दिवाळी आणि दिवाळी अंक २०१८
मराठी घरांमधून फटाके, फराळ, रांगोळ्या, देवता पूजन, आका़शकंदील, गोडधोड ह्यांसोबत दिवाळी अंक घरात आल्याखेरीज दिवाळी सुफळ संपूर्ण साजरी झाल्यासारखी वाटत नाही. आजच्या जमान्यात नेहमीच्या पारंपारिक अंकसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही उपलब्ध असतील.
ह्या वर्षी मात्र मला अजून एकही दिवाळी अंक घेता वा बघता आलेला नाही - अगदी ऑनलाईन अंकही. फारच वाईट! तरी अंकांविषयी उत्सुकता आहेच. जास्तीत जास्त दिवाळी अंक वाचायला मिळावेत म्हणून ग्रंथालयाचे सदस्यत्व घ्यायचाही विचार आहे, म्हणजे घेईनच. जसजसे वाचेन, तसे इथे लिहीन. तुम्ही कोणी पारंपारिक अंक विकत घेतलेत का? किंवा ऑनलाईन अंक पाहिलेत, वाचलेत का? तर इथे त्या अंकांविषयी लिहा, ही विनंती.
मिपाचा दिवाळी अंकही लवकरच प्रकाशित होईल, तोही वाचायचा आहेच.
अंकांच्या किंमतीही भरमसाट वाढल्या आहेत म्हणा. तरीही एका तरी अंक दिवाळीच्या निमित्ताने घरी आणावासा वाटतो. एकच दिवाळी अंक घरी आणायचा, असं ठरलं तर तुम्ही कोणता अंक आणाल?
💬 प्रतिसाद
(64)
य
यशोधरा
Wed, 11/14/2018 - 10:11
नवीन
मौज दिवाळी अंक घेऊन आले आहे. बराच भरगच्च अंक दिसतो आहे.
कवितांवरून नजर फिरवली आहे त्यात धामणस्कर ह्यांची किसन ही कविता फार चुटपुट लावणारी आहे. सुरेख. सगळ्या वाचल्या नाहीयेत अजून. पाहत राहतं झाड ही पण एक सुरेख आहे, हेमकिरण पत्की ह्यांची. अजूनही बऱ्याच आहेत, वाचायाच्यात. सशक्त कविता विभाग बघूनच मस्त वाटले! 3 कथा दिसताहेत आणि बाकी अंकात ललित प्रकारचं लेखन अधिक दिसतं आहे. ते बघूनही आनंद झाला. चांगलं ललित प्रकारातलं लेखन वाचायला आवडतं.
वाचून अधिक लिहिते.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Sat, 11/17/2018 - 10:37
नवीन
मला मौजेतले लेख अधिक आवडले कथांपेक्षा. कथादेखिल चांगल्याच आहेत पण मौजेकडून ज्या अपेक्षा असतात तितपत ग्रेट वाटल्या नाहीत. परिसंवाद उत्तम. लेखांपैकी नरेंद्र चपळगावकरांचा मधु लिमयेंवरचा, आलोक कुलकर्णींचा वडिल श्री. वि. कुलकर्णिंवरचा, मिलिंद बोकिलांचा माया संस्कृतीवरचा आणि मुंबै नगरी ग बडी बाका हे चार लेख अतिशय आवडले. दासू वैद्यांची कविता अप्रतीम. खुप म्हणजे खुप आवडली.
बाकी, पुण्यात जुने दिअंक कुठे मिळू शकतील कुणी सांगू शकेल का? मला १४, १५, १६, १७ चे मौजेचे अंक हवे आहेत.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 11/17/2018 - 15:19
नवीन
मी कथा वाचल्या नाहीत, कदाचित वाचणारही नाही. हल्ली बऱ्याच कथांचा ठराविक फॉर्म्युला झालाय, असं वाटतं. वाचायला सुरुवात केली की तोच तोच पणा वाटत राहतो.
खरं सांगायचं तर ह्या वर्षीचा मौज मला जरा ढिसाळ कारभार वाटला. काही विभाग चांगले आहेत, जसं की, लेख विभाग. त्यातील सगळे लेख मला आवडले. तुम्ही उल्लेख केलाच आहे. मात्र, एलकुंचवार ह्यांच्या ललित लेखनाचा आढावा घेणारा लेख जरा अहवाल लिहील्यासारखा वाटला. :( प्रभाकर कोलत्यांनी प्रभाकर बरवे ह्यांच्यावर लिहिलेला लेख आणि चित्रांचे फोटो आवडले.
व्यक्तिचित्रे विभागातील तीनही लेख आवडले. अटलजी, श्रीनिवास कुलकर्णी आणि मधू लिमये ह्यांच्यावरचा. परिसंवाद विभाग अजून वाचून व्हायचाय. उद्या. राहिलेल्या कविताही.
सगळ्यात नावडता लेख म्हणजे लुआंग प्रबांग. किती वाईट. आणि दुसरी चूक म्हणजे डायान फॉसी म्हणून सिगुर्नी वीवरचा फोटो लावलाय! डायान वर जो सिनेमा निघाला त्यात सिगुर्नी ने डायानची भूमिका केली आहे. आणि डायानचे फोटो उपलब्ध आहेत की! म्हणजे ही लेखिकेची चूक म्हणावी की संपादिकेची की अजून कोणी प्रुफे वगैरे तपासतात त्यांची?
- Log in or register to post comments
प
पुंबा
Sat, 11/17/2018 - 16:12
नवीन
जीएंचा लेख किती वाईट आहे हे दुर्दैवाने मला कळू शकले नाही कारण तुम्ही उल्लेखलेला ढिसाळपणा. अक्षरशः पहिलेच पान दोनदा जोडले आहे, उरलेला लेख गायब.
विनया जंगलेंबाबत बरेच ऐकले होते, १६, १७ च्या अंकात त्यांनी लिहिलेले लेख उत्तम असल्याचे बरेच वाचले होते, मला त्यांचा लेख एवढा खास वाटला नाही. चित्रासंबंधीची चूकतर फार भयाण. अक्षम्य म्हणावीशी.
संपादिकेच्या चुका अंकात दिसल्याच. पण लेखकांच्या निवडीबाबतपण अनेकांनी आक्षेप नोंदवलेला दिसला. सतततत त्याच त्याच लेखकांचे लेख छापले जाताहेत असे म्हटले जात आहे. तिथेच संपादिका केवळ सोमवारी १ ते ३ येतात व मौज नवोदितांनी पाठवलेल्या कथा- लेखांबाबत काय झाले हे वेळेवर कळवण्याचीदेखिल तसदी घेत नाहीत अश्या वदंता ऐकल्या.
कवितांचा सेक्शन मला सो सोच वाटला मला तरी.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 11/16/2018 - 14:04
नवीन
अनुभव, मुशाफिरी आणि पासवर्ड दिवाळी अंक ई-अंक स्वरूपात विकत घ्यायचे असतील तर खालील लिंक्सवरून घेऊ शकता.
• अनुभव दिवाळी अंक २०१८
https://imojo.in/anubhavdiwali18
• मुशाफिरी २०१८
https://imojo.in/mushafiri2018
• पासवर्ड २०१८
https://imojo.in/password2018
- Log in or register to post comments
प
प्रसाद प्रसाद
Sat, 11/17/2018 - 13:45
नवीन
मी खालीलप्रमाणे दिवाळी अंक घेतले ह्या वर्षी. किमती भरमसाठ वाढवल्या आहेत या वर्षी –
१. माहेर
२. मेनका
३. चंद्रकांत
४. धनंजय
५. आवाज
६. झी मराठी
७. उत्तम अनुवाद
८. मानिनी
९. ग्राहकहित
माहेरमधील सुरवातीच्या काही गोष्टी वाचल्या, मला चांगल्या वाटल्या, मला वाटतंय मंगला गोडबोलेंची कथा या वर्षी माहेरमध्ये नाहीये. मेनकाची पहिली कथा मात्र मेनकेच्या परंपरेला बिलकुल साजेशी नाही, एव्हढी सरळ सरधोपट पहिली कथा कशी घ्यावी संपादकांनी ते कळत नाही. पुढच्या गोष्टी चांगल्या आहेत. धनंजयमध्ये पण कथा बर्या आहेत. निम्म्यावर वाचत आलोय पण अगदी छान वाटावी अशी कथा अजून वाचनात आली नाही. दरवर्षीच्या प्रतिथयश लेखकांनी अगदी पाट्या टाकल्यात. किमतीच्या मानाने धनंजय सुमार आहे. पूर्वीचा धनंजय काय उत्तम असायचा. उत्तम अनुवाद वर हयावर्षी फेसबूक वर उत्तम समीक्षण आले म्हणून घेतला पण म्हणाव्या अशा कथा नाहीत, एखाद दुसरी बरी आहे. आवाजची पहिली खिडकी लहान मुलांच्या एखाद्या अंकासारखी आहे, अजून पुढे वाचला नाही. चंद्रकांत अजून वाचायला घेतला नाही. गेल्या वर्षी, वरच्या यादीपेक्षा ३-४ अंक जास्त घेतले होते किस्त्रीम, जत्रा, वगैरे... किमती प्रचंड वाढल्याने या वर्षी काटछाट केली. गेल्या वर्षी सर्वोत्तम अंक माझ्यामते ग्राहकहितचा होता, दर्जाच्या मानाने किममत नगण्य त्यामुळे हयावर्षीपण घेतला, किमतीच्या मानाने अंक अजूनही बरा आहे – १०० रु.ला मिळाला. पण गेल्यावर्षी इतका उत्तम नाही.
हयावर्षी ह्या अंकांचं काय गणित चुकलय कळत नाहीये, अजून एक दोन अंक वाचायचे आहेत, त्यामुळे आशा आहे. पण किमतीच्या तुलनेत मनोरंजन मूल्य चांगलच घसरलंय असं वाटतंय.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Tue, 11/20/2018 - 09:57
नवीन
इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र या शाळेतल्या तासांची आठवण होतेय का ? उजळणी करावीशी वाटतेय ? मग ‘कालनिर्णय’चा अंक वाचायला घ्या !!
ही बघा काही लेखांची यादी :
१. पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांचे योगदान, चर्चिल चे छुपे युद्ध, द ग्रेट गेम १९१७.
२. ब्रम्हदेश, ग्रीस, सायलेंट valley, पाखरांचे स्थलांतर,
३. युक्रांद : संघटित युवाशक्ती
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 11/20/2018 - 12:27
नवीन
मौजेचा अंक परत केला आणि परिसंवाद वाचायचेच राहिले. पुन्हा आणायला हवा. आज लोकसत्ता दिवाळी अंक घेऊन आले. त्यात पुढल्या वर्षाचं भविष्य वाचून जरा तरतरी आली! =))
काश्मीर मधील परिस्थितीची उकल करणारा महेश सरलष्कर ह्यांचा लेख खूप आवडला. अजून वाचून झाल्यावर पुढे लिहिते.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sun, 12/23/2018 - 09:13
नवीन
थोडाफार लोकसत्ता वाचला अजून पण फारसे काही पकड घेणारे वाटले नाही, म्हणजे वाईट होते असेही नाही पण नाही क्लिक झाले. माबुदो असावा.
उत्सव नात्यांचा, धनुर्धारी, एक कोणता तरी अजून आणलेला - नाव आठवत नाही - ठीक ठाक. धनुर्धारी मध्ये खरं तर साळगावकर ह्यांचा गोव्याच्या आठवणींबद्दलचा लेख छान आहे पण तो अर्धवटच आहे! :(
अजून कोणी काही वाचले का?
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 12/23/2018 - 10:59
नवीन
नुकताच यंदाच्या ‘लोकमत’ दिवाळी अंकातील द.कोरिआबद्दलचा लेख वाचला. त्यांच्या सोल या राजधानीची लोकसंख्या आहे १.१० कोटी. तरीही तिथे अंगावर येणारी गर्दी वा कलकलाट नाही. याचे कारण दीर्घकालीन नियोजन व अंमलबजावणी.
त्यातले ठळक मुद्दे:
१. अनेक कार्यालये व उद्योग दूरच्या शहरांत जाव्यात यासाठी करसवलती आणि प्रोत्साहन दिले.
२. मेट्रोची सुसज्ज आणि कार्यक्षम व्यवस्था. लोक ही वापरतात कारण:
a) खाजगी वाहन पार्क करायचे शुल्क जबरी आहे व
b) taxi सेवा मरणाची महाग आहे.
सोलची लोकसंख्या मुंबईशी तुलना करण्याजोगी असल्याने हे आशियाई उदाहरण भावले.
(हा प्रतिसाद मी 'जय जवान' या धाग्यावरही लिहिला आहे).
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 12/24/2018 - 12:33
नवीन
हो, लोकमत अंक आवडला मला.
- Log in or register to post comments
र
राघव
Sun, 12/23/2018 - 16:19
नवीन
मागच्या ३-४ वर्षांपासून दिवाळी अंक विकत आणून वाचणे बंद झालेय. कुठे कुणाकडे मिळाला तर चाळून बघतो.
तसं गूढ कथा म्हणून नवल आवडायचा. धनंजय, किस्त्रीम, जत्रा, माहेर, मेनका, मटा.. बरीच चांगली होतीत/आहेत. प्रसाद आणि संतकृपा नागपुरात येतातच घरी, बाबांमुळे.
बाकी दिवाळी अंक म्हटले म्हणजे "अ ब क ड ई" ची आठवण आल्यावाचून राहत नाही. एका विषयाला धरून संपूर्ण अंक प्रसिद्ध करायचा म्हणजे येरागबाळ्याचे काम नोहे. पण बंद झाले कधीच. "अ ब क ड ई" चे जुने अंक मिळालेत तर वाचायला आवडतील.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 12/27/2018 - 08:20
नवीन
कालनिर्णय दिवाळी अंक हातात आलाय. जरासा चाळून झालाय आणि आवडलाय. वाचन सुरू झाले की लिहिते अधिक. अजून कोणी वाचलाय का कालनिर्णय?
- Log in or register to post comments
न
नाखु
Sun, 01/06/2019 - 16:54
नवीन
दिवाळी अंक वाचत आहे,(वाचनालय मुदत चार महिने असल्याने तब्येतीत वाचन)
कोकण रेल्वेची कुंडलीसह विवेचन करणारा लेख आहे.सरकार बदलेले की आडकाठी आणली होती त्याचे दुष्परिणामही आणि तपशीलवार वर्णन आहे.
लेखक पत्रकार नसून कोकण रेल्वे अभियंता म्हणून सक्षम जबाबदारी निभावलेला पुरस्कार प्राप्त अधिकारी आहेत.
रेल्वे मंत्री आणि त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी करणारे यावर आपले मत व्यक्त केले आहे.
अंक जालावर उपलब्ध नाही.
मुद्रीत प्रत वाचायला हवी.
नाखु वाचकांची पत्रेवाला
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2