कविता महाजन: शैलीदार लेखिका
- डॉ. सुधीर रा. देवरे
दिनांक 27-09-2018 च्या संध्याकाळी झी चोवीस तासवर ब्रेकींग न्यूज येत होती : लेखिका कविता महाजन यांचे न्यूमोनियाच्या आजाराने निधन. प्रचंड हादरलो. अस्वस्थ झालो.
कवयित्री कविता महाजन यांच्याशी पहिली भेट झाली तेव्हा त्या पांढर्याड साडीत आणि गळ्यात रूद्राक्ष माळा घातलेल्या तरूणी होत्या. दुसरी भेट 2000 साली बडोद्याला भाषा केंद्रात झाली. कविता महाजनचं ‘वारली लोकगीबतं’ हे संकलीत पुस्तक आणि माझं ‘आदिम तालनं संगीत’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन बडोद्याच्या भाषा केंद्राच्या कृतीसत्रात सोबतच झालं. यावेळी साहित्य आणि कवितेवर आमच्या अनौपचारिक गप्पा झाल्या होत्या. ‘राम राम पाव्हनं डॉट कॉम’ या वेबसाइटवर त्यावेळी कविता काम करत होत्या. वेबसाईटवर टाकण्यासाठी त्यांनी माझ्या कविता मागितल्या. मी दिल्या. त्यावेळी वेबसाईटचं इतकं पेव फुटलेलं नव्हतं.
यानंतर आम्ही टेलिफोन आणि पत्रसंवादाने संपर्कात होतो. दरम्यान त्या आजारी होत्या. कोणत्यातरी आजाराने शरीर लठ्ठ झालं होतं. आजाराची ट्रिटमेंटही सुरू होती. त्यात नवर्यारच्या वाईट अनुभवांमुळे त्यांना घटस्फोट घ्यावा लागल्याचं समजलं. त्यांची मुलगी (तिचं नाव बहुतेक ‘दिशा’ असल्याचं आठवतं.) तेव्हा सहावीत शिकत होती. कविता एकट्या रहात असल्याने वा एकट्या प्रवासात असताना त्यांना बर्या च वाईट अनुभवांना सामोरं जावं लागलं.
‘मी लठ्ठ झाल्याने साहित्य क्षेत्रातले मित्र मला आता हत्ती म्हणतात’ असं कविताने हसत हसत फोनवर सांगीतलं. ‘रूद्राक्ष माळांचं काय प्रकरण होतं?’ असं विचारताच ‘ते त्या वेळी काहीतरी केलं बस’, असंही हसत उत्तरल्या. फोनवर साहित्य गप्पा होत. पत्रसंवादही सुरू होता. कविताचा स्वभाव अतिशय प्रांजळ, सालस, भाबडा, मनमिळाऊ असा होता. नेहमी हसतमुख असत. खूप बोलायच्या. त्यांच्या मनात कोणाबद्दल मळ नसायचा की अढी नसायची.
2003 की 2004 नक्की आठवत नाही. आदिवासींसंदर्भातले लिखाण आणि त्या लिहीत असलेल्या पहिल्याच कादंबरीवर चर्चा करण्यासाठी त्यांचा फोन आला.
त्यांची कादंबरी लिहून पूर्ण झालेली होती. कादंबरी पीसीत डिटीपी करून ठेवली, असे म्हणाल्या. राजहंस प्रकाशनाने स्वीकृतही केलेली होती. पण नाव अजून निश्चित होत नव्हतं. मला इमेलने पाठवणार होत्या. पण तोपर्यंत माझ्याकडे संगणक नव्हता की इंटरनेट. कादंबरीचं नाव काय असावं, यावर चर्चा सुरू झाली. कादंबरीचं कथानक थोडक्यात कविताने सांगितलं. कादंबरीला त्यांना हवी तशी मी चार- पाच नावं सुचवलीही. पैकी काही नावं त्यांना भावली. (पारंपरिक आणि लांबलचक नावं नको, यावर त्या ठाम होत्या.) फोनवर कादंबरी आणि कवितांवर चर्चा होत. कविता वाचनही.
काही दिवसांनी त्यांची कादंबरी प्रकाशित झाल्यावर मला कळलं की त्या कादंबरीचं नाव ‘ब्र’ ठेवलं. हे नाव आमच्या चर्चेत आलं नव्हतं. कादंबरी वाचताना मला त्यातले सर्वच पात्र परिचित होते. हे कविताला फोनवर सांगितल्यावर कविता हसत म्हणाल्या, ‘याला समीक्षा म्हणतात का?’
आदिवासी साहित्य आणि आदिवासीपण यावरही चर्चा व्हायची. आदिवासींवर लिहिलेलं माझ्याकडून एक जाडजूड पुस्तक त्यांना लिहून हवं होतं. पण मी ते अजूनही दिलं नाही. त्यानंतर कविताने पुन्हा दुसरी कादंबरी लिहायला घेतली. ती ही लगेच ‘भिन्न’ नावाने प्रकाशित झाली. या दोन कादंबर्यांणमुळे कविता अचानक महाराष्ट्रात लोकप्रिय लेखिका झाल्या. त्यांचे वाचक वाढले. कविता दिवसेंदिवस मराठी वाचकांत पोचत होत्या. या दोन्ही कादंबर्याे अफलातून आहेत. (धुळीचा आवाज, रजई आणि कविता सुध्दा). कविताची गद्य शैलीच अशी जबरदस्त होती की कविताला कवयित्री म्हणून आतापर्यंत असलेली मान्यता कादंबरीकार कविताने हिसकावून घेतली...
...यश वा मोठंपण माणसाला माणसापासून तोडतं की काय? माणसाला अहंकार असतो. त्यातल्यात्यात कलाकाराला- साहित्यिकाला तो जास्त असतो का? हा अहंकार एकतर आपण तो माणूस गमावल्यावर गळतो वा स्वत:च गेल्यावर आपोआप गळून पडतो. अनेकांचे असे सुहृद संबंध अचानक थांबतात. ते संबंध थांबण्यामागे खूप मोठी कारणं नसतात. छोटी छोटी कारणं असतात वा एखादंच छोटं कारण माणूस माणसापासून दूर जायला पुरेसं ठरतं. आणि मग तो माणूस या जगातून कायमचा गमावल्यावर आपण हळहळत राहतो. कलाकार वा साहित्यिकांमध्ये ज्युनियर सिनियर असं काही असतं का? गट – तट असतात का? समवयस्क असले तरी अचानक मिळणारी प्रसिध्दी ज्युटनियर- सिनियर विभागणी करत असेल का? यश, प्रसिध्दी वा मोठेपण प्रत्येक माणसाला सहजासहजी पचवता येत नाही. म्हणून मोठ्या- प्रथितयश कलावंतांशी- साहित्यिकांशी अनेक चाहत्यांचे संबंध एकतर्फी असतात का? खरं तर समग्र मानवी संबंध तपासायला हवेत.
कविताचा लँडलाईन नंबर आता माझ्याकडे सेव्ह आहे. मोबाईल नंबरही सेव्ह आहे. तरीही मी साताठ वर्षांपासून कविताशी बोललो नाही. का बोललो नसेल? कविता आता खूप प्रसिध्द लेखिका झाल्या. त्या खूप व्यस्त असाव्यात. आपल्याशी बोलायला त्यांना वेळ असेल की नाही? म्हणूनच त्या फोन करत नसाव्यात. समजा आपण बोललो आणि त्यांनी औपचारिक बोलून निरोप घेतला तर ते आपल्याला आवडेल का? त्यापेक्षा नकोच. त्यांनी करावा फोन, मग आपण बोलू. हा अहंकार मला आडवा येत असेल म्हणून मी कविताशी काही वर्षांपासून बोललो नाही. आणि त्यांच्या मृत्यूची ही बातमी अचानक ऐकताच प्रचंड हादरलो. (मागच्याच वर्षी याच काळात- सप्टेंबर ऑक्टोबर 2017 - मी ही मृत्यूच्या दाढेतून- न्यूमोनियाच्याच आजारातून आयसीयूतून पुन्हा जीवंत झालो होतो.) मला आता राहून राहून वाटतं, कविताला फोन करून एकदा तरी त्यांच्याशी बोलायला हवं होतं. ‘कसे आहात? काय लिहिताहात? काळजी घ्या.’ पण दुर्दैवाने आता हे दुसर्यातला सांगण्यासाठी लिहावं लागतं, ते ही ‘भावपूर्ण श्रध्दांजली!’ अर्पण करत...
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
💬 प्रतिसाद
(10)
च
चौथा कोनाडा
Mon, 10/01/2018 - 17:39
नवीन
सुंदर लेख ! लेख आवडला !
या थोर लेखिकेशी आपला जवळून संबंध आला हे विशेषच म्हणायला हवं !
+ १
मला वाटतं कलाकारानं यशाचं , प्रसिध्दीचं एखादं शिखर गाठल्यावर ते राखून ठेवण्यासाठी स्वतःकडून जास्तच अपेक्षा वाढणार, त्याला / तिला आणखी यातायात करावी लागत असणार, याचा परिणाम त्याला / तिला इतरांपासून अलिप्त राहण्यास भाग पाडत असणार.
- Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा…
Tue, 10/02/2018 - 13:44
नवीन
खरं आहे. आपलं मत मान्य करतो.धन्यवाद.
- Log in or register to post comments
व
वीणा३
Tue, 10/02/2018 - 17:24
नवीन
तुमचा लेख छान. मी त्यांचा ब्र वाचलंय, खूप आवडलं. त्यांचे काही लेखही आं जा वर वाचलेत तेही आवडले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो
- Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा…
Wed, 10/03/2018 - 14:11
नवीन
अच्छा
- Log in or register to post comments
व
विटेकर
Wed, 10/03/2018 - 03:53
नवीन
त्या मिपावर होत्या असे पुसट आठवतंय ,.... नेहमीप्रमाणे .. कुणीतरी त्यांना चपला घालायला सांगितले ..
त्यांचे इथले लेखन कोणी खोदकाम करेल का?
- Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा…
Wed, 10/03/2018 - 14:12
नवीन
धन्यवाद. हो असाव्यात
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 10/03/2018 - 15:45
नवीन
त्यांचे मिपा लेखन
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 10/03/2018 - 15:48
नवीन
लेखनाप्रमाणे प्रतिसादाम्ची यादी उपलब्ध व्हावयास हवी असे वाटते.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Wed, 10/03/2018 - 14:56
नवीन
कविताताईंचं ग्राफिटी वॉल सोडलं तर आणखी काहीच वाचलेलं नाही. मात्र फेसबुकवर त्यांच्या मित्रयादीत असल्याने समकालिन घटनांवर, त्यांच्या लिहिताना येणार्या अनुभवांबद्दल, निसर्ग तसेच सामाजिक कार्याबद्दल नियमित वाचायला मिळायचे ते त्यांच्या शैलीदार आणि प्रांजळ भाषेत. त्यांचा स्वभाव खमका पण खुप संवेदनशील होता. मला खुप व्हिविडली आठवतं ते त्यांचं अक्षरशः राक्षसी म्हणता यावं असं वाचन व अतिशय उत्कटपणे त्यातल्या आवडलेल्या पुस्तकांची त्यांनी केलेली शिफारस. खुशवंत सिंगांचे दिल्ली या पुस्तकांचे कहंड त्यांच्याच शिफारशीमुळे मी घेतलेले. त्यांच्या जाण्यामुळे जवळची मंडळी किती दुखावलीयेत हे फेसबुकवरून आठवडा झाले वाचायला मिळत आहे. त्यांनी किती माणसे जोडली होती ते कळतंय.
- Log in or register to post comments
ए
एकविरा
गुरुवार, 10/04/2018 - 11:51
नवीन
मलाही त्यांचे लिखाण आवडते ,ब्र ,भिन्न वाचून येणारी अस्वस्थता अनुभवलीय , त्यांच्या जाण्याची बातमी ऐकूनहि तसेच वाटले अस्वस्थ
- Log in or register to post comments