Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पाच भारतियांच्या चमूने जागतिक भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये विक्रमी सुवर्णक्षण नोंदवला !

ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/30/2018 - 08:40
💬 13 प्रतिसाद
लिस्बन (पोर्तुगाल) येथे आयोजित केलेल्या जागतिक भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये (International Physics Olympiad उर्फ IPhO) पवन गोयल, लाय जैन, सिद्धार्थ तिवारी, भास्कर गुप्ता आणि निशांत अभंगी या पाच भारतियांच्या चमूतील प्रत्येकाने सुवर्णपदक जिंकले आहे !  चमूतील १००% सभासदांनी सुवर्णपदक पटकावणे हा भारताचा गेल्या २१ वर्षांतील विक्रम आहे. या पूर्वी एकदा पाच पैकी चार जणांनी सुवर्णपदकाची कमाई केली होती. भौतिकशास्त्र शिक्षणाच्या विकास व प्रगतीसाठी आयोजित केल्या जाणार्‍या या ऑलिंपियाडची प्रथम आवृत्ती सन १९६१ मध्ये पोलंडमध्ये आयोजित केली होती व तिच्यामध्ये पाच देशांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. आजच्या घडीला या प्रतियोगितेचा आवाका, ८७ देशांतील ४०० पेक्षा जास्त विद्यार्थी, इतका वाढला आहे. होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशनने या चमूची ऑलिंपियाडसाठी तयारी करून घेतली होती. या चमूतील पाचपैकी चार जणांची या वर्षी IIT Bombay मध्ये शिक्षणासाठी निवड झाली आहे आणि एकजण MIT मध्ये जाण्याच्या तयारीत आहे.

भारताची मान अभिमानाने ताठ करणार्‍या या सुवर्णचमूच्या सर्व सभासदांना उत्तुंग भविष्यासाठी अनेकानेक शुभेछा !


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9294 views

💬 प्रतिसाद (13)
ह
हेमंतकुमार Mon, 07/30/2018 - 09:00 नवीन
व अभिनंदन!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 07/30/2018 - 09:06 नवीन
सर्वांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 07/30/2018 - 10:38 नवीन
या पाच जणांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे पण! एक्का काका, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन (HBCSE) आहे ते. कृपया सम्पादित करा ही न वि.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/30/2018 - 10:59 नवीन
धन्यवाद ! तशी दुरुस्ती केली आहे.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 07/30/2018 - 18:37 नवीन
अभिमान वाटतोय आईनस्टाईन बघ रे बाबा वरून जरा खालच्या जगातला नाखु
  • Log in or register to post comments
D
dhananjay.khadilkar Mon, 07/30/2018 - 18:51 नवीन
अभिनन्दन
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 07/30/2018 - 23:18 नवीन
डॉक्टर सुहास म्हात्रे, बातमीबद्दल आभार. पाचही सुवर्णपदकधारकांचं अभिनंदन. निकाल इथे आहेत : http://ipho2018.pt/content/exams आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 07/31/2018 - 20:29 नवीन
परिक्षेचे स्वरूप (format), प्रश्न, उत्तरे आणि निकाल इत्यादींच्या तपशीलांसाठी धन्यवाद !
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 07/31/2018 - 11:23 नवीन
चमुचे, त्यांच्या पालकांचे, मार्गदर्शकांचे तसेच शाळांचे सहर्ष अभिनंदन..
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 08/01/2018 - 05:11 नवीन
अभिनंदन. कौतुकास्पद. पुढे कितीजण इथे राहतील माहीत नाही. पण मूळचे भारतीय म्हणून अभिमान राहतोच भारतीयांना.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Wed, 08/01/2018 - 16:13 नवीन
अपूर्व, झळझळीत वगैरे यश. अभिनंदन. बातमीबद्दल डॉ.साहेबांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 08/01/2018 - 16:43 नवीन
अशा बातम्यांनी बर वाटत
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प Tue, 08/07/2018 - 12:14 नवीन
आणि बातमी प्रसारित केल्या बद्दल डॉ साहेबान्चे तसेच गा पै यान्चे आभार.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा