Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
दिवाळी अंक

कर्ण आणि कृष्ण

श
शैलेन्द्र
Mon, 11/05/2018 - 19:30
💬 18 प्रतिसाद
H
कर्ण आणि कृष्ण
कर्ण व्हावे की कृष्ण व्हावे? कृष्ण व्हावे की कर्ण व्हावे? जे आपले असते तेच द्यावे की द्यावे तेही आपले रहावे? रक्तगर्भी वारसा जखमेचा सांभाळून ठेवावा उरात की, स्वतःच्या आशेचेच कवच स्वतःच्या जिवाला शिवावे? परशुरामाचे शाप आळवत खेचावी प्रत्यंच्या रागावून, की कमलकरांनी जग जिंकून पुन्हा कुणाचे रथ हाकावे? तेजाळल्या दुखऱ्या व्यथांचा कुणी सुयोधन बाजार मांडेल की त्याची वाट पाहण्यापेक्षा आपले पार्थ आपण शोधावे? अनाहूत स्वयंवराचा अपमान आयुष्याशी जुगारात तोलावा, की कडूजहर विष पचवूनही कालियाच्या फण्यावर नाचावे? नियतीच्या सारिपाटावर दान कधी असे पडेल कधी तसे, मस्तकी डोंब पाजळत फिरावे की राख होऊन पुन्हा हसावे? कर्ण व्हावे की कृष्ण व्हावे? कृष्ण व्हावे, हो, कृष्णच व्हावे कधी कुणाचे कवच व्हावे, कधी कुणाचे कुंडल व्हावे!! H

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 19700 views

💬 प्रतिसाद (18)
य
यशोधरा Tue, 11/06/2018 - 07:28 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 11/06/2018 - 12:14 नवीन
आहा...सुरेख. खुप आवडली कविता.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 11/06/2018 - 15:29 नवीन
उत्तम रचना आणि आशयही !
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 11/07/2018 - 04:14 नवीन
फारच सुरेख अर्थगर्भी.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 11/07/2018 - 11:27 नवीन
मस्त..
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 11/07/2018 - 11:47 नवीन
कर्ण व्हावे की कृष्ण व्हावे? कृष्ण व्हावे, हो, कृष्णच व्हावे कधी कुणाचे कवच व्हावे, कधी कुणाचे कुंडल व्हावे!! छान.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 11/07/2018 - 15:25 नवीन
व्वा..! सुरेख रचना.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Wed, 11/07/2018 - 18:17 नवीन
आशयपूर्ण रचना
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Fri, 11/09/2018 - 07:21 नवीन
वाहवा. मस्तच.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 11/09/2018 - 07:58 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/09/2018 - 09:09 नवीन
कर्ण किंवा कृष्ण... आपल्या मनसिकतेला झेपेल असे कोणीही व्हावे. दोन्ही पचवायला तितकेच कठीण !
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 11/09/2018 - 10:07 नवीन
मला तर वाटते संजय व्हावे, डीटीएचचे बिलहि न भरता ईलईडी टीव्हीचा हप्ता नसता निवांत घरी बसून युध्द पाहावे एखाद्या अंधाला स्टोरी सांगण्याचे पुण्य कमवावे. . विनोदाचा भाग अपार्ट, कविता आवडली. सुरेख
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Mon, 01/07/2019 - 08:52 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Mon, 01/07/2019 - 13:58 नवीन
काय सुंदर पोत जमलाय. मस्त.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 01/07/2019 - 15:03 नवीन
धागाकर्ता आणि आपला अभ्या दोघेही सुस्साट न अफ्फाट
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Sun, 02/17/2019 - 15:35 नवीन
खूप आवडली कविता
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sun, 02/17/2019 - 16:02 नवीन
अरेच्या ही कविता कशी काय नजरेतून सुटली . अप्रतिम रचना !
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/28/2019 - 13:00 नवीन
सुरेख कविता, आशय सुंदर आहे. आवडली.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 26 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 30 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 33 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा