Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

पाऊस !

म — मनमेघ, Sat, 07/21/2018 - 17:59
भिजून भिजून, गात्री- झेलून झेलून पाणी झाडाशी बसून, गोड- सुरात गातोय कोणी. कातर कातरवेळी लकेर लकेर ओठी पालवी पालवी जशी पानाच्या फुलते देठी. सळसळ सळसळ पानी चाहूल, जिवाला भूल मोकळ्या मोकळ्या वाटा वाटांत ओलेते सल... गारवा, गारवा रात्री हवेत वेगळा नाद... दुरून, दुरून आली कुणाची? कुणाची साद? ... झाडाशी झाडाशी खोल, थरथर थरथर देही डोळ्यांत, डोळ्यांत दोन पाऊस झाला प्रवाही ! ~ मनमेघ

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4204 views

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 07/22/2018 - 09:13 नवीन
आवडलीय कविता. लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
S
Secret Stranger Mon, 07/23/2018 - 15:23 नवीन
मस्त वाटली कविता..
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 07/23/2018 - 15:28 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Tue, 07/24/2018 - 07:23 नवीन
भावली. आवडली
  • Log in or register to post comments
म
मनमेघ Tue, 07/24/2018 - 13:23 नवीन
प्रतिसादांबद्दल सर्वांचा आभारी आहे _/\_
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 07/24/2018 - 16:33 नवीन
मस्त लिहिले आहे ..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा