दिवाळीच्या फराळात चकली ही अगदी हवीच हवी. पण हवी तेव्हा चकलीची भाजणी उपलब्ध न होणार्या ठिकाणी राहिल्यावर कुठली चकली नि काय..
एकदा असाच चकलीचा खमंग विषय चालला असता माझ्या भावजयीने तिच्या आईच्या - डॉ. दीपा कोल्हटकरांच्या ह्या रेसिपीने केलेल्या चकल्या खाल्ल्यावर भाजणीचा हा प्रश्न सुटला.
तर ह्या बिनभाजणीच्या चकल्यांसाठीचे साहित्य -
१ वाटी तेल, १ वाटी मैदा, १ वाटी बेसन किवा फुटाण्याचे डा़ळे, ४ वाट्या तांदळाचे पीठ.
ओवा, मीठ, तिखट, तीळ - चवीनुसार
कृती -
बेसन/फुटाण्याचे डाळे भाजून घ्या.
बेसन, मैदा, तांदळाचे पीठ, ओवा, मीठ, तिखट , तीळ हे सर्व एकत्र मिक्स करून घ्या.
तेल गरम करा. हे गरम तेल वरील मिश्रणात घाला व कालवून ठेवा. साधारण तासभर झाकून ठेवा.
तासाभराने ते परत एकदा चांगले कालवा.
एका सोर्यापुरतेच पीठ भिजवा व चकल्या पाडा व तळा
पुढच्या घाण्यासाठी प्रत्येक वेळी तेवढेच पीठ भिजवून चकल्या पाडा.
ह्या चकल्या फक्त खाल्ल्या की करुन देखिल पाहिल्या? खमंग होतात का ?
बाय द वे, फराळाचा व्यवसाय अगदी घराघरातून चालतो. ते लोक चकली खुशखुशीत पण फार तुटणार नाही, रंग सोनेरी, अशी अगदी हुकमी छान चकली कशी करतात? असा अगदी नो-फेल फॉर्म्युला असतो का ? चकली मधले असंख्य वेरिएबल्स कसे मॅनेज करतात?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aastha Gill - Buzz feat Badshah | Priyank Sharma | Official Music Video