Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

रंग आयुष्याचे..

क
कलम
Tue, 09/25/2018 - 09:03
💬 5 प्रतिसाद
अरे किती प्रकारची माणसं असतात आपल्या भोवताली. फक्त रंग-रूप, जातपातच नाही तर हजारो स्वभावांच्या लाखो छटा असणारी. कधी राग, द्वेष तर कधी प्रेम आणि आदर यांचे बदलत जाणारे मुखवटे. कधी खरेपणात लकाकणारे तर कधी खोटेपणाच्या बुरख्यात काळवंडलेले. कधी कधी तर असं वाटत की आपलं आयुष्य म्हणजे मनाच्या कोऱ्या कागदावर विचारांच्या कुंचल्याने आणि भावनांच्या वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेली चित्रेच जणू. अरे पण ही चित्रे पण कशी, तर हर घडीला आपले रंग आणि आकार बदलणारी. आपण सगळेच चित्रकार अगदी जन्मल्यापासून सरणावर जाईपर्यंत. राग आणि द्वेषाचे जहाल भडक रंग, दुःख आणि वेदनांचे उदास फिके रंग, सुख, आनंद आणि यशाचे हसरे जादूई रंग. मनाच्या कागदावर सगळेच रंग नागडे, एक तर एकमेकांवर कुरघोडी करणारे नाहीतर एकमेकांचे अस्तित्वच झाकोळून टाकणारे. आपण सगळेच आपलं आयुष्य घालवतो एक तर स्वतःची चित्रे रंगवण्यात, नाही तर दुसऱ्यांच्या चित्रांमध्ये आपले आवडते रंग हुडकण्यात; आणि जर आपल्याला आवडलेले रंग सापडले तर आपली बहरत जाणारी चित्रे आणि नाही सापडले तर अश्रूंच्या ओघात ओघळत जाणारे आपले तरल रंग. सगळं मिळून एवढीच काय ती आयुष्याची व्याख्या.... कधी तरी वाटतं बाहेर पडावं या सगळ्यातून, अगदी "नार्नीया" मधल्या कपाटाच्या दरवाज्यासारखं आपल्याला पण काही तरी सापडावं आणि मग आपण पण त्या पल्याडच्या जगात थोडं जगून बघावं. मला खूपदा एक स्वप्न पडतं कि मी सकाळी घराचा दरवाजा उघडून बाहेर पाय ठेवलाय आणि पायाला थंड मऊ आणि शुभ्र रेतीचा स्पर्श होतोय. वर बघितलं तर निरभ्र निळे आकाश आणि समोर अथांग समुद्र... तो पण निळाच बरं का.आणि मग वाटत कि हे सगळंच मागं सोडून अनवाणी पायांनी चालत जावं आणि बसावं किनाऱ्यावर, खूप खूप वेळ. मऊशार वाळूचा स्पर्श आणि पायांना गुदगुल्या करणारं पाणी, लाटांच्या गर्जनेचा आवाज आणि घोंघावणारा खारट वारा . वाटतं , आपल्याकडचे सगळेच रंग आणि चित्रं फेकून द्यावीत समुद्राच्या पाण्यात आणि मनाच्या कोऱ्या कागदावर फक्त हुडकावं..... फक्त स्वतःला.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2217 views

💬 प्रतिसाद (5)
श
श्वेता२४ Tue, 09/25/2018 - 10:57 नवीन
टतं , आपल्याकडचे सगळेच रंग आणि चित्रं फेकून द्यावीत समुद्राच्या पाण्यात आणि मनाच्या कोऱ्या कागदावर फक्त हुडकावं..... फक्त स्वतःला. हे खूप छान वाटलं
  • Log in or register to post comments
क
कलम Tue, 09/25/2018 - 11:38 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Tue, 09/25/2018 - 13:33 नवीन
अगदी खरं. मलाही रक नार्निया हवंय. एक वेगळं जग! आपल्याही नकळत आपण खूप अडकत असतो आपल्या आजूबाजूच्या जगात. एक मोकळ्या श्वासाचा आयुष्य अनुभव कसा असेल?
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 09/25/2018 - 18:11 नवीन
दर्जेदार लिखाण _/\_
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Wed, 09/26/2018 - 06:16 नवीन
छान लेखन .
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 22 hours ago
  • सुंदर !!
    6 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा