Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

भात घ्या की !!

स
सतिश पाटील
Wed, 09/26/2018 - 19:18
💬 17 प्रतिसाद
बऱ्याच दिवसांनी मी आणि आई माझ्या सासुरवाडीला आलो होतो, सासू आणि बायको काही कामासाठी 2 दिवस बाहेर गेल्या होत्या, घरी मी, माझी आई, माझा सासरा आणि सासऱ्याची आई असे 4 जण जेवायला बसलो होतो, मी नेहमीच खूप कमी जेवतो अशी माझ्या सासरकडच्यांची तक्रार असते. आजही मी कमीच जेवत होतो, माझ्या ताटात वाढलेला भात आता संपायला आला होता, तर सासू आणि बायकोची कमी भरून काढण्यासाठी सासरे मला म्हणाले "अहो जावई बापू भात घ्या भात" मी म्हटले नको बास झालंय मला, सासरे म्हणाले अहो घ्या की मी म्हटले अहो नको पॉट भरलंय गच्च. सासरे नुसतेच हसले म्हणाले "आव जावई बापू भात मला पायजेय, भात घ्या हिकडं" !!!!! बोंबला तिच्यायला

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6724 views

💬 प्रतिसाद (17)
ज
जव्हेरगंज Wed, 09/26/2018 - 19:39 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Wed, 09/26/2018 - 19:44 नवीन
झक्कास
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 09/26/2018 - 19:47 नवीन
वाहवा घ्या पाटलानु.
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Wed, 09/26/2018 - 20:17 नवीन
हे हे हे! Image removed.
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि गुरुवार, 09/27/2018 - 00:12 नवीन
ह ह पु वा
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 09/27/2018 - 06:41 नवीन
हाह्हाहाहा.. जब्री किस्सा..
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ गुरुवार, 09/27/2018 - 07:43 नवीन
मी पण अशा प्रसंगांना सामोरी गेलेय. जरा भात घ्या असं म्हटलं तर पाहुणे म्हणाले नाही नकोय मला. घरातले सगळे हसायला लागले. मी म्हणलं तुम्हाला नाही विचारत मला हवा आहे भात. तेव्हापासून बोलण्यात सुधारणा केली भाताचं (पातेलेयडबा) घ्या. वरणाचं(आमटी/घमेले) घ्या. असं म्हटल्यावर शक्यतो गोंधळ होत नाही
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल गुरुवार, 09/27/2018 - 08:31 नवीन
=))
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि गुरुवार, 09/27/2018 - 08:41 नवीन
हा हा हा ... वाचुन मजा आली .
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 09/27/2018 - 08:50 नवीन
बायको नव्हती, नायतर कुटला असता!
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु गुरुवार, 09/27/2018 - 09:07 नवीन
मजेदार किस्सा. मागे दुपारी झोपण्याला "जरा पडा आता" यावरुन घडलेल्या किस्श्या संदर्भात ही मिपावरील एक लेख वाचनात आला होता त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील गुरुवार, 09/27/2018 - 12:05 नवीन
निदान सासू सासऱ्यांसमोर तरी वेंधळेपणा होऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न करतो, शेवटी व्हायचं तेच होतं. याच विषयावर लग्नाशी संबंधीत एक लेख लिहितोय. झाल्यावर टाकतो.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 09/27/2018 - 12:17 नवीन
गमतीशीर :)
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प गुरुवार, 09/27/2018 - 12:24 नवीन
हलका फुलका विनोदी प्रसंग !!!!
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Fri, 09/28/2018 - 03:28 नवीन
सुप्रसिध्द कथाकथनकार शंकर पाटील यांच्या " मिटिंग " या ग्रामपंचायतीच्या सभेवर आधारीत कथेतसुध्दा रात्री दहा वाजता,सरपंच जेंव्हा,शिपायास, कमिटी 'मेंबरांना' बोलावण्याची सूचना करतात्,त्यावेळी इरसाल शिपाई, " आ SS ता , जवळ SS जवळ S झोपायची येळ झाली आहे, तवा कोणी ईल असं वाटत नाही " असे सूचक बोलतो. मग काय ? हास्याचा गडगडाट ! ! !
  • Log in or register to post comments
S
Sanjay Uwach Sat, 09/29/2018 - 16:11 नवीन
असेच माझे ग्रामीण भागातील मित्राला मी जेवायला घरी बोलावले होते. डायनिंग टेबलवर मोठ्य थाटामाटात मी त्यांची जेवणाची सोय केली होती. माझ्या बायकोने जस जसे पदार्थांचे बाऊलस आणून त्यांच्या समोर ठेवण्यास सुरवात केली तसतसे ते दरखेपेला म्हणायचे"आहो! मी ऐवढे काय खातोय हो"माझी पण चांगलीच पंचाईत झाली. आपण आता या बाऊल मधील पदार्थ घ्यायचे की नाही.
  • Log in or register to post comments
ए
एमी Fri, 10/05/2018 - 13:14 नवीन
:D :D भात द्या इकडे किंवा भाताचे पातेले द्या इकडे का नाहीत म्हणत?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 22 hours ago
  • सुंदर !!
    6 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा