Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

ठाणे कट्टा २५ ऑगस्ट

स
सुबोध खरे
गुरुवार, 08/23/2018 - 08:46
💬 70 प्रतिसाद
आमंत्रणपत्रिका बृहन्मुंबई (मुंबई ठाणे डोंबिवली बोरिवली नवी मुंबई अंतर्भूत) चा पावसाळी कट्टा २५ ऑगस्ट २०१८ रोजी मालवण तडका लुईस वाडी पूर्व द्रुतगती मार्ग ठाणे पश्चिम येथे सायंकाळी १९. ३० वाजता साजरा करण्याचे ठरले आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सुहास्य वदनाने आणि रिकाम्या पोटाने आपली उपस्थिती लावावी अशी नम्र विनंती आहे. बृहन्मुंबई च्या बाहेरील लोकांचे हि सहर्ष स्वागत आहे. तरी वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याचे करावे आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करावा हि विनंती. https://www.google.co.in/maps/dir/''/malvan+tadka+thane/@19.1968751,72.8919969,12z/data=!4m8!4m7!1m0!1m5!1m1!1s0x3be7b9d2d4f56bed:0x4f96ca1879360691!2m2!1d72.9620374!2d19.1968884

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 24577 views

💬 प्रतिसाद (70)
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/23/2018 - 08:59 नवीन
अरे वा ! कट्ट्याला अनेक शुभेच्छा ! सचित्र कट्टावर्णनाची प्रतिक्षा आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 08/24/2018 - 05:02 नवीन
प्लस वन!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 08/23/2018 - 09:11 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 08/23/2018 - 09:28 नवीन
पावसाळी कट्टा पावसातच हवा. बारवी /लोणावळा/ खंडाळा
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 08/23/2018 - 09:50 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा. उपस्थित राहायला नक्की आवडले असते परंतु २५-२६ ऑगस्ट ला रक्षाबंधन निमित्त पुण्याला जाण्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ह्यावेळी शक्य होणार नाही. वरती डॉक्टर म्हणाल्या प्रमाणे सचित्र कट्टावर्णनाची प्रतिक्षा आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 08/23/2018 - 11:03 नवीन
कट्ट्यास शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 08/23/2018 - 11:19 नवीन
कट्ट्याला अनेक शुभेच्छा. सचित्र वृत्तांत येऊ द्या! (सहाएक वर्षांपूर्वी पॉप टेट्समध्ये गवि, रामदासकाका, सर्वसाक्षी, प्रभूमास्तर, वरुण मोहिते, विमे, स्पा, किसन, विजुभाऊ, जयपाल, क्लिंटन इत्यादी महारथींसोबत जमलेल्या धमाल कट्ट्याच्या आठवणी या निमित्ताने पुन्हा जाग्या झाल्या)
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील गुरुवार, 08/23/2018 - 11:30 नवीन
मिपावर मोजक्या प्रतिक्रिया आणि 2-4लेख याव्यतिरिक्त माझं काही योगदान नाही, तसेच मी कुणाला व्यक्तिशः ओळखतही नाही. त्यामुळे मी आलो तर चालेल का ? नाहीतर उगाच बेगानी शादी मे अब्दुल्लाह दिवाना असं व्हायला नको. बादवे काय काय असतं कट्टा म्हणजे ?
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी गुरुवार, 08/23/2018 - 11:57 नवीन
सगळे मिपाकस असेच एकमेकांना प्रथम भेटून मग मित्र झालेले आहेत. त्यामुळे नक्की या कट्ट्याला.
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी गुरुवार, 08/23/2018 - 11:57 नवीन
मिपाकर*
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/23/2018 - 14:33 नवीन
@सतिश पाटील साहेब आपले सहर्ष स्वागत आहे. कोणताही कट्टा केला तरी त्यात दर वेळेस काही लोक अनोळखी असतातच. पण आपोआप कशी मैत्री होते ते पहा.
  • Log in or register to post comments
व
विनोद वाघमारे Fri, 08/24/2018 - 10:09 नवीन
पर॑तू श॑का दुर झाली.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 08/23/2018 - 12:07 नवीन
शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले गुरुवार, 08/23/2018 - 13:12 नवीन
श्रावणात सीफूड रेस्टोरंटमध्ये होणार कट्टा सात्त्विक असेल काय ? :)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/23/2018 - 14:33 नवीन
जो जे वांच्छिल तो ते खाओ
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 08/23/2018 - 17:11 नवीन
कांदा लसूण ना घालता मासे करायला सांगा ! हाकानाका
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 08/23/2018 - 14:37 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 08/23/2018 - 14:44 नवीन
उत्तम. बाकी अन्य मांसाहारी/शाकाहारी मिक्स हॉटेलांत सर्वांचं एकत्र चालून जातं पण सीफूड स्पेशल हॉटेलमध्ये माश्याचे पदार्थ चिकनपेक्षा जास्त प्रमाणात असल्याने हवेत गंध जास्त तीव्र आणि मुरलेला असतो जो शुद्ध शाकाहारी लोकांना त्रासाचा होतो असा अनुभव आहे. खुद्द अतिमत्स्यप्रेमी असूनही शक्यतो व्हेज लोकांना सोबत घेऊन मासळी फेम हॉटेल्समध्ये जाणं टाळतो. या मुद्द्याचा विचार व्हावा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/23/2018 - 17:46 नवीन
चौथा शनिवार संध्याकाळ ठरवली आहे (जेंव्हा बऱ्याच लोकांना मोकळा वेळ मिळतो) म्हणून आणि जेथे जागा भरपूर उपलब्ध आहे आणि जेथे जेवण चविष्ट आहे असे एकंदर अभिप्राय आहेत असे ठिकाण म्हणून याची निवड केलेली आहे. याचा अर्थ सर्वंनुमतें ती बदलता येणार नाही असे नाहीच. याला चांगला पर्याय असेल तर जागा बदलता येईल. चांगले पर्याय सुचवल्या आभारी आहोत. मूळ हेतू लोकांना भेटणे आणि सुग्रास भोजन हा आहे. जागा महत्त्वाची नाही __/\__
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 08/24/2018 - 03:40 नवीन
तुम्हाला तर माहीत आहे, मासेप्रेमी लोक एकत्र आले की हेमंतसारख्या ठिकाणीही इन्स्टंट कट्टा भरतो आणि एन्जॉयही फुलटू होतो. ठिकाण उत्कृष्ट असेलच. ते मनापासून निवडलेलं असल्याने ते बदलण्याने नक्कीच विरस होऊ शकतो. पण योगायोगाने मजभोवती शाकाहारी लोक जास्त असल्यामुळे पूर्वी अशाच कट्ट्याचा अनुभव आणि अन्य काही मत्स्यआहारी हॉटेलांत भेट झाल्यावर पूर्णवेळ नाकाला रुमाल लावून अंकम्फर्टेबल होणं पाहिलं. एकदोघांनी स्पष्ट तसं बोलून दाखवलं. त्यांचा खुद्द काही शाकाहारी खाण्याचा उत्साह त्या वासात बसून मावळला. त्यातच खेकडा, शेवंड वगैरे मागावलेल्यांची फोडाफोडी, कवचाचे तुकडे , कड कड आवाज याने ते आणखीन अस्वस्थ होत होते. मिश्र ग्रुप असताना असं होऊ नये इतकाच उद्देश सुचवणीमागे आहे. शिवाय फिक्स कॉस्ट ठिकाण मिळाल्यास कट्ट्याला अजून चांगलं. (एकाच दरात अनलिमिटेड थाळी, बुफे, एन्ट्री बेस्ड जेवण (व्हिलेज, विष्णुजी इत्यादि इत्यादि)
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Fri, 08/24/2018 - 05:24 नवीन
मीपाकरांचे मागील काही कट्टे आयोजित / उपस्थित राहिलयवर एक गोष्ट लक्षात आलेली आहे ती म्हणजे शाकाहारी लोक जास्त असतात त्यातून श्रावण चालू आहे , ठिकाण बदलण्याचा विचार व्हावा , पुन्हा पोप टेट्स किवा मॉल मधीलफूड कोर्टचा विचार व्हावा , पार्किंग समस्या येत नाही (इतर कामे पण होतात :) ) अर्थात तुम्ही कट्टा आयोजित करत आहात म्हणजे तुम्हीच सर्वेसर्वा आहात :)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/24/2018 - 06:06 नवीन
घोडबंदर रोड हे लोकांना जाण्यायेण्यासाठी फार अडचणीचे होते. यास्तव ठाणे शहर/ स्टेशनपासून रिक्षाने जाण्याच्या अंतरात जेथे शनिवारी संध्याकाळी अर्धा पाऊण तास रस्त्यावर न थांबता जागा मिळेल असे एखादे थाळी किंवा तत्सम रेस्टोरंट असेल तर त्याला आमची कुणाचीच हरकत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 08/24/2018 - 03:41 नवीन
"मालवण" तडका म्हणजे चांगलंच असणार.:) बाकी शाकाहारी , अतिशय चविष्ट , नेहमीपेक्षा जरा वेगळे पदार्थ, किंमती जास्त महाग नाहीत आणि सहसा ८ वाजेपर्यंत आरामात जागा मिळणारं अजून एक हाॅटेल म्हणजे मानपाड्याचं 27यार्डस. कट्ट्याला सुरवातीला थोडा वेळ यायचा मानस आहे. 8.15 पर्यंत निघावं लागेल. त्याआधी कोणीतरी तर असेल ना?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/25/2018 - 14:33 नवीन
श्री वरूण मोहिते सात वाजल्यापासून तेथे हजर आहेत. बाकी सर्व येतच आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 08/25/2018 - 14:49 नवीन
जोरात कट्टा करा डॉक, होऊद्या फुल्ल एंजॉयमेन्ट. तुमच्या ऑफरबद्दल थ्यांक्स अ लॉट पण भेटू परत कधीतरी. सध्या नाही शक्य. :( जमल्यास माझ्यावतीने टक्याच्या पाठीत एक जोरदार बुक्का हाणा. लै दिवस पेंडींग आहे. मोहित्यांना पण नमस्ते सांगा.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 08/23/2018 - 17:50 नवीन
कट्ट्यास शुभेच्छा. . पाताळेश्वर परत एकदा गजबजवण्याचे मा. एक्काकाकांनी मनावर घ्यावे ही नम्र विनंती. . (आता कट्टाच्या ठिकाणी माझा मी येऊ शकतो ह्याची सर्व पुणेकरांनी नोंद घ्यावी हि विनम्र विनंती.)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/23/2018 - 17:53 नवीन
मग मुंबईस पण या वाट खर्च देण्यात येईल.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 08/23/2018 - 17:56 नवीन
डिअर डॉक, मला ते वाटखर्च शब्द खर्चापान्यासारखा का दिस्तोय हो? ;)
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 08/23/2018 - 19:04 नवीन
अभ्या पुण्यात कट्ट्याला येणारे म्हणजे भारीच कि, पिंपरी-चिंचवड कर हैस ना मग ठेवू पिंपळे सौदागर नायतर प्राधिकरणात!!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/23/2018 - 20:07 नवीन
आता आम्ही सरळ लिवलंय त्यात बी तुम्हांसनी वाकडं दिसतंय व्हय?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 08/24/2018 - 10:22 नवीन
काय ते नखरे....एखादा पुणेकर तुला PMT चे तिकीट तरी काढून देईल का कट्ट्याला यायला
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 08/24/2018 - 00:11 नवीन
>>माझा मी येऊ शकतो>> पूर्वी बोट धरून यावं लागायचं?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 08/24/2018 - 04:59 नवीन
पुणेकरांचाही एखादा कट्टा झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 08/24/2018 - 06:30 नवीन
त्या आधी तीन धागे यायला हवेत ना?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 08/24/2018 - 06:42 नवीन
आमचे तर धागेविरहित खाजगी कट्टे होतात ब्वॉ, तेदेखील मुक्कामी.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 08/24/2018 - 07:34 नवीन
ब्वॉर्र हो!!
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 08/24/2018 - 16:51 नवीन
मनोरंजन,विरेचन,विवेचन आणि प्रवचन करण्यासाठी अवकाश मिळावा या उद्दात्त हेतुनेच पुणे कट्टा साठी दोन तीन धागे प्रयोजन असते याची नोंद घ्यावी ही विनंती!!! सदस्य अखिल पुणे महानगर मिपाकर गाठभेट क्षेमकुशल संघ
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 08/24/2018 - 06:51 नवीन
मी पुणेकर नसलो तरी उद्या पुण्याला येणार आहे. एवढ्या शॉर्ट नोटीस वर आणखीन कोणाला जमणार असेल तर ठरवा उद्या संध्याकाळी. पुणे भेट सार्थकी लागेल.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 08/24/2018 - 06:53 नवीन
उद्या उशिरापर्यंत ऑफिसातच काम असल्याने उद्याचे शक्य दिसत नाही.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 08/24/2018 - 06:57 नवीन
हरकत नाही, पुन्हा कधीतरी... सध्या एक २ मेम्बर्स चा छोटा कट्टा ठरलाय वाकडला :)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/24/2018 - 10:29 नवीन
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/24/2018 - 10:36 नवीन
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/24/2018 - 10:37 नवीन
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/24/2018 - 10:41 नवीन
सहा मासाअदुगार शनिवारवाड्या वरती
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/24/2018 - 10:19 नवीन
आता तुम्ही पुण्यात उपलब्ध आहात तर, नव्या रक्ताला वाव देऊ इच्छितो. घ्या पुढाकार आणि करा जाहीर जागा व वेळ जाहीर... मिपाकर नेहमीप्रमाणे येतीलच !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 08/24/2018 - 05:15 नवीन
मी येत आहे..
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 08/24/2018 - 08:13 नवीन
अजून शाकाहारी लोक्स अस्तित्वात आहेत??? पळा....
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 08/25/2018 - 10:01 नवीन
मापं,माशाम्पेन आहे मी शाकाहारी. भेटून परत जाईन.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 08/24/2018 - 15:33 नवीन
यानिमित्ताने मी ही बरेच दिवस मनात असलेला प्रश्न विचारून घेतो: हैदराबादला कुणी मिपाकर आहेत का?
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 08/25/2018 - 13:51 नवीन
असलेल्या अज्ञात मिपाकरांना ,काही आंतरराष्ट्रीय, सामाजिक, वैश्विक आणि भाषाबंधन प्रतिबंध व सांकेतिक राजशिष्टाचार यामुळे प्रकट पणे संपर्क करु शकत नाहीत याची नोंद घ्यावी ही विनंती. ते आपल्या समोर कुठल्याही रुपाने प्रकट होतीलच याबाबत उत्सुकता आम्हालाही आहे नाखु पांढरपेशा मिपाकर
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 19 hours ago
  • सुंदर !!
    6 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा