Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

श्रीगणेश लेखमाला २०१८ - समारोप

स
साहित्य संपादक
Mon, 09/24/2018 - 16:09
💬 6 प्रतिसाद
नमस्कार. अनंत चतुर्दशीला बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर जी एक हुरहुर असते, तशी काहीशी भावना श्रीगणेश लेखमालेचा समारोप करताना आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही मिपावर श्रीगणेश लेखमाला-२०१८ आयोजित केली होती. यंदा 'DIY - Do It Yourself - केल्याने होत आहे रे' अशी संकल्पना घेऊन लेख मागवले होते. लेखकांनी उत्स्फूर्तपणे आपण केलेल्या प्रयोगांचे, प्रकल्पांचे, स्वनिर्मितीचे लेख पाठवले. आणि विषयांचा आवाका तरी केवढा! मातीच्या भांड्यांना रंगवून त्यांचं सौंदर्य खुलवण्याची कल्पना, 'वैद्यकीय डॉक्टर' असून Y2K वर केलेली मात, सायकलिंगच्या माध्यमातून दीडशे किलो वजन शंभरवर आणण्याचा अनुभव, आरत्या व श्लोक यांचा इतिहास व अर्थ, पेशवेकालीन गणेशोत्सव, जुन्या सूटकेसमध्ये बनवलेली सौर चूल, जगभरात एकल प्रवासाचा अनुभव, शून्यातून सुरुवात करत २००-३००-६०० किमी सायकलिंग, ब्लू टूथची तांत्रिक करामत, परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या बहाद्दरांच्या सांगायलाच हव्यात अशा गोष्टी.... कला, तंत्र, विज्ञान, मनोनिग्रह यांचं मनोज्ञ दर्शन घडलं. आणि प्रत्येक लेखाला मिळालेला मिपाकरांचा भरघोस प्रतिसाद!! असे लेखक आणि चोखंदळ वाचक हीच तर आहेत मिपाची बलस्थानं! अर्थात आणखी काही उत्तम लेख प्रकाशित करता यायला हवे होते अशी हुरहुर आहेच आणि त्याबरोबरच 'पुढच्या वर्षी लवकर या' ही भावनासुद्धा आहे. पुन्हा एकदा सर्व लेखकांचे व वाचकांचे मनापासून आभार. ता.क. आणि हो, आता वेध लागलेत दिवाळीचे.. फराळाचे.. आणि मिपा दिवाळी विशेषांकाचे!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3557 views

💬 प्रतिसाद (6)
ज
ज्योति अळवणी Mon, 09/24/2018 - 16:17 नवीन
श्रीगणेश लेखनमालेत माझा लेख घेतल्याबद्दल मनापासून आभार. दिवाळी अंकाच्या बांधणीत नक्की भाग घेण्याचा प्रयत्न करेन. मिपाच्या सर्वच उपक्रमांना कायमच मनापासून शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 09/24/2018 - 16:50 नवीन
सुरेख झाली श्री गणेश लेखमाला. अभिनंदन! उत्तम वाचनानुभव दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 09/24/2018 - 18:46 नवीन
छान झाली लेखमाला! आता दिवाळी अंकाची उत्सुकता आहे. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 09/24/2018 - 18:48 नवीन
आपण घरात केलेले खटाटोप,फसलेले किंवा यशस्वी झालेले जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मिसळपाव माध्यम फारच उपयोगी. इंग्रजीत DIY भाराभार साइट्स असतात पण मराठीत दोनचारच असतील. DIY मध्ये काय प्रयत्न केले किती खर्च केला त्यातून काय साध्य झाले हे वाचून पुढचा हौशी आणखी पर्याय शोधतो. पुन: तेच करण्यात वेळ वाया जात नाही. सर्वच गोष्टी बाजारात विकत मिळत नाहीत अथवा छोटेमोठे दुरुस्तीचे काम करून देणारेही सापडत नाहीत. किंवा एखादी वस्तू फेकून नवी घ्या सांगतात तेव्हा आपल्याला करता आले तर त्यात आनंद मिळतो. बऱ्याचदा फसलेले DIY थट्टेचा विषय होऊन प्रयत्न सोडून दिलेले जातात. लेखमालिकेमुळे नवीन लोकांचा उत्साह वाढेल. पुढेमागे वेळ कसा घालवायचा ही विवंचना सुटेल. या छंदाकडे अधिकाधिक लोक वळतील.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 09/24/2018 - 19:08 नवीन
सुंदर, रोचक आणि उपयोगी माहितीने भरलेली ही लेखमाला वाचताना खूप मजा आली ! तिला प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्या कोणी आपला अमुल्य वेळ आणि श्रम खर्च केलेला आहे, त्या सर्वांचे हार्दीक अभिनंदन आणि धन्यवाद !
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Mon, 09/24/2018 - 20:16 नवीन
आणि लेखमाला घडवण्यासाठी सर्वांनी केलेल्या प्रयत्नांचे आभार.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 22 hours ago
  • सुंदर !!
    6 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा