Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कंपन्यांचे ले ऑफ

ज
जेडी
Tue, 10/23/2018 - 19:39
🗣 88 प्रतिसाद
आय टी कंपन्या बऱ्याच वेळा ले ऑफ करतात म्हणजेच अर्थात आपल्या एम्प्लॉयीना नारळ देतात . तशा बऱ्याच कंपन्या अगदी नॉन आयटी कंपन्याही ले ऑफ करतात पण कमीतकमी त्यांच्या एम्प्लॉयीना भरपाई देतात . (टेल्को , बजाज वैगेरे ) पण आयटी कंपन्या मात्र फक्त नोटीस पिरेडचे पैसे देतात . कंपनी त्यांना रेसिग्नेशन द्यायला लावते. सभ्य भाषेत त्याला पिंक लेटर मिळाले असेही म्हणतात. रेसिग्नेशन नाही दिले तर टर्मिनेट करू अशी भीती घालतात . मग बिचारे एम्प्लॉयी मुकाट रेसिग्नेशन देतात . त्यांची एकजूट नसल्याने ते कोणाकडे दाद मागू शकत नाहीत . मोठा पगार हा नुसता दिखावा असतो कारण खूपशा लोकांनी घरे घेतलीत . पुण्यामुंबईत घर घ्यायचे म्हणजे करोडो रुपयांचे फ्लॅट असतात. त्याचे हफ्ते , लाईफस्टाईल मेंटेन करण्यात सगळा पगार खर्ची पडत असतो त्यामुळे सेविंग्ज नसतेच आणि असे ले ऑफ झाले कि काही खरे नसते . अक्षरशः दुसरा जॉब मिळोंपर्यंत पूर्णतः वाट लागते कारण घराचे हफ्ते थकवणे शक्य नसते . हे सर्व का लिहिले तर मी माझ्या कंपनीतले आतापर्यंतचे दोन ले ऑफ पहिले आता तिसरा होऊ घातलाय त्यामुळे डोक्याचा नुसता भुगा झालाय . ज्यांना काढले जाते त्यांच्याकडे त्यांचा परफॉर्मन्स कसा चांगला नव्हता म्हणूनच त्यांना जायची वेळ आली ह्याच नजरेने पाहतात . मॅनेजरचे राजकारण पण काहींना भोवते. एखादा प्रोजेक्ट जातो त्यात क्लाएन्टला किती फुंडींग मिळाले , त्याचा व्यवसाय किती वाढला , आपल्या कंपनीने त्यांच्याकडून किती नफा काढला , इथली तिथली माणसे बदलणे अशा बऱ्याच फॅक्टरवर प्रोजेक्टचे जाणे अवलंबून असते पण सर्वात शेवटी त्याचे खापर एम्प्लॉयी वर फोडून त्यांची हकालपट्टी होते . आतापर्यंत तुम्ही त्यांना का ठेवले त्यांचा परफॉर्मन्स नव्हता तर? पण जोवर कंपन्यांचा फायदा असतो तोवर त्या ठेवून घेतात , भरघोस नफा कमावतात आणि नको असेल तेंव्हा सरळ त्यांना काढून टाकतात . शिवाय ह्या आयटी कंपन्यात तुम्ही एकदा शिका तुम्हालाते कायम उपयोगी पडेल असे कधीच होत नाही , नेहमी स्वतःला अपडेट करत राहा, त्यासाठी खर्च करा , स्वतःला छानछोकी मेंटेन करत रहा , पार्ट्या वगैरे करा , टीमला खुश ठेवण्यासाठी पार्ट्या करत राहा असले उद्योग करावे लागतात . सतत तुम्ही गुलाम असल्यासारखे क्लायंटचा शब्द झेला , त्यासाठीचे पराकोटीचे टेन्शन , स्ट्रेस घ्या पण बिन बोलता तोंडात साखर पेरून काम करत राहा असले उदयॊग करावे लागतात .हे सर्व असह्य होऊन दर फ्रायडेला दारूचे ग्लास रिचवा , दर अर्ध्या तासाला भकाभका सिगारेटी फुंका ...हेच लाईफ होऊन गेलेले असते . काही उदाहरणे द्यायला आवडतील , पहिल्यांदा जेंव्हा ले ऑफ झाला तेंव्हा एकाची बायको गरोदर होती . रोजची टेन्शन पेलवणार नाही म्हणून ह्याने तिला रिझाईन द्यायला लावलेले . आईवडील ह्याच्यावरच अवलंबून. त्याने कंपनी अगदी लहान होती तेंव्हापासून काम केलेले म्हणजे कंपनि मोठी होण्यात त्याचा नक्कीच हाथ होता .अशा वेळी त्याला व आणखी पंधरा जणांना अर्ध्या तासाच्या नोटीसवर काढून टाकले . टेन्शन ने इतका गोंधळला होता कि बास . कंपनीने काढून टाकताना त्याच्या योगदानाचा विचार केला नाही . घरी सांगितलेस का म्हणल्यावर ,"घरी सांगायची हिम्मत नाही म्हणाला ". त्याला बरेच दिवस जॉब मिळाला नव्हता . किती अवघड आहे अशा स्थितीत जॉब जाणे . त्याच वेळी नुकतेच कॅम्पस मधून रिक्रूट केलेले चार जणांना काढून टाकले . वाळल्यासंगे ओलं जळतंय तसा प्रकार झालेला . बिचाऱ्यांची कॅम्पस मधल्या पुढल्या संधी पण हुकल्या आणि पुन्हा फ्रेशर म्हणून जॉब शोधणे किती अवघड . त्यात एक मुलगी खूप कष्टाने शिकून आलेली ती तर असं झाल्यामुळे इतकी रडली होती कि बास . अर्ध्या तासात कंपनी इमेल अकाउंट बंद झाले . आपल्या सॅलरी स्लिप पण त्यांना फॉरवर्ड करायला जमले नाही . एकाने नुकतेच होम लोण घेतले होते , काही बॅकअप नाही , डाउनपेमेंट सुद्धा इथून तिथून लोकांकडून उसने घेतले होते. ते परत करण्याचे शेड्युल होते . त्याला हे कंपनीला समजावता समजावता नाकी नऊ आले . कसेतरी त्याला घेतले , पण कधीही संबध नसलेल्या टेकनॉलॉजि वर टाकले आणि शिवाय भारतातच दुसऱ्या लोकेशनला पाठवून दिले . इतके अवघड झाले कि बिचार्याला आपणहून राजीनामा द्यावा लागला . दुसऱ्या ले ऑफ च्या वेळी काहींना अड्जस्ट करण्यासाठी भलत्याच टीम मधल्या लोकांना जावे लागले . त्यांना चार दिवसाच्या मुदतीवर काढले . जबरदस्त मनस्ताप दिला . दोन महिन्यात पाहिजे तो जॉब मिळण्यासाठी एकजण आपल्या दोन महिन्याच्या बाळाला बायकोला हिथेच सोडून दुसरीकडे जॉब ला गेला. मोठी मुलगी शाळेत , तिला नवीन शहरात ऍडमिशन घेणे अड्जस्ट होणे अवघड वाटले . त्यानेही जवळपास ६ वर्षे ह्या कंपनीत जॉब केला होता . तो गेला तेंव्हा बाकी टीमची पण गोची झाली होती , मॅनेजर तर बिचारा रडकुंडीला आला होता , नवीन लोकांना घेऊ न कसे काम करायचे म्हणून ते हि चार दिवसाच्या केटीवर . कंपन्या करोडो रुपये मिळवतात आणि पाहिजे तेंव्हा लोकांच्या पोटावर पाय आणतात. काहीतरी कायदे व्हायला हवेत . अवघड आहे एकूण . कंपन्यांच्या मालकांना काहीही फरक पडत नाही . अशा परिस्थितीत नक्की काय करायचे? कंपन्यांशी लॉयल राहणे किती घातक असू शकते . होम लोन घेताना काय करायचे , नवीन जॉब मिलोपर्यंत कसा पेशन्स टिकवायचा ह्यावर ह्यात चर्चा व्हावी असे वाटते . कायदे असले तर कोणते ? त्यासाठी काय क्रायटेरिया असतो वैगेरे मुद्दयांवर चर्चा अपेक्षित आहे . अगोदर अशी चर्चा झाली असल्यास त्याचा धागा हि अवश्य द्यावा .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 33058 views

🗣 चर्चा (88)
र
रुपी Tue, 10/23/2018 - 23:45 नवीन
असे ले-ऑफ होतात तेव्हा कंपनीबद्दल / मॅनेजमेंटबद्दल राग वाटणे साहजिक आहे. पण खरं सांगायचा तर नोकरी करायची तर ह्या बाबी ग्राह्य धरायलाच हव्यात. शेवटी मॅनेजमेंटवरही खरचांचा मेळ घालण्याची जबाबदारी असतेच, त्यामुळे कॉस्ट कटींग करण्यासाठी बर्‍याचदा ले-ऑफ होत राहतात. शिवाय कधी एखाद्या पोझिशनची गरज राहिलेली नसते, एखादे प्रोडक्ट बंद करावे लागते. रि-ऑर्ग झाले तर नव्या ंएनेजमेंटचे काही लोकांची फार जमत नाही.... आमच्याकडे तर आता अर्धा तास काय, ५ मिनिटेही मिळत नाहीत. एच.आर. स्वतःच त्या व्यक्तीकडी येतात आणि लगेच त्यांचे वैयक्तिक सामान घेऊन जायला सांगतात. देखरेख ठेवायला तेवढा वेळ तिथेच उभे राहतात! पॅकेज वगैरे मिळते. मला वाटतं सॅलरी स्लिप्स इ. गोष्टी विनंती करुन नंतरही घेता येत असाव्यात. खरं तर होम लोन, लाइफस्टाइल इ. साठी एखादा बॅक-अप प्लॅन असायलाच हवा. सेकंड इनकम म्हणतो तशी काहीतरी सोय आजच्या काळात तरी असायलाच हवी. पगार नसेल तरी ५-६ महिन्यांचा खर्च निघेल एवढी तरतूद असावीच. बर्‍याच लोकांमध्ये क्षमता असेल तर २-३ महिन्यांनी किंवा अजून कालावधीने का होईना, त्यांना अजून चांगली संधी मिळाल्याचं पाहिलं आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेडी Wed, 10/24/2018 - 08:04 नवीन
कमीत कमी २-३ महिने तग धरायचा म्हणजे कमीतकमी ३ सॅलरी एव्हढे पैसे शिल्लक हवेत हे पटतय पण जेव्हा माणुस घर घेतो तेव्हा डाऊन पेमेंट साठी स्वत:जवळची सर्व पुंजी लावतो त्यामुळे पुन्हा तेवढे पैसे जमवणे अशक्य होवुन बसते. तसेही तुम्ही एम्प्लोयीला काढुन टाकणारच असता तर ॲटलीस्ट त्याला २ महिने द्यायला काय हरकत आहे, अर्धा तासात घरी जा असे सांगणे किती चुकिचे आहे.
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 10/24/2018 - 21:53 नवीन
२ महिने?! तुमच्या इतर प्रतिसादात वाचून तुमच्या कंपनीत १५० लोक आहेत, त्यामुळे अश्या कंपन्यांना ते परवडणे अशक्य आहे. काही मोठ्या कंपन्या थोडीफार मुदत देतात (२-३ आठवडे. २ महिने इतकी मुदत दिलेली मी तरी कधीच ऐकली नाही), पण त्यांना ते शक्य असते. महत्त्वाच्या बर्‍याच टूल्सचे अ‍ॅक्सेस ते काढून घेतात. सगळ्या कंपन्या हे करता येण्याइतक्या समर्थ नसतात. आमच्याकडे आधी आद्ल्या दिवशी कळायचे. पण कुणीतरी त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, नशीबाने कंपनीला ते रिकव्हर करता आले. पण आता ते नकोच म्हणून त्यांनी अगदी ऐन वेळीच सांगायचे ठरवले असावे. तुम्ही लेखात लिहिलंय तसं ले ऑफ झालेल्यांकडे बघणार्‍यांची काहींची मानसिकता तशी असतेही, पण परफॉर्मन्स हे कारण नसेल तर दुसरी नोकरी शोधण्यात फार अडचण येऊ नये. तुम्हाला जर डोक्याचा भुगा झालाय असे वाटत असेल तर तुम्ही स्वतःच दुसरी नोकरी शोधलेली बरी. बाकी इतर काही प्रतिसादांशी सहमत.. ले-ऑफची भीती असो वा नसो, अंथरुण पाहूनच पाय पसरलेले बरे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 10/24/2018 - 02:14 नवीन
सहा महिन्यांनी तुमचा जॅाब सोडावा लागेल - अशा नोटिसा देता येतील.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 10/24/2018 - 05:24 नवीन
आयटी मध्ये एक युनीअन झाली आहे. नाव आठवत नाही. ती याबाबत लढते आहे. सगळा प्रकार उद्वेगजनक आहे. खुपसारे पदर आहे यात. याबाबत काही करता येणे तुर्तास अशक्य आहे. नोकर्यांचीच शाश्वती राहीली नाही. महापुरात मोठी झाडे लवकर जातात लव्हाळे वाचतात, असेही होते.
  • Log in or register to post comments
ज
जेडी Wed, 10/24/2018 - 08:32 नवीन
कोणती युनियन, शोधुन सांगाल का प्लीज?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 10/25/2018 - 18:02 नवीन
फाईट : FITE (फोरम फॉर आय टी एम्प्लॉइज) आयटी, आयटीईएस, बीपीओ, केपीओ, टेलेकॉम कर्मचार्‍यांसाठी भारतात स्थापन झालेली ही पहिली ट्रेड युनियन आहे. साईट : http://fite.org.in
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Wed, 10/24/2018 - 06:25 नवीन
आपला जॉब कीतीही चांगला असेल तरीसुद्धा दर ६ महीने / १ वर्षांनी दुसरीकडे ईंटर्व्ह्यु देत रहावा. आपली मार्केट मधली खरी कींमत नेहमी आजमावत रहावी. सर्व खाजगी कंपन्या केवळ नफा कमवण्यासाठीच बनल्या आहेत. कर्मचार्‍यांचा भल्यासाठी नाही. मालकांची व समभागधारकांचे हीत प्राधान्याने पहाणे हे अप्पर मॅनेजमेंटचे कायदेशीर कर्तव्य आहे. कर्मचार्‍यांचे भले मोठे पगार व सुवीधा या फक्त त्यांची प्रॉडकटीव्हीटी व रीटेंशन वाढवण्यापुरती व पर्यायाने कंपनीचा अधीक फायदा व्हावा या कारणासठी असतात. त्यामुळे कर्मचार्‍यांनी कंपनीशी बांधील रहावे, एकनिष्ठ रहावे अशी कंपनीची अपेक्षा नसते. (शंका असल्यास ऑफर लेटर पहावे - अ‍ॅट वील एम्प्लॉयमेंट). प्रत्येक कर्मचारी हा स्वतःच्या करीयरसाठी, नोकरीसाठी स्वतःच जबाबदार असतो. म्हणुनच म्हणतो, बॅग भरुन तयार रहावे, आपला जॉब कीतीही चांगला असेल तरीसुद्धा दर ६ महीने / १ वर्षांनी दुसरीकडे ईंटर्व्ह्यु देत रहावा. आपली मार्केट मधली खरी कींमत नेहमी आजमावत रहावी.
  • Log in or register to post comments
ज
जेडी Wed, 10/24/2018 - 08:30 नवीन
त्यामुळे कर्मचार्‍यांनी कंपनीशी बांधील रहावे, एकनिष्ठ रहावे अशी कंपनीची अपेक्षा नसते. (शंका असल्यास ऑफर लेटर पहावे - अ‍ॅट वील एम्प्लॉयमेंट) वरील वाक्य मला थोडे बरोबर नाही वाटत, त्यांना नुसते कळले जरी एम्प्लोयी बाहेर शोधत आहे तरीही लगेच त्याला २ -३ महिने तो रिटेन होईल असे बघतात, त्याच्या जागी नवीन शोधुका त्याला काढायची तयारी करतात. दर सहामहिन्या ने स्वत:ला अजमावत मात्र रहायला हवे हे १००% पटलेले आहे
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Wed, 10/24/2018 - 08:39 नवीन
या समस्येची व्याप्ती प्रचंड असून ती मातं पुरती मर्यादित नाही. एकेकाळी नोकरीला लागल्यावर पहिले सहा महिने हा निरिक्षण/ प्रशिक्षण काळ असायचा. मग ते यशस्वी रित्या पार पाडल्यावर चाकर 'पक्का' व्हायचा. हल्ली कन्फर्मेशन या शब्दाला काहीही अर्थ नाही. एफ एम सी जी, सी डी, बी पी ओ इथे सुद्धा अस्थिरता प्रचंड आहे. अनेक कंपन्या आपली कामे अनेक छोट्या कंपन्यांना वाटून देतात ज्यायोगे ते काम करणारे कर्मचारी हे मूळ कंपनीचे कर्मचारी नसून त्या सेवादात्या/ पुरवठादार छोट्या कंपनीचे कर्मचारी असतात. अनेक उद्योगात असे करण्यामागे कर्मचार्‍यांचा उपद्रव व अवास्तव मागण्या आणि बंधनमुक्त, मनाप्रमाणे वर्तन हे आहे. पाच पैशात नाश्ता मिळतो म्हणून कँटिनमध्ये एकमेकाला वडे फेकून मारल्याचे वा मेनु प्रमाणे नाशता मिळाला नाही यासाठी काम बंद करण्याचे प्रकार घडलेले आहेत. शिवाय युनियनची दादागिरी, कार्यकर्ते काहीही काम न करता उनाडणार या सगळ्यातून काम बाहेरुन करुन घेण्याची गरज निर्माण झाली. मालक कर्मचारी संबंध संपले आणि फक्त पैशाचा हिशोब उरला. जेव्हा कंपनीला गरज असते तेव्हा ते आलेल्या उमेदवाराला त्याच्या मिळकतीच्या पेक्षा ३० - ४०% अधिक वेतन देऊन रुजु करुन घेतात. गरज संपली की सोडुन देतात. अनेकदा मोठा पगार मोठे पद पाहुन उमेदवार बरच काही कबूल करतो, मग कालांतराने बोललेले करता आले नाही की नाना कारणे ( ती रास्तही असू शकतात) दिली जातात पण कंपनीचा पवित्रा असा असतो की या समस्या आहेत म्हणुनच तुम्हाला जे काही मागितले ते देउन भरती केले. जर सगळे घटक अनुकुल असते काम सोपे असते तर तुम्हाला इतके पैसे मोजुन का घेतले असते? अनेकदा काही चूक नसतानाही प्रकल्प रखडला, अपेक्षित नफा झाला नाही म्हणुन कर्मचारी कमी केले जातात. कधी माणसे भरपूर पण अपेक्षित भार नाही म्हणुन नाहक कुणाची तरी नोकरी जाते. दुर्दैवाने अशी वेळ आली तर आपण तळाच्या दहा टक्क्यात असू नये तसेच थोड्या कालांतराने नवी कौशल्ये आत्मसात करुन आपली पात्रता व आवश्यकता निर्माण करणे आणि एका ठिकाणी एकच काम फार काळ न करणे, आपल्या सहकार्‍यांच्या एक पाउल पुढे राहणे आवश्यक आहे. जंगलातून जात असताना जर वाघाची डरकाळी ऐकू आली तर पळताना आपली स्पर्धा वाघाशी नसते तर आपल्या बरोबरच्यांशी असते की सर्वात मागे पडून वाघाच्या तावडीत सपडणारा मी असता कामा नये.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 10/24/2018 - 09:19 नवीन
पुर्वीच्या एल.आय.सी. /पोस्टातल्या नोकर्या बर्या म्हणायच्या.! हल्ली ते क्लाउड्/ए.आय.मुळी नोकर्या आणखी कमी होणार आहेत असे वाचले आहे. शिवाय संगणकीय भाषांत होणारे बदल कारणीभूत आहेत असे आमचे मत. म्हणजे १९९८-९९ साली एक वेब साईट बनवायला २/३ महिने लागयचे. आता ? तेव्हा ३/४ लोक लागत. आता ?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 10/24/2018 - 09:37 नवीन
क्लाऊडमुळे सगळेच ढगात आहेत माई. तुमचे हे पोष्टात होते तेंव्हाची गोष्ट वेगळी होती. तार खात्यामुळे लोकांना तातडीने महिती मिळायची ( केली की नाही तुमच्या सुतकाची सोय तार खात्याने बेंबट्या.... असा मी असामी ) आत अया पुढे सोफ्टवेअर स्वतःचा सॉफ्टवेगर प्रोग्रम बनवू लागतील तेंव्हा सगळेच रीकामे ठरतील कॉल सेंटर ची कामे तंत्रज्ञान सुधारले म्हणून कमी झाली ( १०० माणसंऐवजी ८/१० माणसेच लागू लागली.) उद्या रीलायन्स , बीग बाजार , यांसारख्या मॉल्स मुळे गावागावातली वाण्याची दुकानेही बंद होतील.त्यावेळी त्या दुकानदारांनी कोणाच्या नावाने ओरडायचे ड्रायव्हरलेस कार मुळे ड्रायव्हरच्या नोकर्‍या जातील, अपघातांचे प्रमाण अत्यल्प होईल, ट्राफीक पोलीसांची कामे कमी होतील, ए टी एम आणि नेट ब्यांकिंग मुळे ब्यांकेतील ग्राहकांची गर्दी अगोदरच कमी झालेली आहे. भाजीवाले बाजारात न बसता धंदा करतील. हे चित्र फार लाम्ब नाही. येत्या चार पाच वर्षात दिसेल. पण नव्या टेक्नॉलॉजीमुळे जी माणसे घरी बसतील त्यानी काय करायचे हा मोठाच प्रश्न आहे. त्या परिस्थितीत एक शक्यता रहाते की जर जागतीक युद्ध झाले आनि त्यातून बरीचशी टेक्नीकल कपॅबिलीटी सम्पली तरच लोकांना पुन्हा काम मिळेल
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Wed, 10/24/2018 - 09:43 नवीन
या IT मधील लोकांनी आपल्या बाबा , काका इ इ लोकांना बघितलं नोकरी करताना. एकदा लागली कि पक्की. त्यांना वाटतं आपली पण पक्की. असं काही नसतं हे कळे पर्यंत उशीर झालेला असतो. छानछोकी मेंटेन करत रहा , पार्ट्या वगैरे करा , टीमला खुश ठेवण्यासाठी पार्ट्या याची कोणी जबरदस्ती करतो काय ? स्वतःची इमेज वाढवण्याकरता हि फालतुगिरी चालते. बंद करा. करोडो रुपयांचे फ्लॅट असतात. त्याचे हफ्ते , लाईफस्टाईल मेंटेन करण्यात सगळा पगार खर्ची जर का कोणी १ वर्ष लोन करता बॅकअप पुरवणार असेल तरच घर घ्यावे. पूर्वचि पिढी काय वेडी होती काय ? उशिरा / सेटल झाल्यावर घर घ्यायला. जे नोकरीत सुखचित्र दिसतेय ते कायम टिकणारे नाही हि जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. हॉटेलिंग / lifestyle / फॅन्सी शॉपिंग सर्व फालतुगिरी आहे. अंथरूण पाहून पाय पसरावे. थोडक्यात नोकरी गेली तर रडण्यात काय अर्थ नाही. आणि हे प्रकार आता वाढतच जाणार आहेत हे लक्षात ठेवावे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 10/24/2018 - 10:11 नवीन
योग्य बोललास रे अभिजिता. तीशी उलटायच्या आतच २ बी.एच.के. व मोठी गाडी घेणारे तरूण्/तरूणी पाहिले आहेत. अर्थात चूक नाही त्यात पण आय.टी/एम बी.ए. च्या नोकर्या ह्या ईतर उद्योग्धंद्याना पूरक म्हणून आहेत हे ध्यानात पाहिजे.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Wed, 10/24/2018 - 10:12 नवीन
Not Only IT टेलिकॉममधील ६० हजार रोजगारांवर टांगती तलवार टेलिकॉममधील ६० हजार रोजगारांवर टांगती तलवार
  • Log in or register to post comments
ल
लई भारी Wed, 10/24/2018 - 10:55 नवीन
मोठ्या आकाराच्या आयटी सर्व्हिस कंपन्यांमध्ये थोडा वेळ बेंच वर ठेवून घेणे किंवा इतर कुठल्यातरी प्रोजेक्टवर(कदाचित दुसऱ्या शहरात) पाठवणे या मार्गाने थोडी फार सोय होऊ शकते. प्रॉडक्ट कंपन्या थोडं बरं पॅकेज देतात अशा वेळी. पण मध्यम/लहान आकाराच्या सर्विस कंपन्या मध्ये असं तडकाफडकी काढून टाकण्याचे प्रकार जास्त होतात असं वाटतं. बऱ्याच वेळा स्टॉक मार्केट मधील स्थिती सुधारण्यासाठी सुद्धा असे प्रकार केले जात असावेत कारण यानंतर कंपनीचा खर्च कमी दाखवला जातो जेणेकरून शेअर वधारतो. अर्थात, मी काही तज्ञ नाही आहे, थोड्याफार अनुभवावरून लिहितोय. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा. पण कंपनीच्या प्रेमात न पडता स्वतःला अद्यावत ठेवणे याला पर्याय नाही. बाकी प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे बॅकअप असणं किंबहुना मुळात होम-लोन इ. मोठे पाऊल घेताना ह्या गोष्टी गृहीत धरूनच प्लॅनिंग करावं. (कोण आहे रे जो मला आरसा दाखवतोय! ;-) )
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 10/24/2018 - 10:57 नवीन
>>होणारे बदल कारणीभूत आहेत असे आमचे मत.>> ह्यांचे मत काय?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 10/24/2018 - 13:03 नवीन
पण मध्यम/लहान आकाराच्या सर्विस कंपन्या मध्ये असं तडकाफडकी काढून टाकण्याचे प्रकार जास्त होतात असं वाटतं. भारतीय आय टी कंपन्या यात आघाडीवर आहेत. काही अमेरीकन कंपन्यादेखील आहेत. या सर्व बड्या कंपन्या आहेत.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 10/24/2018 - 13:53 नवीन
बाकी सगळं ठिक आहे, कदाचित विचाराला प्रवृत्त करणार आहे. पण हे अजिबात पटले नाहीये:
स्वतःला छानछोकी मेंटेन करत रहा , पार्ट्या वगैरे करा , टीमला खुश ठेवण्यासाठी पार्ट्या करत राहा असले उद्योग करावे लागतात . सतत तुम्ही गुलाम असल्यासारखे क्लायंटचा शब्द झेला , त्यासाठीचे पराकोटीचे टेन्शन , स्ट्रेस घ्या पण बिन बोलता तोंडात साखर पेरून काम करत राहा असले उदयॊग करावे लागतात .हे सर्व असह्य होऊन दर फ्रायडेला दारूचे ग्लास रिचवा , दर अर्ध्या तासाला भकाभका सिगारेटी फुंका ...हेच लाईफ होऊन गेलेले असते
कोणीही आणि कोणतीही कंपनी किंवा परिस्थिती तुम्हाला ह्या पैकी काहीही करायला भाग पाडू शकत नाही.
  • Log in or register to post comments
ज
जेडी Wed, 10/24/2018 - 14:01 नवीन
मी स्वत: हे फेस करते, लोक साधे राहणार्यांना काही येत नाही. असे समजतात. शिवाय बरीच मुलं लेडीज मॅनेजर बरोबर काम करायला पण नाखुश असतात कारण मुली त्यांना अशा पार्ट्यांना घेवुन जात नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 10/24/2018 - 14:08 नवीन
कुठल्या कंपनीत आहत तुम्ही? कश्या लोकांबरोबर काम करताय तुम्ही?
  • Log in or register to post comments
ज
जेडी Wed, 10/24/2018 - 14:17 नवीन
मी एका आय टी कंपनीत काम करते, १५० लोकांची कंपनी आहे. मी ॲडमीन वैगेरे नाही, प्रोजेक्ट मॅनेजर आहे. क्लायंटला थोडेही वाकडे बोलुन चालत नाही. कोणतीही कंपनी स्वत:हुन तुम्ही हे करा म्हणत नाही पण टिम बरोबर रॅपो ठेवा म्हणते, त्यासाठी बजेट देते . आता मला सांगा, मी काही त्यांना दारु पिन्याच्या पार्टयात घेवुन जात नाही..।
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 10/24/2018 - 17:56 नवीन
तुमचं नाव जेडी आहे म्हटल्यावर लोकांच्या इतक्या अपेक्षा असणारच
  • Log in or register to post comments
ज
जेडी Wed, 10/24/2018 - 18:29 नवीन
जेडी म्हणजे Jack Daniel नाही हो
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 10/24/2018 - 18:45 नवीन
साधारण 5 वर्षांपूर्वी भारतातली एक आघाडीची सर्व्हिस आणि प्रॉडक्ट दोन्हीमध्ये नावाजलेली कंपनी मी 30 टक्के इंक्रेमेंट वॉर जॉईन केली. जॉईन करताना कंपनी तुला कधीही काढून टाकणार नाही वगैरे वगैरे सांगितलेले होते. जॉईन झाल्यावर 4 महिन्यात वातावरण बदलायला लागले.. खूपच वर, म्हणजे executive लेव्हल ला भयंकर पॉलिटिक्स सुरू होते, आम्ही तर प्रोग्रामर लेव्हल होतो.. पण तरीही बातमी एक दिवस फुटलीच. आमच्या डायरेक्टर सकट सगळी प्रॉडक्ट टीम कॅनडा च्या मेन टीम ने layoff च्या कात्रीने कापून टाकला होता. सुदैवाने आम्ही भारतात होतो, आणि कंपनीने आम्हाला बेंच वर टाकले.. 3 महिने सलग नोकरी जायची टांगती तालावर डोक्यावर. 3 महिन्यांनी आम्हाला कुठेतरी जिथे जागा असेल तिथे खुपसून विषय संपवून टाकला.. निम्मे लोक अगोदरच कंपनी सोडून गेले होते. आता मी कसा अडकलो बघा - कंपनीच नाव चांगलं होते, त्यामुळे जॉईन झालो तेव्हा मला अतिशय स्पष्ट (तथाकथित) जॉब सिक्युरिटी होती. त्यावर विसंबून मी 1. घर घेतलं 2. घराचं डाउन पेमेंट करायला पर्सनल लोण घेतलं 3. चार वर्षे कंपनीत आता राहणारच हे गृहीत धरून कंपनी लीज वर कार घेतली.. आता वर्षभरात 7-8 हजारांनी पगार वाढेलच हे गृहीत धरून अगदी इमर्जन्सी साठी थोडेसे पैसे हातात ठेवून यात पूर्ण कफल्लक झालो. पगार लाखात असून पण हप्ते गेल्यावर हातात 20000 शिल्लक राहायचे. जेव्हा ले ऑफ करणार असे कळले, तेव्हा मी बाहेर जॉब बघायला गेलो, तर आताच पगार 30 टक्के वाढलेला असल्यामुळे नवीन वाढ मिळेना. कंपनी लीज कार ही अश्या परिस्थिती लायबिलिटी होते, कारण ती तोडल्यास 4 वर्षांचे सरळ व्याज बँकेला आंदण म्हणून द्यावे लागते. माझ्याकडे नव्हते 50000, तर 200000 कुठूब देऊ? मग प्राप्त परिस्थितीत काय होते ते बघत बसने इतकेच हातात होते. 3 महिन्यानी एक प्रोजेक्ट मिळाला कसाबसा, तो घेतला, नोकरी स्थिर केली. दोन वर्षात 2000रु नी पगार वाढला.. कसेतरी 2 वर्षे सहन केले, आणि कंपनी लीज कार ब्रेक इव्हन ला आल्याबरोबर कंपनी सोडली. आता सरळ कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो.. 2 वर्षांनी मला खूप शिकवलं, माझे करिअर दोन वर्ष मागे गेलं, आणि इतर बऱ्याच गोष्टी झाल्या. पण आता इतकं शिकलोय, 1. की नोकरी म्हणजे तुमचा हक्क नव्हे, 2. मालकाला गरज आहे म्हणून तो तुम्हाला नोकरी देतो, तुम्हाला गरज आहे म्हणून नाही 3. कोणत्याही क्षणी तुम्हाला नोकरी सोडावी लागली तरी तुम्ही किमान 3 महिने राहू शकाल इतकी बचत पाहिजे, रोखीत. 4. भविष्यकाळ आपण पाहिलेला नाही, तेव्हा निवृत्तीची सोय आपली आपणच केली पाहिजे.. 5. घराकडे लायबिलिटी म्हणून न बघता asset म्हणून बघा
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 10/24/2018 - 21:56 नवीन
1. की नोकरी म्हणजे तुमचा हक्क नव्हे, 2. मालकाला गरज आहे म्हणून तो तुम्हाला नोकरी देतो, तुम्हाला गरज आहे म्हणून नाही 3. कोणत्याही क्षणी तुम्हाला नोकरी सोडावी लागली तरी तुम्ही किमान 3 महिने राहू शकाल इतकी बचत पाहिजे, रोखीत. 4. भविष्यकाळ आपण पाहिलेला नाही, तेव्हा निवृत्तीची सोय आपली आपणच केली पाहिजे.. 5. घराकडे लायबिलिटी म्हणून न बघता asset म्हणून बघा एकदम सही.....
  • Log in or register to post comments
ज
जेडी गुरुवार, 10/25/2018 - 10:42 नवीन
स्वानुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद, खुपच उपयोगी सल्ला.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Fri, 10/26/2018 - 16:08 नवीन
अतिशय छान प्रतिसाद! अनुभवाच्या पाठबळावर आधारित असल्याने अधिक भिडला. पैकी दोन मुद्द्यांबद्दल थोडीशी मतभिन्नता..... 3. कोणत्याही क्षणी तुम्हाला नोकरी सोडावी लागली तरी तुम्ही किमान 3 महिने राहू शकाल इतकी बचत पाहिजे, रोखीत. :---> या इथे ३ ऐवजी ६ हवेत हे वैम. कारण आज ३ महिन्यात योग्य पर्याय मिळेल याची शाश्वती कमी झाली आहे. बफर(मराठी शब्द आठवत नाही) अधिकच असावा. 5. घराकडे लायबिलिटी म्हणून न बघता asset म्हणून बघा. :---> घर जो पर्यंत कर्जमुक्त होत नाहीय तो पर्यंत ती लायबिलिटीच आहे. कारण गृहकर्जाच्या हप्त्यापेक्षा भाडे केव्हाही कमीच असते...वैम.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 10/26/2018 - 19:27 नवीन
मी asset असे वेगळ्या अर्थाने म्हणालो. वेळ आली तर ते विकायची तयारी ठेवा, आणि सामान्यपणे आपल्या घराची किंमत आणि आपल्यावरील गृहकर्ज या गोष्टी समान ठेवा, जेणेकरून तुम्ही 3-4 महिन्यात आली वेळ तर घर विकून मोकळे व्हाल.. मी जेव्हा अश्या दृष्टीने घराकडे बघायला सुरुवात केली तेव्हा मला खऱ्या अर्थाने टेन्शन फ्री आयुष्य जगता यायला लागले.. मी नोकरी सोडून कॉन्ट्रॅक्ट जॉब घेतला तेव्हा हा asset आणि liability चा हिशोब मांडला होता.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 10/26/2018 - 16:53 नवीन
आणि आपण जात्यात नाही तरी सुपात आहोत याचे जाणीव झाली. मीही एका मा.तं. कंपनीत प्रोजेक्ट लीड म्हणुन काम करणारा ४० जणांची टीम असलेला कामगार. माझे काही अनुभव बहुतेक वेळा असे अचानक शॉर्ट नोटिस ले ऑफ छोट्या कंपनीत होतात. शिवाय मॅनेजर/ मॅनेजमेंट शी वाजले वगैरेही कारणे पुरतात. एच.आर नावालाच असते. मोठ्या कंपनीत बेंच वगैरे प्रकार असल्याने २-३ महिने निघतात. पण एखादा माणुस माझ्या स्किल् चेच काम करेन नाहीतर बेंचवर राहीन असे अडुन बसला आणि आलेले प्रोजेक्ट नाकारत राहिला तर मात्र कठीण होते. म्हणजे नवीन स्किल शिका किवा आपल्या स्किल ची नवीन नोकरी शोधा हेच पर्याय राहतात. बरेच जण आला त्या प्रोजेक्टला हो म्हणतात पण मग काही काम करत नाहित. नंतर त्यांना इंप्रुव्ह्मेंट प्लॅनमध्ये टाकुन काढावे लागते. ह्यात ५-६ महीने निघुन जातात. थोडक्यात ज्यांना सिस्टीमची चांगली माहिती असते ते कंपनीला खेळवत राहतात असेही प्रकार बघितले आहेत. काही लोकाना प्रोजेक्ट किवा कंपनीशी काही घेणे नसते. एकेका मॅनेजरची पिलावळ त्याच्याबरोबर जॉब बदलत फिरत राहते. मग स्किल वगैरे बाजुलाच राहिले, जो रोज मॅनेजरबरोबर चहा पाण्याला फिरतो त्याचीच वट चालते आणि त्यालाच संधी मिळत राहतात. असो.
  • Log in or register to post comments
ज
जेडी Fri, 10/26/2018 - 17:40 नवीन
अगदी हेच चालते
  • Log in or register to post comments
स
सतिश म्हेत्रे Wed, 10/24/2018 - 20:35 नवीन
पुढच्या वर्षी पासून आम्हाला पण ह्या क्षेत्रात पाउल ठेवायचे आहे. त्यामुळे जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा ही नम्र विनंती. पुढील धोक्यांची आधिच कल्पना असेल तर त्या तयारीने रहायला बर...
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 10/24/2018 - 21:14 नवीन
आय टी त नोकरी लागल्यावर, फ्लॅट घेण्यापेक्षा 2 एकर शेती घ्या. कधीच उपाशी मरणार नाही. शेती शिवाय मजा नाही..!! (ज्यांच्या कडे 7/12 नाही त्यानी जरश्या / शेरडा विकत घ्याव्यात. कोंबड्या पण चालतील. फक्त वराह पालनाच्या भानगडीत पडू नये!)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 10/24/2018 - 22:08 नवीन
शेती शिवाय मजा नाही..!! =====> +१ ज्यांच्या कडे 7/12 नाही त्यानी जरश्या / शेरडा विकत घ्याव्यात. कोंबड्या पण चालतील. -----> शेळ्यांना सांभाळायला मनुष्यबळ लागते असे पाहण्यात आहे आणि कोंबड्यांच्या व्यापारात माझ्या एका मिताने जबरदस्त आर्थिक फटका खाल्ला आहे.शिवाय ह्या व्यवसायातून सुट्टी नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/25/2018 - 10:20 नवीन
कमाल आहे ! एकीकडे, "शेतीत फायदा नाही म्हणून शेतकरी आत्महत्या का करत आहेत" असे म्हटले जाते आणि दुसरीकडे, "आय टी त नोकरी लागल्यावर, फ्लॅट घेण्यापेक्षा 2 एकर शेती घ्या. कधीच उपाशी मरणार नाही. शेती शिवाय मजा नाही..!! असे !!! नक्की काय भानगड आहे ?!
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 10/25/2018 - 14:25 नवीन
मी फायदा तोट्या बाबत चकार शब्द काढला नाही. उपाशी मरणार नाही असे म्हटले आहे. ,,,, बी पेरूण, पीक काढण्यात जी जुवारी मजा आहे ती कदाचित कॅसिनो मधे जाऊन सोंगट्या खेळण्यात पण मिळणार नाही बाबत आपले एकमत होऊ शकतं. म्हणून शेती शिवाय मजा नाही असे म्हटले.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/25/2018 - 16:57 नवीन
असं होय ! :)
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 10/24/2018 - 21:17 नवीन
आय टी मधील बरेच जण मिपा सारख्या संकेतस्थळावर पडिक असतात असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेडी गुरुवार, 10/25/2018 - 10:44 नवीन
माझ्या आॅफिसमधले मी सोडुन कोणच नाही बा मिपावर
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 10/25/2018 - 14:27 नवीन
मला पण असेच वाटायचे.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Fri, 10/26/2018 - 16:19 नवीन
हा हा हा .... यू डोंनो. मिपा इज क्रियेटिव्ह थिंग.....
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 10/26/2018 - 16:38 नवीन
खरंच पहिला मी पडिकच होतो मिपावर. आता वनलाईनर लिहायलाच वेळ मिळतो. .... एकदा एचआर मधला माझ्या मागं येऊन उभा राहिला होता. मी मिपावर इतका गुंग होतो की मला कसलीच चाहूल नव्हती. म्हणतोय कसा " तू आहे होय 'विशुमित', शेतकर्याचा कैवारी. ..... माझी जागा बदलून डायरेक्टर च्या केबीन समोर दिली आहे. उ का चू करता येत नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 10/24/2018 - 21:19 नवीन
डिस्क्लेमर : हा प्रतिसाद कुणालाही वैयक्तिक उद्देशून नाही.त्यामुळे, विचारवंतांनी दूर राहिलेले उत्तम... तुम्ही अतिशय योग्य प्रश्नाला वाचा फोडलीत, ह्या बद्दल मनापासून धन्यवाद. पण, हा प्रश्र्न फार पुर्वी पासून आहे. ह्यावर आमचे एक गुरु, चाणक्य ह्यांनी "कौटिल्याच्या अर्थशास्त्र" ह्या ग्रंथात, ह्या गोष्टीचा उत्तम परामर्ष घेतला आहे आणि एकूण-एक सगळ्या युद्धांचा अभ्यास केला तर........ ज्याच्या कडे योग्य ती हत्यारे, योग्य त्या वेळी, योग्य त्या जागी आणि योग्य त्या प्रकारे वापरायची कला होती, तेच युद्धात जिंकले.नौकरी असो किंवा व्यवसाय किंवा रोजचे व्यवहार...ह्या ४ही गोष्टींचे पालन ज्याच्याकडून होते, त्याला भविष्यकाळ जड जात नाही. आणि आपले रोजचे जगणे, हे पण युद्धा सारखेच असते..... ज्याच्या कडे योग्य ती हत्यारे ===> आपले वाढते ज्ञान, मग ते चपला शिवणे असो किंवा केस कापणे किंवा नौकरी.... योग्य त्या वेळी ====> दुसर्‍याची गरज ओळखून योग्य त्या जागी ====> भरपूर पैसे मिळत असतील तर आजही केस कापणारा , घरी येऊन केस कापतोच. योग्य त्या प्रकारे वापरायची कला ===> उत्तम न्हावी चेहरे पट्टी बघून केस कापतो. नमनाला थोडे सल्ले दिले, आता काही गोष्टींकडे वळतो. ----------------------------------- अशा परिस्थितीत नक्की काय करायचे? मुळात आपण नौकरी किंवा अर्थार्जन का करतो? तर, आपल्याला कुणाकडे हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून..... दुपारी १२ वाजता आणि रात्री ८ वाजता कुणीही स्वतःची भाकरी मुद्दामहून कुणालाही देत नाही.त्यामुळे अन्नाची सोय ही सर्व प्रथम, दुसरी कपड्यांची. मला स्वतःला ३-४ जीन्सच्या पँट्स आणि ३-४ साध्या पँट्स आणि ६-७ शर्ट्स भरपूर होतात.सध्या माझे वय ५२ आहे, पण अद्यापही स्वतःचा फ्लॅट नाही.पण स्वतःची ७१ गुंठे जागा आहे.जर मला माझ्या खेडेगावात फुकट रहायला मिळत असेल तर, मला लोकांना दाखवायला फ्लॅट बांधायची हौस नाही.आमचा तुकड्या पण झोपडीतच राहिला तर गाडग्याला झोपडी पण न्हवती.मग आमच्या सारख्या पामराला, फ्लॅटची पण काय गरज? शिवाय ४५लाखात घर घेण्यापेक्षा, त्या व्याजात (महिना ३०,०००) घर संसार करता येतो आणि लोनचे टेंशन पण रहात नाही.सध्या हेच केले आहे. आता भाड्याची घरे पण, हवी तितकी मिळतात आणि तुम्ही जर योग्य घरमालक शोधलात तर १५-२० वर्षे तुम्ही दर ११ महिन्यांचा करार करून पण राहू शकता.आता असे घरमालक निदान आमच्या डोंबोलीत तरी भरपूर आहेत.मुले परदेशी आणि ती परत यायची शक्यता नाही आणि घरमालकाचा स्वतःचा दुसरा फ्लॅट आहेच.असे घरमालक भरपूर.त्यांना वेळच्या वेळी भाडे देणारा आणि घराला बाधा येईल असे न वागणारा किंवा सोसायटीला त्रास न देणारा, भाडेकरू असेल तर, डोंबिवलीत तरी त्रास होत नाही. कंपन्यांशी लॉयल राहणे किती घातक असू शकते? कंपन्यांशी लॉयल राहणे, मला तरी फायद्याचेच ठरले आहे.मुळात, कंपनीला पण उत्तम माणसे हवीच असतात.नाझ्या स्वतःच्या माझ्या स्वतःकडून फार मोठ्या अपेक्षा कधीच न्हवत्या. तरी पण एकदा संधी मिळाली म्हणून एका मोठ्या कंपनीत, मोठी पोस्ट मिळाली म्हणून, एक अनुभव म्हणून काम केले.१२५कोटीचा प्रोजेक्ट आणि १७ इंजिनियर, १८-२० काँट्रॅक्टर आणि ४००-४५० कामगार हाता खाली होते.पण त्या कामाचा आनंद मिळाला आणि भरपूर अनुभव (मनसोक्त शिव्या खाल्या) पण मिळाला.योग्य वेळी कंपनी सोडली आणि परत एकदा परदेश वारी केली. पण कंपनीशी लॉयल राहिल्यामुळे, आजही तिथल्या बॉस बरोबर खेळी-मेळीचे संबंध आहेत.आता गुलामगिरी करायचीच नसल्याने, कुठल्याच कंपनीत नौकरीत जाणार नाही, ही बाब अलाहिदा, पण दरवाजे उघडे आहेत. कंपनीचा मालक तुम्हाला कधीच ओळखत नसतो, पण तुमचे बॉस आणि तुमच्या बॉसचा बॉस मात्र तुम्हाला ओळखत असतोच.आपल्या ज्ञानावाचून किंवा आपल्याला मदतीला घेतल्या शिवाय त्यांना यश मिळता कामा नये इतपत ज्ञान आणि ते ज्ञान फक्त तुमच्याकडेच ठेवण्याचे कौशल्य तुमच्या कडे हवेच.नाहीतर कवचकुंडले नसलेल्या कर्णासारखी अवस्था होते. माझे ते माझे आणि तुझे ते ही माझेच, असा तुमचा स्वभाव नसेलही, पण शेकडा ४०% ते ५०% लोकांचा हाच स्वभाव असतो.विशेषतः जिथे नौकरीची शाश्वती नाही, तिथे तर जास्तच. म्हणजे कंपनीला जर KOBALच्या ऐवजी C++ वाले हवे असतील तर, तुम्हाला C++ यायलाच हवे.नाहीतर तुम्हाला नारळ मिळणारच.कारण बॉस स्वतः एकवेळ C++ शिकेलही पण बॉसचा बॉस C++ शिकण्याचे चान्सेस कमी. (मी अजूनही KOBAL आणि C++ च्याच जमान्यात आहे, ह्यावरून तुम्ही माझ्या आय.टी. मधल्या ज्ञानाची केलेली परिक्षा योग्यच आहे.) ------------------- होम लोन घेताना काय करायचे? लोन मग ते कुठल्याही व्याजाने का असेना, घेऊच नये.विशेषतः कार, फ्लॅट,परदेश वारी साठी...शैक्षणिक लोन पण, शक्यतो घेऊ नये.कारण शिक्षण पूर्ण केल्या नंतर नौकरी मिळेलच ह्याची खात्री कुणीच देऊ शकत नाही....मी मुळातच एका जागी स्थिर न राहणारा, त्यामुळे ह्या आयुष्यात स्वतःचे असे पक्के घर कधीच बांधणार नाही...आणि तशी वेळ आलीच तर बांबूची झोपडी फक्त बांधीन किंवा मग डोम टाईप घर बांधीन आणि ते पण व्याजाचे पैसे वाचले तरच...स्वस्त आणि दर ५ वर्षांनी नविन घर.... ------- नवीन जॉब मिळेपर्यंत कसा पेशन्स टिकवायचा? मुळामध्ये, प्रत्येक कंपनीत एक नोटीस पिरियड दिलेला असतो. माझ्या प्रत्येक कंपनीत वेगवेगळा नोटीस पिरियड होता.एका कंपनीत ३ महिन्याचा नोटीस पिरियड होता.(ती कंपनी, मी एका दिवसात सोडली पण आजही, त्या कंपनीतल्या बॉस बरोबर उत्तम संबंध असल्याने, त्याचा २ वेळा नौकरी संबधात फोन येऊन गेला आणि ते पण बॉस बरोबर एकदाही पार्टी न करता.) विलास मुणगेकर आणि दा.कृ.सोमण ह्यांच्या बरोबर चर्चा करतांना त्यांनी एक वाक्य सांगीतले, स्वतःला स्वतंत्र करा.कुठल्याही आर्थिक पारतंत्रात जखडून घेऊ नका.तुमची जर रोज सिंगल माल्ट प्यायची कॅपॅसिटी असेल तर ब्लेंडेड स्कॉच प्या आणि ब्लेंडेड स्कॉच प्यायची कुवत असेल तर, इंडियन प्या...पण शक्यतो पिऊच नका..कारण काही काही सवयी एकदा लागल्या की सुटत नाहीत.उपवासाचा मुळात तोच अर्थ असतो, एक दिवस उपाशी राहिलात, तर कमीत-कमी गरजात दिवस काढायची सवय राहते.एक उदाहरण देतो... एका सौदीला विचारले, हे तेल संपले की पुढे तुमचे काय? तो म्हणाला, सोपे होईल....आम्ही परत उंट हाकायला सुरुवात करू.पण बाकीचे जग तेलाशिवाय जगू शकणार नाही. दर वर्षी अरबस्तानातील लोक काही दिवस तंबूत घालवतात.मग ते कुवैती असोत किंवा सौदी... माझे सौदी बॉस तर प्रसंगी उंटीणीचे, सॉरी सांडणीचे पण दूध प्यायचे. थोडक्यात काय तर, तुमच्या गरजा जितक्या कमी तितके तुमचे टिकून रहायचा कालावधी जास्त.... -------- कायदे असले तर कोणते? थोडे परखड लिहितो.... मुळात हे असे कायदे हवेत कशाला? नौकरी हवीच कशाला? नौकरी करणारा श्रीमंत होईलही पण शेवटी तो गुलामच.प्रत्येक माणसांत व्यवसाय कौशल्य असतेच, आणि निदान स्वतःची मीठ-भाकरी स्वतः कमावण्या इतके कौशल्य तरी असतेच.(देवाची मुले, म्हणजे मेंदू विकसित न झालेली मुले, सोडून) पण मराठी माणसाला गुलामगिरी इतकी अंगवळणी पडली आहे की, आपण आर्थिक गुलाम तर आहोतच आणि वैचारिक पण गुलाम झालो आहोत. गल्लो-गल्ली वाढत असलेली बाबा-महाराज-आई-माई ह्यांच्या मंदिरांचे प्रमाण, हेच दाखवते....एक लेख वाचला होता.केमाल पाशाने, तुर्कस्थान मधील सर्व बाबांना धंदा बंद करायला लावला आणि तुर्कस्थानाची प्रगती झाली.. आणि कामगारांच्या बाजूचे कायदे आले की कंपन्या दुसरा मार्ग निवडतात....काँट्रॅक्ट लेबरचा...आणि तो तर सगळ्यात घातक आणि तो पण निवडता आला नाही की, मग स्थलांतर करतात....मुंबईतल्या कंपन्या बंद पडायला, जमिनीचे वाढते भाव हे प्रमूख कारण आणि न परवडणारा कामगार वर्ग हे दुसरे कारण...नोसिल बंद पडली पण त्याच जागी आय.टी. कंपन्या सुरु आहेत.कारण नोसिलच्या कामगाराच्या आत्ताच्या पगारापेक्षा, आय.टी. इंजिनियरचा पगार कमी आहे. --------- आता, एक शेवटचा मुद्दा लिहितो....राग मानू नये... मुळात, शाळेत व्यवहार ज्ञान शिकवले जातच नाही, त्यामुळे अडचणी आल्या, तर पुढे काय? ह्याची कुठलीही ठराविक उत्तरे नसतात.आपली शालेय शिक्षण पद्धती, आमच्या काळांत तरी कारकून तयार करायची फॅक्टरी होती आणि माझ्या मुलांनाही हाच अनुभव आला.त्यामुळे निव्वळ शालेय शिक्षण घेणारी व्यक्ती, अशा व्यावहारिक अडचणी आल्या की भांबावून जाते. एखादी कंपनी बंद पडली तर, कुणी दुसरी नौकरी पत्करतो तर कुणी स्वतःचा व्यवसाय स्थापन करतो.इथे दोघांनाही जगण्याची समसमान संधी मिळते.तर काही जण व्यसनांच्या आहारी जातात किंवा मग काळ्या व्यवसायांकडे वळतात.तुम्ही कुठल्या मुशीतून घडला आहात, ह्यावर अशा गोष्टींचा फार व्यापक परिणाम होतो. व्यवहार ज्ञाना वर आधारीत एक सुंदर पुस्तक आहे...."छळछावणीतील दिवस"...लेखक व्हिक्टर फ्रँकल....आणि "विशेष पर्व" हे "विशे" नावाच्या कंपनीच्या मालकाचे आत्मचरित्र..... ज्यु छळछावणीतून फार कमी लोक वाचले.आणि अशा लोकांचा जेंव्हा अभास केला गेला तेंव्हा, असे समजले की.....एव्हढ्या भयाण परिस्थितीतही त्या वाचलेल्या लोकांनी, त्यांना स्वतःलाच तगवण्याचा, वाचवण्याचा, जगवण्याचा प्रयत्न केला.कारण, त्यांच्याकडे जगण्यासाठी "कारण" होते.एखादे "उद्दिष्ट" होते किंवा एखादे काही तरी "कार्य" होते. जगण्याचे कारण समजले की, "कसं" जगायचे? हे त्यांना समजत गेले, मग त्यासाठी ते धडपडले, कोणत्याही परिस्थितीत जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि जगण्याचे मार्ग शोधून काढले. आपण सगळेच तसे ह्याच परिस्थितीत असतो.मग आपण व्यवसाय करत असो किंवा नौकरी.व्यवसाय वाढ करण्यापेक्षा, दुपारी १ ते ४ दुकान बंद ठेवणारा व्यावसाइक आणि स्वतःच्या नौकरीची काळजी न करणारा, पुढचे शिक्षण न घेणारा नौकरदार, ह्यांचा भविष्यकाल अंधःकार मय होण्याचे चान्सेस जास्त. आमचे डॉन व्हिटो कॉर्लिऑन ह्या बाबतीत म्हणतात, मुळात अशी वेळच येऊ देऊ नये.उगाच ड्रग मध्ये पैसे ओतण्यापेक्षा, जुगार किंवा इमारती बांधणे किंवा सिनेमा तयार करणे अशा कायदेशीर व्यवसायात पैसे गुंतवणे योग्य.थोडक्यात काय? तर परिस्थिती अस्थिरच असते.अज्जुन चार कायदेशीर व्यवसाय करा.व्यवसायांना मरण नाही. एक शेवटचे उदाहरण देतो. इंद्रा नुयी, ज्यावेळी पेप्सीकोच्या अध्यक्षा झाल्या त्यावेळी, सकाळी ५ ते १० ह्यावेळेत विकले जाणारे प्रॉडक्ट कंपनीकडे न्हवते.त्यावेळी त्यांनी ओट्स बनवणार्‍या एका कंपनीला सामावून घेतले आणि ट्रॉपिकानाला पण सामावून घेतले.ह्या दोन कंपन्यांमुळे पेप्सिकोला मस्त फायदा झाला. प्रत्येक व्यक्तीने, आपल्या फावल्या वेळेचा, सदुपयोग स्वतःच्या कौटुंबिक भल्या साठी केला पाहिजे, हेच मी उदाहरणातून शिकलो.(पेप्सिको कडे सकाळी ५ ते १० ह्या वेळेत विकले जाणारे पदार्थ आधी न्हवते.आधी ते लेज किंवा सॉफ्ट ड्रिंक्स विकत होते.अमेरिकन झाले तरी, सकाळी-सकाळी नाश्ता म्हणून कुणी, लेज आणि पेप्सी पित नाही.म्हणून मग ओट्स आणि फळांचे रस) रात्री घरी येऊन, बिनडोक टी.व्ही. मालिका बघायच्या की व्हॉटस-अप वरील फालतू गप्पांत भाग घ्यायचा की उगाच हिंदी सिनेमा नट्यांवरील गॉसीपिंग वर भाग घ्यायचा, की कुणाचे आत्मचरित्र वाचून, स्वतःचेच भविष्य घडवायचा प्रयत्न करायचा? हा ज्याचा त्याचा प्रश्र्न. डिस्क्लेमर : "मी सांगतो तेच सत्य", हा माझा दावा कधीच न्हवता.....पण चुकून ह्या प्रतिसादाने, कुणाला तरी "मुवि" म्हणजे सर्वज्ञ, असा समज झाला असल्यास, आधीच माफी मागतो.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 10/24/2018 - 22:18 नवीन
डिस्क्लेमरची बिलकुल गरज नव्हती. .... जीवनरहस्य उलगडून दाखवलेत.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 10/25/2018 - 03:09 नवीन
१.
ज्याच्या कडे योग्य ती हत्यारे, योग्य त्या वेळी, योग्य त्या जागी आणि योग्य त्या प्रकारे वापरायची कला होती, तेच युद्धात जिंकले.नौकरी असो किंवा व्यवसाय किंवा रोजचे व्यवहार...ह्या ४ही गोष्टींचे पालन ज्याच्याकडून होते, त्याला भविष्यकाळ जड जात नाही.
२.
थोडक्यात काय तर, तुमच्या गरजा जितक्या कमी तितके तुमचे टिकून रहायचा कालावधी जास्त....
३.
.(ती कंपनी, मी एका दिवसात सोडली पण आजही, त्या कंपनीतल्या बॉस बरोबर उत्तम संबंध असल्याने, त्याचा २ वेळा नौकरी संबधात फोन येऊन गेला आणि ते पण बॉस बरोबर एकदाही पार्टी न करता.)
४.
प्रत्येक व्यक्तीने, आपल्या फावल्या वेळेचा, सदुपयोग स्वतःच्या कौटुंबिक भल्या साठी केला पाहिजे मुवि साहेब, नोकरदार माणसाच्या जीवनशैलीचे सार सांगितलं.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/25/2018 - 04:39 नवीन
अगदी योग्य लिहिले आहेस रे मुवि. पण हे मराठी माणसाच्या जीवनाचे सार होय.. असे ह्यांचे मत.(ह.घ्या.) . ईतर अमराठी लोकाना,तरूणाना मोठे फ्लॅट्स्,गाड्या,परदेश नोकर्या.. हव्या आहेत व त्यात भविष्यात काही फरक पडेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/25/2018 - 04:58 नवीन
सुंदर व्यावहारिक आणि "केले ते सांगितले" प्रकारचा प्रतिसाद ! मुवि rocks !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 10/25/2018 - 20:37 नवीन
धन्यवाद...
  • Log in or register to post comments
स
सतिश म्हेत्रे गुरुवार, 10/25/2018 - 07:14 नवीन
तुम्हाला COBOL म्हणायच आहे का? अणि ते नोकरी ऐवजी नौकरी खटकत.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 10/25/2018 - 09:55 नवीन
तुम्हाला COBOL म्हणायच आहे का?
हेच विचारणार होतो
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा