Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

बेडूक उड्या - लहान मुलांसाठी यूट्यूब चॅनल

व
वेल्लाभट
गुरुवार, 09/06/2018 - 16:07
🗣 44 प्रतिसाद
भूमिका बदलतात आणि बदललेल्या काळाची ओळख होते. पालक झाल्यावर लहान मुलांनी ऐकायची गाणी, गोष्टी याचे बदललेले अवतार समोर आले. आता मुलांना वाचायला पुस्तकं कमी आणि बघायला व्हिडिओज जास्त आहेत हे लक्षात आलं. या नव्या डिजिटल माध्यमात असलेलं मराठी बालसाहित्य मात्र पालक म्हणून मला कधी तुटपुंजं वाटलं तर कधी उथळ. कुठलाही दृश्याचा आधार नसताना फक्त एकदा ऐकून पाठ होणाऱ्या कविता, आजही संपूर्ण आठवणाऱ्या गोष्टी, हसत खेळत म्हटलेली बाराखडी, पाढे हे सगळं बदललेल्या डिजिटल माध्यमात पुरेसं उपलब्ध नाही असं लक्षात आलं. मग आपणच चांगल्या मराठी बालसाहित्याची डिजिटल रुपात निर्मिती का करू नये? असा विचार केला. तेंव्हापासून शोध, वाचन, चिंतन सुरु झालं. मी आणि माझी बहीण, Arnika Paranjape, आम्ही एकत्रपणे या संकल्पनेवर काम करू लागलो. मराठीतल्या गोष्टी, कविता, गाणी, आणि एकूणच चांगली भाषा मुलांच्या कानावर पडावी, त्यांच्या विचारांना चालना मिळावी हा प्रांजळ हेतू होता. त्या हेतूला आज मूर्त स्वरूप आलंय. 'बेडूक उड्या' हा आमचा यूट्यूब चॅनल आजपासून सुरु होत आहे. या चॅनलवर काय असेल? व्हिडिओ रुपात बालसाहित्य असेल. गाणी असतील, कविता असतील, गोष्टी, खेळ, गमती असतील काळानुरूप आणि कालाबाधित; रंजक तरीही विचारप्रवर्तक; मुलांना रमवणारं, आणि खुलवणारं; आठवणीत हरवलेलं आणि नवीन घडवलेलं असं सर्वसमावेशक बालसाहित्य असेल. तुमच्या मुलामुलींना जरूर आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ दाखवा. चॅनलला आवर्जून भेट द्या, सदस्यत्व घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ येताच तुम्हाला सूचना मिळेल. https://www.youtube.com/channel/UCxvNbqrI_I9ob9yAILjVwjw/ आमच्या या प्रयत्नाला तुमचा प्रतिसाद मिळेल, प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे. - अपूर्व ओक

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13913 views

🗣 चर्चा (44)
ल
लौंगी मिरची गुरुवार, 09/06/2018 - 16:35 नवीन
छान उपक्रम :)
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 09/06/2018 - 19:14 नवीन
आवडला चानेल.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 09/06/2018 - 19:23 नवीन
काही व्हिडीओ पाहीले. खुपच छान आहेत. तुमच्या या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा. अर्थात या तुमच्या खारीचा वाटा उचलण्याने "इंग्लिश मिडीयम" वाल्यांवर कितपत परिणाम होईल याबद्दल शंका आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/06/2018 - 19:32 नवीन
स्पृहणिय उपक्रम. तुमच्या या वाटचालीची अशीच माहिती आम्हालाही देत रहा.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 09/07/2018 - 10:10 नवीन
व्हिडिओंंमधला मजकूर आणि सादरीकरण दोन्हींची प्रत उत्तम आहे. मराठीमध्ये अश्या उपक्रमाची खूपच निकड होती. शाळकरी मुले असलेल्या नातेवाईकांना दुवा पाठवला आहे.
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Fri, 09/07/2018 - 00:36 नवीन
उत्तम उपक्रम! तुमच्या ह्या प्रयत्नामुळे परदेशी राहणार्यांना पण आपल्या मुलांना मराठी बडबडगीतांची ओळख करून देता येईल. तुमच्या ह्या प्रयत्नासाठी अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 09/07/2018 - 03:42 नवीन
वेल्लाजी, खूप खूप छान उपक्रम!!! मराठी डिजिटल माध्यमांतील कंटेंटची कमतरता मलाही मागच्या २-३ वर्षात खूप जाणवली आहे. काही लोकप्रिय बालगीते उपलब्ध आहेत पण अतिशय मोजकी. तुमचा उपक्रम खूप खूप मोठा होवो ही मनापासून शुभेच्छा!! ता.क. आमच्या ४वर्षाच्या चिरंजीवाला 'रंग' दाखवला. आणि त्याला तो आवडलासुद्धा. लाल, पिवळा, हिरवा त्याला चांगलं कळतं, पण तोंडात रेड, येलो, ग्रीन बसलंय. याचा नक्की उपयोग होईल, अशी खात्री आहे. परत एकदा खूप शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 09/07/2018 - 07:49 नवीन
सगळे व्हिडीओ उत्तमच झालेत! मला अंकाचा तर विशेष आवडला. दर्जा अगदी ग्रेटच झालाय व्हिडीओचा. आता पारंपरिक आजी सांगायची तशा कथा (ज्या आजकाल फार कुठे ऐकायला मिळत नाहीत), गाणी, कविता वगैरे येऊ दे. अत्यन्त उत्सुकतेने वाट बघत आहे. कुठेही काहीही मदत लागली तर नक्की कळवा. मिपाकर पण आनंदाने सहभागी होतील. इथे आपण चांगला डेटाबेस उभा करू शकतो गोष्टींचा.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 09/07/2018 - 08:05 नवीन
चॅनेल सबस्क्राईब केला आहे.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 09/07/2018 - 08:31 नवीन
लौंगी मिरची, सतिश गावडे, कंजूस, डॉ. सुहास म्हात्रे, बागलाणकर, प्रसाद मनापासून धन्यवाद :) आशीर्वाद असूदेत पैलवान भाऊ, ऐकून बरं वाटलं व्हिडिओ मुलाला आवडला ते. असेच उत्तमोत्तम व्हिडिओ आणत राहू. धन्स पिरा, तुझी नेहमीच अमूल्य मदत होत आलीय. पुढेही लागणार आहे अर्थात. पारंपारिक कथा, कविता, सगळं येतंय हळू हळू. पडद्यामागं काम चालू आहे. मिपाकरांना या निमित्ताने एक आवाहन करतो. कुणाकडे सामान्यतः ऐकिवात नसलेल्या, अप्रचलित पण विचारमूल्य असलेल्या गोष्टी, कविता असतील, आजी आजोबांनी, आईबाबांनी सांगितलेल्या आठवत असतील, तर मला व्यनि करा. मला तुमची मदत होऊ शकेल. _/\_
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 09/07/2018 - 08:39 नवीन
स्वीडन स्थित भाचीला लिंक पाठवित आहे शुभेच्छा
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Sat, 09/08/2018 - 18:51 नवीन
अनेक आभारः)
  • Log in or register to post comments
व
वकील साहेब Fri, 09/07/2018 - 13:10 नवीन
खूप छान उपक्रम सुरु केला आहे. काही बडबड गीते, गोष्टी, उखाणे जमतील तसे व्यनि करतो. अधिक जाणून घ्यायला आवडेल. तुमच्या कार्याला शुभेच्छा
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Sun, 09/09/2018 - 09:00 नवीन
धन्यवाद वकील साहेब ! वाट बघतो व्यनि ची
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 09/07/2018 - 13:59 नवीन
सहमत आहे सर्वांच्या मताशी . खासकरून मुलांसाठी उपयुक्त ठरेल आणि हि जी लिंक दिली आहे त्याबद्दल धन्यवाद . वाचनखूण साठवत आहे ....
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Sun, 09/09/2018 - 09:01 नवीन
धन्स :)
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 09/07/2018 - 15:57 नवीन
वाह, सुंदर उपक्रम.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Sun, 09/09/2018 - 09:01 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Fri, 09/07/2018 - 16:37 नवीन
अत्यंत सुंदर आणि स्तुत्य उपक्रम! व्हिडिओचा दर्जासुद्धा छान. सध्या जालावर उपलब्ध असलेले मराठी बालसाहित्य इंग्रजी बालसाहित्याच्या मानाने फारच तुटपुंजे आणि बटबटीत (माझा मुलगा घाबरतो) आहे. त्यातुलनेत 'बेडूक उड्या' फारच छान आहे. भरभराटीसाठी खूप खूप शुभेच्छा! या उपक्रमाकरता हातभार लावायला आवडेल.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Sun, 09/09/2018 - 09:02 नवीन
हो जरूर. धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Fri, 09/07/2018 - 19:27 नवीन
मी तुमच विडिओ चॅनेल अजून बघितल नाहीये, नक्कीच बघेन. या निमित्ताने पण आत्तापर्यंत जे काही मराठी साहित्य मी माझ्या लहान मुलाला (सध्या ६ वर्ष, मी ३-५ वर्षाचा असताना बराच प्रत्न केला) १. मराठी गोष्टी - खूप हिंसाचार दाखवतात. २-३ उदाहरण देते a . जवळपास प्रत्येक गोष्टी मध्ये कोणीतरी मरत, आणि मेलेल्या व्यक्ती / प्राणी शेजारी रक्त सांडलंय असा पण दाखवतात b . एक बदकाची गोष्टी होती. बदक दिसायला छान नसतं त्याच्याकडे पैसे चांगले कपडे नसतात म्हणून उंदीर कोंबडा त्याला जत्रेला नेट नाहीत. त्यात त्या बदकाला आधी वाईट बोलतात. त्यात ज्या पद्धतीने ते बदकाला बोलतात "त्या भिक्कारड्या बदकाला कशाला आपल्या बरोबर न्यायचं ". ३-४ वर्षाच्या मुलाला हे दाखवाची गरज नाहीये असं वाटतं c. काही गोष्टी मध्ये सुरवात करतात "फार फार वर्षा पूर्वी .... " पुढची २-३ मिनिट एकाच चित्र दिसत राहतं. लहान मुलांसाठी हा वेळ खूप आहे. इंग्रजी कार्टून मध्ये चित्र दर २-३ सेकंद मध्ये बदलतात. मुलं आवडीने बघतात. d. हनुमान च्या कार्टून विडिओ मध्ये तो लहान असताना मस्तीखोर दाखवलाय. तो ऋषींच्या डोक्यावर फळं घाण टाकतो, प्राण्यांना मारतो. आमच्याकडे पण एका डबक्यात पाणी साचलं होत त्यात दगड मारून झाले, "हनुमान मारतो ना तसाच दगड मारला मी बेडकांना" नशीब त्या डबक्यात बेडूक पण नव्हते. मराठी पुस्तकांची पण तशीच तऱ्हा आहे, चित्र कमी कधी कधी नाहीतच. रक्त वगैरे पण नीट दाखवलेलं असतं . मी पंचतंत्र / महाभारत मधल्या गोष्टी ऐकवायचं बंद केलाय. मराठी गाणी त्या मानाने खूप खूप चांगली आहेत, ती बरेचदा बघितली जातात.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Sat, 09/08/2018 - 13:44 नवीन
हाच अनुभव माझाही आहे. किमान दर्जाचे ग्राफिक्स, बाल-विसंगत भाषा आणि दृष्य, इ. बर्‍याच गोष्टी आहेत. काही दर्जेदार इंग्रजी व्हिडिओ बघून नक्कीच शिकता येईल. एक शंका: काही चांगल्या इंग्रजी कार्टून व्हिडिओची भाषा बदलून मराठीत आणता येतील का? अर्थात हे कायदेशीररित्या करणं बरंच क्लिष्ट असावं.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Sun, 09/09/2018 - 09:04 नवीन
खरं म्हणालात, हे मलाही जाणवलं.
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Fri, 09/07/2018 - 19:32 नवीन
मात्र अजून एक गमतीशीर आहे. माझ्याकडे २-३ ऑडियो सीडी आहेत. त्यात जवळपास सगळेच निवेदक अतिशय नाटकी विचित्र पद्धतीने बोलतात (असं मला वाटायचं) पण मुलाला ते प्रचंड आवडतं
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 09/07/2018 - 23:43 नवीन
लय भारी
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस Sat, 09/08/2018 - 01:46 नवीन
उत्तम उपक्रम. विडीओज पण छान जमलेत. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना चॅनल शेअर केले आहे.
  • Log in or register to post comments
ल
लई भारी Sat, 09/08/2018 - 09:39 नवीन
आम्हाला याची गरज होतीच :) मुलींना दाखवतो आता हे व्हिडीओ! आपल्या उपक्रमास शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Sat, 09/08/2018 - 19:42 नवीन
अतिशय स्पृहणीय उपक्रम. आपण काही तरी करायला हवं हे अनेकांना वाटत असतं पण एवढं मनावर घेऊन ते प्रत्यक्षात उतरवणं क्वचित घडतं - त्यासाठी वेल्ला तुझं खास अभिनंदन. बेला ला दाखवायला या चॅनल चा खास उपयोग होणार आहे - तिथे आमच्या मराठी शाळेत पण दाखवेन मी हा चॅनल :) तुला भरपूर शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Sun, 09/09/2018 - 09:06 नवीन
टका, थॉर माणूस, लई भारी, अनेक अनेक आभार. सृजा, वेळोवेळी मत, सूचना मागून पुढेही तसदी देईनच, पण तरीही आत्ता विशेष आभार.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा गुरुवार, 09/20/2018 - 09:02 नवीन
एनिटाईम!
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Sun, 09/09/2018 - 16:12 नवीन
खूप चांगला उपक्रम
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 09/09/2018 - 16:39 नवीन
शुभेच्छा ...
  • Log in or register to post comments
श
शलभ Sun, 09/09/2018 - 17:04 नवीन
मस्त उपक्रम. ह्याची खूप गरज होती.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 09/10/2018 - 11:00 नवीन
माझ्या 2.5 वर्षाच्या मुलाला खूप आवडले. विशेषता रंग व अंकांचा खूप आवडला. त्यातही रंगांचे उच्चार तांबला, नालिंगी असे बोबडे आहेत, आणि तो स्वतादेखील असेच बोबडे उच्चार करतो त्यामुळे तो विडीओ बघून खोखो हसला आणि मला म्हणाला आई तो तांबला नाई तांबला म्हनतोय. बाकी काही सुधारणा सुचवायच्या आहेत त्या व्य.नि. करते.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 09/10/2018 - 12:08 नवीन
धन्यवाद श्वेता, प्रतिसाद वाचून फार छान वाटलं. जाणीवपूर्वक बोबडे बोल ठेवले होते त्याचा परिणाम झाला यात मोठा आनंद आहे. व्यनिला उत्तर देतोय.
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Sun, 09/16/2018 - 01:45 नवीन
फारच छान व उपयुक्त उपक्रम आहे. मला आवडला. आता माझ्या नात-नातुंना नक्की दाखविणार. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
स
सुमो Sun, 09/16/2018 - 01:54 नवीन
आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुमच्या प्रयत्नांना सलाम. अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर Mon, 09/17/2018 - 17:05 नवीन
सगळे व्हिडिओ फुरसतीत पुन्हा बघीन. माझ्याकडून काही सहभाग होण्यासारखा असेल तर त्याही दृष्टीने विचार करतोय.
  • Log in or register to post comments
ड
डॉ श्रीहास Mon, 09/24/2018 - 15:17 नवीन
काका तुमचा अनुभव नक्कीच कामाला येणार... मला पूर्ण खात्री आहेच
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/22/2018 - 10:16 नवीन
अतिशय सुरेख उपक्रम... :) लेकीसह ३ही व्हिडियो पाहिले. :) अंकगीत फारच आवडले ! :) अश्या बाल साहित्याची फार गरज आहे... तुमच्या चॅनलला आणि उप्रक्रमास खुप सार्‍या शुभेच्छा. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Nirvana Shatkam (Ameya Records)
  • Log in or register to post comments
न
निशाचर Sun, 09/23/2018 - 01:36 नवीन
उत्तम उपक्रम
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 09/24/2018 - 13:34 नवीन
निशाचर, मदनबाण, सुमो, जयन्तशिम्पी खूप खूप धन्यवाद, नूलकर काका, स्वागत आहे!
  • Log in or register to post comments
ड
डॉ श्रीहास Mon, 09/24/2018 - 15:15 नवीन
सबस्क्राईब केला लगेच... मातृभाषेतून शिक्षण आणि त्याचा बुध्यांकाशी संबंध ह्यावरचं संशोधन हे फारच महत्वाचं अाहे असं सांगतंय .... आता पुढला टप्पा वेगवेगळे विषय आणि त्यांची मांडणी ह्यासाठी शुभेच्छा , अजिबात थांबू नका अखंड चालू द्या हा चॅनल :))
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 09/25/2018 - 08:14 नवीन
डॉ श्रीहास, तुमच्या शब्दांनी खूप प्रेरणा मिळाली, _/\_
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा