Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

सांगा निबंध कुणी हा पाहिला

म
मूखदूर्बळ
Mon, 08/06/2018 - 17:07
💬 14 प्रतिसाद
सांगा निबंध कुणी हा पाहिला आज दंतवैद्या कड़े बसलो होतो. साधारण दोन तासांची निश्चिन्ती. दंतवैद्याचा मुलगा साधारण सातवीत असावा.शाळा आय सी इस सी . मास्तरानी गृहपाठ दिलेय होता. चार विषयावर निबंध लिहायचे होते. आमच्या पीढ़ित निबंध लिहीताना ठराविक सुरुवात असायची. आणि शेवटी नेहमी प्रमाणे "अशे हे मामा मला खुप खुप आवडतात" किंवा निबंध गांडूळ वर असेल तर " असे है गांडूळ मला खुप खुप आवडते" किंवा अशे है गाढव मला खुप खुप आवडत असा संपक असायचा. मध्ये मध्ये वरणावर तूप सोडतात तशी सुवचने सोडायची किंवा मोदकात सारण पेरायच तस प्रसिद्ध लेखकांची नावे पेरायची. मधे काहीही लिहील तरी चालायचे. मार्क 10 पैकी 5 मिळत. परीक्षेत निबंध है थोड़े भारी प्रकरण असायची. विषय भ्रष्टाचाराचा भस्मासुर किंवा माझा आवडता प्राणी किंवा नेता ( द्विरुक्ती) असे असायचे. त मौजून आठ ओळ मध्ये पूर्ण व्हायचे. सुभाषीत / सुवचने अजिबात आठवायाची नाहीत. मग टी व्ही वर पाहीलेलेली महाभारतातली "यंदा यंदा ही अधर मत्स्य ग्लानीर भवतु भारत " अस काही बाही लिहूँन यायचो. है तस म्हटलं तर बरच विषयांतर झाल.दंतवैद्याला कुणी सभ्य सैतान गृहस्थाने ह्याच एक पुस्तक आले आहे अशी आठवण करून दिली. मला पुढचा धोका दिसत होता पण आजचा दिवस भयानक होता. दंतवैद्याने मला मुलासाठी निबंध लिहून देण्याचे निमंत्रण दिले. मला कोरा कागद आणि लेखणी देण्यात आली. भोवती सगळी मंडळी घोळका करुन बसली. काही सूचते आहे का , किती वेळ लागेल अशी विचारणा सुरू झाली. झाल की सांगा इतकयाही सूचना देण्यात आल्या. मला अगदी शौच कुपात बसल्याच फिलींग आल. सुरुवात केल्यावर थोडास विनोदी लिहा हा अशी सूचना करण्यात आली. डोक्यात तीडीक गेली. वाटल पेन घालून त्या कागदाची सुरळी करावी आणि आणि असो. पण पण आज काही म्हणजे अगदी शिव्या सुद्धा सूचत नहवत्या. शेवटी आम्ही शाळेत म्हटलेल्या " वे डा त मराठे वीर दौडले सात" गाण्या च्या पंक्तिनी सुरुवात केली. तीतक्यात वार्याने कागद उडाला आणि आठवे नववें आणि दहावे वेडे तो कागद आणायला धावले आणि मी प्रतापराव गुर्जरा सारखा महाराजांच्या ख़लीत्याची म्हणजे कागदाची वाट बघत बसलो. शेवटी नाही नाही हो हो म्ह णु न निबंध कसा बसा पूर्ण केला. तो त्या दंतावैद्याच्या होतकरु मुलाने कॉपी पेस्ट केला. आणि मी तेथून काढता दांत घेतला. निबंध फसला का बसला ते कळायला मार्ग नाही कारण परत तिथे फिरकलो नाही. परत निबंध कोण लिहीणार हो. तर अशी ही निबंधाची गाथा. तर असा हा निबंध मला खुप खुप आवडतो ( हे मात्र असच निबंध पूर्ण करायला आणि हो 10 पैकी 5 मार्क मिळवायला) केदार अनंत साखरदांडे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3329 views

💬 प्रतिसाद (14)
ट
ट्रम्प Mon, 08/06/2018 - 19:01 नवीन
छान विनोदी लिहलय !!!!! पण !! शेवट खूप लवकर आणला अस वाटतंय .
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 08/06/2018 - 21:45 नवीन
यंदा यंदा ही अधर मत्स्य ग्लानीर भवतु भारत
क्या बात है! =))
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Tue, 08/07/2018 - 01:50 नवीन
मस्त ...
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Tue, 08/07/2018 - 07:35 नवीन
मस्त..खूपच छान..!! थोडा लवकर संपवलाय...निबंधातला काही भाग दिला असता तर अजून मजा आली असती.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 08/07/2018 - 08:23 नवीन
पावणं लैच मजेदार लिहिताय की हो तुम्ही, अजून थोडं वाढवायला हवा पुढे अजून हसवा, खूप खूप शुभेच्छा विषय भ्रष्टाचाराचा भस्मासुर किंवा माझा आवडता प्राणी किंवा नेता ( द्विरुक्ती) असे असायचे. त मौजून आठ ओळ मध्ये पूर्ण व्हायचे. सुभाषीत / सुवचने अजिबात आठवायाची नाहीत. मग टी व्ही वर पाहीलेलेली महाभारतातली "यंदा यंदा ही अधर मत्स्य ग्लानीर भवतु भारत " अस काही बाही लिहूँन यायचो.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Tue, 08/07/2018 - 13:43 नवीन
@ केदार, ५ नाही हो, निबंधाला १० पैकी १० मार्क :-) पंचेस मस्त आहेत. त्या 'सभ्य सैतान गृहस्थाने' तुमच्याकडून अजून निबंध लिहून घ्यावेत आणि ते तुम्ही इथे मिपावर प्रकाशित करावेत अश्या शुभेच्छा :-) अनिंद्य
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Tue, 08/07/2018 - 15:03 नवीन
मजा आली. छान लिहिला आहे
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 08/07/2018 - 15:33 नवीन
पण दंतवैद्याचा तुमच्यावरच का दात होता? याची कारणे द्या. १) मागच्या वेळी तुम्ही कुठे काम करता हे त्याने विचारले होते ( आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी) तेव्हा तुम्ही नको ती एक्स्ट्र्रा माहिती दिलीत./ २) त्याने तुम्हाला पेपरातला अग्रलेख वाचताना पाहिले होते./ ३)तुमचा नंबर शेवटी होता.
  • Log in or register to post comments
श
शाली Tue, 08/07/2018 - 15:50 नवीन
भन्नाट! थोडक्यात आवरले, ते काही पटलं नाही बुवा!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 08/07/2018 - 16:50 नवीन
=)) =)) "यंदा यंदा ही अधर मत्स्य ग्लानीर भवतु भारत" एक नंबर !
  • Log in or register to post comments
न
नीळा Tue, 08/07/2018 - 19:04 नवीन
अरे तो नीबंध पण टायपायचा ना...
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 08/07/2018 - 19:25 नवीन
=))
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 08/08/2018 - 00:48 नवीन
भारी!
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sun, 08/19/2018 - 12:54 नवीन
९/१० शेरा: निबंध ८ ओळींचा न झाल्याने १ मार्क कापलाय. :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 17 hours ago
  • सुंदर !!
    6 days 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा