अज्ञाताचा गड चढताना
अज्ञाताचा गड चढताना अशी पायरी आली
तर्कबुध्दी थकुनिया त्यावरी विश्रांतिस्तव बसली
उठून गड बेलाग लांघण्या कंबर कसुनी उठली
निरीक्षणाची, निष्कर्षाची वाट पकडुनी चढली
जिथे संपली वाट त्या तिथे काहीतरी लखलखले
त्या तेजातच अज्ञाताचे नवेच दर्शन घडले
💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप
Sun, 08/19/2018 - 20:27
नवीन
चांगली कविता.... आवडलीच! :)
हा माझा निराळा दृष्टीकोन:
कवितेचा गड लढताना अशी हुशारी आली
विवेकबुद्धी जिंकुनिया तेथ आधारास्तव बसली
जागून भवसागर तरण्या सजग सज्ज झाली
माणुसकीची, आपुलकीची कास धरून चालली
जिथे हरवली वाट तमात तिथेही लख्ख झगमगले
त्या दीपोत्सवात ज्ञानकणाचे मोती मला मिळाले
धन्यवाद!
Sandy
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Wed, 08/22/2018 - 16:29
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
स
सोत्रि
Sun, 11/10/2019 - 06:43
नवीन
_/\_ _/\_ _/\_
- (नतमस्तक) सोकाजी
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Mon, 11/11/2019 - 09:13
नवीन
शेवट आवडला
- Log in or register to post comments