Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

हट्ट!

म — मनमेघ, गुरुवार, 07/26/2018 - 04:21
हट्ट कोणता करू तुजकडे? थिट्या मनाची झेप थिटी फिरून येती मनात इच्छा भेट हवी मज, हवी मिठी. आणि हासुनी ओळखशी तू, देउन जाशी हवे तसे मंतरल्यासम ते क्षण जाता, इच्छांचे त्या पुन्हा पिसे. 'थांब थांब तू, नकोस जाऊ' सांगावेसे तुज वाटे, त्याच क्षणी अन् सभोवताली काजळगहिरे तम दाटे. म्हणून जाशी मिठी छेडुनी झिणिझिणि वलये गात्रात अन् पुढल्या भेटीची होते मनी अनावर सुरुवात. असंख्य वेळा अशी भेटशी मिठीत घेशी हळुवार 'थांबवून ठेवावे तुज' ही इच्छा अपुरी, अनिवार. हट्ट सांग मी करू कोणता? थांबशील जो पुरवाया, थांबशील का अजून थोडी आज एवढे ठरवाया? - मनमेघ

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3216 views

💬 प्रतिसाद
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 07/26/2018 - 05:51 नवीन
सुंदर कविता!
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी गुरुवार, 07/26/2018 - 14:15 नवीन
खरच सुंदर
  • Log in or register to post comments
म
मनमेघ Fri, 07/27/2018 - 03:05 नवीन
प्रतिसादाबद्दल आभारी आहे _/\_
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा