Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
दिवाळी अंक

इझी, पिझी! नारळाची बर्फी!

प
पद्मावति
Mon, 11/05/2018 - 19:30
💬 19 प्रतिसाद
H
इझी, पिझी! नारळाची बर्फी!
चिवडा, चकली, करंज्या, अनरसे, लाडू ... फराळातली ही मातबर मंडळी खमंग भाजून, सारणाने भरून आणि तेलातुपात तळून आता सज्ज झाली असतील, हो ना? घरोघरी खरेदीची धांदल, पै-पाहुण्यांची गडबड सुरू झाली असेल. उटण्याचा सुगंध, रांगोळीचे रंग, पणत्यांची आरास आणि भरगच्च भरलेले फराळाचे ताट! या फराळात भर म्हणून एक अतिशय सोपी आणि पटकन होणारी पाककृती आज आपण पाहणार आहोत. आपली नेहमीचीच नारळाची बर्फी किंवा नारळाची वडी! साहित्य - २ वाट्या खोवलेला नारळ किंवा डेसिकेटेड कोकोनट १ वाटी साखर १ चमचा तूप वेलची पूड किंवा जायफळाची पूड . कढईत तूप गरम करून खोबरे थोडे भाजून घ्या. मी डेसिकेटेड कोकोनट वापरला होता. वडीचा ज्यांना रंग पांढरा शुभ्र आवडतो, त्यांनी खोबरे भाजताना रंग बदलणार नाही याची काळजी घ्यावी. मला जरा सोनेरी रंग आवडतो, त्यामुळे मी जरा जास्त भाजते. . त्यात साखर आणि किंचित पाणी टाकून शिजवत ठेवा. साधारण पाव वाटीच्याही कमीच पाणी टाकावे सुरुवातीला. मग वाटले तर थोडे टाकता येईल आणखी. साधारणपणे १० ते १५ मिनिटातच मिश्रण कोरडे व्हायला लागेल. . मिश्रणात आता जायफळ पूड किंवा वेलची पूड टाका. केशरही टाकू शकता. एका थाळीला आता तुपाचा हात लावून घ्या. नारळ आणि साखरेच्या मिश्रणाचा गोळा त्या थाळीत चांगला थापून घ्या. हे करताना हाताला तूप लावावे आणि गरम असतानाच थापावे. . एखाद तासात सुरीने वड्या कापून घ्या. कमीत कमी वेळात आणि कमीत कमी गोष्टींमध्ये बनणाऱ्या या वड्या आहेत. येता-जाता अगदी सहज पटकन करण्यासारखा हा प्रकार आहे. . सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा __/\__ . H

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 22140 views

💬 प्रतिसाद (19)
स
सविता००१ Tue, 11/06/2018 - 07:08 नवीन
प्रचंड आवडणारा पदार्थ. कधीही, कुठेही खाउ शकते
  • Log in or register to post comments
प
पलाश Tue, 11/06/2018 - 11:03 नवीन
पाककृती आवडली. फोटोज पण छान.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 11/06/2018 - 11:20 नवीन
किसलेल्या नारळाची नेहमीच असते, एकदा खोवलेल्या नारळाची करायला सांगून बघतो.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 11/07/2018 - 04:26 नवीन
मस्त दिसते आहे नारळाची बर्फी!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 11/07/2018 - 04:59 नवीन
करून बघेन नक्की.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 11/07/2018 - 11:16 नवीन
वडी उचलून तोंडात टाकावीशी वाटते आहे. ही एकदम आवडती वडी.. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 11/07/2018 - 11:26 नवीन
तोंपासू...
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 11/07/2018 - 12:45 नवीन
आवडता पदार्थ. माझी मावशी त्यात बीट पण किसून घालते. रंग मस्त येतो पण टिकाऊ नसल्याने लगेच संपवावी लागते
  • Log in or register to post comments
S
Sanjay Uwach Wed, 11/07/2018 - 18:26 नवीन
खूप सुंदर व सोपी रेसिपी व त्याचे फोटो पण. नाहीतरी प्रत्येक घरात या ना त्या कारणाने अनेक नारळ फोडले जातात व फोडलेल्या नारळाची रवानगी मात्र शेंडी सहित फ्रिज मध्ये केली जाते आणि अडचणीत आणखीन भर....., असेना का, या रेसीपी मुळे ही बर्फी मात्र वारंवार करायला व खायला आवडेल.
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत गुरुवार, 11/08/2018 - 18:18 नवीन
मस्त,मस्त
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 11/09/2018 - 16:17 नवीन
एकदम सुरेख, फोटोला 100 पैकी 220 मार्क
  • Log in or register to post comments
ज
जुइ Sat, 11/10/2018 - 19:05 नवीन
झटपट होणार्‍या वड्या आवडल्या. करून बघायच्या यादीत आणखीन एक भर. फोटो खूप छान आलेत!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sun, 11/11/2018 - 14:06 नवीन
मला नारळाची बर्फी आवडते नेहमी विकतच घ्यावी लागते.
  • Log in or register to post comments
व
वन गुरुवार, 11/15/2018 - 07:23 नवीन
पाककृती आवडली. तोंडाला पाणी सुटले आहे.... मस्त.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 11/15/2018 - 15:04 नवीन
नारळाची बर्फी!
  • Log in or register to post comments
न
नँक्स Sat, 11/17/2018 - 08:07 नवीन
पाककृती आवडली
  • Log in or register to post comments
प
पियुशा Fri, 11/30/2018 - 08:42 नवीन
वाह वाह !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 12/01/2018 - 11:47 नवीन
आवडेश...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chogada... :- Loveyatri
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 12/01/2018 - 11:58 नवीन
अनेक धन्यवाद सर्वांना __/\__
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 35 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 47 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 51 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा