एक मराठा लाख मराठा
" एक मराठा लाख मराठा "
पूर्वी गुंजला होता नाद
गिनीज बुकात नाव नोंदवुनी
मराठ्यांनी घेतली होती दाद
नव्हता कुणाचा अंकुश तेथे
नव्हते कुणीही नेते
गल्लोगल्ली येऊनि मिसळले
लाख लाख मराठे
काकासाहेब गेले बुडुनी (?)
झाला मोठा आघात
बंद पुकारला खरा तरीही
पण चढला हिंसेचा माज
मी हि मराठा तरी
भेदत आलो चक्रव्हुय ते सारे
शांततेतच खरा जोर असे
नको हिंसेचे वारे
मराठा असूनही आज मला
वाटत आहे लाज
पुन्हा रोवूया अटकेपार झेंडा
नको आरक्षणाचा साज
सिद्धेश्वर विलास पाटणकर
नको आरक्षणाचा साजठार निषेध !! मराठा समजाच्या भावना दुखाऊ नका . आरक्षण ही केवळ मागणी नाही , गरज आहे गरज ! आणि कोंबडं झाकुन ठेवलं म्हणुन सुर्योदय होण्याचं टळत नाही ! कोणी किती ही विरोध करा , मराठा आरक्षण होणारच आणि नुसते होणारच नाही तर अन्य अरक्षणांप्रमाणे यावश्चंद्रदिवाकरौ रहाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे !तुमची अशी भूमिका का आहे ते अधिक सविस्तर सांगू शकाल का?>>>> सांगतो पण त्या आधी तुम्हाला माझा इतका स्पष्ट लिहिलेला प्रतिसाद खवचट का वाटाला ते सांगु शकाल ?