Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

गावाकडची गोष्ट

द
दिनु गवळी
Sat, 08/18/2018 - 15:59
💬 2 प्रतिसाद
अरे .. ! ये दिनू अरे थांब कि थोडा वेळ मला पण यायचं आहे . तू असा एकटाच कसा चालला पण दिनू च लक्ष आज कुणाकडेच नव्हतं त्याला आज काहीही करून त्या गावाबाहेरच्या पडक्या विहिरीचं रहस्य शोधायचं होत मागील एक महिन्या पासून त्या विहिरीजवळ मेलेली मांजर दररोज टाकलेली असायची . , पण आज दिनूला या गोष्टीची खूपच चिड आली होती कि कोण आहे या मागे जो दररोज एका निष्पाप प्राण्याचा जीव घेतोय दिनू त्याच्या विचारात चालला होता मागून अमित पळत पळत त्याच्या जवळ येऊन थांबला त्याने दिनूला असा घाई घाईत कुठे चालला आहेस म्हणून विचारलं तेव्हा दिनूने त्याला आपण कुठे चाललो आहोत याची माहिती अमित ला दिली . अमित पण मग दिनू सोबत निघाला संध्याकाळचे सात वाजत आले होते सूर्य बुडून बराच वेळ झाला होता . शेतातून येणारी तुरळक माणसेच दिसत होती . , दिनू आणि अमित थोड्याच वेळात विहिरीजवळ येऊन पोहोचले बघतो तर विहिरीजवळ एक पांढरी मांजर फिरत होती ती सारखी म्याव म्याव करत विहिरीच्या भोवती फिरत होती अमित आणि दिनू बाजूला उभे राहून त्या मांजरीकडे बघत होते . ..................................................................................... आता बराच अंधार पडला होता ,. दिनू आणि अमित अजूनही शांत उभे होते ती मांजर आता समोरच्या पिंपळाच्या झाडाकडे निघाली होती झाडाजवळ पोहचताच त्या मांजरीचे रूप रूप विरळ होत गेले आणि त्या ठिकाणी एका पांढऱ्या साडीतली बाई निर्माण झाली . अमित तर हे सर्व बघून पूर्ण पणे घाबरून गेला त्याला पूर्ण पणे घाम फुटला पण दिनू ने त्याला धीर दिला कि घाबरू नको शांत उभा रहा आणि पुढे काय होतंय या ककडे नीट लक्ष दे ! पण या दोघांना माहीतच नव्हते कि आज त्याच्या वर वाईट वेळ येणार आहे ,. झाडाजवळ उभी असलेली बाई बघता बघता त्या झाडावर सरसर चढली झाडावरून तिने या दोघांवर एक मंत्र टाकला क्षणात या दोघांचं रूपांतर मांजरी मध्ये झाले दिनू आणि अमित ला काय करावे सुचत नव्हते पण दोघांनी वेळीच सावध होत गावाकडे धाव मारली त्या भयानक जागेच्या बाहेर येताच मंत्राचा प्रभाव कमी झाला आणि हे दोघे पुन्हा मानवी रूपात आले ,. दिनू आणि अमितला तर त्या चेटकिणीची धडकीच भरली होती कसे बसे दोघे गावात आले अमित तर दिनूला खूप शिव्या देत होता . पुंन्हा कधी त्या विहिरीकडे परतणार नाही याची शपथ च अमितने घेतली दिनूला पण आपण जास्तच जोश मध्ये चूक केल्याचं समजले . मनातून दिनू पण खूप घाबरला होता पण सांगतोय कुणाला इकडे विहिरीजवळ ती बाई अजूनही आपले सावज शोधत भटकत होती ,. वातावरणात एक गारवा पसरला होता त्या पडक्या विहिरीजवळ अजूनही भयानक शांतता होती गावात सगळीकडे शुकशुकाट होता दूरवरून मांजरीचा आवाज येत होता तो आवाज ऐकून गावातील एक मांजर त्या दिशेने चालली होती तिच्या शेवटच्या प्रवासाला .......

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2499 views

💬 प्रतिसाद (2)
ट
टर्मीनेटर Sat, 08/18/2018 - 16:35 नवीन
भारी लिहिलंय.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 08/18/2018 - 17:31 नवीन
थोडक्यात गोडवा प्रकारे तुफान बार उडवला!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 17 hours ago
  • सुंदर !!
    6 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा