Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आभाळाची छत्री

म
मूखदूर्बळ
Sun, 07/29/2018 - 18:48
💬 3 प्रतिसाद
आभाळाची छत्री माझ्या कड़े आभाळाची छत्री आहे. गुलाबी रंगाची लांब दाण्डयाची. रंग बऱ्या पैकी मळलेला आहे. गंजलेल्या तारांच्या गंजा च्या छटा त्यावर उमटल्या आहेत. कधी कधी तारा सुटतात. त्या मी परत बसवून घेतो. पाऊस सुरू व्हायच्या आधीपासून म्हणजे में पासून ते पाऊस सम्पायच्या नंतर नंतर अगदी ऑक्टोबर पर्यन्त मी त्या आभाळा च्या छत्रीला अंतर देत नाही. विसरत नाही म्हटले तरी दोन तीन दा तरी असेल छत्री दुकानात खानावळीत विसरून आलोय पण तितक्या च प्रयत्नने ती शोधूनही आणालिये. छत्री ला मी जसा विसंबत नाही तशी छत्री सुद्धा मला कधी विसम्बत नाही. ही आभाळाची छत्री वारसा हक्कानी माझ्या कड़े आली आहे. माझ्या आभाळा ने माझ्या बाबाने दिलेली ती छत्री आहे. ह्याच छत्री तून कधी कधी आम्ही दोघे अर्धे अर्धे भीजत भर पावसातून आलेलो आहोत. हीच छत्री मी बाबाचा डोळा चुकवून घेऊन गेलो आहेत. बाबाने तीन चार वर्षे वापरलेली छत्री मी बाबानन्तर पाच एक वर्ष तरी वापरत आहे. अजूनही वापरणार आहे. ही छत्री उघडली की मस्त सर्र करूंन आवाज येतो. आणि छत्रीतून प्राजक्ता ची फूले पडावीत तश्या आठवणी पडतात. पावसाने नाही भिजलो तरी आठवणीने मी नक्की भिजतो. माझा डोळा चुकवून माझी मुलगी ती छत्री कधीतरी घेऊन जाते. हिस्ट्री रीपीट्स म्हणतात. जनूक एकच आहेत ना काही झाल तरी. छत्री मला दिसेपर्यंत मुलगी घरी येई पर्यन्त मी चल बिचल होतो. मुलीला मी सांगतो ही छत्री तुझ्या आजोबाँची आहे. ती हळूच एक कटाक्ष आजोबांच्या फ़ोटो कड़े टाकते. आणि मी साँगायाच्या आधी चोरोन नमस्कार करते. तिला साँगावस वाटत बेटा माझ्या नंतर ही छत्री तुझीच आहे बर. असाच कधी कधी तूफान पाऊस पडतो. मी छत्री घेऊन बाहेर पडतो. पावसा कड़े माझ्या आभाळाकडे बघतो आणि सरकन छत्री उघडतो. माझी नेहेमीची आभाळाची छत्री

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1375 views

💬 प्रतिसाद (3)
श
श्वेता२४ Mon, 07/30/2018 - 10:53 नवीन
ही छत्री उघडली की मस्त सर्र करूंन आवाज येतो. आणि छत्रीतून प्राजक्ता ची फूले पडावीत तश्या आठवणी पडतात. पावसाने नाही भिजलो तरी आठवणीने मी नक्की भिजतो. छान लिहीलय छत्री ला मी जसा विसंबत नाही तशी छत्री सुद्धा मला कधी विसम्बत नाही विसम्बत ऐवजी विसरत म्हणायचंय का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Tue, 07/31/2018 - 12:57 नवीन
वडिलांचा 'आभाळ' उल्लेख आवडला
  • Log in or register to post comments
स
सुखी Tue, 07/31/2018 - 18:55 नवीन
मस्त लिहिता, लिहीत रहा अजून
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा