Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

i care for u

अ
अनाहूत
गुरुवार, 08/02/2018 - 09:16
💬 8 प्रतिसाद
" कसा आहेस ? " " तसाच . जशी तू सोडून गेलीस , तेव्हा होतो तसाच आहे . " " आपल्यात काही नव्हतं " " तुझ्याबाजूने . माझ्याबाजूने तर नेहमीच होत, आहे आणि राहील " " बाय द वे माझं लग्न झालं " " माहित आहे मला " " तू केलस कि नाहीस लग्न " " जिच्यावर प्रेम आहे तिचा अजून होकार आला नाही " " ओह्ह कोण आहे ती " " तू आणि कोण ? " " माझं लग्न झालय " " माहितेय मला लग्नाचं आणि डिवोर्सचही " तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं " तुला काय करायचं आहे ? हा माझा वैयत्तिक प्रश्न आहे " " तुझी काळजी आहे ना " " नको करू माझी काळजी माझी मी समर्थ आहे " " तू असतीस समर्थ तर काय होत " " लग्नाआधी जितकी स्ट्रॉंग होतीस त्याच काय झालं का बनून राहिलीस त्याच्या हाताच बाहुल " " असं काही नाही " " हो हे न कळण्याइतकं हळू तरी भांडायचं होत ना , सगळ्या सोसायटी समोर कशाला तमाशा ? " ती रडवेली झाली होती . " तुला काय करायचं आहे ? " " आय एम सॉरी माझ्यामुळे तुला त्रास झाला पण जे खर आहे ते मान्य तरी कर " " हो चुकले मी . चुकली माझी निवड . आता खुश ? " " स्वतःला का दोष देते आहेस आणि ज्याने तुला इतका त्रास दिला तुझं व्यक्तिमत्व इतकं इतकं बदललं , बदललं म्हणण्यापेक्षा कमजोर बनवलं त्याला वाचवते आहे . खरतर तुझा नाही बऱ्याच मुलींचा हा वीक पॉईंट आहे . त्या जो त्रास देतो त्याच्याशी छान वागतात, सगळं सहन करतात आणि जो त्यांची care करतो त्याला एकतर बुद्धू समजतात किंवा बुद्धू बनवतात . " " माहित नाही पण मुली मनाने विचार करतात डोक्याने नाही . " " जो त्यांचं मन समजण्याचं प्रयत्न करतो त्याला तर सगळ्या प्रॅक्टिकल चाचण्यांवर चेक केलं जात आणि जो त्यांच्या मनाशी खेळतो त्याच्यासोबत ओढल्या जातात . खरंच यार ... " " ते राहू दे तू स्वतःचा विचार कर . थोडा प्रॅक्टिकल हो . " तिला त्याला वेगळ्या विषयावर नेहू पाहत होती . " मी नाही ना बदलू शकत स्वतःला तू तेव्हाही आवडत होतीस आणि आजही आवडतेस तू माझ्यावर प्रेम करावं हि अपेक्षा नाही माझी . पण मला तर अडवू शकत नाहीस ना तुझ्यावर प्रेम करण्यापासून " " का आणि कशाला हे . शोध ना कुणीतरी दुसरी आणि हो सेटल " " तुझ्याशिवाय नाही सुचत कोणी " तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला . " असं नको ना करू मला ऑड वाटत खूप . " त्याने स्वतःला सावरलं आणि म्हणाला " तू नको विचार करुस माझा तू तुझ्या फ्यूचरचा विचार कर आणि चांगला जोडीदार निवड आणि त्याच्यासोबत आयुष्य घालवं " " आणि तुझं काय " " तू नको ना करू माझा विचार . आजपर्यंत जगलोय तसाच पुढे जगेन " तिने एकवार त्याच्या डोळ्यात पाहिलं . " एक बोलू माझं ज्याच्यावर प्रेम होत त्याला मी निवडल पण तो कधी माझ्यात तितका इन्व्हॉल्व्ह झालाच नाही . माझीच फरफट झाली त्याला समजून घेताना . उद्या दुसऱ्या कुणाचा विचार केला किंवा निवड केली तरी तोही माझ्यात इन्व्हॉल्व होईल कि नाही काही माहित नाही . मी अशा कुणाच्या इमोशन बद्दल शुअर नाही . आता परत तोच त्रास सहन करण्याची माझी मानसिक तयारी नाही . मी अशाच व्यक्तीसोबत सुखी होऊ शकते ज्याच्या इमोशन माझ्यासाठी कधीही बदलणार नाहीत . " " तुला मिळेल नक्की कुणीतरी तुझ्या इमोशन्स समजून घेणारा . " तो अजूनही बरच काही बोलत होता पण ते तिला ऐकू येत नव्हतं . ती न ऐकताच त्याला समजून घेत होती त्याच्या हावभावावरून , इमोशन्सवरून ... " I want to kiss u " ती अचानक बोलली . त्याला काही कळेना . तरीही त्याने तिला विचारलं " आपुलकी म्हणून , दया म्हणून , कि ...." तिने त्याला पुढे बोलू दिले नाही आणि स्वतःचे ओठ त्याच्या ओठावर टेकवले . खरंच काही भावना या शब्दात नाही व्यक्त करता येत .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3136 views

💬 प्रतिसाद (8)
क
कानडाऊ योगेशु गुरुवार, 08/02/2018 - 09:28 नवीन
बर झाले शेवट गोड केलात ते. ;)
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 08/02/2018 - 10:22 नवीन
तुमच्या प्रतिसादातील गोड शब्द मला ठळक अक्षरात का दिसत आहे? ;) धक्कादायक शेवट फक्त सैराटमध्येच चांगला वाटला. धडकमध्येही तो मनाला भिडला नाही. त्यामुळे गोड शेवटच बरा :)
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 08/02/2018 - 11:17 नवीन
छान...
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी गुरुवार, 08/02/2018 - 12:50 नवीन
छान लिहिली आहे कथा. थोडक्यात आणि प्रभावी
  • Log in or register to post comments
अ
अनाहूत गुरुवार, 08/02/2018 - 17:30 नवीन
आपल्या प्रतिसादांसाठी खूप खूप आभार
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Fri, 08/03/2018 - 08:40 नवीन
बरोबर आहे. जे काम शब्दांनी होत नाही ते 'मुक्या'ने होते :-)
  • Log in or register to post comments
प
पुणेकर भामटा Sat, 08/04/2018 - 16:08 नवीन
एकदम षटकार ठोकलात की हो. ☺️
  • Log in or register to post comments
अ
अनाहूत Mon, 08/06/2018 - 12:06 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 16 hours ago
  • सुंदर !!
    6 days 16 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 16 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा