वेगळ्या प्रतिमांचे मुस्लीम
ज्यांना टिका करायच्या आहेत त्यांनी माझ्या आधीच्या धाग्यांवर जावे, ज्यांना (खरोखर उपरोधाने नव्हे) मुस्लीमातील (परधर्मीय/नास्तिक द्वेष, तकफीर, हिंसा नसलेला) नेमस्तपणा (मॉडरेशन), सुधारणावाद, प्रबोधनवाद, आधूनिकता, अनुकूलनीयता, सहिष्णुता, लवचिकता, अभिव्यक्ती स्वात्रंत्र्य, कला आणि संस्कृती स्वातंत्र्याची बुज राखणार्या, रचनात्मक आणि सकारात्मक योगदानाचे कौतुकाचे दाखले देणे शक्य आहे त्यांनी धागा लेख न वाचताही प्रतिसादातून मनमोकळे कौतुक करण्यास हरकत नसावी. अर्थात त्यात मर्यादा अथवा उणीवा असल्यास प्रसंगी कठोर टिकाही केली जाऊ शकेल हे लक्षात घ्यावे.
*** नमनाला घडाभर ***
त्याज्य ते टाकायचे आणि चांगले ते घ्यायचे या साध्या तत्वाचा का कोण जाणे विसर पडतो. बहुतेक लोक, कोणतेही धर्म किंवा समाज असतील त्यात सर्वच चांगले किंवा सर्वच चुकीचे अश्या उणिवग्रस्त बायनरीत सापडलेले असतात. मी अलिकडे मुस्लीम समाजीय मर्यादांची चर्चा विवीध धागा लेखातून केली, प्रबोधनांच्या दिशांची चर्चा पुढच्या लेखातून करणार आहेच. यात धर्मग्रंथातील मर्यादांबद्दल पालन करणार्या समुहास का जबाबदार धरु नये असे जे मत असते त्या बद्दलच्या बाजूची चर्चा मी इतरत्र केल्या आहेत त्यांचे संकलन पुढील लेखातून देता आल्यास बघेन. तुर्तास त्याचा इथे केवळ दुवा आल्यास बघेन - थोडक्यात सांगायचे तर कोणतेही व्यक्ति, गट आणि समुह पुर्णतः धर्मग्रंथा-पंथा प्रमाणे चालत नाहीत आणि इन एनी केस विचारांची लढाई विचारांनी लढावी आणि व्यक्ती व समुह स्टिरीयो टाईपींगीग आणि विशेषतः द्वेष टाळावेत ; पण या नाण्याची दुसरी बाजू धर्मग्रंथांची चिकित्सा करताना अंशतः तरी टिका होणे स्वाभविक असते आणि धर्मग्रंथांची नावे नमुदकरुन अशी टिका करणे जोखीमीचे असू शकते शिवाय त्यासाठी अधिक अभ्यासाची गरज असते आणि असे अभ्यास लेखन सर्वसाधारणपणे अभ्यासकांपर्यतच मर्यादीत रहातात. ईतर धर्मीय सर्वसाधारणपणे धर्मग्रंथांच्या चिकित्सा आणि प्रबोधनाच्या प्रक्रीयेतून जरासे पुढे गेले असल्यामुळे धर्मग्रंथांच्या तत्वज्ञानांच्या चिकित्सा करणे कमी जोखीमीचे होते आणि समुहाच्या नावामागे राहुन आडमार्गाने टिका करण्याची गरज कमी भासत असावी तेच मुस्लीम समाजाच्या बाबतीत समुहांचे नाव घेऊन टिका करणे स्टिरीओ टायपींगच्या शक्यता असल्या तरी कमी जोखीमीचे आणि ढोबळ भेद आणि खुपणार्या बाजू सर्वसामान्यांना एकमेकांशी शेअर करणे अधिक सोपे जात असावे. याचा अर्थ मी स्टीरीओ टायपींग अथवा सरसकटीकरणाचा समर्थक आहे असा होत नाही, वस्तुतः स्टीरीओ टायपींग अथवा सरसकटीकरण तर्कशास्त्रीय कसोट्यांवर टिकत नाही. ढोबळ भेद आणि खुपणार्या बाजूतर शेअर केल्या पण या स्टीरीओ टायपींग अथवा सरसकटीकरणाचा प्रभावातून बाहेर कसे यायचे हा ही महत्वाचा प्रश्न असला तरी संबंधीत धर्मीय असलेले पण स्टिरीयो टाईप मध्ये न बसणार्या छोट्या छोट्या गट, समुह आणि स्टिरीयो टाईप मध्ये न बसणार्या व्यक्तिंचे योगदान आणि उदाहरणे लक्षात घेतली की सरसकटीकरणाच्या प्रभावातून मोकळे करणे सोपे जावे असे वाटते. आणि या धागा लेखाचा उद्देश्यही असाच आहे. अर्थात आपापल्या समुहांच्या गतकालीन चुका मोकळेपणाने मान्य करण्याची प्रक्रीया उपलब्ध असल्यास समाज गतकालीन वेदनांच्या कोषात अडकलेला न रहाता परस्परांचे सकारात्मक योगदान समजून घेणे आणि पचनीपडणे सोपे जात असावे.
तसे पहाता सर्वसामान्य माणसाचा सर्वसामान्य दिवस ८ तास काम आठतास झोप आणि उर्वरीत वेळ त्यासाठी लागणारी तयारी कौटूंबिक जबाबदार्या कुटूंब आणि मित्रांसोबतच्या मनोरंजन आणि खेळात संपत असतो. त्यातला जेमतेम थोडा वेळ धार्मीक बाबींवर खर्च होतो. तेव्हा इतराम्शी धार्मीक बाबीम्वरुन संघर्ष होण्याचे प्रसंग कमी यावयास हवे. पण प्रत्यक्षात काही वेळा उलटेही घडताना दिसते की ज्यामुळे अविश्वास आणि असुरक्षीततेच्या भावना मनात घरे बनवू लागतात. मुस्लिम समाजावरील (कि धर्मावरील ?) एक आक्षेप काहीसा असा असतो की अल्पसंख्य असतात तिथे तडजोड करुन रहावे, तडजोड करुन रहाणे अवघड गेल्यास स्थलांतर करावे, पण संधी मिळाल्यास प्रेम किंवा लागल्यास भेद निती वापरुन धर्मप्रसार करावा. अशा पद्धतीच्या बाबी ग्रंथीत असल्याने संशयवादास बळ मिळते हे खरे. पण या नाण्याची दुसरी बाजू अशी की कोणताही समुदाय अत्यल्पसंख्यांक असतो तेव्हा तो बहुसंख्यांशी जुळवून घेऊन रहातो, जुळवून घेऊन रहाणे अशक्य होत असल्यास स्थलांतरे करतो आणि पण संधी मिळाल्यास प्रेम किंवा भेद निती वापरुन स्वतःचा प्रसार करतो हे तत्व ग्रंथात लिहिले नाही तरीही अस्तीत्वात येऊ शकते. ह्या मुद्याकडे नरहर कुरुंदकरांनीही त्यांच्या लेखनातून लक्ष्य वेधले असावे. अत्यल्पसंख्य असताना समुह आहे ती स्थिती स्विकारतात तेच संख्या वाढते तशी अपेक्षा आणि सवलतींची इच्छा वाढते. या नव्या वाढलेल्या अपेक्षा आणि सवलतींच्या अपेक्षा बहुसंख्य समाजास खुपणे स्वाभाविक असते मग त्या सोबत एकमेकांच्या निसटत्या बाजू अधिक खुपणे अविश्वास असुरक्शेच्या भावना इथपर्यंतचा प्रवास सहज पुढे जात असावा. तेच नवीन अल्पसंख्यांकाचा गट आला की आधीचे लोक आपापसातले मतभेद विसरुन नव्या अल्पसंख्यांका विरुद्ध एकजूट होऊ लागतात हे सर्व नैसर्गीक असावे. त्यामुळे नवे नवे अत्यल्पसंख्यांक गट आयात करावे पण कोणताही नवा अल्पसंख्यांक गट एकगठ्ठा इंट्रोड्यूस न होऊ देऊ नये तर या मानवी प्रश्न आणि भावनांचे निराकरण होऊ शकेल का असा प्रश्न मला कधी कधी पडत असतो. असो.
सगळेच मुस्लीम मॉडरेट असतात असा एक पुरोगामी आक्षेप असतो, प्यु रिसर्च सर्वे चे अहवाल बघता असे सरसकट प्रमाणपत्र देण्याबद्दल साशंकता वाटते. दुसरा एक आक्षेप विरुद्ध बाजूने काही अभ्यासकांचा असा येतो की मुस्लीमातील धर्मग्रंथाधारीत मॉडरेट मॉडरेशन साठी जी टूल्स आणि टेक्निक वापरतात तीच टूल्स आणि टेक्नीक एक्सट्रीमीस्ट वापरतात (उदा. इज्तीहाद ) केवळ वेगळ्या दिशेने एवढेच त्यामुळे मॉडरेशनची वेगळी दखल का घ्यावी. मला वाटते मॉडरेशनची दख्ल घेण्याने भावी प्रबोधनाच्या दिशांसाठी आणि सामंजस्यासाठी अशा अभ्यासाचा उपयोग होऊ शकावा.
*** विषय ओळख समाप्त***
मुस्लिम समाजातील मॉडरेशनचा तात्वीक मांडणी वाचनास आली तरी मॉडरेशन झालेल्या व्यक्ती आणि समुहांच्या इतिहासाचा नेटका अभ्यास माझ्या प्राथमिक गूगल शोधातून अद्याप मिळाला नाही -कुणाला त्याची माहिती असल्यास तो येथे देण्यास हरकत नाही. जिथे जगण्याची व्यावहारीक गरज येत असणार तेथे किमान थोडे फार मॉडरेशन होत असणार हे स्वाभाविक आहे. खासकरुन व्यावहारीक राहुन सत्तेत टिकून रहाण्याची सत्ताधिशांना गरज असते. त्यामुळे अंषतः मॉडरेशनला त्यांचा सपोर्ट मिळत असतो, कोणत्याही समाजात कर्मठतेला वैतागून नास्तिक आणि लिबरल असणारे छुपे किंवा उघड व्यक्ती आणि गटही असणे स्वाभाविक असते तेही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मॉडरेशनचे मार्ग शोधत असतात.
वासतीया wasatiyyah हि एक इस्लामिक संकल्पना आहे जी मध्यममार्ग किंवा समतोलाचे प्रतिपादन करते. तर इज्तिहाद हि संकल्पना दुधारी तलवार आहे जी, न उलगडलेल्या इस्लामिक संकल्पनांची स्वतःचे अर्थ स्वतः लावण्याची लवचिकता उपलब्ध करते यात नकारात्मक अर्थ काढल्यास अतिरेकाच्या दिशेने प्रवास होऊ शकतो तेच आधुनिकतेच्या बाजूने अर्थ काढल्यास नेमस्तपणा किंवा सुधारणावादास पोषक ठरु शकते.
काही मुस्लीम खलीफा आणि तत्वज्ञांनी कर्मठांपासून सुटकेसाठी काही चातुर्यपुर्वक मांडण्या केल्याचे क्वचित दिसते. कुराण अनादी आहे की इश्वर निर्मीत हा मुस्लीम खलिफांच्या इतिहासात चातुर्यपूर्णपणे कर्मठांच्या गळ्यात मारण्यासाठी वापरला गेलेला असाच वाद होता (Muʿtazila). याच धर्तीवर जो पर्यंत कर्मठता समोर येते तो पर्यंत विज्ञान अनादी आहे की इश्वर निर्मित हा वाद श्रद्धावंतांसमोर उकरण्यात काहीच हरकत नसावी. ओटोमनांच्या एका खलिफाच्या काळात अशाच काही वैचारीक युक्त्या वापरुन स्त्रीयांना दगडांनी मारण्याची शिक्षा केवळ कागदावर राहिल प्रत्यक्षात होणार नाही हे पाहिले गेले. युरोपीयन दबावाखाली अल्पसंख्याकांना किमान अधिकार देणारे तंझीमत सुधारणा ओटोमनांनी केल्या अर्थात याच काळात ओटोमनांनी त्यांच्या युरोपीयन वसाहतीत अर्मेनीयन जिनोसाईड घडवले.( याच तंझीमीयत सुधारणांच्या परिणामी रशियन ज्यूंना इज्राएलमध्ये जमिनी विकत घेण्याचे आधीकार मिळाले) तसेच तंझिमीयत सुधारणांनी तुर्कस्थानच्या भावी म्हणजे २०व्या शतकाच्या पुर्वार्धातील केमाल पाशा याच्या सेक्युलर सुधारणांची बिजे रोवली असे समजले जाते. ( संदर्भ इंग्रजी विकिपीडीया). १९ आणि २० व्या शतकात रशियनांनी मध्य आशियात स्वतःची सत्ता बळकट करताना सुधारणावादी जदीदांची मदत घेतली. सेंट्रल एशियातील समुहांशी जोडून घेत केलेल्या प्रसंगी लादलेल्या रशियन-सोव्हीएत-कम्युनीस्ट सुधारणावादाचे प्रयत्नांचे यशापयश अभ्यासणे उपयु़क्त ठरु शकते (संदर्भ १,२,३,४ ) चीनही किमान पातळीवर सांस्कृतिक स्वरुप स्थानिक असेल , तर दुसर्या बाजूला चीन बाह्य राजकीय प्रभाव पडणार नाहीत या दृष्टीने अती संवेदनशील रहात आला आहे. चिनी सुधारणावादी प्रयत्नांच्या यशापयाशाचाही अभ्यास होण्यास वाव असावा असे वाटते. (इराणसारख्या देशात क्ठीण परिस्थितीतून का होईना बहाई सारखा पंथ पुढे येताना दिसतो त्याचा विकास आणि त्यातील सुधारणावाद त्यांच्या मर्यादांसहीत समजून घेणे उपयूक्त असू शकते)
ओमानी स्वतःला अधिक कट्टर म्हणवून घेतात, अंशतळ धर्मांतरेही करवतात पण अरबी देशांमध्ये हिंदूंसाठीचे आधूनिक काळातले पहीले मंदिर उभारुन गुण्यागोविंदाने नांदण्या एवढी मुभा देण्यातही ओमानी सुल्तानाचा पहिला क्रमांक होता.
इंडोनेशियातील प्रमुख विचारधाराही तुलनेने सहीष्णू समजली जाते, आपल्याकडे केरळी नायरात जशी स्त्री सत्ताक कुटूंब पद्धती नांदत असे तशी इंडोनेशियातील एका बेटावर मुस्लीम असूनही स्त्री सत्ताक पद्धती नांदते. सिरिया इराक इराण तुर्कस्तान यांच्या सिमावर्ती भागात वास्तव्य करणारे कुर्दीश लोक सुन्नी असूनही सांस्कृतिक दृष्ट्या लिबरल आहेत आणि आपली लिबरल संस्कृती जिवंत रहावी म्हणून चार चार देशांचा राजकीय छळही सहन करताना दिसतात. गुरु परंपरा चालवणारे सुफी आणि शियांचे गटही दिसून येतात त्यातील काही आपापल्या पद्धतीने लिबरल होण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या सर्वावरही दगडा पेक्षा वीट मऊ म्हणजे लोणी नव्हे हि रास्त टिका होउ शकते आणि वेळो वेळी अशी चिकित्सा झाली पाहिजे तरीही विटे एवढे मऊ होण्यासाठीही कुणाचेतरी योगदान कारणी पडले त्यांना त्यांचे क्रेडीट दिले पाहीजे. स्वप्नाला खरे मानून बळी जाण्याची शक्यता असलेल्या मुलाच्या जागी शेळी ठेवणारा जो कोण अनामिक मॉडरेट राहीला असेल किंवा जी कोण शेळी असेल त्याच्या तिच्या प्रसंगावधानाचे मानवतेने अंशतःतरी अभारी रहाण्यास हरकत नसावी - त्यामुळे किती कोटी की लाख मुलांचे जिव वाचले असतील याचा विचार करा.
दारा शुकोह , वीर अब्दुल हमीद ते एपिजे अब्दुल कलाम अशा अनेक व्यक्तींचे योगदान या धागा लेख आणि चर्चेच्या माध्यमातून पुढे यावे असे वाटते.
लेखन चालू
* अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी, चंद्रा एवजी चंद्र दाखवणार्या बोटा बद्दलचे प्रतिसाद टाळण्यासाठी सकारात्मक रचनात्मक योगदानासाठी अनेक आभार,
* इंग्रजी विकिपीडियावरील या विषयावरील अपरिपूर्ण लेख
** Islamic Modernism
** Islam and modernity
** Liberalism and progressivism within Islam
* critics of Islam https://twitter.com/ApostateRidvan/status/1100934630864232449
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- परदेसिया ये सच है पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया... :- Mr. Natwarlalमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- परदेसिया ये सच है पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया... :- Mr. Natwarlalमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- परदेसिया ये सच है पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया... :- Mr. Natwarlalमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiya Kiya... - Welcomeमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खिलते हैं गुल यहाँ खिलके बिखरने को, मिलते हैं दिल यहाँ, मिलके बिछड़ने को... :- शर्मिली (१९७१)ओमानी स्वतःला अधिक कट्टर म्हणवून घेतात,सर्वसामान्य ओमानी माणूस कट्टर मुस्लिम नाही, जे काही आहेत त्यांचे प्रमाण फार कमी आहे. किंबहुना, सगळ्या खाडी देशातला ओमान हा सर्वात जास्त उदारमतवादी देश आहे. तेथे गेल्या जवळ जवळ एक शतकापेक्षा जास्त अनेक काळ मंदीरे आहेत व त्यातली दोन मोठी मंदीरे सुलतानाच्या दरबारातून दिलेल्या मदतीने उभारलेली आहेत. सर्वसामान्य ओमानी माणूस परदेशी अमुस्लिम लोकांशी मित्रत्वाने वागतो, भारतियांशी तर जरा जास्तच. तो एक असा खाडी देश आहे की जेथे २० पेक्षा जास्त वर्षे खुशीने राहत असणारे भारतिय सहज दिसतात. अनेक हिंदूना त्या देशाचे नागरिकत्व दिलेले आहे, या बाबतीत हा देश मोठा अपवाद आहे. हे मी माझ्या त्या देशातील १४ वर्षांच्या वास्तव्याच्या अनुभवावरून खात्रीने सांगू शकतो. कामाच्या निमित्ताने आणि माझ्या भटक्या प्रवृत्तीमुळे मी बहुतेक ओमानी लोकांनी पाहिला नसेल इतका ओमान पिंजून काढला आहे. तेव्हा हा अनुभव केवळ मोठ्या शहरात नाही तर दूर दराजमधील गावांतीलही आहे. भारतातल्या कट्टर मुस्लीमांसारखे भडकाऊ भाषण ओमानमध्ये मला एकदाही दिसले नाही. त्या १४ वर्षांत मला मोजून चारदाच माझा धर्म विचारला गेला आणि मी हिंदू असे अभिमानाने सांगितल्यावर कोणतीही विरोधी भावना दिसली नाही. याची दोन मुख्य कारणे आहेत : १. ओमानी लोक सलाफी नाहीतर इबाधी पंथाचे आहेत. इबाधी पंथ हा कट्टर नाही तर बराच उदार विचारसरणीचा पंथ आहे. २. ओमान उदारमतवादी राहण्याचे सर्वात महत्वाचे कारण तेथिल राजे 'सुलतान काबूस बिन सैद' हे आहेत. जगातील केवळ चारच सर्वसत्ताधिश राजांपैकी (अबसॉल्युट मोनार्क) एक असलेला हा शासक "उदार सर्वसत्ताधिशाचे (benevolent monark)" उदाहरण आहे, असे मी दीर्घ व्यक्तिगत अनुभवावरून खात्रीने म्हणू शकतो. गेल्या सुमारे चार दशकापासून आस्तित्वात असलेले आणि ओमानच्या सुलतानांच्या आर्थिक व जमिनीच्या मदतीने उभे राहिलेले, राजधानी मस्कतमधील संगमरवरी हिंदू मंदीर हे मस्कतमधील पर्यटक आकर्षण आहे. तेथे सर्व हिंदू सण अनेक दशके मोठ्या प्रमाणात साजरे होत आलेले आहेत. त्या मंदीरामधील काही फोटो...मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- त्रिपक्षीय नौसैनिक सरावाने चीनला संदेश-भारत-पाकिस्तान सैनिकी संघर्ष भडकल्यास चीनसाठी भारताचे "मलाक्का औषध"