Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

भद्र किल्ला (अहमदाबाद- गुजरात)

ग
गणेश विजय काळे
Fri, 08/17/2018 - 19:39
💬 5
भद्र (Bhadra Fort)किल्ल्याची माहिती पाहण्याआधी आपण हा किल्ला ज्या अहमदाबाद शहरात आहे त्याचा थोडक्यात इतिहास पाहूया….. ११ व्या शतकात साबरमती नदीच्याकाठी आशाभिल्ल राजाने “आशावल” नावाचे गाव वसविले.पुढे कर्णसोळंकी राजाने हे गाव जिंकले आणि याचे “कर्णावती” असे नामकरण झाले.सुमारे शतकभर येथे हिंदू राजे राज्य करीत होते.परंतु तेराव्या शतकात मुस्लीम राजाचे आक्रमण झाले.१४-१५ व्या शतकात सुरवातीस बहामनी वंशाचा आणि गुलबर्गयाचा सुलतान अहमदशाह या राजाने राज्य केले.इ.स. १४११ मध्ये या कर्णावती शहराचे नाव बदलून अहमदाबाद असे करून अहमदशाहाने येथे आपली राजधानी वसवली. जुने अहमदाबाद साबरमतीच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे नवीन अहमदाबाद वसलेले आहे. हा किल्ला अहमदाबादच्या मध्यवर्ती आणि लाल दरवाजाच्या नजीकच्या भागात आहे.लाल दरवाजाच्या नजीकच याचे अवशेष पाहवयास मिळतात.इ.स.१४११ मध्ये हा किल्ला बांधण्यात आला होता.पूर्वी किल्ल्याला ८ गेट होते, तीन मोठे, २ पूर्वेला आणि एक दक्षिण- पूर्व भागात, तीन मधम आकाराचे यातले दोन दक्षिण आणि एक उत्तर भागात होते. 1 पेशव्यांच्या काळात येथे मराठी अंमल चालू होता.दामाजी गायकवाड हे सरदार इकडे करवसुली करत होते.येथे मराठी मंडळीनी अजूनही गजबजलेला परिसर आहे.याच मराठ्यांनी भद्रकाली मातेचे मंदिर येथेच उभारले होते.हि मूर्ती काळ्या दगडाची असून मुखात चांदीची जीभ आहे. भद्र किल्ल्यावर घड्याळ असलेला जो मनोरा आहे आणि यात जे घड्याळ आहे ते British East India Company ने खास लंडनवरून आणून 1878 मध्ये बसवले. 2 किल्ल्यातील सुंदर लाकडी कलाकृतीचे छायाचित्र 3

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4384 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Sat, 08/18/2018 - 08:54 नवीन
भारीच! Sandy
  • Log in or register to post comments
श
शलभ Tue, 08/21/2018 - 08:00 नवीन
मी पण शनिवारीच जाऊन आलो इथे. इतिहास तुमच्याकडून समजला.
  • Log in or register to post comments
ग
गणेश विजय काळे Tue, 08/21/2018 - 16:43 नवीन
इतिहास मोठा आहे पण थोडक्यात लेखन केले आहे. धन्यवाद .............
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 08/22/2018 - 07:02 नवीन
एका नवीन गडाची माहिती समजली, त्याबध्दल धन्यवाद. आणखी फोटो असतील तर धाग्यात टाका. पण आणखी थोडी सविस्तर माहिती देउ शकला असतात तर चांगले झाले असते. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 08/22/2018 - 14:02 नवीन
छान महिती आणि झकास फोटो ! आणखी माहिती दिल्यास उत्तम ! माझा एक तरूण मित्र नुकताच अहमदाबादेत पोस्ट झालाय, त्याला हा धागा पाठवतो.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा