Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

सुरक्षा विमा आहे, साहेब?

व
विवेकपटाईत
Sat, 10/27/2018 - 07:08
💬 10 प्रतिसाद
कालची गोष्ट, उत्तम नगर मेट्रो स्टेशनवर उतरल्यावर नेहमीप्रमाणे घरी येण्यासाठी इलेक्ट्रिक रिक्षा घेतला. दिवाळीचे दिवस साहजिक आहे, रस्त्यावर ट्राफिक वाढणारच. दिल्लीकरांची एक अत्यंत वाईट सवय, रस्त्यावर जरा हि ट्राफिक दिसले कि लगेच वाहन रॉंग साईट वर घ्यायचे. रिक्षावाला हि त्याला अपवाद नाही. पंखा रोड वर ट्राफिक पाहून, सवयीनुसार रिक्षा चालकाने, समोरून येणार्या बसची पर्वा न करता, रिक्षा रॉंग साईड वर टाकला. चालक शेजारी बसलेल्या सवारीने त्याला टोकले, रिक्षा बस खाली असती तर, तू तर वर गेला असता, सोबत आम्हाला हि घेऊन गेला असता. रिक्षा चालकाने लगेच उत्तर दिले, साहेब विमा घेतलेला आहे, काळजी करू नका. चालक शेजारी बसलेला माणूस उद्गरला, गाढवा विम्याचे पैशे तू मेल्यावर तुझ्या बायकोला मिळतील आणि त्या पैश्याने ती तुझ्या सारखाच एक गाढव नवरा पुन्हा विकत घेईल. मोठ्या मुश्कीलने हसू आवरले. काही वेळ विचार करून रिक्षा चालक म्हणाला, साहेब मला दोन मुले आहेत, सरकारी शाळेत शिकतात. बायको तीन-चार घरी झाडू-पोंंछा करून चार-पाच हजार घरी आणते. मला काही झाले तर, विम्याचे पैशे पोरांच्या शिक्षणाच्या कामी येतील, असा विचार करून मी बँक खाते उघडले आणि विमा हि घेतला. त्याच्या उत्तराने आम्ही सर्व निरुत्तर झालो. घरी येऊन विचार केला. बँक खाते आणि १२ रुपयात मिळणारा सुरक्षा विमा, गरीब आणि अडाणी माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवितात आहे. तो हि आता आपल्या परिवाराचा, मुलांचा भविष्याचा सकारात्मक रूपेण विचार करू लागला आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6377 views

💬 प्रतिसाद (10)
अ
अभ्या.. Sat, 10/27/2018 - 07:26 नवीन
नेक्स्ट टाइम मोलकरणीला झालेला आणि जनधन खात्यात जमा झालेला उज्ज्वला योजनेचा फायदा येऊ द्या. मेक इन इंडियातल्या रिक्षातून फिरताना तुम्हाला आठवलेले अटल पेंशनचे फायदे लिहिल्यास सोन्याहून पिवळे.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Fri, 11/02/2018 - 16:27 नवीन
मोदींचा फोटो असलेली जर्षि बनवण्याची ऑर्डर तुला देणार होतो, पण 2024 च्या विलेक्शन पर्यंत काय ती मिळणार नाही.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 10/27/2018 - 10:19 नवीन
आता अडाणी माणसंही आपल्या मुलांचा सकारात्मक विचार करू लागलेत.त्यांना पेन्शन नकोय एकरकमी विमा हवाय. मस्त सरकारी जाहिरात.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 10/27/2018 - 10:55 नवीन
मरावे परी अटलरुपी उरावे. नेहरु घराण्यातल्या लोकांची नावं सगळ्या दानधर्म योजनांना आहेत यावर ओरड होत असे॥ आता बाळासाहेब ठाकरे रोजगार योजना भाजपने आणली मागच्या आठवड्यात. काल युती निश्चित झाल्याची बातमी आहे. सर्व राज्यांत काळजीवाहू सरकारे आहेत॥
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 10/29/2018 - 10:31 नवीन
अभ्या आणि कंजूषजी, पहिली गोष्ट हि सत्य घटना आहे, कुणाचा प्रचार नव्हे. दुसरी विम्यासाठी त्याने पैशे भरले आहे. अश्या लोकांचे पूर्वी खातेच उघडत नव्हते किंवा बँकेत शिरण्याची त्यांची हिम्मतच नव्हती. या लोकांपैकी २५ टक्के लोक जरी भविष्याच्या आर्थिक बाबींबाबत विचार करू लागले तरी मोठी आर्थिक क्रांती होईल. अर्थात अनेक खाते ठेवणार्या सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांना हे कळणार नाही. त्याच्या साठी दिल्लीच्या अनधिकृत कोलोनीत एका खोलीच्या घरात भाड्यावर राहणाऱ्यांचे अध्ययन करावे लागेल. याचा अर्थ तो मोदीजींना वोट देणार असे हि नाही. गेल्या निवडणूकीत अधिकांश रिक्षाचालकांने या दुसर्या शब्दांत अधिकांश गरीब लोकांनी आप पार्टीला वोट दिले होते.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 10/29/2018 - 16:25 नवीन
त्याच्या साठी दिल्लीच्या अनधिकृत कोलोनीत एका खोलीच्या घरात भाड्यावर राहणाऱ्यांचे अध्ययन करावे लागेल.
खरे आहे. माझ्या एका दिल्ली पोलीसमधील मित्राकडून अनेक सत्यकथा ऐकायला मिळतात, ते सगळे अगदी वेगळेच, कल्पनातीत, भीषण विश्व आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 10/29/2018 - 17:06 नवीन
दिल्लीचा बकाल भाग बाहेरूनच पाहिला आहे. ( प्रवासात) पण जे किनाऱ्यावरून झालेले दर्शन होते ते खरेच विदारक आणि फार त्रास देणारे होते, हे आठवते. चित्रगुप्त काका म्हणतात ते खरेच असावे.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Tue, 10/30/2018 - 03:06 नवीन
आणि केली त्यांनी जाहिरात तरी ते तुमच्या घरी येवुन लगेच विमा घ्या म्हणुन पाठीस नाही ना लागलेत. गोरगरिब ज्यांचे खरेच कधीही बॅन्केत खाते नव्हते ते कधी विमा काढु शकत नव्हते आता सग़ळे व्यवहार करु लागलेत हे चांगलेच आहे ना ? भलेही सरकार कोणाचेही असु दे.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Wed, 10/31/2018 - 11:16 नवीन
+१
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 10/31/2018 - 13:49 नवीन
त्याच्यासाठी एका खोलीच्या घरात भाड्यावर राहणाऱ्यांचे अध्ययन करावे लागेल.
+१ सर्व सामान्य, गरिब यांच्यासाठी या अतिशय महत्वाच्या योजना आहेत. या विमा योजनांद्वारां किती रक्कम जमा होते, त्याचा विनियोग कसा होतो व विमाधारकांना कशी वागणूक मिळते, किती रकमा वितरित होतात या तपशिलाची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा