Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

बोली बोली बायका बोली

श — शिव कन्या, Fri, 09/21/2018 - 06:28
आम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या ! चुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी.... लिपीबिपीचे बंधन नाही व्याकरणबिकरण... हे काय असते? आम्ही बोलतो अनंत बोलीतून .... कुजबुज जितकी थरथरणारी तितके भांडण कडकडणारे कठोरतेचा शीण आम्हाला मवाळतेचा शाप तसाही पण बोली आमची जपून ठेवतो.... अर्थाचा पण अनर्थ करू.... खिल्ली तुमची सहज उडवू निरर्थाला अर्थ देऊ... पण तुटका संसार नेटका करू.... आमच्यातलीच एखादी बोली बोलता बोलता मग लिहिती होते, प्रमाण होऊन पुस्तकात जाते लिपीत बद्ध होते, ग्रंथात कैद होते राजकारणात बटिक होते, माध्यमात वारांगना होते शिक्षणात डाकिन होऊन मानगुटीवर बसते बघता बघता तिचे काटेरी कुंपण होते... आमची एक बोली हरवते आम्ही तिचा शोध घेत राहतो.... तिच्या शोधात आम्ही बोलत राहतो... बोलता बोलता पुन्हा नव्या बोली प्रसवत राहतो... आम्ही बायका म्हणजे बोलीभाषा.... -शिवकन्या

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4229 views

💬 प्रतिसाद
व
विवेकपटाईत Fri, 09/21/2018 - 07:27 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/21/2018 - 15:24 नवीन
कविता आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 10/21/2018 - 15:37 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा