भाळी लाल कुंकु
भाळी लाल कुंकु
गळ्यात काळे मणी
अस्तित्व तुझे जाणवे
साजणे क्षणोक्षणी
*
अंगणी रोज शेणसडा
रेखते नाजुक रांगोळी
जोडव्याचा तो पदान्यास
भासे तू नाजुक कळी
*
सकाळची तुझी लगबग
चुलीस करी चूल पोतेरे
कंकणाचा नाद भिनला
अन्नपुर्णा भासे मजला
*.
तुळशी समोर तेवावी
ज्योत दिव्याची मंद
अस्तित्व तसं तुझं
उजळते माझे जीवन
अकुकाका
उजळते माझे जीवन अकुकाकाहे वाचलं आणि जरासा दचकलोच ! :) छान आहे काव्य.सकाळची तुझी लगबग चुलीस करी चूल पोतेरे कंकणाचा नाद भिनला अन्नपुर्णा भासे मजलायात इतर िकाणी आहे तसे यमक जुळलेले नाही त्यामुळे थोडी खटकली