दिवाळी अंक २०१८ - आवाहन
नमस्कार मिपाकरहो!
सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या मिपाचा दिवाळी अंक आपण सादर करणार आहोत. आणि सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या भरघोस प्रतिसादाचं आवाहन आम्ही करत आहोत.
गेली दोन वर्षं आपण दिवाळी अंकामध्ये एक विशेष विभाग जोडतो. आत्तापर्यंत 'रहस्यकथा' (२०१६) आणि 'व्यक्तिचित्रं' (२०१७) हे विभाग झाले आहेत. सलग दोन वर्षं हे झाल्यामुळे यंदा बदल म्हणून दिवाळी अंक मूळ स्वरूपात, म्हणजे मुक्त, असावा असं योजलं आहे.
तर दिवाळी अंकाला काही विषय, थीम नाही. 'सकस आणि / किंवा रोचक लिखाण' हे दोनच मापदंड आहेत. कथा, कविता, लेख, प्रवासवर्णन, पाककृती, अर्कचित्रं - सर्वांचं स्वागतच आहे.
...आणि काही नियम/सूचना:
१) तुम्ही पाठवलेलं लेखन तुमची स्वतःची निर्मिती असावी. कशावर आधारित असल्यास तसा स्पष्ट उल्लेख करावा. कोणत्याही प्रकारच्या वाङ्मयचौर्याचा ढका आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाला लागू नये ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे.
२) मिपाचा दिवाळी अंकात आलेलं साहित्य फक्त मिपाच्याच दिवाळी अंकात (एक्सक्ल्युजिवली) वाचायला मिळावं असं आम्हाला वाटतं. म्हणून, अंकासाठी पूर्वप्रकाशित साहित्य पाठवू नये. तसंच, मिपाचा अंक प्रसिद्ध झाल्यावर १५ दिवसांच्या आत ते लेखन ब्लॉग, फेसबुक किंवा अन्य संस्थळांवर / सामाजिक माध्यमांवर प्रकाशित करू नये. (मिपा आपल्या फेसबुक पेजवर प्रसिद्धी करतंच. ती पोस्ट शेअर करायला अर्थातच हरकत नाही. तसंच, मिपाची लिंक व्हॉट्सअॅपवरून पाठवायलाही काहीच हरकत नाही.)
३) मिपाचा दिवाळी अंक दर्जेदार साहित्याने भरलेला असावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे, आणि त्यासाठी आम्ही दिवाळी अंक टीम आटोकाट प्रयत्नही करणार आहोत. आलेल्या साहित्याला नीट निवडून, टिपून, पारखून मगच दिवाळी अंकात स्थान दिलं जाईल. याचाच अर्थ काही साहित्य नाकारावं लागेल. समजा, तुमचं लेखन नाकारलं गेलं तर कृपया नाराज होऊ नका. आपणांला वाटल्यास ते स्वतंत्रपणे मिपावर नक्की प्रकाशित करा.
४) दिवाळी मंगलमय, आनंदाचा सण आहे हे आपण सगळेच जाणतो. तो सण साजरा करायच्या साहित्यिक मेजवानीत बीभत्सपणाचा आंबटरस असू नये. तरी तुम्हाला काही मदत/सल्ला/मार्गदर्शन हवं असल्यास साहित्य संपादकांशी संपर्क साधावा.
--x--
दिवाळी ४ नोव्हेंबर २०१८ ला सुरू होते आहे. तुमचं लेखन आल्यावर ते वाचून, मुद्रितशोधन करून, सजवून चकाचक करायला लागणारा वेळही जमेस धरावा लागेल. म्हणून, आपलं लेखन उशीरात उशीरा १५ ऑक्टोबर २२ ऑक्टोबर २०१८ पर्यंत साहित्य संपादक या आयडीला व्यनीने पाठवा.
त्याआधी किंवा त्यानंतर काही मदत लागल्यास आम्ही आहोतच!
- टीम दिवाळी अंक
दिवाळी ४ नोव्हेंबर २०१८ ला सुरू होते आहे. तुमचं लेखन आल्यावर ते वाचून, मुद्रितशोधन करून, सजवून चकाचक करायला लागणारा वेळही जमेस धरावा लागेल. म्हणून, आपलं लेखन उशीरात उशीरा १५ ऑक्टोबर २२ ऑक्टोबर २०१८ पर्यंत साहित्य संपादक या आयडीला व्यनीने पाठवा. त्याआधी किंवा त्यानंतर काही मदत लागल्यास आम्ही आहोतच! - टीम दिवाळी अंकसाहित्य संपादक आयडी : https://www.misalpav.com/messages/new/27432?destination=user/27432