Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

खानावळ - एक शतशब्दकथा

त
तिमा
Sun, 07/29/2018 - 07:12
💬 10 प्रतिसाद
एक जुनी, सरकारी अनुदानावर चाललेली खानावळ होती. सर्व मेंबरं, तिथे गुण्यागोविंदाने जेवत असत. जेवण साधेच असे, रविवारी एखादी स्वीट डिश असे. तर, हळुहळु मेंबर्सची संख्या वाढत गेली. काही नवीन मेंबर आले. त्यांनी रोजच स्वीट डिशची मागणी केली. कंत्राटदार गयावया करु लागला. शेवटी आमटीतले पाणी वाढवून, ही मागणी त्याला पुरी करावी लागली. त्यानंतर आणखी मेंबर आले. ते स्वतःचे स्वीट खाऊन शेजारच्याचेही मागू लागले. जुन्या मेंबरांनी निषेध नोंदवला. पुढे पुढे तर, ते हिसकावून घेण्यापर्यंत मजल गेली. वातावरण फार गढुळ झाले. नवीन मेंबरांची आपापसात भांडणे सुरु झाली. कंत्राटदार तर जेरीस आला. नासधूस सुरु झाली. शेवटी, जुन्या मेंबरांनी, मुकाट्याने दुसर्‍या खाजगी खानावळीचा रस्ता धरला.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3604 views

💬 प्रतिसाद (10)
ज
ज्योति अळवणी Sun, 07/29/2018 - 12:17 नवीन
Hmmmm....
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 07/30/2018 - 13:52 नवीन
खरंय. त्यापेक्षा जुन्या मेंब्रांनी चांगला चोप देऊन पळवून लावायला हवे अशा फुकट खाऊ ऐदयांना!!
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 07/30/2018 - 18:44 नवीन
जुन्या जाणत्या मेंबराना त्यातलेच काही नको असतील तर नव्यांच्या आडून हे केलं नसेल कशावरून??? तसंही मालक २४ तास नसतेत तेंव्हा मी लै मामा असा आविर्भाव तोरा आपण पाहीला नाही का मैय्या!! मामा= मालकाचा माणूस उगा चिल्लर मेंबर नाखु बिनसुपारीवाला
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Mon, 07/30/2018 - 15:41 नवीन
ही खंत अनेक दिवसांपासून जाणवतेय आणि आज एकाच अर्थाचे दोन धागे!! मला वाटतं जुन्या मेंबरांनी पाठ फिरवल्याने आज खानावळीला हे दिवस आलेत.
  • Log in or register to post comments
भ
भन्नाट भास्कर Mon, 07/30/2018 - 18:52 नवीन
खानावळ शीर्षक वाचून शाहरूख, सलमान, आमीर आठवले :) येनीवेज, Change Is The Only Constant Thing In This World हेच खरे !
  • Log in or register to post comments
R
Ram ram गुरुवार, 08/02/2018 - 10:02 नवीन
हे मराठा आरक्षणा संदर्भात असल्याचा वास मला येतोय, आणिक कुणाला असं जाणवलं का?
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 08/02/2018 - 14:44 नवीन
मलाही असं वाटलं.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 08/08/2018 - 05:54 नवीन
मी पुन्हा मिपाव खानावळीत जोमाने लिहायला सुरवात करणार आहेत. पळून जाणार नाही.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 08/11/2018 - 05:37 नवीन
फक्त छान छानच लिहा ओंडक्यातला नाखु ओंडके
  • Log in or register to post comments
च
चिगो Mon, 08/13/2018 - 13:22 नवीन
म्हणूनच खानावळीकडे फारसे फिरकत नाही अनेक मेंबर.. असोच. ते Change is the only constant का काय म्हणतात, तसंच..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा