Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

करामत - एक लघुकथा

अ
अनिंद्य
Mon, 08/13/2018 - 09:27
💬 28 प्रतिसाद
* * * दंग्यात लुटल्या गेलेला माल जप्त करण्यासाठी पोलिसांनी छापे मारायला सुरवात केली. लोक घाबरले, लुटीचा माल रात्रीच्या अंधारात घराबाहेर फेकू लागले. काहींनी तर स्वतःचाच माल फेकून दिला, उगाच पोलिसांचे झेंगट नको म्हणून. * * * एका माणसाची मात्र पुरती गोची झाली. त्याच्याकडे साखरेच्या दोन गोण्या होत्या, किराणा मालाचे दुकान लुटताना त्याचा हाती तेव्हढेच लागले. रात्रीच्या अंधारात एक गोणी त्याने शेजारच्या विहिरीत कशीबशी ढकलली, पण दुसरी ढकलतांना तोल गेला आणि तोही विहिरीत ! आवाज ऐकून लोक गोळा झाले. दोरखंड टाकून दोन उत्साही वीर विहिरीत उतरले, त्याला बाहेर काढले. पण थोड्याच वेळात शेवटचे आचके देत तो देवाघरी गेला. * * * दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांनी विहिरीतून पाणी शेंदले तर ते चवीला अगदी गोड ! * * * रात्री बघतो तर काय - त्या माणसाच्या कबरीवर दिव्यांची आरास ! * * * ज्यांनी इथवर वाचलंय त्यांच्यासाठी :- ‘सआदत हसन मंटो’ ह्या अत्यंत प्रिय लेखकाच्या 'करामात' ह्या लघुकथेचा मराठीत अनुवाद करण्याचा माझा पहिलाच प्रयत्न. मोजके चार शब्द पदरचे लिहिण्याची आगळीक केली आहे, पण ती मराठीत वाचण्याच्या सुगमतेसाठी. * * *

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11770 views

💬 प्रतिसाद (28)
ह
हेमंतकुमार Mon, 08/13/2018 - 09:35 नवीन
तुमचा प्रयत्न. छान. येऊद्यात अजून.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Mon, 08/13/2018 - 14:18 नवीन
येऊद्यात अजून...... अवश्य प्रयत्न करीन, आभार !
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 08/13/2018 - 10:13 नवीन
* * * कमी असरे तर उत्तम झाले असते.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Mon, 08/13/2018 - 14:15 नवीन
सूचनेबद्दल आभार _/\_
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 08/13/2018 - 10:23 नवीन
प्रयत्न चांगलाच जमलाय. कमीत कमी शब्दात आणि वाक्यात मनाला चटका लावणाऱ्या लघुकथा लिहिण्याची मंटो साहेबांची होतोटी विलक्षण होती. या आधी मिपावर जयंत कुलकर्णी साहेबांनी अनुवादित केलेल्या काही कथा वाचल्या होत्या. हि कथा आधी नव्हती वाचली ती अनुवादित केल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Mon, 08/13/2018 - 13:58 नवीन
आभारी आहे. कुलकर्णी साहेबांनी केलेले अनुवादही वाचून बघतो. मला आवडलेल्या काही कथांचा पुढे अनुवाद केलाच तर इथे रिपीट होणार नाही.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 08/13/2018 - 10:41 नवीन
म्हणलं का विषयच संपला, कमीतकमी शब्दात समर्पक अर्थ!
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Mon, 08/13/2018 - 13:42 नवीन
Absolutely !
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 08/13/2018 - 11:18 नवीन
चांगला प्रयत्न. तथापि कथा काहीशी तुटक वाटली.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Mon, 08/13/2018 - 13:33 नवीन
आभार ! मंटोंची मूळ कथाच तशी आहे, आटोपशीर - एक एक शब्द ताशीव, भारदस्त.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Mon, 08/13/2018 - 12:06 नवीन
छान अनुवाद आणि कथा पण वेगळी... खोल अर्थ असलेली
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Mon, 08/13/2018 - 13:37 नवीन
थँक्यू ! चमत्काराला नमस्कार असतो, मग कर्म चोराचे का असेना :-)
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 08/13/2018 - 16:19 नवीन
एक चांगला प्रयत्न. नाखु कोंडके
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Tue, 08/14/2018 - 09:48 नवीन
@ नाखु, आभार ! बरेच दिवसांपासून तुम्हाला एक सांगायचे होते - तुमची ती 'वाचकांची पत्रे वाला नाखु' अशी सही मला आवडते :-)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 08/14/2018 - 04:59 नवीन
उत्तम लघुकथा.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Tue, 08/14/2018 - 09:49 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Tue, 08/14/2018 - 13:18 नवीन
आणि अशा सुंदर कथेचा आटोपशीर अनुवाद
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Wed, 08/15/2018 - 07:56 नवीन
@ मित्रहो मला मंटोंच्या लघुकथा फार आवडतात. किमान शब्द आणि कमाल आशय. प्रतिक्रियेबद्दल आभार ! अनिंद्य
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 08/14/2018 - 13:26 नवीन
चांगला प्रयत्न.पुलेशु. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Wed, 08/15/2018 - 07:52 नवीन
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, आपल्यासारखे मराठी भाषेचे प्राध्यापक म्हणताहेत तर जमला असावा प्रयत्न. आभार !
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 08/14/2018 - 15:13 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Wed, 08/15/2018 - 07:52 नवीन
आभार !
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Mon, 05/11/2020 - 16:57 नवीन
आज साहित्यप्रेमी मंटोंचा वाढदिवस साजरा करताहेत. त्या कारणे मंटोंचे बावनकशी लेखन पुन्हा एकदा पुढ्यात आले. _/\_
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 05/12/2020 - 14:11 नवीन
जबरदस्त कथा ! मंटोंचं फारकाही वाचण्यात आलेलं नाही ! मंटोंच्या आणखी कथा वाचायला आवडतील !
  • Log in or register to post comments
श
शेखरमोघे Tue, 05/12/2020 - 17:01 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Tue, 05/12/2020 - 17:34 नवीन
वा सुरेख कथा आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Sat, 05/16/2020 - 06:36 नवीन
@ चौथा कोनाडा @ शेखरमोघे @ बिपीन सुरेश सांगळे आभार. मिपा/माबो वर काही मंटोकथा मराठीत आहेत.
  • Log in or register to post comments
र
रुपी Sun, 05/17/2020 - 18:05 नवीन
छान कथा. आवडली.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 17 hours ago
  • सुंदर !!
    6 days 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा