Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

रफाल - भाग २

र
रणजित चितळे
Wed, 10/17/2018 - 05:40
💬 151 प्रतिसाद
ह्या आधीचे रफाल भाग १ भाग २ – वारंवार पडणारे प्रश्न व अंततः प्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का. उ१- यूपीए सरकारच्या वेळेस सुरू झालेल्या वाटाघाटी पूर्णत्वास गेल्या नव्हत्या त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या वाटाघाटीतून उद्भवणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या वाटाघाटींच्या किमतीची आपण तुलना करू शकत नाही. वाटाघाटी ‘किमतीच्या अंदाजे आकड्यावर’ आधारलेल्या असतात. हा ‘किमतीचा अंदाजे आकडा’ नवीन नवीन मिळणाऱ्या माहिती नुसार बदलत राहतो. कोठल्याही वाटाघाटी करायच्या आधी एक कार्य समिती ‘किमतीचा अंदाजे आकडा’ म्हणजेच ‘बॉलपार्क प्राइस’ किंवा ‘बेंचमार्क प्राइस’ तयार करते. असल्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंची किंमत बाजारात उपलब्ध नसते त्यामुळे वेगवेगळ्या माहितीवर व समितीच्या अनुभवावर एक किमतीचा अंदाजे आकडा बॉलपार्क प्राइस ठरवला जातो व त्याला मध्य मानून वाटाघाटींना सुरवात करतात. जेव्हा केव्हा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचतात तेव्हा अशा ठरलेल्या किमतीच्या वैधतेचा काल करारात नमूद करतात. आता युपिएच्या सरकारात २०१४ पर्यंत रफाल बाबत करारच झाला नसल्या कारणाने अर्धवट वाटाघाटींची अर्धवट किंमत व अशा वैधता नसलेल्या अर्धवट किमतीला काही अर्थ नाही, ना त्याचा काही उपयोग. पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे परत त्यात ५० टक्के ऑफसेटचे (व्यापारातला भारतीय भाग) नवीन कलम आहेच (ऑफसेट काय असते ते भाग ३ परिच्छेद ६ (ग) मध्ये वाचायला मिळेल) (पण येथे थोडक्यात देतो – ऑफसेट (व्यापारातला भारतीय भाग) असणे भारतीय कंपन्यांसाठी अत्यंत फायदेशीर असते. त्यात जर ५० टक्के ऑफसेट असेल तर सौद्याच्या ५० टक्के किमतीचा व्यापार व व्यवसाय भारतीय कंपन्यांना परदेशातील करार झालेल्या कंपनीला द्यायला लागतो. एका अर्थाने ५० टक्के पैसा परत भारतात येतो. चीन मध्ये हा १०० टक्क्यावर जाऊ शकतो). परत नियंत्रक महालेखा परीक्षक – कंपट्रोलर ऑडिटर जनरल (CAG) किमतीची बारकाईने चौकशी करून निवाडा देतीलच. तो पर्यंत अर्धवट वाटाघाटीतून निघणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या व करार झालेल्या किमतीची तुलना करणे म्हणजे पेरू बरोबर आंब्याच्या किमतीची तुलना करण्या जोगे चुकीचे ठरेल. प्रश्न २ – जर वाटाघाटी करून किंमत यूपीए पेक्षा कमी असेल तर मग ३६ रफाल विमानेच का १२६ रफाल विमाने का नाही घेतली. उ २- ३६ ऱफाल चे वितरण सप्टेंबर २०१९ पासून सुरू होऊन ते दोन तीन वर्षात भारतात येतील. पाहिल्या वर्षी ०६ दुसऱ्या वर्षी १२ व तिसऱ्या वर्षी १८ असे काहीसे वितरण असेल. त्या काळात हिंदुस्तान एरोनॉटीक्स एलसीए तेजस ह्या लढाऊ विमानाचे उत्पादन वाढवून भारतीय वायुसेनेला त्याचे वितरण करायला लागले असेल व ह्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीला डिफेन्स पिएसयू (DPSU) व्यवसाय उपलब्ध होऊन फायदा होईल. नाहीतर युपिएच्या काळात ३ वर्ष झाली तरी वाटाघाटी संपत नव्हत्या. ह्याचे कारण असे की दासू (रफालची कंपनी) ह्या कंपनीला भारतातील हिंदुस्तान एरोनॉटीक्स ला ToT देण्यात गुणवत्ते विषयक शंका असल्या कारणाने अजून ५ ते ७ वर्षात तरी वाटाघाटी पूर्णत्वाला येतील असे वाटत नव्हते एवढेच काय अशा रखडलेल्या वाटाघाटींमुळे कधी कधी पूर्णं प्रकल्पच गुंडाळून ठेवला जातो व असे झाले असते (त्याची शक्यता दाट होती) तर भारतीय वायुसेनेला विमानांपासून वंचित राहायला लागले असते व त्याच बरोबर हिंदुस्तान एरोनॉटीक्सचे सुद्धा हातचे काम गेले असते (१०८ विमाने बांधण्याचे). आता ३६ विमानांचा करार झाला आहे. त्याच बरोबर पुढे वाटले तर त्या वेळेच्या सरकारला जास्तीची ऱफाल विमाने घेण्यास कोणी थांबवले नाही व एकदा वाटाघाटी होऊन करार झाला की पुढच्या वाटाघाटींसाठी अनायासे किमतीचा अंदाजे आकडा बॉलपार्क प्राइस रक्षा समितीकडे आपोआप मिळालेला असेल त्यामुळे पुढच्या वाटाघाटी सुकर व पटकन संपू शकतात. पण ह्या पेक्षा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो. व तो म्हणजे आपल्या देशाला खरोखरच १२६ ऱफालची गरज आहे का – हा प्रश्न. प्रश्न ३ – आपल्या देशाला १२६ ऱफालची गरज आहे का. उ ३ – ह्या उत्तरासाठी आपण सापेक्ष व प्रामाणिकपणे विचार करायला हवा. मी ऑक्टोबर २०१५ मध्ये मनोहर पारिकरांना एक पत्र लिहिले होते. अंग्रेजी मध्ये होते पण त्या पत्राचा ह्या विषयास अनुशंघून असलेला भाग, मराठीत देत आहे. त्या पत्रात रफालची विमाने १२६ पेक्षा कमी का घ्यावीत ह्याचा तर्क दिलेला आहे तो वाचावा – मूळ पत्र इंग्रजीत होते व त्यातला जो विषयास अनुशंघून भाग आहे तो मराठीत देत आहे “………………………… Along with technology the combat scene has under gone a change and military aviation has grown into a superior tactical and strategic arm. Present day fighter aircrafts carryout tasks of several aircrafts in one single modern fighter aircraft. With the fantastic capabilities, the emphasis is not on numbers but it is on ‘smart’ capability. This can be seen from the fact that the Royal Air Force and the French Air Force, undertake world-wide commitments with just 225 aircraft of two types each, the French Air Force with the Rafale and Mirage-2000 and the Royal Air Force with Tornadoes and Typhoons. Now we are going for a smart plane in Rafale. I heard CHIEF OF AIR STAFF saying they require more Rafales. It is natural to ask for moon as a head of organisation. No head of an organisation would sincerely trim the organisation except for private entrepreneurs. For public funded organisations we see that they get inflated over a period of time. There are 42 squadrons of MIG now slowly getting depleted. No Chief of Air Staff would say that with smart fighter planes we don’t require so many squadrons. Every organisation on public money tends to grow and never try to scale down the force. As a head of the three services I urge to look into this aspect - do we really need all 42 squadrons. 42 Squadrons were when MIG of low technology fighter was available. I know that cutting down number of squadrons is not easy and opposition may make mountain out of a mole. At the same time there is no need to equip all squadrons with costly smart planes. That way we can have a healthy mix of smart and not so smart planes. ………………………………………………………..” पत्र पुढे दुसऱ्या विषयावर जाते. येथे त्याचा संबंध नाही म्हणून उद्धृत करत नाही. प्रश्न ४ – ऱफालवर बसवण्यात येणारी शस्त्रप्रणाली मोदी सरकारने बदलली आहे का. यूपीए सरकारच्या वेळेला जी शस्त्रसामुग्री ठरवली होती तीच आहे का. उ ४ – यूपीए सरकारच्या वेळेला, भारतीय वायुदलाने ज्या शस्त्रप्रणालीची चाचणी केली होती व हिरवा कंदील दाखवला होता तीच शस्त्रप्रणाली ह्या करारात कायम ठेवलेली आहे. ह्या बरोबर दासू कडून केल्या जाण्याचा विमानाचा रखरखावं व विमानाची देखरेखीचा काळ दासू कडून वाढवून घेतला आहे व ५० टक्के ऑफसेट पण लागू केले गेले आहे. हे सगळे आपल्या देशाच्या दृष्टीने हितकारकच आहे. प्रश्न ५ – बोफर्स हा अंतर सरकारी गोव्हर्नमेट टू गोर्व्हनमेट G2G करार होता का. उ ५- नाही. बोफर्स हा करार भारत सरकार (रक्षा मंत्रालय) व स्वीडनची बोफर्स तोफा बनवणारी कंपनी ह्या मध्ये झाला होता. त्या वेळेला क्वात्रोची (इटालियन व्यापारी व गांधी घराण्याचा जवळचा स्नेही) ह्यांनी हा करार घडवण्यात मदत केली होती. प्रश्न ६ – बोफर्स करार संरक्षण खरेदी प्रक्रिया डिफेन्स प्रोक्यूरमेंट प्रोसीजर (DPP) प्रमाणे झाली होती का. उ ६ – नाही. त्या वेळेला (१९८७ च्या सुमारास) डिपिपि अस्तित्वात नव्हती. पाहिली जलद खरेदी प्रक्रिया किंवा फास्ट ट्रॅक प्रोसीजरचे धोरण वर्ष २००१ (वाजपेयी सरकार) च्या वेळेस तयार झाले. वाजपेयी सरकारला त्या वेळेस वाटले रक्षा खरेदीसाठी एक पारदर्शी प्रक्रिया असली पाहिजे म्हणजे भ्रष्टाचार व पैसा चारू लोकं (मिडलमेन) कमी होतील. त्यासाठी धोरण ठरवायचे ठरले. व लागलीच वाजपेयी सरकारा असताना डीपिपि बनवण्यासाठी सल्लामसलती सुरू होऊन पाहिले डिपिपि २००५ साली प्रसिद्ध झाले. त्या वेळच्या संरक्षण मंत्र्यांनी श्री प्रणव मुखर्जी ह्यांनी ह्या धोरणावर सही करून डिपिपि २००५ मध्ये प्रसिद्ध केले. तो पर्यंत रक्षा खरेदी कोठल्याही ठोस धोरणां अभावी मनमानेल तशी केली जायची व म्हणूनच त्यावळचे रक्ष करार भष्टाचारा पासून अलिप्त राहू शकत नव्हते. पण DPP आल्या पासून (२००५) हे चित्र बदलायला सुरवात झाली. प्रश्न ७ – ऱफाल डिफेन्स प्रोक्यूरमेंट प्रोसीजर डिपिपि वर आधारीत आहे का (भाग ३ परिच्छेद १ ते ८ वाचावे). उ ७ – जेव्हा अंतर सरकारी समन्वय किंवा गोव्हर्नमेंट टू गोव्हर्नमेंट करार होणार असतो तेव्हा दोन्ही सरकाराला करार कसा करावा ह्या बद्दल बरेच स्वातंत्र्य असते. सरकारावर डिपिपि धोरणानेच जायचे असे बंधन नसते. खरे तर मोदी सरकारला मध्यम वजनाची युद्ध विमाने मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट्स (MMRCA) बनवणाऱ्या लॉकहिड मार्टीनची एफ् १६, बोईंगची एफ्/ए १८, युरोफायटर टायफून, रशियन मिग ३५, स्वीडनची साब ग्रिपेन व फ्रांसची रफाल ह्या सारख्या कोणत्याही देशाच्या सरकारांबरोबर बोलणी व वाटाघाटी करण्याचे स्वातंत्र्य अंतर सरकारी करारात होते. जर अशा कोणत्याही देशा पासून मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट्स खरेदी केले गेले असते तरी ते गैर ठरू शकले नसते. पण महत्त्वाचा भाग हा आहे की हे स्वातंत्र्य असताना देखील मोदी सरकारने तेच विमान व तीच कंपनी निवडली जी अगोदर आपल्या देशाने २०११ मध्ये डिपिपि प्रक्रिये मार्गे निवडली होती. त्यामुळे मोदी सरकारला एक भरभक्कम नैतिक बळ प्राप्त झाले कारण तांत्रिकी चाचणी व उड्डाण चाचणीतून निवडून येऊन परत दासूची बोली पण सगळ्या विमानात कमी होती. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे जरी डिपिपि ने न जाण्याचे स्वातंत्र्या मोदी सरकारला होते तरी सुद्धा हा अंतर सरकारी करार डिपिपि वर आधारीतच केला गेला आहे. प्रश्न ८ – साठी दासूला रिलायन्स सारख्या भारतीय कंपन्यांबरोबर व्यवसाय करायला मोदी सरकारने सुचवले का. उ ८ – नाही. मूळ उपकरण निर्माता - ओरिजनल इक्विपमेंट मॅन्यूफॅक्टरर (OEM) इथे दासू कंपनीला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ते कोणत्याही भारतीय कंपनी बरोबर बोलणी करून करार करू शकतात. फक्त त्या कंपन्यांना डिपार्टमेंट ऑफ इनडस्ट्रीयल पॉलिसी आणि प्रमोशन (DIPP) कडून परवाना उपलब्ध असला पाहिजे. त्याच बरोबर असे करार अपेंडीक्स अ अध्याय ३ डिपिपि मध्ये दिल्या प्रमाणे झाले पाहिजेत. परत एक अट अशी आहे की जो मूळ निर्माता आहे त्याने त्याच्या इतर छोट्या कंपन्या जर मध्ये भाग घेऊ शकल्या नाहीत तर त्यांचा ही वाटा स्वीकारून त्यांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन पूर्ण केला पाहिजे. एवढे केले तर भारतीय कोणती कंपनी निवडायची ह्याचे स्वातंत्र्य दासू कंपनीला आहे. २०११ मध्ये हिंदुस्तान एरोनॉटीक्स बरोबर ToT साठी बोलणी सुरू होती (इथे ToT चा अर्थ विमानाचे भाग जुळवणे व विमान तयार करणे असे घ्यावे लागेल. मी मागे दिल्या प्रमाणे ToT मध्ये वेगवेगळे स्थर आहेत, त्या मुळे कोणी ToT म्हटल्यावर पूर्णं राफेल विमानाचे निर्माण ToT मुळे हिंदुस्तान एरोनॉटीक्स करायला लागले असते असे उगाच वाटून हुरळून जाऊ नये). पण राफेलच्या जुळवणी करण्याच्या ToT ला सुद्धा दासूला वावगे होते व ते २०१२ ते २०१५ च्या निष्फळ वाटाघाटींतून दिसून येते. जर त्या वाटाघाटी तशाच चालू ठेवल्या गेल्या असत्या तर अजून काही वर्ष रखडून शेवटी रफाल करार कधी न होणारा होऊन रफा दफा झाला असता. २००१ मध्ये वायुसेनेने त्यांच्या १५ वर्षाच्या लॉग टर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन प्रमाणे MMRCA ची गरज प्रदर्शित केली होती. ह्या गोष्टीला १५ वर्ष होऊन त्यांच्या हाती काही लागले नव्हते. अजून विलंब झाला असता तर त्यांच्या लॉग टर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन वर परिणाम झाला असता व आपल्या वायुसेनेचे मनोबळ खचले असते. प्रश्न ९ – फ्रान्सच्या पूर्व प्रधानमंत्र्यानी एका मुलाखतीत असे म्हटले की मोदी सरकारने रिलायन्सचे नाव घेऊन दासूला सांगितले की रिलायन्स बरोबरच व्यापार करा व म्हणून तहत दासूला हिंदुस्तान एरोनॉटीक्स एचएएल सोडून रिलायन्स बरोबर व्यापार करावा लागला. उ ९ – ह्या मुलाखती नंतर ह्याच पंतप्रधानांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते. त्यामुळे भारतीय लोकांमध्ये गोंधळ उडवण्यासाठीच असले वक्तव्य दिले होते की काय ह्याची शंका येते. परत असले वक्तव्य त्यांच्या भारतीय मित्रासाठी समन्वय साधून केले की काय ह्याची पण शंका येते कारण असे वक्तव्य येण्या अगोदरच्या आठवड्यात एका विरोधी पक्षाच्या नेत्याने ट्विट करून भाकीत केले होते की एक हादरून टाकणारे वक्तव्य पुढच्या आठवड्यात येणार आहे त्यामुळे ही शंका!!!! राजकारण वेगळे सोडले तर, ज्यांना डिफेन्स परवाने मिळालेले आहेत अशा सगळ्या कंपन्यांची यादी DIPP कडे असते व त्यांना माहीत असते कोणती भारतीय कंपनी कोणत्या क्षेत्रात व्यापार करतात. व एखाद्या करारात जर करार करणाऱ्या देशाने विचारले तर कंपन्यांची नावे सांगायचे पूर्ण स्वातंत्र्य DIPP ला आहे. अशी नावे उपलब्ध करून द्यायची हे DIPP चे एक काम आहे. नाहीतर परदेशी कंपनीला त्यांचा वेळ घालवून कंपन्या शोधत हिंडावे लागेल. काही कंपन्या त्यांना कधीच मिळणार नाहीत व त्यामुळे अजाणतेपणे त्यांच्या बरोबर व्यापार केला जाऊ शकणार नाही त्यामुळेच DIPP कडे आपल्या भारतीय कंपन्यांची जाहिरात करण्याचे मोठे काम आहे. तेव्हा जर कोणी सुचवू पाहतं असेल की मोदी सरकारने भारतात व्यवसाय करण्याकरता कंपन्यांची नावे जाहीर केली तर त्याला भारतीय उद्योगां बद्दल माहिती कशी दिली जाते व त्याची प्रक्रिया काय व त्याचे धोरण काय ह्या कशाची माहिती नाही हेच जाहीर होते. उगाच उचलली जीभ व लावली ताळ्याला असे झाले म्हणायचे. प्रश्न १० – ह्या करारा अंतर्गत रफाल बरोबर उद्योग करणाऱ्या कोणकोणत्या कंपन्या आहेत. उ १० – (भाग ३ परिच्छेद ६ (ग) वाचावा). ७० पेक्षा जास्त भारतीय कंपन्या ज्यात डीआरडीओ व प्रायव्हेट कंपन्या पण शामील आहेत. ह्या कंपन्या रफाल बरोबर व्यवसाय करायला सज्ज आहेत. (गुगल वरून डाऊनलोड - अजून कंपन्या पण आहेत त्यात पण हे फक्त दर्शवण्यासाठी देत आहे - रीलायन्स कडे साधारण ३ टक्के ऑफसेट) भारतीय व्यापार भागीदार प्रश्न ११ – ToT तंत्रज्ञानाचे हस्तांतरण रफाल करारातून का वगळले गेले. उ ११ – ToT वगळल्या शिवाय वाटाघाटी पुढे सरकत नव्हत्या. जर पुढे सरकणाऱ्या असत्या तर २०१२ मध्येच यूपीए सरकार असताना तो करार झाला असता. २०११ साली सगळ्यात कमी बोलीवर व बाकीच्या निकषांवर रफालची निवड होऊन सुद्धा २०१५ पर्यंत ToT मुळे वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचू शकल्या नाहीत ह्याचाच अर्थ हे कलम जर असच कायम ठेवले असते तर अजून पर्यंत वाटाघाटी पूर्ण झाल्या नसत्या व करार झाला नसता. ह्या कराराचे प्राथमिक उद्दिष्ट वायुसेनेच्या लॉंगटर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन प्रमाणे त्यांना MMRCA विमाने उपलब्ध करून देणे होते, ToT हे जाता जाता जमले तर चांगलेच असे दुय्यम उद्दिष्ट. प्राथमिक उद्दिष्टच जेथे रखडले व पुरे होत नाही असे दिसत असेल तर दुय्यम उद्दिष्टावर नजर लावून बसण्यात काय अर्थ आहे. आणि जर दुय्यम उद्दिष्ट साध्य करायच्या नादात प्राथमिक उद्दिष्ट संपुष्टात येत आहे असे दिसत असेल तर दुय्यम उद्दिष्ट प्राप्त होण्यात काही अर्थ नाही. ह्याच दृष्टिकोनातून ते वगळले गेले. नाही तर विमाने आली नसती व ती येत नाहीत म्हणून ToT पण झाले नसते. प्रश्न १२ – रफाल ची किंमत सार्वजनिक का करत नाहीत. किमतीची चर्चा का होऊ देत नाही. करारात सुरक्षे संबंधीत कोणते कलम आहे की जेणे करून त्याची किंमत सार्वजनिक होऊ शकत नाही. उ १२ – प्रत्यक रक्षा करारात कोणत्या गोष्टी सार्वजनिक करण्यास मोकळ्या व कोणत्या गोष्टी गुप्त ठेवायच्या ह्याची कलमे असतात. जर त्याची किंमत सार्वजनिक केली गेली तर आपल्या शत्रू राष्ट्रांना आयतेच किमतीच्या अंदाजाचे आकडे उपलब्ध होतील. त्यावरून त्यांना कोणती शस्त्र आपण विकत घेत आहोत ह्याचा अंदाज लावता आला असता. शत्रू राष्ट्राला एकदा अंदाज लागला की त्या शस्त्राला तोड म्हणून त्याला मारक अशी शस्त्रप्रणाली विकत घेऊन तो आपल्याला शह देऊ शकतो. युद्धाचा हाच खेळ असतो. शस्त्र – त्याला तोड. त्या तोडाला तोड. हे सगळे जे कमी वेळात करू शकतात ते जिंकतात. सगळ्या गोष्टी सार्वजनिक करून आपण आपल्या शत्रू राष्ट्रांना एक प्रकारे मदतच करतो. प्रश्न १३ – अंबानींना विमान बनवण्यात अनुभव आहे का. उ १३ – त्यांनी पिपावाव कंपनी विकत घेतली जी बरीच वर्ष डिफेन्स प्रॉडक्शन मध्ये होती. बाकी कंपनी कशी आहे ते दासू ने जाणून घ्यायचे त्यांचा निकष महत्त्वाचा ऑफसेट त्यांनी फेडायचे आहे. अंततः - मी हा लेख लिहिण्या मागचे उद्दिष्ट असे की वर्ष २००१ पासून रक्षा संपादन हे मन मानेल तसे कसे ही होत नाही तर त्या संपादना मागे एक कायदेशीर प्रक्रिया उभारली गेली आहे. ती प्रक्रिया पारदर्शक बनवण्याच्या धोरणातून निर्माण झाली आहे. आता ती पूर्वी सारखी भ्रष्टाचाराला चारा घालणारी राहिली नसून त्याला आळा घालणारी झाली आहे. अंतर सरकारी करार अशा प्रक्रियेला अजून मजबुती देतो, जिथे भ्रष्टाचारी लोक नाही तर थेट आपले सरकार दसर्‍या सरकारशी बोलून काय पाहिजे ते विकत घेते. हा लेख विशेष करून तरुणांना व नवीन पिढीला वाचून दाखवायला हवा. त्यामुळे त्यांच्यात अपप्रचाराने निर्माण झालेला संदेह जाऊन आपल्या धोरणांवर व रक्षा संपादन प्रक्रियेवर विश्वास बसू शकेल. प्रत्येक रक्षा खरेदी भष्टाचारातून निर्माण झालेली नसते हे त्यांना समजले पाहिजे. जे काही नेते व काही पक्ष अपप्रचार करून विश्वास तोडण्याचे काम करत आहेत ते त्यांच्या स्वत:च्या भवितव्याच्या व पक्षाच्या अस्तित्वाच्या संभ्रमातून उद्भवलेली त्यांची गरज आहे व त्यामुळे वास्तव बिघडवण्याचा प्रयत्न आहे. मला खात्री आहे जो पक्षाध्यक्ष भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे त्याला डिपिपिचा लवलेशही माहीत नसणार ना जाणून घ्यायची त्याच्या कडे कुवत आहे ना इच्छा आहे. त्याला फक्त लोकांना गोंधळात टाकून संभ्रम उत्पन्न करायचा आहे. तो फक्त शिकवलेली पोपटपंची करून स्वतःचा टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या नादात वावरत आहे. तिसरा भाग लवकरच – (क्रमशः)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 97198 views

💬 प्रतिसाद (151)
ट
ट्रम्प Sat, 10/20/2018 - 04:13 नवीन
एक काम करा चितळे साहेबांनी लिहलेला लेख खोट्या माहितीवर आहे / भाजप ची भलामण करणारा आहे असं गृहीत धरून राफेल वर तुम्ही लांबलचक लेख लिहून तुमची विद्वत्ता दाखवाच !! त्या शिवाय शिवभक्त आणि मोदीभक्त मधील वाद थांबणार नाही . ही एका मोदीभक्ताची विनंती आहे = )
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Sat, 10/20/2018 - 04:18 नवीन
या लेखात काहीही गोपनीय माहिती उघड केलेली नाही. मला सगळे नियम माहित आहेत. मी सेनेतून आता निवृत आहे.
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Sat, 10/20/2018 - 04:20 नवीन
या लेखात काहीही गोपनीय माहिती उघड केलेली नाही. मला सगळे नियम माहित आहेत. मी सेनेतून आता निवृत आहे.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 10/20/2018 - 04:45 नवीन
ओके. दोन्ही किंमती गोपनीय असताना दुसरी पहिलीपेक्षा कमी आहे हे तुम्ही ठामपणे म्हणता की मोघम?
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Sat, 10/20/2018 - 04:53 नवीन
सैन्य अधिकारी कधी मोघम, जरतर ची भाषा करत नाहीत जे म्हणायचे ते ठाम पणेच म्हणतात
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/20/2018 - 06:11 नवीन
चितळे साहेब तुम्ही उगाच लष्करात वर्षे फुकट घालवलीत. अगोदर ऑफिशिअल सिक्रेट्स ऍक्ट मिपामधील दिग्गजांकडून शिकून घ्यायला हवा होतात. आणि काहि सिक्रेट्स त्यांना माहिती असतात ती तुम्हाला माहिती नसतात हे हि समजून घ्यायचे होते. नाही तर पोकळ बांबूचे फटके मिळतील.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 10/20/2018 - 07:15 नवीन
लेखात तुम्ही तुलनात्मक किंमतीचा उल्लेख केल्यावर त्याच्या सत्यतेची मागणी होणारच,जी तुम्ही देऊ शकत नाही. मग असा उल्लेख टाळता आला नसता का चितळेसाहेब?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/19/2018 - 05:52 नवीन
https://www.misalpav.com/comment/reply/43450/1012777 चितळे साहेब मी वर आपल्याला एक विनंती केली आहे.
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Sat, 10/20/2018 - 04:37 नवीन
अगदी खरे
  • Log in or register to post comments
S
SHASHANKPARAB Fri, 10/19/2018 - 07:46 नवीन
मला तर या लेखात कुठलिहि गोपनिय महिती उघड झालेली दिसली नाही.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 10/19/2018 - 10:20 नवीन
भारत रफाल घेतोय ही माहिती गोपनीय नाही काय ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/19/2018 - 11:26 नवीन
खरी गोपनीय बातमी तर अशी आहे की भारत JF-17 विमान आणि PL -9C क्षेपणास्त्र घेतोय.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Fri, 10/19/2018 - 13:37 नवीन
एकंदरीत भाजप ची राफेल विमान करार किंमत यातील गोपनीयता पूर्णतः समर्थनीय आहे असा भक्तांचा सूर दिसतोय. ठीक आहे. हा काही शेवटचा करार नाही. २०१९ नंतर पण बरेच करार होतील. तेव्हा पण त्या सरकारने असाच पवित्रा घेतला तरी हीच राहील ना प्रतिक्रिया तुमची ?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 10/19/2018 - 15:25 नवीन
अर्थात.. हायर लेव्हल ला ज्या गोष्टी होतात त्या प्रेत्येक वेळेस डिटेल मध्ये मला कळलंच पाहीजेत असा माझा कधीच आग्रह नसतो. पण गोपनीयता आहे म्हणून 2G च्या लिलावाचे आकडे लपवायला गेलात तर मान्य होणार नाही. आता मला सांगा, रॉ अनेक देशात जाऊन अनेक गोष्टी करते, ते काय त्यांनी लेजर लिहून आम्हाला सांगायला पाहिजे का? रागा रॉ ची गुप्त माहिती कळावी म्हणून आग्रह का करत नाहीत?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 10/19/2018 - 15:28 नवीन
बाय द वे, augasta westland चे उदाहरण घ्या.. कोणीही किंमत सांगा म्हणून आग्रह केला नव्हता.. कळल्यावर देखील भ्रष्टाचार झाला असेल म्हणून देखील ओरडले नव्हते.. ओरड झाला तो दलाली प्रकरण बाहेर पडल्यावर.. त्यात सुद्धा संरक्षण किंवा अश्या आंतरदेशीय व्यवहारात दलाली अधिकृत करावी असे माझे मत आहे. पण सरकार माझ्या मताला भीक घालणार नाही हे पण मला माहितेय
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Fri, 10/19/2018 - 15:28 नवीन
मी फक्त किंमत विषयी बोलत आहे. आता बघूच २०१९ नंतर ..
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Fri, 10/19/2018 - 16:28 नवीन
हांगं अश्शी... सौ सुनारकी आनी एक... अ... आपलं... लव्हारकी ! अग्ली बार रागा सर्कार !! २०१९ साली आम्चे लोक्प्रिय जनेऊधारी, शिवभक्त आनी पार्टीचे अनभिशिक्त न्येते युवराज श्रीश्रीश्री (उर्फ लोजशिपाअन्येयुश्रीश्रीश्री) रागासायेब पंतपरधान व्हनारच आनी मंग त्ये नुस्त्या देसूबिसू नायतर खाल्च्या समद्या भ्रश्टाचाराचे खर्रे खर्रे आकडे सोत्ताहून पेप्रात प्रशिद्द कर्नार हाहेत होsss 2011 2जी स्पेक्ट्रम घोटाला 1,76,000 करोड़ 2011 कॉमन वेल्थ घोटाला 70,000 करोड़ 2010 आदर्श घर घोटाला 900 करोड़ 2010 S बैंड स्पेक्ट्रम घोटाला 2,00,000 करोड़ 2010 खाद्यान घोटाला 35,000 करोड़ 2009 चावल निर्यात घोटाला 2,500 करोड़ 2009 उड़ीसा खदान घोटाला7,000 करोड़ 2009 झारखण्ड खदान घोटाला 4,000करोड़ 2009 झारखण्ड मेडिकल उपकरण घोटाला130करोड़ 2008 हसन अली हवाला घोटाला 39,120 करोड़ 2008 काला धन 2,10,000 करोड 2008 स्टेट बैंक ऑफ़ सौराष्ट्र 95 करोड़ 2008 सैन्य राशन घोटाला5,000 करोड़ 2008 सत्यम घोटाला 8,000 करोड 2006 पंजाब सिटी सेंटर घोटाला 1,500 करोड़ 2006 ताज कॉरिडोर घोटाला 175 करोड़ 2005 आई पि ओ कॉरिडोर घोटाला1,000करोड़ 2005 बिहार बाढ़ आपदा घोटाला 17 करोड़ 2005 सौरपियन पनडुब्बी घोटाला 18,978करोड़ 2003 स्टाम्प घोटाला 20,000 करोड़ 2002 संजय अग्रवाल गृह निवेश घोटाला 600करोड़ 2002 कलकत्ता स्टॉक एक्सचेंज घोटाला 120करोड़ 2001केतन पारिख प्रतिभूति घोटाला 1,000करोड़ 2001 UTI घोटाला 32 करोड़ 2001 डालमिया शेयर घोटाला 595 करोड़ 1998 टीक पौध घोटाला 8,000 करोड़ 1998 उदय गोयल कृषि उपज घोटाला 210 करोड़ 1997 बिहार भूमि घोटाला 400 करोड़ 1997 सुखराम टेलिकॉम घोटाला 1,500 करोड़ 1997 SNC पॉवेर प्रोजेक्ट घोटाला 374 करोड़ 1997 म्यूच्यूअल फण्ड घोटाला 1,200 करोड़ 1996 उर्वरक आयत घोटाला 1,300 करोड़ 1996 यूरिया घोटाला 133 करोड 1996 चारा घोटाला 950करोड़ 1995 मेघालय वन घोटाला300करोड़ 1995 प्रेफ्रेंशल अलॉटमेंट घोटाला 5,000 करोड़ 1995 दीनार घोटाला (हवाला) 400करोड़ 1995 कॉबलर घोटाला 1,000 करोड़ 1995 वीरेंदर गौतम (कस्टम टैक्स) घोटाला 43करोड़ 1994 चीनी घोटाला 650 करोड़ 1992 हर्षद मेहता (शेयर घोटाला) 5,000 करोड़।। 1080-90s बोफोर्स तोप घोटाला -राजीव गांधी 960करोड़ कोनाला आजून काय काय नावं म्हायती आस्सली तर नुस्तं ब्वोला बास. आमाचे लोजशिपाअन्येयुश्रीश्रीश्री रागासायेब सोत्ता सम्दे आकडे आनी त्ये कोनाकोनाकडे ग्येले ते सम्दे लोक्सभेत फटाफट भाषान देउन सांगतिला. काय सम्जलानं, आँ !
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 10/19/2018 - 19:56 नवीन
आणि ते पण रावण दहन नंतर!!! असं नाही करायचा, टाका ना यांना कारागृहात जसं काही हे मागे पुरावे ठेवून गेले आहेत,आणि त्यांचे भागीदार सरकारी, बॅंक कर्मचारी अगदी अलगदपणे सापडतील. काही लाभार्थी सत्ता, सरकारी ठिकाणी असतील तर ... तरी म्हणायला काय विशेष अक्कल लागत नाही, न्यायव्यवस्था कशी फरफटत जाते हे रस्त्यावर फुकटात मेलेल्या आणि त्यांना सद्गती देणार्या प्रेमने "हम आपके है कौन"असं वेडावून दाखवलं आहे. मुदलात किरकोळ सदस्य नाखु
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/20/2018 - 06:21 नवीन
UPA २ च्या काळात झालेले एवढे सगळे घोटाळे बाहेर आले. परंतु P ८ I या विमानाच्या दोन सरकारांच्या मधील कंत्राटावर NDA ने कोणताही आक्षेप घेतला नाही किंवा त्याच्या किमतीबद्दल कोणताही गदारोळ केला नाही हे कसे काय झाले? आणि आताही मोदी सरकारला ४ वर्षे झाली तरी त्याबद्दल काही चकार शब्द नाही. उलट मोदी सरकारने अजून चार विमाने विकत घेण्याचे कंत्राट दिले. कुछ तो गडबड है दया.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Sat, 10/20/2018 - 13:04 नवीन
Orders dry up, HAL staff could sit idle हरकत काय ? अंबानी जगला पाहिजे. ते महत्वाचे. या लोकांना काय, सरकार फुकट पगार देऊ शकतेच कि . https://economictimes.indiatimes.com/news/defence/orders-dry-up-hal-staff-could-sit-idle/articleshow/66291103.cms HAL has 29,035 employees, including 9,000 engineers. And, they’re spread across nine locations—Bengaluru; Nashik in Maharashtra; Lucknow, Kanpur and Korwa in Uttar Pradesh; Barrackpore in West Bengal; Hyderabad and Kasargod in Kerala—with Bengaluru and Nashik accounting for 10,000 of them.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 10/22/2018 - 04:22 नवीन
ओपन आणि स्ट्रेट बोलतो.. ही बातमी व्यवस्थित आहे, पण सदर आयडी यातून अर्धवट माहिती काढून इतरांची दिशाभूल करत आहे .. 1. बातमीत सरळ लिहिलंय, HAL कडे 83 तेजस ची ऑर्डर येऊ घातली आहे, जी आली तर या सगळ्यांना काम मिळेल. 2. हे सगळे लोक आता या क्षणी बेंच वर येत आहेत. राफेल डील झालं असतं तर या सगळ्या आ आत्ता या क्षणी काम कसे मिळाले असते हे या आयडीने कृपया स्पष्ट करावे. आणि अंबानीच्या 3000 कोटी मध्ये हे 29000 लोक कसे पोसले गेले असते हे पण सांगणे, अन्यथा मिपाकरांची माफी मागावी.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Wed, 10/24/2018 - 09:29 नवीन
आत्ता या क्षणी काम कसे मिळाले असते हे या आयडीने कृपया स्पष्ट करावे नंतर मिळाले तरीही बरेच नाही का ? कधीच न मिळण्यापेक्षा ? अंबानीच्या 3000 कोटी मध्ये फक्त ३००० कोटी ? तो सांगायचा आकडा आहे .. राफेल डील कॉस्ट किती आहे ते एकदा बघा ..
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Mon, 10/22/2018 - 07:28 नवीन
तुमची आकलन क्षमता अगदी राहुल गांधीच्या तोडीची आहे. हे तुमच्या वरिल प्रतिसादातून दिसून येत आहे. -- अजून येऊ देत असे हास्यास्पद प्रतिसाद. :))
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sat, 10/20/2018 - 19:07 नवीन
खूप छान मुद्देसूद अपोलोजेटिक लेखन!
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 10/20/2018 - 19:43 नवीन
गाववाले तुम्ही पण भक्तगणात शिक्कामोर्तब केले गेले. भा शि मो नाखु
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sun, 10/21/2018 - 22:22 नवीन
हा हा हा.. होल्ड युवर हॉर्सेस गाववाले, अजून अचूक लेखन म्हटलेलं नाहीय. =))
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Mon, 10/22/2018 - 08:21 नवीन
ननि यांचा वरील प्रतिसाद कळला नाही. अपोलोजेटीक! बाय द वे, मी चितळे साहेबांना काही विचारले होते वरती, प्रोसिजर वाचूनच, पण त्यावर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. दुवा: https://www.misalpav.com/comment/1012791#comment-1012791
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 10/25/2018 - 16:45 नवीन
तर तात्पर्य काय की मोदी आणि भाजप सरकारने केलेला व्यहवार अतिशय स्वच्छ आहे. रिलायन्स ही कंपनी विमान बनवण्या/जोडण्याकरिता सर्वोत्तम भारतीय कंपनी आहे रिलायन्सला कंत्राट मिळावे याकरिता मोदी सरकारातील कुणीही शब्द टाकला नाही. मोदी सरकार जे काही करतं ते सगळं फक्त आणि फक्त देशहिताकरिताच असतं तो रागा एक मुर्ख माणूस आहे आणि यातलं कुणाला काही अमान्य असेल तर तो एक देशद्रोही म्हणून गणला जाईल.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 10/25/2018 - 18:46 नवीन
प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे खात्री देऊ शकत नाही. कारण ते मिपावर प्रतिसाद देण्यासाठी उपलब्ध नाहीत आणि त्यांच्यापेक्षाही सरसपणे मोडतोडप्रवणअर्धहळकुंडीपीतपिपाणी वाजवणारे स्वघोषीत प्रवक्ते आहेत. बाकी मुद्दे कपील सिब्बल यांच्या कडे पाठवीले तर किरकोळ दुरुस्ती करून प्रचारपत्रिकेत समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. पुन्हा शिक्कामोर्तब झालेला नाखु वाचकांची पत्रेवाला
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/26/2018 - 06:08 नवीन
तो रागा एक मुर्ख माणूस आहे मी आपल्या मताशी १००% सहमत आहे. गम्मत म्हणजे सगळेच भारतीय याच्याशी सहमत आहेत. कारण इकडे बटाटे टाकून तिकडून सोनं बाहेर काढण्याचे मशीन लावणार असूनही सोन्याचा भाव कमी व्हायच्या ऐवजी वाढलाच आहे. बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 10/26/2018 - 10:50 नवीन
गम्मत म्हणजे सगळेच भारतीय याच्याशी सहमत आहेत
खरं आहे.. रागा मुर्ख आहे आणि त्याला बाजूला सारण्याचं धाडंस बाकी काँग्रेसजनांत अजूनतरी नाही म्हणूनच इतरांच फावतंय... ते असो. पृथ्वीराज चव्हाण भारताचे पंतप्रधान बनतील हे स्वप्न मी उराशी बाळगून आहे... २०१९ .. नाही तर २०२४ ला तरी "अब की बार pc सरकार !! ...."
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 10/26/2018 - 14:28 नवीन
पृथ्वीराज चव्हाण भारताचे पंतप्रधान बनतील हे स्वप्न मी उराशी बाळगून आहे असं प्रकटपणे म्हणून तुम्ही पृ. चव्हाणांचे अभितव्य धोक्यात आणत आहाते, हे आपल्या ध्यानात आले काय ? पंतप्रधानपद सोडाच, आजपर्यंत 'कॉग्रेसच्या पक्षाध्यक्षाच्या पदासाठी निवडणुकीला उभे राहणार' अशी नुसती इच्छा व्यक्त केलेल्या भल्याभल्यांची काय अवस्था झाली आहे, हे विसरलात ?! =))
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 10/27/2018 - 14:03 नवीन
त्यांना चव्हाणांचे पवाररुपांतर करायचं आहे!!! हाकानाका नाखु वाचकांची पत्रेवाला
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/26/2018 - 06:05 नवीन
ना खु साहेब काय होतंय कि मोदी विरोधी लोकांची फार तडफड होते आहे कारण कोणत्याही बाबतीत "घोटाळा" असे कितीही उच्चरवाने सांगितले तरी कोणत्याही बाबतीत सबळ असा पुरावा कोणालाही देता येत नाहीये. त्यामुळे त्या पुरस्कार वापसीच्या भंपक प्रकारानंतर दर काही दिवसांनी नवीन नवीन काहीतरी काढायचे आणि मोठा आरडा ओरडा करायचा आणि ते खोटं निघालं कि शांत बसायचं सोडून परत काहीतरी भंपक शोधून काढायचं. डोंगर इकडनं पोखरला आणि उंदीर निघाला कि परत तिकडनं पोखरायला सुरुवात करायची अशी स्थिती झाली आहे.
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Sat, 10/27/2018 - 14:45 नवीन
सरकारने दासूला सांगायला पाहिजे होते ऑफसेट कोणालाही द्या फक्त अंबानींना देऊ नका. मग तरी सुद्धा ओरड झाली असती.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/27/2018 - 14:59 नवीन
रिलायन्सला फक्त ८५० कोटीचे कंत्राट आहे. एवढा डोंगर पोखरून एक उंदीर निघाला. आता हे लोक कोणता डोंगर पोखरायला घेणार? The joint venture, Dassault Reliance Aviation Limited (DRAL), will see an investment capped at €100 million (Rs 850 crore) for setting up a plant to manufacture parts for Falcon executive jets, ET has learnt. https://economictimes.indiatimes.com/news/defence/reliance-defence-to-get-3-of-rs-30000-crore-offset/articleshow/66228334.cms
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Sun, 10/28/2018 - 04:36 नवीन
म्हणजे ४०० करोड
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 10/28/2018 - 10:07 नवीन
युवराज ३०००० हजार कोटींचा मलिदा अंबानींच्या कंपनीलाच राफेल करारामुळे दिला असं म्हणतात. आता कुठे बेसीकमध्ये लोच्या आहे ते पहा. काही पुरावे मागणी करणारे विचारवंत बुद्धीवादी यांसाठी खालील दैनिक भास्कर मधून कांग्रेस अध्यक्ष ने कहा- देश के प्रधानमंत्री भ्रष्ट हैं, राफेल पर जवाब दें, नहीं तो इस्तीफा दें राहुल ने कहा- खुद प्रधानमंत्री ने अनिल अंबानी को कंपनसेशन दिलवाया राहुल का सवाल- रक्षा मंत्री को अचानक फ्रांस क्यों भेजा गया? Dainik Bhaskar Oct 11, 2018, 03:09 PM IST नई दिल्ली. राफेल विवाद पर कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ने गुरुवार को फिर मोदी सरकार को आड़े हाथों लिया। राहुल ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को भ्रष्ट बताया। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री ने अनिल अंबानी को राफेल का कॉन्ट्रैक्ट दिलाकर 30 हजार करोड़ रुपए उनकी जेब में डाले। वे देश के नहीं, अंबानी के चौकीदार हैं। अगर मोदी राफेल डील में भ्रष्टाचार को लेकर जवाब नहीं दे पा रहे हैं तो इस्तीफा दें। उधर, फ्रांस की एक मैगजीन ने राफेल बनाने वाली दैसो के आंतरिक दस्तावेजों के हवाले से दावा किया कि कंपनी के पास रिलायंस के अलावा दूसरा विकल्प नहीं था। हालांकि, दैसो ने इससे इनकार किया है।
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 10/28/2018 - 13:59 नवीन
ऐका खुद्द घोड्याचा तोंडून आणि स्वतःच ठरवा कोण किती फेकाफेक करतो आहे ते...
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 10/28/2018 - 14:03 नवीन
और ये है तुलनात्मक ब्यौरा.... :) विशेषतः, राफालं आणि रिलायंसमधील काँट्रॅक्टसंबंधीच्या तारखा/वर्षे आणि त्यावेळेची दोन देशतिल सरकारे हे तपशील पाहणे मनोरंजक ठरू शकते
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Sun, 10/28/2018 - 17:12 नवीन
वरील दोन्ही व्हिडीओ पाहिल्यावर याउप्पर काही अधिक चर्चा करणे आवश्यक आहे असे वाटत नाही, फक्त त्या '५० वर्षीय युवराजाच्या' टाळक्यात हे कसे उतवायचे हेच एक मोठे आव्हान आहे. विनाकारण केवळ फोकसमध्ये राहण्यासाठी तो ५० वर्षीय युवराज खोटे आरोप करतोय किव्वा या डिलमध्ये आपल्या हाताला एक दमडीसुद्धा लागली नाही म्हणुन चाललेले रडगाणे आहे अशी शंका येते.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 10/28/2018 - 17:39 नवीन
रागाभक्तांची ज्याम कुचंबणा झाली आहे. नवीन उटपटांग आरोप करण्यासाठी त्यांच्या खालील संघटना संशोधन उत्खनन सुरू करीत आहेत. "खोटंच बोल पण रेटून रेटून बोल" "वडाची साल पिंपळाला आणि मुल्लाची दाढी साधूला" संपादक (प्रमाणित २०१६ पासूनच शिक्कामोर्तब) नाखु वाचकांची पत्रेवाला
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 10/28/2018 - 18:38 नवीन
राग मानू नका नाखुकाका, पण आजकालचे तुमचे प्रतिसाद वाचून वगात कसा "दिसला गं बाई दिसला" असा मुख्य आवाज आला की मागच्या "हिला दिसला गं बाई दिसला" च्या रंगीबेरंगी कोरसाची आठवण येती बघा. ते एक असो... राजकारण सोडा, चिंचवडात मिसळ कधी खाऊ घालताय ते सांगा.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 10/29/2018 - 03:00 नवीन
चिंचवड आपलाच असा अभ्यासाठी आजपण आणि उद्यापण नाखु
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Tue, 10/30/2018 - 06:29 नवीन
दासूच्या मालकांनी इकॉनॉमीक टाईम्सला दिलेली मुलाखत मस्त आहे.
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या Fri, 12/14/2018 - 09:48 नवीन
राफेल प्रकरणी सर्व याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने परखड मतं नोंदवली आहेत. 'राफेल कराराच्या प्रक्रियेवर आम्ही समाधानी असून त्यावर शंका घेण्यासारखं काहीही कारण नाही. यात काही पक्षपात झालाय, असं आम्हाला आढळून आलं नाही. त्यामुळे त्यावर अपीलीय प्राधिकारी बनून कराराच्या सर्व मुद्द्यांची चौकशी करणं कोर्टासाठी ठरणार योग्य नाही,' असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. तर ऑफसेट पार्टर्नरच्या पर्यायात हस्तक्षेप करण्याचंही काही कारण नसल्याचं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केलं. --maharashtra times news
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 12/14/2018 - 10:01 नवीन
रफाल खरेदीवर सुप्रिम कोर्टात गेलेल्या तीन जणांना (प्रशांत भुषण अरुण शौरी व यशवंत सिंन्हा) सु.को. ने सणसणीत चपराक मारलेली आहे
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Fri, 12/14/2018 - 10:05 नवीन
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल https://timesofindia.indiatimes.com/india/sc-verdict-on-rafale-defence-deal-what-the-court-said/articleshow/67088303.cms https://indianexpress.com/article/india/rafale-deal-sc-dismisses-probe-pleas-says-country-cant-remain-without-fighter-jets-5493476/ https://www.loksatta.com/desh-videsh-news/rafale-fighter-jets-deal-supreme-court-cji-ranjan-gogoi-no-irregularities-process-modi-government-1805821/ https://www.republicworld.com/india-news/politics/titanic-win-for-modi-government-supreme-court-dismisses-opposition-and-lobbys-plea-on-rafale-deal
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Sat, 12/15/2018 - 02:51 नवीन
मझा लेख व निकाल ह्यात बरेच साम्य आहे. छान वाटले वाचुन
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 12/15/2018 - 03:36 नवीन
आता सरकारने विरोधकांची जेपीसी मागणी मान्य करून त्यांना तोंडावर पाडायची संधी गमावू नये.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा