Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
दिवाळी अंक

चकली

स
स्वाती दिनेश
Mon, 11/05/2018 - 19:30
💬 15 प्रतिसाद
चकली
दिवाळीच्या फराळात चकली ही अगदी हवीच हवी. पण हवी तेव्हा चकलीची भाजणी उपलब्ध न होणार्‍या ठिकाणी राहिल्यावर कुठली चकली नि काय.. एकदा असाच चकलीचा खमंग विषय चालला असता माझ्या भावजयीने तिच्या आईच्या - डॉ. दीपा कोल्हटकरांच्या ह्या रेसिपीने केलेल्या चकल्या खाल्ल्यावर भाजणीचा हा प्रश्न सुटला. तर ह्या बिनभाजणीच्या चकल्यांसाठीचे साहित्य - १ वाटी तेल, १ वाटी मैदा, १ वाटी बेसन किवा फुटाण्याचे डा़ळे, ४ वाट्या तांदळाचे पीठ. ओवा, मीठ, तिखट, तीळ - चवीनुसार कृती - बेसन/फुटाण्याचे डाळे भाजून घ्या. बेसन, मैदा, तांदळाचे पीठ, ओवा, मीठ, तिखट , तीळ हे सर्व एकत्र मिक्स करून घ्या. तेल गरम करा. हे गरम तेल वरील मिश्रणात घाला व कालवून ठेवा. साधारण तासभर झाकून ठेवा. तासाभराने ते परत एकदा चांगले कालवा. एका सोर्‍यापुरतेच पीठ भिजवा व चकल्या पाडा व तळा पुढच्या घाण्यासाठी प्रत्येक वेळी तेवढेच पीठ भिजवून चकल्या पाडा. .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 20263 views

💬 प्रतिसाद (15)
म
मुक्त विहारि Tue, 11/06/2018 - 08:06 नवीन
बायकोला वाचायला देतो...
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 11/06/2018 - 08:11 नवीन
+१
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 11/06/2018 - 17:08 नवीन
+२
  • Log in or register to post comments
म
मित्रहो गुरुवार, 11/08/2018 - 14:13 नवीन
बायकोला वाचायला दिले... आता अशी पण चकली हवी ज्यात पिळण्याचा त्रास नाही.
  • Log in or register to post comments
म
मीअपर्णा Tue, 11/06/2018 - 17:07 नवीन
चकली माझा विक पाॅइंट. या चकलीत १ वाटी तेल पाहून करेन का माहित नाही पण मस्त रेसिपी. यम्म :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 11/07/2018 - 04:25 नवीन
अटक मटक, चकली चटक! मस्त गं स्वातीताई!
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Wed, 11/07/2018 - 11:49 नवीन
मस्त बिनभाजणीची चकली.
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई गुरुवार, 11/08/2018 - 16:01 नवीन
ह्या चकल्या फक्त खाल्ल्या की करुन देखिल पाहिल्या? खमंग होतात का ? बाय द वे, फराळाचा व्यवसाय अगदी घराघरातून चालतो. ते लोक चकली खुशखुशीत पण फार तुटणार नाही, रंग सोनेरी, अशी अगदी हुकमी छान चकली कशी करतात? असा अगदी नो-फेल फॉर्म्युला असतो का ? चकली मधले असंख्य वेरिएबल्स कसे मॅनेज करतात?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 11/08/2018 - 16:23 नवीन
स्वातीताई, मी उद्या तुझ्या ह्या पद्धतीने चकली करणारे. तुला सांगीन कशा झाल्या.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Fri, 11/23/2018 - 02:19 नवीन
आम्हाला पण थोड्या पाठवा, म्हणजे आम्हीपण स्वातीताईना त्या कश्या झाल्या त्या सांगू. (हलकेच घ्या) - चकलीचा भोक्ता.
  • Log in or register to post comments
ल
लौंगी मिरची Sat, 11/10/2018 - 14:25 नवीन
करुन बघते :)
  • Log in or register to post comments
ज
जुइ Sat, 11/10/2018 - 18:28 नवीन
इथेही भाजणी मिळत नाही त्यामुळे या प्रकारच्या चकल्या नक्की करून बघणार आहे. माझ्या आईनेही मैदाच्या चकल्या पूर्वी केल्याच्या आठवत आहे.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 11/11/2018 - 17:53 नवीन
मस्तं चटकदार रेसेपी.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Mon, 11/12/2018 - 15:54 नवीन
मस्त ग स्वातीताई, करून पहाते
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 11/25/2018 - 08:48 नवीन
वा... मला चकली पेक्षा कडबोळी जास्त आवडतात. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aastha Gill - Buzz feat Badshah | Priyank Sharma | Official Music Video
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 48 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा