Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

डिजीटल डिजीटल

श — शिव कन्या, Sat, 09/15/2018 - 04:01
जी माणसे कुठल्याच डिजीटल प्रोफाईल मध्ये नसतात, त्यांचे जगणे कसे असेल, हा प्रश्न मला छळू लागला, आणि मला माझ्या डिजीटल विचारांची भिती वाटू लागली... जी माणसे ऑफलाईन असतात त्यांचे लाईफ कसे असेल या प्रश्नाने मला परेशान केले आणि मला माझ्या डिजीटल चिंतेची काळजी वाटू लागली... मग, या डिजीटल तुरुंगातून सुटका होण्याची वाट पाहताना मी विंडोजमध्ये डोकावून पाहते... तर, खऱ्या जगण्यातून सुटका म्हणून डिजीटल तुरुंगात येणारे लाखो, करोडो लोक समग्र पृथ्वीला वेढा घालून, प्रकाश डोळ्यांवर घेत 24/7 काल डिजीटल दोरीवर चालत असतात... मी ते डिजीटल जगाचे सत्यरूप पाहून हादरून जाते, आणि परत विंडोजमधून आत येऊन माझ्या डिजीटल प्रोफाईलमध्ये सुखीआनंदीसुंदर होऊन खऱ्या जगाचा डिजीटल विचार करू लागते... -शिवकन्या

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6976 views

💬 प्रतिसाद
अ
अभ्या.. Sat, 09/15/2018 - 09:28 नवीन
ओह्हो. मस्तच . डिजीटलभ्या..
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 09/21/2018 - 06:35 नवीन
अभ्याभौ धन्यवाद.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sat, 09/15/2018 - 09:30 नवीन
खऱ्या जगण्यातून सुटका म्हणून डिजीटल तुरुंगात येणारे लाखो, करोडो लोक समग्र पृथ्वीला वेढा घालून, प्रकाश डोळ्यांवर घेत 24/7 काल डिजीटल दोरीवर चालत असतात... एक नं
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sat, 09/15/2018 - 11:36 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 09/15/2018 - 14:17 नवीन
वाईट आहे , हा नैसर्गिकपणा वाईट आहे या डिजिटल युगात , सर्वजण घाईत आहे पत्र वाचायला नि बोलायला वेळ कुठे ? हाय नि बाय या दोन शब्दांनाच लाईक आहे डिजिटल युगात माणूस नाती शोधत शोधत , मातीपर्यंत आला तरीदेखील डिजिटलपणा सोडून , नॅचरल नाही झाला सातासमुद्रापारचा गोळा , माय डोळे भरुनी पाहते अश्रुंचे बांध सोडिता , बॅटरी डाऊन होते डिजिटल मित्रा, सारेच डिजिटल , नॅचरल काहीही नाही मरणासन्न झाला तरीही " नैसर्गिक " कळत नाही सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 09/15/2018 - 15:05 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sun, 09/16/2018 - 18:23 नवीन
खूपच छान ! पटण्यासारखी कविता आहे.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 09/21/2018 - 06:36 नवीन
सर्व जाणकार वाचकांचे मन:पूर्वक आभार.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 09/23/2018 - 14:18 नवीन
ढकलपत्र ढकलणार्यांना, तसेच ढकला ढकलीत कुठलीही चालढकल न करता आभासी जगात रमणार्या अभ्यासूंना समर्पित.... अशी अर्पणपत्रिका हवी. जमिनीवरील नाखु
  • Log in or register to post comments
त
तृप्ति २३ Sat, 09/29/2018 - 13:29 नवीन
Very nice kavita. I like it very much. Also you can watch my Marathi Kavita Video from this link :- https://www.youtube.com/channel/UC5AsDuTsDM--VKz0EkMB8ZA
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा