Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

फिशिंग अलर्ट माझा अनुभव डॉ. स्पर्शिका जोशी

श
श्वेता२४
Tue, 08/14/2018 - 16:48
💬 75 प्रतिसाद
आज मिपावर फिशिंग अलर्ट संदेश वाचला आणि खूप दिवसापासून चुटपुट लागून राहिलेल्या भावनांना वाट मिळाली आणि जी माहिती किंवा लेख सगा सरांनी दाखवला(हा लेख कोणीतरी मायबोलीवर लिहिला आहे) तो पाहून मी उडालेच. कारण मी पण अगदी याच अनुभवातून गेले आहे. सबब समस्त मिपाकरांना सावध करण्यासाठी खासकरून महिला सदस्यांसाठी हा लेख. डॉ. स्पर्शिका जोशी यांनी मला 7 जुलै च्या आसपास व्यनि केला की त्यांना माझ्या काही पाककृती आवडल्या. त्याला प्रतिसाद देण्यासाठी मी टिचकी मारली पण एक अशा आशयाचा संदेश झळकला कि त्यांना कुणीही प्रति संदेश पाठवू शकत नाही. मला हे विचित्र वाटलं. पण अशी काही सेटिंग करता येत असेल व मला माहित नसेल असं वाटलं. त्यानंतर लगेचच मला मेल आला की आपण बोलू शकतो का ? मला तुमची मदत हवी आहे. त्यावर मी त्यांना मला जमेल तशी करेन असा मेल पाठवला. त्यावर त्यांनी आपण चॅट वर बोलू असं सांगितलं. मी त्यांना शक्य नसल्याचे कळवले. त्यावर दुसरे दिवशी त्यांनी विंडो ओपन करून त्याचा पासवर्ड दिला पण मी त्यांना मला जमणार नाही आपण मेल वर बोलू असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी मी स्त्रीरोगतद्न्य असून वेदना न होणारे जेल शोधून काढले आहे जेणेकरून इंजेक्शन दिल्यावर वेदना जाणवत नाही असे सांगितले. मी या जेलचे काय घटक आहेत व याची काय साईड इफेक्ट आहेत ते विचारले . त्यांनी त्याचे नीट स्पष्टीकरण दिले. त्यांनी मला इंजेक्शन बाबतचे अनुभव विचारले मीही त्याची प्रामाणिकपणे उत्तरे दिली. हे तीन चार दिवस चालू होते कारण मला जमेल तसे मी मेल वर मराठी टाईप करून उत्तरे देत होते. मला त्यांनी कोल्हापुरात त्यांची मावशी राहते व त्यांचे क्लिनिक बांद्रा वेस्ट ला असल्याचे सांगितले. एव्हाना आम्ही बऱ्यापैकी सरावले होतो एकमेकींना. टाइपिंग चा कंटाळा असल्याने व मेल वरचेवर पाहण्याची सवय नसल्याने मी त्यांना माझा मोबाइल नं देऊन त्यावर वॉट्स अँप करा असे सांगितल्यावर माझा फोन मी केवळ imergency ला वापरते असं सांगितलं. मी जरा दुखावले गेले होते . त्यांचं असं वागणं अपेक्षित नव्हतं. कदाचित त्यांनाही हे जाणवलं असेल. त्यानंतर आजतागायत माझा त्यांच्याशी संपर्क नाही. पण खरा धक्का अजून मला बसायचा होता...... आज मी मिपावरचा संदेश वाचताच क्षणात मला स्पर्शिका आठवली. मी सरपंच ना संदेश पाठवला. खफ वर सगा सरानी त्यांचा उल्लेख केल्यावर त्यांनी माबो वरचा लेख जोडलेला वाचला आणि लक्षात आलं की मी पण हेच अनुभवलंय. पण खरं धक्का पुढे आहे..... हा लेख लिहायचा म्हणून gmail वरचे तिचे reply इथे पेस्टवण्यासाठी शोधले तर आमचे सर्व संभाषण उडवले गेले आहे......... मी अगदी trash फोल्डर हि तपासले. आमचे संभाषण झालयाचा एकही पुरावा शिल्लक नाही...... केवळ एक draft आहे पण त्यात काहीही लिहिलेले नाही. फक्त तिचा gmail address सापडला sparshika@ gmail.com ...........

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 26733 views

💬 प्रतिसाद (75)
क
कंजूस गुरुवार, 08/16/2018 - 17:31 नवीन
hangout बोलण्यासाठी आहे का लिहिण्यासाठी? त्यातून कॅाल/व्हिडिओ कॅाल होतो का?
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 08/16/2018 - 18:15 नवीन
हे व्हिडीओ कॉल करण्यासठी किवा चॅट करण्यासाठीचे अ‍ॅप आहे. बाकी मेल वापरल्यावर लॉग आउट करणे, ब्राउझर नुसताच कट न करणे, इन कॉग्निटो मोड वापरणे, जीमेल/ गुगलवर लॉगिन असताना ईतर ब्राउसिंग न करणे, पासवर्ड वरचेवर बदलणे वगैरे योग्यच. पण मेल आपोआप कशी डिलीट झाली हे समजले नाही अजुन...
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/17/2018 - 11:48 नवीन
हँगऑट्स हे गुगलचे "चॅट, व्हॉईस कॉल (फोन) व व्हीडिओ कॉल" करण्यासाठीचे अ‍ॅप आहे. माझ्या अनुभवात हे एक उत्तम अ‍ॅप आहे ! :)
  • Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड गुरुवार, 08/16/2018 - 21:10 नवीन
हे प्रचन्ड मह्त्त्वाचं आहे. बाकीच्या सूचना पण महत्त्वाच्या आहेतच.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 08/17/2018 - 02:20 नवीन
>>तुम्चा मेल आयडी दुसर्‍याकुणी 16 Aug 2018 - 10:39 pm | पिलीयन रायडर>> १) हॅक झालं असेल खातं तर आता तसे नवीन डिवाइसचे नोटिफिकेशन येणार नाहीत. म्हणजे तसा कोड टाकला असावा. जुने नोटि० तसेच राहतील. २) आउटलुकबद्दलचे सपोर्ट. माइक्रोसोफ्ट.कॅामवर लिहिले आहे पण सगळे प्रकार दिलेले आहेत. ३) मेललाच रिप्लाइ केल्याने मेल अॅड्रेस मिळाला असेल. ४)मेल डिलीट झालेत तर 'रिपोर्ट धिस प्रॅाब्लेम' करावे. " some of the conversations are found to have been deleted without any action on my part, how do I know that my gmail account has not been compromised?" ५) तुमचा संगणक/डिवाइस कोणता आणि ब्राउजर कोणता वापरला हे कोणा मिपाकराशी चर्चा करावी.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 08/17/2018 - 07:03 नवीन
काका, हॅक झाल्यावर सेटिंगस बदलले तरी एकदा तरी नोटिफिकेशन येईलच की. तुम्ही आपल्या मेल आयडीवर जे मिपाचे नोटिफिकेशन येते व्यनि आला की, त्याला रिप्लाय करण्याबद्दल बोलताय का? कारण तसं करून स्पर्शिकाबैंना मेल जात नाही, कारण ते मिपा अडमीन कडून नोटिफिकेशन असतं. त्यामुळे जीमेलला रिप्लाय केला तरी तो मिपा अडमीनच्या मेलला जातो. मी प्रोफाईलवर डिस्प्ले केला नसेल तर सर्वसाधारण सदस्याला माझा मेल आयडी मिळणं अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 08/17/2018 - 08:53 नवीन
क्र ५ आणि नोटिफिकेशनबद्दल त्यांनी तपास करायला हवा. ही एक साधी केस नसून जीमेलसह मिपाही गुंतले गेले॥ * हँगाउट माध्यमातून मेल अॅड्रस पोहोचतो का? *
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/17/2018 - 15:09 नवीन
@ श्वेता२४ मोबाईलवरून पाठविलेल्या जीमेल्स मेल पाठविताना त्यांना ठरविलेल्या वेळी डिलीट करण्याची व्यवस्था "confidential mode" वापरून करता येते. जीमेलमधील हा पर्याय एप्रिल २०१८ पासून उपलब्ध झाला आहे. तुम्ही सांगितलेली घटना त्यापूर्वी झाली आहे की त्यानंतर ?
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 08/17/2018 - 17:39 नवीन
9 जुलै 2018 च्या आसपास 2-4 दिवस हे सगळं घडलंय
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/17/2018 - 18:30 नवीन
म्हणजे स्पर्शिकाने, तिच्याकडून तुम्हाला आलेले जीमेल संदेश डिलीट करण्यासाठी, मी वर लिहिलेला पर्याय वापरला असण्याचीच दाट शक्यता आहे. आपल्या मोबाईलवरून जीमेलने पाठवलेले संदेश रिसिव्हर व्यक्तीच्या जीमेल खात्यातून आपोआप डिलिट होण्यासाठी, "confidential mode" वापरून "१-२-३... दिवस / आठवडे असा पर्याय वापरून", तसे करणे कोणालाही सहज शक्य आहे. ही ईमेल प्रणालीतल्या सुरक्षेतली कमतरता नसून, व्यावसायिक संदेशांना आवश्यक असलेली, बराच काळ मागणी असलेली आणि म्हणून मुद्दाम दिलेली सोय आहे. पूर्वीच्या कागदी व्यवहारात अश्या संदेशांत, "संदेश वाचून झाल्यावर तो फाडून नष्ट करा" अशी तळटीप असायची... तिचे हे संगणकीय रूप आहे.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 08/17/2018 - 20:11 नवीन
आपण जी माहिती दिलीत त्याने त्यावरून स्पर्शीकने याचा वापर केला असण्याची दाट शक्यता आहे. कारण gmail login alert चा संदेश मला कधीही आला नाही . यावरून gmail हॅक झाला असण्याची शक्यता कमीच वाटते. पण प्रश्न रराहतो कि स्पर्शिकाला माझा ई-मेल मिपावरून कसा मिळाला. पी. रा यांच्या सूचनेवरून मी नीलकांत ना व्य नि केलाय . पाहू काय उत्तर येतंय. माझे मेल परस्पर कसे delet झाले याचं टेन्शन आला होतं. पण तुमच्या या माहितीमुळं मी जरा निश्चिनंत झाले . आपण सर्व, कंजूसजी व पिरा हे गेले दोन दिवस या अनुषंगाने जे सहकार्य करत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments
र
रुपी Sat, 08/18/2018 - 01:59 नवीन
तुम्ही आधी तुमचा इमेल आयडी मिपाच्या प्रोफाइलमध्ये सर्वांना दिसू शकेल असा ठेवला होता का? मिपाच्या सिक्युरिटीबद्दल मला फार कल्पना नाही. पण तिथे नसला तरी तो दुसरीकडून मिळू शकतो हे आजच्या जमान्यात तरी मला फार अशक्य वाटत नाही. इथे मिपावर आणि इतरही बर्‍याच ठिकाणी आपण कळत-नकळत कितीतरी वैयक्तिक माहिती देऊन जातो. खास करुन गूगल, फेसबूकसारख्या कंपन्या आपले वेगवेगळे अकाउंट लिंक करतात त्यामुळे तर हे बरंच सहज साध्य होऊ शकतं.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 08/18/2018 - 10:37 नवीन
+१ मिपा किंवा इतर कोणत्याही सामाजिक संस्थळावरची ईमेल असलेली प्रोफाईल "पब्लिक" असली, तर तिच्यातला ईमेल अ‍ॅड्रेस सगळ्यांना दिसतो. gmail login alert चा संदेश मला कधीही आला नाही यावरून माझा वरचा अंदाज खरा ठरत आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 08/17/2018 - 22:06 नवीन
फक्त यांचेच मेल का काढले अथवा काढता आले हा प्रश्न उरतो.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 08/17/2018 - 15:27 नवीन
कोणी स्पर्शिका जोशींनाच असे व्यनि पाठवून पाहिलं आहे का?
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 08/17/2018 - 16:47 नवीन
परीक्षा कोण घेईल? कंठात नीळ नसलेल्या संघाचा किरकोळ सदस्य नाखु
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/17/2018 - 17:07 नवीन
समजा स्पर्शिकाकूनी तुम्हाला तुमचे लेखन आवडले तुम्ही छान लिहिता तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल असं म्हटलं असतं तर... तुम्ही- १) त्या व्य.नि कड़े दुर्लक्ष केले असते ? २) गप्पा मारायला गेले असता ? उत्तराच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 08/17/2018 - 18:55 नवीन
दुर्लक्ष केले असते एकतर सहा महिने मी ई-मेल वापरतच नाही आणि मिपावावर,कायप्पा फक्त भ्रमणध्वनीवर आहे त्यामुळे फार संथगतीने वाटचाल. असल्या अनाकर्षक संथ मनुष्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा तितक्याच वेळात चार-पाच ठिकाणी स्पर्ष लाघव करतील त्या!!!!
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Fri, 08/17/2018 - 18:05 नवीन
एकंदरीत या स्पर्शिका ताईंनी बऱ्याच मिपाकरणींच्या आयडी ला स्पर्श केला आहे तर ! त्या खऱ्या असतील तर हि सगळी चर्चा वाचून व्यथित झाल्या असतील आणि ट्रोल असतील तर फिदीफिदी हसत असतील. मज्जानु लाईफ !!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 08/17/2018 - 18:31 नवीन
माबोचा धागा वाचलात का?मी अगदी सुरुवातीला वाचला होता, पुढे काय प्रगती झाली ते पाहिलं नव्हतं. अत्ता श्वेता व्यास आणि मामी ह्यांचे प्रतिसाद वाचल्यावर आणि अजून एका आयडीने दिलेले स्पष्टीकरण वाचल्यावर हे प्रकरण बरंच विचित्र आहे असं दिसतंय. निव्वळ ट्रोल किंवा टाईमपास नसून कदाचित ही विचित्र मनोवृत्ती दिसतेय. तिथल्या स्त्री आयडींनी कडक फाईट दिलीये! सिक्स्थ सेन्स अगदीच निरुपयोगी नसतो तर...
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Sun, 08/19/2018 - 16:09 नवीन
त्यानंतर आजपर्यंत हॅकिंग वगैरे इतर काहीही नुकसान झालेलं नाहीये. त्यामुळे "एका विचित्र मनोवृत्तीच्या माणसाशी झालेलं संभाषण" असं समजून आता विषय सोडून दिलाय.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sat, 08/18/2018 - 14:21 नवीन
गुगलने जी-मेल साठी ऑटो-डिलीट सुविधा आणलेली दिसते, त्याचा वापर स्पर्शिका जोशी यांनी केला असावा असे वाट्ते. जीमेलचं नवं फिचर: आपोआप डिलीट होणार मेल
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Mon, 08/20/2018 - 09:32 नवीन
जीमेलचं नवं फिचर: आपोआप डिलीट होणार मेल -- हे फिचर फक्त मोबाईलसाठी आहे का ? कारण पीसीतून जीमेल ओपन केल्यास ते "Confidential" ऑप्शन, COMPOSE मेल मध्ये दिसत नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 08/21/2018 - 20:39 नवीन
सद्या तरी फक्त मोबाईल (अँड्रॉईड आणि आयओएस) साठीच आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 09/06/2018 - 14:21 नवीन
लोकहो, इथला मिपावरचा व माबोवरचा असे दोन्ही लेख व प्रतिक्रिया वाचल्या. एकंदरीत हा पुरुष दिसतोय. याला टोचनोद्दीपनाचा ( = इंजेक्शन फेटीश ) विकार जडलेला वाटतो हे इथलं निरीक्षण बरोबर दिसतंय. विकार अशासाठी की केवळ कामोद्दीपन साधणं निरुपद्रवी असतं. पण त्याचा इतरांना किंवा स्व:ला त्रास होऊ लागला की त्याचा विकार होतो. माझ्या मते तो अनेक बायकांशी बोलून घेऊन नंतर सावकाश स्वत:स उद्दीपित करीत असावा. २०१२ साली बायकांचा 'स्टॉक' करून ठेवला असावा. तो संपल्यावर परत साठा भरण्यासाठी सक्रीय झालेला आहे. ज्याअर्थी तो गूगल हँगाऊट वर बिनदिक्कीत बोलावतोय त्याअर्थी त्याच्याकडे पुरुषी आवाज स्त्रैण बनवण्याचं सॉफ्टवेअर असावं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 20 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 20 hours ago
  • सुंदर !!
    6 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा