Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

राजस्थान भटकंतीत

म
मॅक
Tue, 07/17/2018 - 06:30
💬 9
मला डिसेंबर 2018 मध्ये राजस्थान मध्ये 6 ये 7 दिवस पर्यटनासाठी जायचे आहे... मी कोणत्याही टूर पॅकेज मधून न जाता स्वतः नियोजन करून जायचं ठरवलं आहे. आम्ही 8 प्रौढ आणि 5 लहान मुले आहोत.... तरी राजस्थान बाबत माहिती आणि नियोजन बाबत जाणकारांकडून माहितीची अपेक्षा आहे.... कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती.....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7009 views

💬 प्रतिसाद
क
कंजूस Tue, 07/17/2018 - 14:35 नवीन
सात दिवसांत राजस्थानातला थोडा भाग पाहून होतो. पॅलेस आणि म्युझिअम लहान मुलांना बोअरिंग आहेत. ठिकाणं निवडावी लागतील सर्वांना आवडणारी. राजस्थान स्वत: फिरणे अजिबात अवघड नाही. कुठून जाणार? मुंबईकडून उत्तम गाड्या आहेत. पुण्याकडून कमी.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 07/18/2018 - 17:09 नवीन
२ दिवस माउंट अबू आणि ३ ते ४ दिवस उदयपुर मध्ये वास्तव्य केल्यास ६-७ दिवसांत राजस्थानातला मेवाड प्रांत व्यवस्थित बघता येऊ शकेल. माउंट अबू , कुंभलगड, चितोडगड, हल्दीघाटी, नाथद्वारा, राणकपूर, एकलिंगजी, थोडेसे दुर्लक्षित असलेले परंतु खजुराहो प्रमाणे लेणी असलेले अत्यंत सुंदर असे सहस्त्रबाहू (अपभ्रंश होऊन सास बहु ) मंदिर , आणि उदयपुर शहर अशी ठिकाणे पाहता येतील. एकूण १३ जण आहात तर हि सर्व ठिकाणे पाहण्यासाठी उदयपुर पासून सुरुवात करून परत उदयपुर ला येण्यासाठी टेम्पो ट्रॅव्ह्लर किंवा फोर्स असे वाहन बुक करता येईल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/19/2018 - 06:45 नवीन
हाच भाग केला आहे पण अबु त्याला जोडले नाही, वेगळी ट्रिप केली. बरेच लोक जमा केले की नावे सुचवत राहतात हे करायचं ते करायचं पण नकाशाप्रमाणे काय सोयीचं आहे कुणालाच माहित नसते. एका शहरात राहून एकेक/दोनचार ठिकाणं करून परत त्याच शहरात येण्यात बराच वेळ वाया जातो. अबु - उदयपूर दोनशे किमि आहे. अबु -अंबाजी-पाटण-मोढेरा-अहमदाबाद ही ट्रिप वेगळी करणे सोयीचं आहे. कोटा(मेन लाइन स्टेशन) कोटा - बुंदी-।।।-चितोडगड-उदेपुर ।।-एकलिंगजी+नाथद्वारा+हल्दिघाटी परत।। उदेपुर शहर बाग पॅलेस दर्शन।। उदेपुर-राणकपुर।।राणकपुर-फलना रेल्वेस्टेशनमेन लाइन. उदयपुर आडमार्गावर आहे. कोटा आणि फलना इथे जाण्यायेण्यासाठी भरपूर गाड्या आहेत. कुंभालगड नक्की कुठे आहे? :- वर दिलेल्या "एकलिंगजी+नाथद्वारा+हल्दिघाटी पुढेच कुभालगडमार्गे फलना स्टेशनला जाता येते. थोडक्यात कुंभाल डोंगराच्या दोन बाजुनी फलना ते उदयपुर रस्ते आहेत. उजवीकडे हा रस्ता आणि डावीकडून राणकपूरमार्गे.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 08/13/2018 - 09:50 नवीन
@ कंजूस. माफ करा हा प्रतिसाद वाचायचा राहून गेला होता. आम्ही माउंट अबू हून उदयपूरला येताना राणकपूर - कुंभलगड -एकलिंगजी - सहस्त्र बाहू मंदिर असे करत आलो होतो. आणि दुसऱ्या दिवशी उदयपुरहून चितोडगड - नाथद्वारा - हल्दीघाटी राणाप्रताप म्युझियम बघून परत उदयपूरला आलो होतो.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 08/13/2018 - 12:14 नवीन
टुअर/टॅक्सीवाले फार उलटसुलट फिरवतात. त्यात प्रवासात वेळ जातो आणि बघायला रेंगाळायला वेळ कमी उरतो.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 07/23/2018 - 15:05 नवीन
फायनल झाले की कृपया ईथे टाका, म्हणजे सर्वांना उपयोगी होईल
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 07/24/2018 - 10:27 नवीन
>>सर्वांना उपयोगी होईल>> बरोबर जाणाऱ्या लोकांच्या वयोगटाप्रमाणे आवडीनिवडी बदलतात हो. मुलांना घेऊन अजमेर दर्गा, पुष्कर तीर्थ करणे वेळेचा अपव्यय. पाच दिवस फक्त अबु पाहून आलो आहे.
  • Log in or register to post comments
च
चारु राऊत Sun, 08/12/2018 - 14:58 नवीन
मी राजस्थान ची बहुतेक शहरे रात्री रेल्वे चा प्रवास व सकाळी रीटायरिंग रूम मध्ये प्रातर्विधी करून थोड्या दिवसात भरपूर राजस्थान पहिले आहे कारण बहुतेक शहरे ठराविक अंतरावर आहेत.
  • Log in or register to post comments
च
चारु राऊत Sun, 08/12/2018 - 14:59 नवीन
मी राजस्थान ची बहुतेक शहरे रात्री रेल्वे चा प्रवास व सकाळी रीटायरिंग रूम मध्ये प्रातर्विधी करून थोड्या दिवसात भरपूर राजस्थान पहिले आहे कारण बहुतेक शहरे ठराविक अंतरावर आहेत.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा