Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मैत्र..

प — प्राची अश्विनी, Tue, 07/17/2018 - 15:29
अगदी अचानक काहीच न कळवता आपण मित्राच्या घरी धडकावं. त्याने दरवाजा उघडताच त्याला बाजूला सारून आत शिरावं. चपला पर्स फेकून खिडकीजवळच्या मऊ गुबगुबीत माऊसारख्या खुर्चीवर धप्पकन बसावं. आपलं अगडबंब वाढलेलं वजन, परीटघडीच्या ड्रेसला पडणा-या चुन्या, खांद्यावरून डोकावत असलेला किंवा नसलेला चुकार पट्टा कसला कसला विचार मनात येऊ देऊ नये तेव्हा. "तुझीच आठवण काढली होती मी आज बघ डेविलिणबाई" म्हणत हसत त्यानं ग्लुकोज बिस्किटं आणि पाण्याचा ग्लास पुढे करावा. खरंतर मनात खुश होत पण वरवर "चल् काहीही खोटं" म्हणत त्याला उडवून लावावं. अगं हो, तुझ्या आवडीची शेवळाची भाजी केलेली हिने तेव्हा तुझी आठवण आलेली. त्याच्या शब्दातलं सत्य डोळ्यातून ओळखू यावं. (त्याची "ही" ऑफीसला असणार हे आपल्याला नक्की माहित असावं) "मग? काय म्हणतेस?" त्याने आपल्या समोर फतकल मारून बसत विचारावं. "काही नाही मज्जेत!" तोंडभर हसत आपण उत्तर द्यावं. त्यानं तसंच आपल्याकडं पहात बसावं, विस्कटणा-या डोळ्यांनी. "ग्रेस वगैरे वाचलास की नाही हल्ली?" "हा हा , बिझी इन बीईंग ग्रेसफुल" आपण फालतु पीजे मारावा. त्यावर न हसता, चाचपडणा-रया नजरेनं तो आपल्याकडंच पहातोय हे जाणवताच आपणही न फुटणारं हसू आवरावं. "मुलं काय म्हणतायत?" मस्त मजेत. पंख फुटलेत त्यांना. आपण चिवचिवावं. "यंदाच्या पावसात भिजलीस की नाही?" त्यानं खोडकर पणं विचारावं. "देव बाभळी बघितली वाटतं?" आपण प्रश्नाला प्रश्नानं काटावं. "Btw त्या दिवशी हरिप्रसादजींची मैफल काय रंगली होती सांगू" आता हसण्याची पाळी त्याची असावी. "गोविंदाची गाणी ऐकणारी तू , हरिप्रसाद कधीपासून enjoy करायला लागलीस?" किती म्हणून हसण्याचा प्रयत्न केला तरी डोळे वाहू लागावे. कारण आपल्यालाही समजू नये. "काय झालं" म्हणत त्याने हलके हात हातात घ्यावा. हळुवार थोपटावं. त्या थोपटण्याच्या लयीत मनातला अव्यक्त संभ्रम, मळभ आपोआप निघून जावं. ओठांवर पुन्हा सावरीचं हसू फुलावं. तेव्हाच्या त्या स्पर्शात निव्वळ माया असावी. नजर नीतळ असावी. मग इकडच्या तिकडच्या गप्पा , चिडवाचिडवी जोक यात वेळ भुर्रकन उडून जावा. अरे बापरे उशीर झाला म्हणत आपण मोकळ्या हलक्या मनानं तिथून लगबगीने निघावं. "अरेच्चा तो कसाय विचारायचं राहूनच गेलं की. वय झालं खरं आपलं." हा विचार मनात येईतो घरी पोचलेलं असावं. कुकर लावायचाच, भाजी कसली करावी बरं या विचारात तोही विचार हरवून जावा. असं मैत्र लाभायला भाग्य लागतं. आणि जर चुकून कधी गवसलंच तर त्याला कध्धी कध्धी हरवू देऊ नये.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4018 views

💬 प्रतिसाद
श
श्वेता२४ Wed, 07/18/2018 - 12:00 नवीन
मन हेलावून गेलं हे सगळं वाचून
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 07/20/2018 - 05:23 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
श
शाली गुरुवार, 07/19/2018 - 17:36 नवीन
वा! खरच खुप सुरेख. यावर चांगली कथा होईल. खरं तर असं मैत्र लाभतं बरेचदा पण आपणच थोडं शंकेने, थोडं भितीने दुर रहायचा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 07/20/2018 - 05:22 नवीन
खरंय , असेच मोती हातून निसटून जातात.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 07/20/2018 - 09:17 नवीन
कविता आवडली, कल्पना म्हणून(च) छान आहे रच्याकने :-
असं मैत्र लाभायला भाग्य लागतं
खरं आहे मैत्रच असलं वागू शकत. मित्र किंवा मैत्रिणी नाही. एक असलं मैत्र आहे आमच्या कॉलेजच्या ग्रूप मधे, त्याच्या घरी अशा अवेळी जाता की नाही ते मैत्रिणींना विचारावे लागेल. मैत्र असण्याचा असाही फायदा असतो हे लक्षात आले नव्हते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 07/21/2018 - 07:39 नवीन
धन्यवाद. काहीही हं पैजारबुवा. असतात हो मित्र आणि मैतरणी अशा. खरंच.
  • Log in or register to post comments
S
Secret Stranger Fri, 07/20/2018 - 17:16 नवीन
खूप छान..
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 07/21/2018 - 07:40 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 07/21/2018 - 17:40 नवीन
हातात इतर लेखन करावयाचे असल्याने सविस्तर प्रतिक्रीया देण्याची इच्छा असूनही शक्य होत नाहीए . हलक्या झालेल्या मनाने केलेल लेखन मोकळ आणि सुरेख झाले आहे. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 07/22/2018 - 04:08 नवीन
धन्यवाद आणि तुमच्या इतर लेखनास शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 07/23/2018 - 15:35 नवीन
वरचा सूर सुद्धा कोमल लागावा इतकं अलवार लेखन. :)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 07/26/2018 - 06:52 नवीन
किती सुंदर प्रतिसाद आहे!_/\_
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 07/23/2018 - 18:01 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 07/26/2018 - 06:52 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 07/26/2018 - 07:09 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 07/26/2018 - 07:05 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 07/26/2018 - 08:03 नवीन
उत्कृष्ट
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 07/26/2018 - 12:03 नवीन
...Platonic!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा