Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

बघू नंतर..

इ
इनिगोय
Fri, 09/28/2018 - 15:59
💬 3 प्रतिसाद
मी ब्र वाचली नाही, भिन्न नाही. कुहू सुद्धा अनुभवलं नाही. का तर.. हे सगळं डोक्यात ठाण मांडून बसेल ही खात्री होती. बघू नंतर, केव्हातरी काहीतरी साधं लिहितीलच तेव्हा वाचू कधीतरी, असं नकळत ठरवलं होतं.. असं काय.. याला काही लाॅजिक नाही... कदाचित त्यांच्या भूतकाळाबद्दल दुसऱ्या बाजूकडूनची (फारच धुसर) कल्पना होती. म्हणून असेल... पण त्यांच्याबद्दल लेखिकेपेक्षाही बाई+माणूस म्हणून जिव्हाळा होता. जो त्यांच्या पोस्टस् वाचून त्या आता स्वतःच्या मनासारखं जगतायत हे अधूनमधून बघत राहून मी माझ्यापुरता जपला होता... पण आता त्यांच्या जवळच्यांच्या लिहिण्यावरून समजतंय... बाहेरून धाकड दिसताना आतून थकत होत्या, झिजत तुटत होत्या. एकट्या माणसाला स्वतःच स्वतःला उभारी द्यावीच लागते. ती कुठवर पुरेल? वयाला, उपचारांना न जुमानता थकलेलं शरीर शेवटी निवांत झालं. गोष्टी सांगणारा जीव काल संपून गेला.. सांगायचं काय काय उरलं तेही आता नाही कळणार. असे अकाली पूर्णविराम अपूर्ण राहिलेल्या कितीतरी शक्यतांना पार अनाथ करून टाकतात. ------- माणसं असतात तेव्हा ती असतीलच, बघू नंतर हे गृहित धरून बसू नका मायबापांनो......... हे निघून जाणं क्षणात होऊन जातं. परत येणं हा पर्यायही नसतो.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1927 views

💬 प्रतिसाद (3)
ग
गवि Fri, 09/28/2018 - 17:40 नवीन
अतिशय समयोचित. पण समयोचित म्हणण्यासाठी असा प्रसंग यायला नको होता. मिपा, ऐसी यावर सदस्य असलेल्या व्यक्तींपैकी भोचक, यकु, निपो, श्रामो यांच्यानंतर आणखी एका व्यक्तिमत्वाने घेतलेला आकस्मिक निरोप. ताकदीचं होतं त्यांचं लिखाण. वाईट झालं.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 09/28/2018 - 18:29 नवीन
"अकस्मात तोही पुढे जात आहे" याची तीव्र जाणीव होण्याचे हे क्षण, म्हणून त्रासदायक खरं तर...
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 09/28/2018 - 18:14 नवीन
>>निघून जाणं क्षणात होऊन जातं. परत येणं हा पर्यायही नसतो.>> लिहून उरणं हा एकच.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 22 hours ago
  • सुंदर !!
    6 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा