Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

तुम्हाला असं कधी होते का ? भाग - १ .......

P
Prakashputra
Sat, 08/25/2018 - 08:28
💬 6 प्रतिसाद
मी एकदा घराबाहेर पोर्चमध्ये उभा होतो. वरती एक कोळ्याचे जाळे होते. अचानक मानेवरती एक कोळी पडला. त्याला झटकून काढायला गेलो तर तो खूप जोरात चावला. विषाची काही reaction होईल का या आधी 'आपण स्पायडर - मॅन होऊ का ? हा सुखद विचार पहिल्यांदा मनात आला' ----- तुम्हाला असं कधी होते का ? खूप उत्तेजित होऊन हि आनंदाची बातमी मी बायकोला सांगायला गेलो. आपण सुपरहीरोची बायको होणार याचा आनंद व्यक्त करण्याऐवजी तिने मला हे विचारलं कि , "ती कोळ्याची जाळी मी होऊनच कशी दिली ? " आणि "आता तरी मी जाळी साफ केलीय का ?". मी तिला हे पटवायचा खूप प्रयत्न केला की जाळी रोज जरी साफ केली तरी कोळी एका रात्रीत परत जाळी तयार करतो. दुसरा प्रश्न मात्र मी साफ टाळला, कारण जर उद्यापर्यंत मी स्पायडर मॅन नाही झालो तर परत पोर्चमध्ये जाऊन उभा राहावे असे म्हणतोय. -- तुम्हाला असं कधी वेड्यासारखे वागावे असे वाटते का ? एकदा मी आणि माझ्या मित्राने एक Investment Property विकत घेतली. सौदा पूर्ण करून आम्ही ती प्रॉपर्टी बघण्यासाठी गाडीतून चाललो होतो. ज्या रस्त्यावर ती प्रॉपर्टी होती त्या रस्त्यावर वळण्याआधी आमच्या समोरच आगीचे २-३ बंब त्या रस्त्यावर वळले. त्याक्षणी मी आणि माझ्या मित्राने एकमेकांकडे बघितले आणि आम्ही एकदम हसलो. आम्ही दोघेही असाच विचार करत होतो कि "च्यायला , आपल्याच प्रॉपर्टीला आग लागली कि काय ?" --- तुम्हालाही असे कधी "मन चिंती ते वैरी न चिंती" असे विचार डोक्यात येतात का ? अशाच उडपटांग गोष्टी असलेला दुसरा भाग लवकरच.......

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4544 views

💬 प्रतिसाद (6)
आ
आनन्दा Sun, 08/26/2018 - 09:45 नवीन
च्यायला मला कोळी चावला होता तेव्हा 10 दिवस आजारी पडलो होतो.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 08/26/2018 - 12:15 नवीन
तो कोळी मॅन स्पायडर झाला कि नाही ते चेकवलेत का =))
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 08/27/2018 - 12:08 नवीन
तुम्हाला असं कधीपासून होतंय?
  • Log in or register to post comments
P
Prakashputra Tue, 08/28/2018 - 04:24 नवीन
कायमच होते हो
  • Log in or register to post comments
P
Prakashputra Sat, 09/08/2018 - 04:59 नवीन
भाग दोन इथे : https://www.misalpav.com/node/43273
  • Log in or register to post comments
P
Prakashputra Sat, 09/08/2018 - 05:09 नवीन
दुसरा भाग इथे : https://www.misalpav.com/node/43273
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 19 hours ago
  • सुंदर !!
    6 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा