Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

एका चेक इन ची चित्तारकथा

म
मूखदूर्बळ
Tue, 08/14/2018 - 20:15
💬 9 प्रतिसाद
एका चेक इन ची चित्तारकथा कालच गोव्यावरुन मुंबई वर हवाई प्रवास करण्याचा योग आला. येताना बरोबर ताज्या पाले भाज्या, फळ भाज्या, शेंग भाज्या, पाणशेंगा (गोव्यात ज्याला नुसत्ये असे म्हणतात आणि इथे मुंबईत मासे म्हणतात) नारळ, बिस्किट, चकली, शेव,लाडू, इत्यादी इत्यादी पदार्थ आणले. मासे बर्फ घालून व्यवस्थित पैक केले होते. विमान तळावर बैगेज स्क्रीन करण्या साठी टाकल. ऑफीसरने मत्स्य पेटी बाजूला काढली. हे गोवन लोक ( ज्यात मीही येतो) माश्यासाठी साले काहीही करतील. पेटीत काय आहे? मासे आणि ? मासे आणि ? मासे आणिक कित्ये ? बर्फ सॉरी सर तुम्हाला मासे इथेच सोडून जावे लागतील (मेल्याचा आमच्या माश्यावर डोळा होता तर) पण का? ( आमच्ये नुसते आमका जाय , आमच्ये गोये आमका जाय च्या चालीवर मी ओरडलो) आमच्या पॉलीसीत बसत नाही सर ( मग थोड़ा मागे जाऊँन फोनवर कुणाला तरी काहीतरी बोलला. नक्की नक्की बायकोला जाऊन मी मासे घेऊन येतोय तू मसाला वाटून ठेव म्हणाला असणार.) "सर मी सीनीयरशी बोललो आहे. ऐज स्पेशल केस तुम्हाला मासे घेऊन जाता येईल. पण तुम्हाला बर्फ काढून टाकावा लागेल आणि .." आणि काय ( अर्धा वाटा मागतो का काय मेला ) आम्हाला पेटी उघडावी लागेल आत क़ुर्ल्या आहेत काय ? ( कनवेयर बेल्ट वर बसून एक एक कुर्ली पुढे सरकते आहे आणि त्या पकडण्या साठी इतर प्रवाशांची धावा धाव चालू आहे असे काहीस चित्र माझ्या डोळ्या समोर उभ राहील आणि हसू आल) नाही त्याने पेटी उघडली आणि मासे चेक केले " सर जर तुम्ही बर्फ टाकलत तर आम्ही तुम्हाला स्पेशल केस म्हणून परवानगी देऊ शकतो" मी निमूटपणे बर्फ काढले आणि बेसीन, यूरिनल मध्ये टाकू लागलो तेवढ्यात " कित्ये करता रे पात्राव? म्हणुन एक क्लीनींग स्टाफ हजर झाला " हंगा बर्फ उडावप ना. असे म्हणुन गेला मला खुप राग आला. वाटले लहान पणी आम्ही करायचे तसे बरफाचे दोन तीन खड़े हळूच त्याच्या शरटात घुसवावेत शेवटी बाहेर आलो त्याने पेटी चेक करून परत स्क्रीन केली. आणि क्लीयर केली. बायको म्हणाली शेवटी एक गोयकारच गोयकाराचे मत्स्य प्रेम समजू शकतो पुढे लगेज चेक इन करताना परत मत्स्य पेटीची विचारपूस झाली तिला स्क्रीनिंग चा शिकका दाखवला "सर तुमच्या मुलीचे ओळख पत्र नाहीये का" ( ओ त्तेरी हे आता नवीन भानगड) " आमच्या पॉलिसी मध्ये ओळख पत्र आवश्यक आहे. पण स्पेशल केस म्हणून तुम्हाला त्याशिवाय परवानगी देतेय. पुढच्या वेळी काळजी घ्या" (आमची केस खूपच स्पेशल होती) थेँकु पुढे सीक्यूरिटीने मला लाकडावर उभ केले आणि हात पसरुन उभे राहायला सांगितले. मी सुद्धा शाहरुख़ सारखा दोन हात पसरून उभा राहीलो. त्यानेही मशीन फिरवून मला तपासला आणि ओके केला पुढे बोर्डईंग केल्यावर सीट वर बसायाच्या आधी हवाई सुंदरी धावत आली ( आता येऊन म्हणेल आमच्या पॉलिसी मध्ये बसून प्रवास करण्याची परवानगी नाही तुम्हाला उभ्याने प्रवास करावा लागेल पण स्पेशल केस म्हणुन तुम्हाला बसून प्रवास करायची परवानगी देतेय) "युर सीट नंबर सर" तीन काही म्हणायची वाट न बघता आम्ही धाड़कन बसलो आणि कुर्सी की पेटी बांधूंन घेतली. बाकीचे यात्रीगण आमच्य कड़े बघत होते पण आम्ही काणा डोला केला शेवट गोड होऊन आम्ही आमचे सामान आणी मत्स्य पेटी मुंबई ला पोहोचलो ( अच्छे लोगो के साथ हमेशा अच्छा ही होता हे) (शेवटी कन्फेशन ह्या श्रावणात आम्ही मासे खाणार आहोत. कारण सांगणार नाही एक गोयकारच गोयकाराला समजू शकतो)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4270 views

💬 प्रतिसाद (9)
ड
डँबिस००७ Tue, 08/14/2018 - 20:36 नवीन
सही जमलय !!
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Wed, 08/15/2018 - 05:24 नवीन
मत्स्य! आपलं, मस्त! बरें नुस्तें पेटयले दिसता घराकडेन मागीर.
  • Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ Wed, 08/15/2018 - 13:33 नवीन
:)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 08/15/2018 - 06:34 नवीन
नुस्तें व्हरच्या दिनाशिल्ले म्हळ्यार कितें? कमाल आसां!! हाडलें मूं मागिर? कितें मेळले रे?
  • Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ Wed, 08/15/2018 - 08:38 नवीन
हावे वेल्यो, बांगडुले, सुंगटा, पापलेटा हाडली
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 08/15/2018 - 07:09 नवीन
मजा आली , छान लिहिता .
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 08/15/2018 - 09:53 नवीन
मस्त, झकास ! हे छोटं लेखन खुसखुशीत आवडलं !
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 08/15/2018 - 10:29 नवीन
=))
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 08/15/2018 - 13:09 नवीन
हे पुन्हा कोकणीत लिहा प्रतिसादात म्हणजे शिकता येईल. फोटु?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 17 hours ago
  • सुंदर !!
    6 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा