Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पाठमोरी

अ
अभ्या..
Fri, 08/03/2018 - 17:33
💬 25 प्रतिसाद
"आपलं कसं है लक्ष्या, वुडलॅन्ड म्हनजे वुडलॅन्ड" "आत्ता पायात सेमच हाय की बॉस, पन जबरीय राव ट्रॅक्टरटायरवानीच दिसतंय बूट" "मग लका, दोन वर्ष बघायचं नाही आता, आधीचा कंटाळा आला राव. चल काढ गाडी" चकचकीत सफारीत बसताना काचेत स्वतःलाच बघताना मात्र कंटाळा येईना. काळा शर्ट, फिटींगची जीन, खाली वुडलॅन्ड्,डोळ्यावर रेबॅन. सगळा साज कसा रोजचा फिक्स. रेबॅनमागचे डोळे मात्र फिरायचे कायम. माग काढत, सावज हेरत. आत्ताही. दार उघडताना दिसली ती पाठमोरी. जर्रा कंबरेखाली नेसलेली साधी साडी आणि अर्धउघडा ब्लाउज हे चित्र नेहमीचं असलं तरी आकारातलं अन हेलकाव्यातलं आव्हान त्याला जाणवलं. "हळू घे बे सेकंडवर फूटपाथपासनं" पास होताना रेबॅनची आणि गाडीची काच एकदमच आली खाली आणि चार डोळे भिडले. शरीराच्या आव्हानातले कणभरही डोळ्यात नव्हते, तासभर वाघाला दमिवल्यावर शेवटाला हरण कसं बघतं वाघाकडं तसली नजर ती. त्याला नेहमी लोकाच्या डोळ्यात वाचत येणारा इतिहास दहावीप्रमाणंच हितंही फेल गेला. "कुठं जायाचं मॅडम तुम्हाला, तुम्ही ते आपलं हितं राहता ना?" "आयोव, मी कुठली मॅडम, आमचं ह्येनी सर हैत जागृती शाळेला, पुढं तर घर हाय, ह्येंनी बोलावलं म्हनून शाळेकडं चालले." "जागृतीला म्हनजे आपल्या पाटील सरच्या शाळेत व्हय, बसा बसा मग, सोडतो शाळेकडंच." होय नको होय नको होत दार उघडले गेले अन चोरुन बसलेल्या तिला आरशात त्याचा चेहरा दिसला. दोन डोळे तिला आक्ख्या आरशाच्या ग्लासातनं पीत होते. ........................ . "सर आयका माझं, करा अ‍ॅडजस्ट, आपण जिंदगीत केली नाही रिक्वेस्ट कुणाला" "आओ पण पंचायतीसमोर लग्न करुन आणलीया हिला" "ते करु की मॅनेज, तुम्हाला नाय न्हवं पाटलानं परमनंट केलं अजुन, ह्या म्हैन्यात काढु ऑर्डर, आपली जबान" "आवो पण तुमीबी कसं बोलिता असं?" "सर, लै झालं आता हां, देतो तेवढं घेयाचं, तिलाबी बोललुया मी. दुसरी एखांदी गरीबाघरची आणा हळद लावून. परमनंट नोकरीत सुखानं राव्हा, हे दागिना तुम्हाला झेपणारा न्हाई, आन तुम्ही ह्ये दागिना घेऊन मिरवनं मला झेपणारं न्हाई" "आवो पण...." "राहायचं न्हवं हितं? ह्या गावात?" "लक्ष्या ह्येना दे रे कॅश..." . . बिचारं सर वळून वळून बघत गेलं. तिची नजर जोडव्यावरनं हलंना. .......................... . ह्याचा रेती कॉन्ट्रॅक्टरचा धंदा. दारात १० हायवा उभ्या स्टीकरं लावून. दोन पोरं दहावी बारावीला, बायको स्वत:चं अस्तित्व माहेरच्या नावाप्रमानं कायमचं विसरलेली. नवर्‍याचा बाहेरख्यालीपणाचा पहिल्या वर्षातच अंदाज आलेला. आता पोरं शिकवून मोठी करणे इतकंच आयुष्य शिल्लक राह्यलेली. ही आली घरात तसं पहिली बायको तोंड फिरवून निघून गेली, पोरं बावचळली, मायेनं जवळ घेतलं तरी बुजली. हिनं स्वतःचं ठिकाण हुडकून काढलं आणि ठिय्या मारला. दोघाच्या वयातलं अंतर चांगलं मोठं. वीस बावीसाचं पण त्याचा रंगेलपणा त्याहून मोठा. ही आली आणि पहिल्या संसारातलं तेल दररोज संपत गेलं होता ते पार विझलंच. हिला काय करु अन काय नको असं व्ह्यायलं. सकाळच्याला चार चार तास लक्ष्या गाडीत वाट बघत बसायचा पण ह्याचं घरातून पाउल निघायचं नाही. जोडीनं कधी निघालं बाहिर तर आठाठ दिवस घराकडं फिरकायचं नाहीत. नुसतं माथेरान न महाबळेश्वराच्याच तीस चाळीस ट्रीपा झाल्या. हिकडं सुरुवातीचं हिचं खेडवळ बुजणं कमी झालं. हा बाहेर पडला की डीमार्ट आन पार्लरला जायाला लक्ष्याला फोन केला की तो येऊ लागला. एकदा डीमार्टातनं बाहेर पडताना सर दिसला. बायको दोन पोरासह खच्चुन भरलेली ट्रॉली खेचत चालला होता. शहराची हवा सगळीकडंच फिरलेली दिसत होती. हिनं तोर्‍यात मान फिरवली, हा मात्र कधी गावात फिरला नाही हिच्यासोबत. जे काय फिराफिरी ते बाहेर गावात. पहिल्या बायकोनं हुशारीनं अटच टाकलेली ती. हिला लाख वाटलं तरी आता तेच्यासोबत फिरण्यासारखं काय राह्यलंही नव्हतं म्हणा. पाठीचा कणा त्याला साथ देईना. आयुष्यभर केलेली व्यसनं आता पोखरलेल्या शरीरासोबत राहत होती इतकंच. इकडं पोरं मोठी होउन कामाधंद्याला लागली. त्यातल्या मोठ्या रविने बापाचाच धंदा शिस्तीत डेव्हलपर्स आणि प्रमोटर्सच्या नावाखाली लिगली करायला सुरुवात केली. पहिल्या बायकोनं शिस्तीत सगळ्या एफड्या, सोनं, घर नावावर लावून घेत पोरं मार्गी लावली. . .................................................... . दुपारच्याला त्याला उठवंना, घशातनं आवाजच फुटंना, चार्जिंगला लावलेला फोन पण उठून घेणं होईना. हिचा काय पत्ता दिसंना. शेवटी रात्री अंथरुणातनं खुरडत खाली पडला की आवाज झाला. पोरगा पळत आला. फोनाफोनी झाली. हिला आणि कारला घेऊन थोड्या पैशानिशी लक्ष्या गायब होता. "पप्पा केस करु गाडीचोरीची, कुणाच्या नावावर आहे?" "........................" "सायबरच्या कदमाला सांगतो ट्रॅक करायला, पैसे कीती नेलेत भैन्चोदने?" ह्याची नुसती आडवी मान हलत होती. पोरानं दिला हात आणि निघाला त्याला घेऊन आईच्या बेडरुमकडे. . ह्याची नुसती आडवी मान हलत होती. ...................................................... . . . . (खूप आधी वाचलेल्या एका कथेवरुन रचलेली:- अभ्या..)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7316 views

💬 प्रतिसाद (25)
ज
जव्हेरगंज Fri, 08/03/2018 - 18:29 नवीन
दोनदा वाचल्यावर समजली ;) मुळ कथा कुठली म्हणायची?
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 08/03/2018 - 19:14 नवीन
छान लिहिली आहे. मूळ कथा सुहास शिरवळकरांची आहे का? नाव नाही आठवत कादंबरीचं, पण असंच काहीसं कथानक होतं.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Fri, 08/03/2018 - 21:48 नवीन
आवडली कथा... छान फुलवली आहात
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 08/04/2018 - 01:46 नवीन
:)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 08/04/2018 - 05:49 नवीन
छान...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- साँसों से नहीं क़दमों से नहीं मोहब्बत से चलती है दुनिया, दौलत से नहीं ताकत से नहीं मोहब्बत से चलती है दुनिया दुनिया... :- Mohabbat (1985)
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Sat, 08/04/2018 - 10:41 नवीन
जहबरी अभ्या भौ
  • Log in or register to post comments
च
चिनार Sat, 08/04/2018 - 12:53 नवीन
जबराट कथा... काही वाक्यांसाठी तर साष्टांग दंडवत घ्या अभ्या भाऊ !! वानगीदाखल..
जर्रा कंबरेखाली नेसलेली साधी साडी आणि अर्धउघडा ब्लाउज हे चित्र नेहमीचं असलं तरी आकारातलं अन हेलकाव्यातलं आव्हान त्याला जाणवलं.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Sun, 08/05/2018 - 06:22 नवीन
+१
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 08/04/2018 - 15:30 नवीन
आवडली कथा. लिहित राहा भावा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 08/04/2018 - 18:57 नवीन
नजरेत जालीम टेलिस्कोप हाय लगा तुझ्या . माणसाची देहबोली, स्वभावबोली, भावबोली अन नेत्रबोली वाचायची अफलातून कला तुला अवगत हाय, ग्रामीण मातीत घोळसून घेत बहुतकरून जमान्याला घोळसत जगला हायस, बेस्ट हाय, मागं ती जेसीबीवाल्याची गुष्ट अन आता ही कथा, लैच लगा जबरा वातावरण निर्मिती करतूस, असंच चालू दे , जियो!
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Mon, 08/06/2018 - 04:15 नवीन
+१ . सहमत .
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 08/05/2018 - 08:54 नवीन
एकाच वेळी तीनचार समांतर कथानकं पुढं सरकवतो मस्त.
  • Log in or register to post comments
ज
जानु Sun, 08/05/2018 - 15:30 नवीन
असंच असतंय....
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 08/06/2018 - 05:14 नवीन
जबरी कथा. सर्व प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिले.
  • Log in or register to post comments
क
कोंबडा Mon, 08/06/2018 - 08:59 नवीन
हिच गोष्ट निमिष सोनार यांनी यापेक्षा चांगली लिहिली असती.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 08/07/2018 - 10:17 नवीन
हो, त्यांचा हातखंडा असेल मूळ लेखकापेक्षा तीच गोष्ट भारी लिहिण्यात.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 08/06/2018 - 13:39 नवीन
गावोगावची कथा..
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 08/07/2018 - 09:47 नवीन
सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 08/07/2018 - 10:09 नवीन
फॉर्मेलिटीचा किडा चावलाय का भावड्या तुला? =))
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 08/07/2018 - 10:15 नवीन
भावड्यातला 'व' जसा आला ना तसाच तो पण आला. ;)
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 08/07/2018 - 10:32 नवीन
भा(व)ड्या विथ अ व ! =))
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 08/07/2018 - 10:02 नवीन
कसलं खतरनाक लिव्हलंय लगा, शिनिमाच बगतोय असं वाटतंय जनू ! येक आन येक डोल्याफुडं हुबा र्‍हायलान ! ____ दंडवत, अभ्या, दंडवत, ____ ______ _/\_ _______
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 08/09/2018 - 13:04 नवीन
डिटेलिंग आवडलेच, तरीही अजून थोडी फुलवायला हवी होतीस, असे वाटले.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 08/09/2018 - 13:47 नवीन
जिकलायस लगा!!
  • Log in or register to post comments
च
चिगो Mon, 08/13/2018 - 13:18 नवीन
भारीच.. जियो, अभ्याशेठ.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 16 hours ago
  • सुंदर !!
    6 days 16 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 16 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा