Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

आरशाला एक पत्र !

फ — फिझा, Sun, 08/05/2018 - 08:14
आरशाला एक पत्र ! ( आज तुला गेलेला तडा पाहताना , तू विखुरण्याच्या आधी , एवढंच सांगावंसं वाटतं ! ) नेहमीच का सगळ्यांनी माझ्या आधी निघून जायचं ? आज तू तरी थांब, आणि मी आधी जाते..... म्हणजे कधीतरी असं होईल कि कुणाच्यातरी आयुष्यातून, ‘मी’ आधी निघून गेले ! रोज सकाळी तीच स्वप्ने घेऊन तुला पाहताना स्वतःचे प्रतिबिंब पाहून तुझ्यावरच हसतांना , तूझ्या मध्ये दिसलेले पाणीदार डोळे पुसतांना मी स्वतःला शोधत आहे कि अजून कुणाला तुला हे कळत असेल सगळं ... म्हणून जरा थांब ! सोबतीचे आश्वासन तू दिले होतेस म्हणून तू मला विसरणार नाहीस हि खात्री आहे म्हणून तुझ्या शिवाय बोलायला कुणी नाही म्हणून किंवा तुझ्याशिवाय "माझे"असे कुणी नाही म्हणून.... म्हणून ..... तरी थांब ! मी खरी नसेन कदाचित, पण माझे डोळे आहेत तू बघितले आहेस त्यांना स्वप्न रंगवताना आणि हरवलेली स्वप्ने पुन्हा शोधतांना एक स्वप्न ...... तुही पाहिलं होतंस या डोळ्यात ....... .....म्हणून तरी थांब ! काय हवंय तुला, सांग, माझी सगळी सुखं दुःख गहाण ठेवेन हवं तर .... स्वप्न ,इच्छा,भावना यांचा सौदा करू हवं तर ..... मी कफल्लक होईपर्यंत... जे मागशील ते देईन .... फक्त तू थांब .....अजून काही क्षण ........ "त्याला " फक्त एकदा दाखव त्याच्या प्रतिबिंबाशेजारी उभी असलेली, "माझी" सावली त्याच्याच डोळ्यातून मनात आत आत उतरून त्याला एकदा तरी जाणीव करून दे 'माझी '…….. फक्त एवढ्यासाठी थांब ...! आयुष्य संपण्याच्या आधी हे त्याला कळायला हवं नाहीतर दोघंही आम्ही स्वतःचे प्रतिबिंब बघत राहू ...स्वतंत्र तडा गेल्यावर ..... तुझ्या विखुरण्याबरोबर बरंच काही तुटणारे,,,,,हे माहीत आहे तुला! .....म्हणून क्षणभर तरी थांब ! ........ फिझा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1896 views

💬 प्रतिसाद
अ
अभ्या.. Mon, 08/06/2018 - 14:51 नवीन
वाह, अप्रतिम. आपल्या लौकिकाला साजेशीच कविता, अनवट अन अलौकिक.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 08/07/2018 - 15:33 नवीन
प्रगल्भ कविता..
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Sat, 09/08/2018 - 22:59 नवीन
धूक्यातून पाहतांना जसे काही दिसते न दिसते, तशी वाटते आपली कविता. काही कळले असे वाटते...एक पारदर्शी मन असलेली,संवेदनशील पण तीचं मन समजून घेण्यात ,मत समजून घेण्यात,अस्तित्व समजून घेण्याची जवळच्या गरज वाटली नाही, प्रियजन बिछडे सभी बारीबारी ? मग वाटते तसे नसावे. स्टाईलाज्ड कविता, मला आवडली.
  • Log in or register to post comments
फ
फिझा Tue, 09/11/2018 - 05:29 नवीन
प्रतिसाद आवडला!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Tue, 09/11/2018 - 09:05 नवीन
फारच आवडली. भावली.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा