Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

स्ट्रॉबेरी सालसा

ज
जुइ
Sun, 09/30/2018 - 01:38

साहित्य:
१. १/२ किलो ताज्या लाल चुटुक पिकलेल्या स्ट्रॉबेरीज
२. अर्धे मोठे लिंबू
३. एका लिंबाची किसलेली साल
४. गोड छोटी ढब्बू मिरची केशरी रंगाची
५. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
६. कांद्याची पात आणि त्याचा कांदा -१ काडी
७. चवीपुरते मीठ आणि ताजी मिरपूड

कृती:

प्रथम स्ट्रॉबेरीज स्वच्छ धुऊन चिरून घ्याव्यात. कांद्याची पात आणि कांदा बारीक चिरावा. तसेच ढब्बू मिरची बारीक चिरून घ्यावी. एका मोठ्या पातेल्यात चिरलेल्या स्ट्रॉबेरीज घ्याव्यात. त्यात लिंबाचा रस आणि लिंबाची साल घालावी. त्यावर कांद्याची पात आणि कांदा घालावा. मिरची आणि कोथिंबीर घालावी. चवीपुरते मीठ आणि मिरपूड घालावी.

यानंतर सगळे जिन्नस मग नीट एकत्र करावेत. स्ट्रॉबेरीजच्या चवीनुसार लिंबाचा रस कमी- अधिक घालावा. मिरचीचा ठसका अधिक हवा असल्यास मिरचीचे प्रमाण वाढवावे. शेवटी सालसा गार करायला थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवावा. चिप्स अथवा नुसता खायलाही हा सालसा झकासलागतो. हा सालसा लहान मुलांबरोबर मोठेही आवडीने खातात.


  • Log in or register to post comments
  • 11955 views


वाचनखूण लावा
| 11955 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
र
राघवेंद्र Sun, 09/30/2018 - 03:33 नवीन
अरे वा मस्तच, लवकरच करून बघण्यात येईल.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Sun, 09/30/2018 - 03:48 नवीन
इंट्रेस्टिंग ! करुन बघणार .. बर्‍याच दिवसांनी दिसलीस.
  • Log in or register to post comments
ज
जुइ Mon, 10/08/2018 - 17:21 नवीन
मध्यंतरी जरा व्यस्त होते. कन्या काय म्हणते आहे?
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Tue, 10/09/2018 - 23:06 नवीन
कन्या भरपूर दंगा मस्ती बडबड करत असते ! तिच्या मागे पळण्याशिवाय दुसरं काम नाही सध्या .. उमा काय म्हणते? उमा ३ ची होईल ना आता?
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Sun, 09/30/2018 - 03:59 नवीन
नक्की.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 09/30/2018 - 10:15 नवीन
मस्तच दिसतोय हा सालसा. खुप टेम्पटिंग.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 09/30/2018 - 10:33 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sun, 09/30/2018 - 12:57 नवीन
नक्की करून बघणार. फोटो मस्तच
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 09/30/2018 - 14:06 नवीन
भूक लागली ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ओठों पे बस तेरा नाम है, तुझे चाहना मेरा काम है... :- Yeh Dillagi
  • Log in or register to post comments
न
निशांत_खाडे Sun, 09/30/2018 - 16:58 नवीन
व्वा! लवकरच करुन पाहतो! रच्याकने, जराशी अमचूर पावडर घातली तर ?
  • Log in or register to post comments
ज
जुइ Mon, 10/08/2018 - 17:18 नवीन
आमचूर पावडर या पाककृती मध्ये कशी लागले माहीत नाही. प्रयोग करून बघण्यास काही हरकत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 10/01/2018 - 15:39 नवीन
लै झ्याक!
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Tue, 10/02/2018 - 14:34 नवीन
लगेच करुन पाहणार
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 10/03/2018 - 01:34 नवीन
मस्तच! स्ट्रॉबेरीज शक्यतो शिल्लक राहत नाहीत, पण कधी राहिल्या तर नक्की करुन बघेन :)
  • Log in or register to post comments
ज
जुइ Mon, 10/08/2018 - 17:16 नवीन
वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 10/09/2018 - 15:21 नवीन
मस्त! फोटु भारी आलेत!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा