Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

भारांच्या जगात... २

अ
अजिंक्य विश्वास
Wed, 08/01/2018 - 19:58
भटांच्या वाड्यातील भुतावळ- भा. रा. भागवत भटांच्या वाड्यातील भुतावळ भूत म्हणले की, आजपण आपले कान टवकारले जातात. ह्या भुतावळीचे नाव वाचल्यावर माझे देखील तसेच झाले होते. कारण भूतकथा ह्या माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय (त्याबद्दल नंतर कधीतरी सविस्तर) पण ही भुतावळ हातात घेतली आणि घाबरण्यापलीकडे जाऊन एका उबदार अश्या अनुभवाला जाऊन पोहोचलो. हे पुस्तक वास्तविक म्हणजे चार्ल्स् डिकन्सच्या क्लासिक ' ए ख्रिसमस कॅरोल'चे स्वैर रुपांतरीत रुपडे आहे. मूळ ख्रिसमसऐवजी त्याला आपल्या मराठमोळ्या दिवाळीचे अलंकार चढवले आहेत, पण मूळ गाभ्याला धक्का न लावता! भन्नाटपुरात ऐन दिवाळी आली असता चिटको पिटको आणि कंपनी मध्ये हयात असलेले चिटको शेठ मात्र दिवाळीला नावे ठेवत आपल्या हाताखालील कारकुनाला दिवाळीची सुट्टी न देता कामाला यायला सांगतात. आपल्या भाच्यालादेखील लागट बोलून घालवतात. देणगी मागायला आलेल्या माणसांनासुद्धा रिकाम्या हातात परत पाठवतात. आजन्म ब्रह्मचारी असलेले चिटको शेठ संध्याकाळच्या वेळेत, कित्येक वर्षांत पडली नव्हती एवढ्या थंडीत आणि धुक्यात आपली आकडेमोड संपवून बाहेर निघतात. दिवाळीचे मंगलमय वातावरण ओलांडून, दिव्यांची रोषणाई न पाहता, फटाक्य़ांच्या आतशबाजीकडे दुर्लक्ष करत आणि चिल्ल्या-पिल्ल्यांच्या नावाने बोटे मोडत ते गर्द झाडांच्या वाडीत एका पेशवाईतल्या पण आता बदनाम झालेल्या इनामदार भटांच्या कुप्रसिद्ध वाड्यात म्हणजेच आपल्या स्वर्गवासी (?) झालेल्या पिटको शेठच्या विकत घेतलेल्या वाड्यात येतात. घरच्या अंधारात जेवण करून झोपायला खोलीत येतात आणि अचानक त्यांना भूत दिसते... नक्की कशाचे भूत असते. आणि नुसते भूत नाही तर ती भुतावळ असते. बोलणारी... सांगणारी... आपला भूत- वर्तमान आणि भविष्यदेखील जाणणारी! पुढचे जाणून घेण्यासाठी ह्या भुतावळीच्या कह्यात जाण्याशिवाय मार्गच उरत नाही. ह्या कादंबरीतील भूते अंगावर तर येतातच पण घाबरवून ना सोडता आपल्या विचारमग्न बनवतात आणि अंतर्मुख देखील! मूळ १८४३च्या डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झालेली लघुकादंबरी आपले लाघव का जपून आहे , हे ह्या पुस्तकामुळे समजते आणि तेसुद्धा भारांच्या खास शैलीत! हा अनुभव घेणे , एकदा तरी अनिवार्य! (जाता जाता- जमल्यास ' ए ख्रिसमस कॅरोल' नावाचा जिम कॅरी याचा २००९ मधला अॅनिमेशनपट देखील पाहा. व्हीक्टोरियन काळातील त्या समाजाची आणि व्यवहारांची माहिती तो चोख आणि उत्कृष्ट पद्धतीने देताना मूळ कादंबरीलाही न्याय देतो.) धन्यवाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2239 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 16 hours ago
  • सुंदर !!
    6 days 16 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 16 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा