Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

तोळा तोळा

ल
लौंगी मिरची
Wed, 11/07/2018 - 04:53
ओठांवरचे शब्द बोलके पापण्यांचे खेळ ते बालिश तुझ्या मिठितले श्वास जिवंत स्पंदनातुनहि बरसतो आशीष... तुझ्या माझ्यातली प्रित बहरतेय , मोहरतेय , दरवळतेय त्या रातराणी सारखी . उगाच फुलुन येते रात्रीची .गंधाळलेला आसमंत , त्यात ती एकटीच नसते , सोबत असते चांदण्यांची . शांत रात्रीची , मुग्ध रातकिड्यांची . तुला आठवतय ?पहिल्यांदा पाहिलं तुला तेव्हा थबकले होते मी , नजरेत अडकलास माझ्या , बरेच दिवस फक्त तुला शोधण्यातच घालवले , आणि मग भेटलास , भेटलास तो हि असा , मुक्त ,स्वच्छंदि .. सतत गर्दि आजुबाजुला . वाट काढणहि मुश्किल होतय . पण त्यातहि माझे प्रयत्न तुला मिळवण्याचे . कधी कधी तुझ्या पाठमोर्या आक्रुतिवरहि मी फिदा असते . सरळ पण आडव्या बांध्याचा तु . एखाद्या उंच पर्वतासारखा वाटतोस , ऐकुन घेतोस माझं .. कधी त्या जराशी विसावलेल्या झाडासारखा भासतोस.. तुझ्या पाठीवर डोकं ठेवुन सुख दु:खात भागिदारी करायची असते मला . तुझं ते वार्याकडे तोंड करुन उभं राहाणं , चेहर्यावरचे हावभाव बदलणं , ओठांना एकिकडे गालात ओढुन हसणं , जिवघेणं स्मायिल. जगात याशिवाय मनमोहक काहि असुच शकत नाहि यावर शिक्का मोर्तब होतो माझा . हरवल्यासारखं विश्व असतं हल्ली माझं . तुझी वाट पहाणं , तुला पहाणं , तु दिसलास कि आजकाल माझ्या काळजाची धडधड मलाच ऐकु यायला लागलिये . श्वासांचे मजले जड पावलांनी चढल्यागत वाटतं . तुला पाहिलं कि मन अलगद वार्यासोबत झुलतं . शहारतं , बहकतं , माझं अंतरमन माझ्यासोबतच चढाओढ करतं ... थांबतं . आणि तु नेहेमीसारखाच असतोस , तुझ्या बोलण्यात वेगळीच लकब , भारदस्त आवाज त्याला रुजव्याची किनार .माझ्याशी बोलताना सतत माझं तुझ्याकडेच लक्ष आहे ना ,ह्याची खात्री करणं . माझ्या बोलण्यावरुन माझा अंदाज घेणं , दोघांमधले नेमके दुवे शोधणे ... हे जे करतोस त्यातच तर अडकतो माझा श्वास . गुंतणं माझ्या हातात नव्हतं , थांबवणं तुला जमत नव्हतं , ओघळत्या भावनांशी सलगी करण्यात तुझं माझं विश्व एकदम मग्न होतं . अफलातुन होतं सगळच . सोडुन दिलं मग मीहि स्वताहाला समजावणं , तुझ्याकडुन उत्तर मिळालं , त्या उत्तराच्या जोरावर सगळे डाव मांडले. आता फक्त खेळायचं .. तुझ्यासाठी तोळा तोळा झुरायचं , तुझ्यात मनसोक्त गुंतायचं तुझ्या मागे बिरभिरणारं मन तुझ्यासोबतच जपायचं ...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1455 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा