Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मला भेटलेले रुग्ण - १८

ड
डॉ श्रीहास
Tue, 11/06/2018 - 06:23
💬 7 प्रतिसाद
https://www.misalpav.com/node/42929 “डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”..... टिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला .... ह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा !!” टिबीच्या औषधांचे काही कॉमन साईड इफेक्टस म्हणजे लाल रंगाची लघवी होणे, ॲसिडीटी (उलट्या + मळमळ) वाढणे, गळून गेल्यासारखं वाटणे . क्वचित किंवा Rare साईड इफेक्ट्स म्हणजे संपूर्ण अंगाला खाज येणे, सांध्यांना सुज येणे , डोळ्यांचा त्रास म्हणजे Colour vision ह्याशिवाय यकृत/Liver वर परिणाम होऊन काही दिवस औषधे थांबवून परत सुरू करता येतात.... पण टिबी आणि त्याच्या औषधांचे भयंकर साईड यांचा आपल्या लोकांवर ईतका काहीतरी मोठा गैरसमज आहे की बरेचदा ह्याचं निवारणच टिबीपेक्षा अवघड काम असतं. _________________॰_______________ “टिबी नही है”....... म्हणताक्षणी बापलेकांनी भरल्या डोळ्यांनी दोघांनी नमस्कार केला आणि धन्यवाद म्हणाले, खर त्या मुलाचा टिबी बरा होऊन २ वर्षे झालेली पण हा टिबीच आहे ह्या भ्रमात होते आणि ह्या सगळ्याचा खूपच त्रास होता... त्याच्या श्वासाची तपासणी केल्यावर दमा आहे हे सांगितलं आणि ही टिबीची लक्षणं नाहीत हे समजावून सांगीतलं ..... त्यांना असलेल्या दम्यापेक्षा नसलेल्या टिबीची भितीच जास्त होती !! मला तर जास्त आनंद त्यांच्या मानगुटीवर बसलेल्या टिबीच्या भुताला उतरवल्याचा होता :)) _________________॰_______________ औषध बदलून दिलं तरी सर्दी कमी होत नव्हती , पेशंट फोनवरून सांगत होता आणि मला जाणवत होतं की काही तरी गडबड होते आहे .... नाकात टाकायचे ड्राॅप्स कसे घेता हे विचारल्यावर पेशंट म्हणाला की तुम्ही सांगीतल्याप्रमाणे पाण्यात २ ड्राॅप्स टाकतो आणि पाणी गरम करून वाफ घेतो. डोक्याला हात मारायची माझी पाळी होती कारण नाकात २ ड्राॅप्स टाकून नंतर गरम पाण्याची वाफ घेणे अश्या क्रमाने करायची क्रिया लिहून दिल्यावरही ही पेशंटनी गडबड करून दाखवली होतीच. ही हसवणारी घटना मला हे शिकवून गेली की पेशंट बरेचदा चुका करतात आणि आपण डाॅक्टर्स कधी कारणीभूत नसलो तरी communication gap मुळे असं होऊ शकतं...! __________________॰______________ “हा दमा आहे”....... रिपोर्ट बघत पेशंटशी बोललो , त्यावर त्यांनीच प्रतिप्रश्न केला “मी तर नियमीत व्यायाम करतो, तरी मला दमा झालाच कसा ?”. हा एक गैरसमज आहे की व्यायाम केला तर दमा होऊ शकत नाही किंवा दमा असतांना तुम्ही व्यायाम किंवा शारिरीक श्रमाच्या गोष्टी करू शकत नाही... त्या पेशंटला समजावतांना हेच म्हणालो दम्याचा आणि तुमच्या क्षमतेचा काहीही संबंध नाहीये कारण बरेचसे खेळाडू (पि.टी. उषा, सौरव गांगुली, ईयान बोथम,पि.कश्यप, शोएब अख्तर ) अभिनेते (अमिताभ बच्चन , प्रियांका चोप्रा) ही लोकं दमा असतांनाही यशस्वी का होऊ शकली ? कारण दम्याचं योग्य निदान आणि योग्य उपचार केवळ ह्यामुळेच ! “त्यासाठी तुमचा नियमीत व्यायाम चालू द्या आणि नियमीत उपचारांनी दम्यावर योग्य नियंत्रण आणून औषधं कमी किंवा बंद देखील करू...!” हे सांगीतलं. _______________•________________

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5735 views

💬 प्रतिसाद (7)
श
शैलेन्द्र Tue, 11/06/2018 - 06:48 नवीन
अल भारी झालाय भाग
  • Log in or register to post comments
भ
भ ट क्या खे ड वा ला Tue, 11/06/2018 - 06:52 नवीन
मस्त जमलाय . यशस्वी दमेकरी माहीत नव्हते इतक्या संख्येने असतात हे
  • Log in or register to post comments
द
देशपांडेमामा Tue, 11/06/2018 - 07:34 नवीन
तुमच्या लेखातून दर वेळी नवीन माहिती मिळत असते. दम्याबद्दल प्रचंड गैसमज अजूनही आहेत लोकांमध्ये. तुमचे अनुभव लेखन वाचुन दमा हा सुद्धा इतर आजारांसारखाच साधा आजार आहे ही माहिती रुजण्यास मदत होईल देश
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Tue, 11/06/2018 - 12:13 नवीन
सुंदर.... नेहमी प्रमाणेच.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Tue, 11/06/2018 - 12:38 नवीन
नेहमीप्रमाणे हा भाग सुद्धा छानच झालाय! तुमच्या या लेखमालेचा नवीन भाग आला की आधी वाचून घेते. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात बरेचवेळा कम्युनिकेशन गॅप होतो आणि अश्या गमती होतात (काही वेळा मात्र ती गंमत न राहता गंभीर होवू शकते.)
  • Log in or register to post comments
व
वन Mon, 11/19/2018 - 07:29 नवीन
आणि उपयुक्तही .
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 11/19/2018 - 07:35 नवीन
हा भागही आवडला पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा