पुण्यातील शाळानिवडीबाबत मदत हवी आहे
मी मिपाचा अनेक वर्ष वाचक आहे. इथे नेक क्षेत्रातले अनुभवी लोक लेखन करत असतात आणि त्यांचे अनुभव मांडत असतात. म्हणून मला मिपाकरांकडून एक मदत हवी आहे. मी बरेच वर्षांच्या परदेश वास्तव्यानंतर परत पुण्यात राहायला येत आहे. माझी मुलगी दोन वर्षांची आहे. त्यामुळे तिच्या शाळेचा (प्लेग्रुप वगैरे) विषय घरी चर्चिला जात आहे. हल्ली बऱ्याच आधी शाळेत ऍडमिशनसाठी नंबर लावावा लागतो असे समजले. बऱ्याच लोकांशी चर्चा केल्यानंतर शाळेबद्दलचा गुंता सुटण्याऐवजी जास्तच वाढत गेला. अनेक शाळांबद्दल अनेक मत मतांतर ऐकायला मिळाली. काही तर एकदम परस्पर विरोधी होती. शिवाय CBSE का SSC ह्याबद्दल कन्फ्युजन आहेच.
मी राहायला मॉडेल कॉलनी परिसरात असल्यामुळे मी ३-४ शाळा निवडल्या आहेत.
१) अभिनव विद्यालय, एरंडवणे
२) DES Primary & Pre - Primary School टिळकरोड़
३) Symbiosis Primary and Secondary स्कूल, प्रभातरोड
४) विखे पाटील मेमोरियल स्कुल, सेनापती बापट रोड
प्रत्येक शाळेचे पालक सापेक्ष गुणदोष ऐकायला मिळाले आहेत त्यामुळे निर्णय घेणे अवघड जात आहे. मूलभूत शिक्षणाबरोबर खेळ, अभ्यासेतर उपक्रम अश्या गोष्टींना उत्तेजन देणारी शाळा असेल तर उत्तमच आहे. CBSC चांगलं का SSC हा प्रश्न आहेच. कृपया अनुभवी मिपाकरांना ह्या बाबतीत योग्य मार्गदर्शन करण्याची विनंती करत आहे.
फाडफाड इंग्रजी बद्दल मानसशास्त्रज्ञ काय म्हणतात ऐका https://www.youtube.com/watch?v=O737FAbkEiM या चॅनलवरचे इतरही व्हिडिओ बघा https://www.youtube.com/channel/UCRuEVEtM1LRY67X0HM2b8aQ/videos