोण आहेत आणि हे सगळं ते का करतायेत? मला वाटतं हा प्रश्न आपल्या मानसिकतेत दडलेला आहे. आपल्याकडे जो तो स्वतःला बादशाह समजतो...एनीवे...फार काही करता येणार नाही हे मात्र खरं!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 11/15/2018 - 14:07 नवीन
तुम्ही या बचड्यानची चिंता सोडा ते सापडलेत. पण वाघांची संक्रांत काही सुटत नाहीये अजून. आजच चंद्रपूर येथे 3 बचड्याचा रेल्वे ओलांडताना चिरडून म्रुत्यु. वाघीण जिवंत आहे तिचा शोधत चालू आहे .
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल गुरुवार, 11/15/2018 - 16:20 नवीन
अरेरे =:( आता यावरून रेल्वेच्या ड्रयव्हरची नोकरी गेलीच... संदर्भ.. पंजाब मधल्या रावण दहणाचे प्रकरण...
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 11/22/2018 - 06:11 नवीन
अवनीसंदर्भात ही काही माहिती. मला सत्यासत्यता ठाऊक नाही. Revealing FACTS ON AVNI's CASE: The alleged killings in Pandharkawada Division in Pandharkawada started in June 2016. This was right in between the announcement of the cement factory sale by the Ambanis and actual purchase by MP Birla group in August 2016. 1. Feb 2016: Announcement of acquisition of Cement Company from Ambanis -- https://www.birlacorporation.com/media/press-releases/press_release_4feb_2016.pdf 2. August 22, 2016: Purchase completed -- https://economictimes.indiatimes.com/industry/indl-goods/svs/cement/birla-corp-completes-acquisition-of-anil-ambanis-reliance-cement-at-rs-4800-crore/articleshow/53812565.cms 3. August 2017: Announcement of expansion plans for Yavatmal plant in the forest -- https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/birla-corp-to-invest-in-cement-plant-near-ytl/articleshow/59976974.cms * Half decomposed mutilated human bodies, deep inside the forest started being declared by the Forest Department as killings by T-1. No DNA analysis was done to prove TIGER attack. * Compensation of 8 lakhs given to victims’ families without any consideration of the fact that they were illegally inside the forests. No forest rights allows grazing to be done INSIDE forests or Forest Development Corporation of Maharashtra (FDCM). * Locals can’t use the forest for grazing as they have not been given any rights under CFR or PESA. It is indeed illegal to graze inside the forests and the FD is making up excuses for their lack of capability and their incompetence by saying the locals taking cattle inside the forests are not truly illegal graziers. 4. January 22, 2018: Notification of forest land diversion --https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/civic/465-hectares-forest-land-to-make-way-for-cement-plant/articleshow/62611657.cms * Within 7 days of the notification of forest land’s official diversion to the Ambanis, on 22 January 2018, the first shoot to kill order for the Tigress was issued by the PCCF on 29th January 2018. * Eye-witnesses were illegally taking their cattle into the forest’s waterbody where the new mother -- Tigress and her cubs lived. * The post-mortem report does not even mention time of death. No clarity if the injuries were ante-mortem and it was a decapitated body of an illegal grazier. * The PCCF hastily called Shafat Ali Khan the very day to shoot the Tigress and was officially reprimanded for this. * No DNA analysis was done to ascertain if there was Tigress DNA on the body either before the shoot-to-kill order was issued by the PCCF. Now, the sanitizing of the Forest for the expansion plans of the cement factory also meant that the PCCF hastily issued the capture order for the MALE Tiger, T-2. 5. August 8, 2018: Announcement of expansion and new mega cement plant for another 2000+ crores -- https://economictimes.indiatimes.com/industry/indl-goods/svs/cement/birla-corporation-to-set-up-greenfield-cement-plant-in-maharashtra-for-rs-2450-crore/articleshow/65278960.cms Birla Cement Board meeting held on Saturday, August 4, 2018, announces expansion plan for Yavatmal plant located in Mukutban, Pandharkawada Forest. Doubling of capacity, creation of captive thermal plant, and a heat-recovery plant. On the same day, after a long gap of 6+ months, a Forest Dept. 'Field Monitoring Team' allegedly spots the tigress and cubs (one of the ONLY actual sightings), and later that same day, in the evening, a human kill is reported.
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील गुरुवार, 11/22/2018 - 07:02 नवीन
खूप महत्वाची माहिती दिलीत, वन आणि वन्य प्राण्यांबद्दल आपले शासन आणि नागरिक किती गंभीर आहेत हे या विषयावर दिसले.
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Fri, 12/07/2018 - 07:10 नवीन
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या समितीने दिलेला हा अहवाल. एक वाघ काय मारला तर असे अश्रू ढाळत आहेत जणू यांच्याच घरातला कोणी मेला, किंवा मारल्या गेलेल्या लोकांच्या घरातले दुःखचे तुम्हाला काही पडले नाही का? मारू दे कि वाघ ... असे बोलणारे आता हा अहवाल वाचून काय स्पष्टीकरण देतील वाघाचा खून केल्याचे?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा