Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

तो आणि ती... जांबवती! (भाग 9)

ज
ज्योति अळवणी
Mon, 07/23/2018 - 04:16
💬 2 प्रतिसाद

Book traversal links for तो आणि ती... जांबवती! (भाग 9)

  • ‹ तो आणि ती....... सत्यभामा! (भाग ८)
  • Up
  • तो आणि ती........ मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा आणि कालिंदी! (भाग 10) ›
तो आणि ती..... प्रस्तावना: https://www.misalpav.com/node/42956 तो आणि ती.... देवकी!: https://www.misalpav.com/node/42957 तो आणि ती.... यशोदा!: https://www.misalpav.com/node/42969 तो आणि ती.... राधा!: https://www.misalpav.com/node/42980 तो आणि ती........ कुंती!: https://www.misalpav.com/node/42995 तो आणि ती...... द्रौपदी!: https://www.misalpav.com/node/43004 तो आणि ती..... सुभद्रा!: https://www.misalpav.com/node/43027 तो आणि ती....... सत्यभामा!: https://www.misalpav.com/node/43043 तो आणि ती......... जांबवती! "जांबवती, प्रिये...... मला आज तुला काहीतरी सांगायचे आहे. केवळ त्यासाठीच आज मी तुझ्या प्रासादात थांबणार आहे असा निरोप धाडला होता. परंतु तुझ्या चेहेरा मात्र मला दुसरेच काही सांगत आहे." "यादवश्रेष्ठ, तुमच्या पासून कधी काही लपून राहिले आहे का? आज मला देखील मनमोकळेपणी तुमच्याशी बोलायचे आहे. यदुकुल भूषणा, आज इतकी वर्षे मी तुमची द्वितीय पत्नी म्हणून या प्रासादात राहात आहे.... तुमच्या सुपुत्राची माता आणि वसुदेव बाबा आणि देवकी आईंची सून म्हणून मिरवते आहे. तसे बघितले तर मला काहीच कमी नाही. परंतु तरीही मला माझ्या मनीचे गूज तुम्हाला सांगण्याची इच्छा गेले अनेक दिवस होते आहे..... तुमच्या सारख्या मनकवड्या देवेश्वरापासून हे कसे लपून राहील? त्यामुळे माझी खात्री आहे की म्हणूनच आज तुम्ही माझ्या प्रासादात थांबण्याचे ठरवले आहे. देवकीनंदना, तुमची आणि माझी गाठ बांधली गेली ते केवळ आणि केवळ त्या अनमोल स्यमंतक मणीरत्नामुळे; याची मला पूर्ण जाणीव आहे. स्यमंतक मणीरत्न बाळगणाऱ्या सत्रजीत महाराजांच्या बंधूंच्या; प्रसेन महाराजांच्या मृत शरीराच्या गळ्यातून ते मणीरत्न माझ्या वडिलांनी; जांबवान बाबांनी आपल्या बरोबर आणला. परंतु हे वसुदेव पुत्रा, तुम्ही चांगलेच जाणता की त्यांनी त्या मणीरत्नाच्या मोहामुळे असे काही केले नव्हते. श्रीदेवा, तुम्हाला सर्व यादवांना जाणवून द्यायचे होते की कोणतेही मणीरत्न सुदिन आणत नाही जोपर्यंत त्यामागील भावना स्वच्छ आणि प्रामाणिक नसते. त्यासाठी तुम्ही नामानिराळे राहात सर्व लीला केली होती; याची चर्चा संपूर्ण द्वारका नगरीमध्ये त्यावेळी झाली होती. त्याचप्रमाणे तुम्ही या मानिरत्नासाठी माझ्या बाबांशी मल्लयुद्ध देखील केलेत. त्या युद्धात हरल्यानंतर बाबांनी त्या स्यमंतक रत्नासोबत मला देखील तुमच्याकडे सुपूर्द केले." "प्रिये, तुझ्या मनातील भाव बोलण्याचे सोडून तू हे काय सांगते आहेस मला?" "द्वारकाधीशा, माझ्या मनातले भाव तुम्ही जाणताच. तरीदेखील मनीची इच्छा व्यक्त करताना त्यामागील कार्यकारण भाव देखील तुम्हाला मी स्वमुखे वदित करावा असे वाटले; म्हणून हे सर्व सांगते आहे." "बोल जांबवती, काय आहे तुझी इच्छा?" "देवेश्वरा, तुम्ही ज्याप्रमाणे स्यमंतकापेक्षा शुद्ध भावना महत्वाची हे सांगण्यासाठी ती घटना घडवून आणलीत त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मागील अवतारकार्य आयुष्यात माझ्या वडिलांना दिलेल्या वचन पूर्ततेसाठी देखील ती घटना घडवून आणली होतीत; हे मी जाणून आहे. रावण वधानंतर माझ्या वडिलांनी तुमचा निरोप घेताना तुम्हाला विचारले होते की त्यांना तुमच्या त्या निरामय श्रीराम रूपाचे दर्शन परत कधी होईल. त्यावेळी तुम्ही त्यांना वचन दिले होते की पुढील अवतार आयुष्यात तुम्ही त्यांना परत भेटून दर्शन द्याल.... आणि त्याप्रमाणे माझ्या बाबांना दिव्य श्रीराम दर्शन झाले....." "जांबवती, तू बुद्धिमान खरीच..... मात्र तुझी इच्छा तू मला सांगते आहेस हे विसरू नकोस. इच्छा व्यक्त करण आणि काहीतरी मागण यात फरक असतो बर..... " "मग माझे शब्दच खुंटले! विश्वेश्वरा............ माझ्या जन्मोजन्मीच्या पुण्याचे फळ म्हणूनच या जन्मी श्रीकृष्ण पत्नीचे स्थान मला मिळाले. तरीही..... बहुदा मानवाच्या मनाला शापच आहे की कितीही मिळाले तरी इच्छा संपत नाही आणि मी एक मानवी ह्रृदय असलेली सामान्य स्त्रीच आहे. त्यामुळे मी माझी इच्छा या श्रीचरणी ठेवते. मोहेश्वरा.... माझ्या बाबांना ज्याप्रमाणे श्रीरामांचे दर्शन झाले त्याप्रमाणे मला देखील व्हावे................... " "देवी, आपल्या सुकार्मांचे फळ आपल्याला जरूर मिळते. मात्र आपण ते प्रसादरुपी फळ शिरोधार्य समजावे. तुझ्या पिताजींच्या पुण्यकर्माचे फळ म्हणूनच तू म्हणतेस त्याप्रमाणे श्रीराम दर्शन त्यांना झाले; तसेच तूच म्हंटल्याप्रमाणे तुझ्या पुण्यकर्माचे फळ म्हणून तू महाराणी झाली आहेस............. अजून काय सांगू? बर, ते जाऊ दे... चल; आज सारीपाटाचा एक डाव तुझ्यासोबत खेळण्याची माझी इच्छा आज तू पूर्ण कर. प्रश्न इच्छापूर्तीचा आहे ना? मग तुझी इच्छापूर्ती आणि माझी इच्छापूर्ती यात फरक तो काय?"

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3248 views

💬 प्रतिसाद (2)
प
पद्मावति Wed, 07/25/2018 - 10:37 नवीन
खुप सुरेख लेखमाला. प्रत्येक भाग आवडतोय.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Wed, 07/25/2018 - 16:05 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा