Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

तो आणि ती...... द्रौपदी! (भाग ६)

ज
ज्योति अळवणी
Mon, 07/16/2018 - 18:37
💬 5 प्रतिसाद

Book traversal links for तो आणि ती...... द्रौपदी! (भाग ६)

  • ‹ तो आणि ती........ कुंती! (भाग ५)
  • Up
  • तो आणि ती..... सुभद्रा! (भाग 7) ›
तो आणि ती..... प्रस्तावना: https://www.misalpav.com/node/42956 तो आणि ती.... देवकी!: https://www.misalpav.com/node/42957 तो आणि ती.... यशोदा!: https://www.misalpav.com/node/42969 तो आणि ती.... राधा!: https://www.misalpav.com/node/42980 तो आणि ती........ कुंती!: https://www.misalpav.com/node/42995 तो आणि ती ....... द्रौपदी "कृष्णे, तुझ्या बोलावण्यावरून मी आलो. पांडवांच्या विजयामुळे संपूर्ण आर्यवर्त दुष्ट, दुर्जन राजापासून मुक्त झालय. चर्चा मात्र हीच होणार की महाभारताचे युद्ध केवळ द्रौपदीच्या अपमानाच्या बदल्यासाठी झालं. याद्न्सेनी, तुझ्या रूपापेक्षा तुझी कुशाग्र बुद्धी मला कायम मोहवून गेली. पांचाली म्हणून जगताना देखील तू तुझं स्वत्व कधीच सोडलं नाहीस. म्हणूनच पांडवांच्या संदर्भातील प्रत्येक निर्णयात मला तुझा सहभाग हवा असायचा. तुझ्या वेगळेपणामुळे तू माझी सखी झालीस." "यादवा...तू माझ्याबद्दल जे सांगितलस ते खरं असलं तरी यासर्वापलिकडे मी मातादेखील आहे! माझे पुत्र माझ हृदय होते. तू जरी जगद्नियंता असलास तरीही तू माता नाहीस. यदुकुलभूषणा, प्रत्येक अपत्य जन्माच्या वेळी मातेचा अनेकार्थाने पुन्हा जन्म होत असतो. स्रीहृदयातील पुत्रशोक तुला कसा कळावा? कृष्णा, युद्ध संपल्यानंतर माझ्या पाची पुत्रांना झोपेत कपटाने मारण्यात आलं रे...." "सखे, त्या कृत्याची शिक्षा अश्वथाम्याला.............." "कृष्णा....नंतर काय झालं याचा हिशोब कशाला? पुढच्या पिढीच्या आदर्शासाठी, न्याय-अन्याय, नीति-अनीती यातील फरक कळावा म्हणून मी किती सहन करायचं? माधवा...माझा जन्मचमुळी सूडासाठी! माझ्या अस्तित्वाला पाचजणात वाटून माझ्या व्यक्तित्वाचा अपमान झाला, भर दरबारात माझ्या स्त्रीत्वाचा अपमान झाला, महाभारताचे युद्ध देखील माझ्यामुळे-माझ्यासाठी झाले. मी मात्र आयुष्याचा प्रत्येक क्षण कर्त्यव्यपूर्तीसाठी जगले. यादवा, जन्मापासून आजवर माझ्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग ही तुझीच करणी आहे! महाभारताचा करविता तूच आहेस! तूच तर जग्त्नियंता आहेस! केशवा....आज मात्र मी तुझ्याकडे जे मागणार आहे ते आपल्या शब्दापलीकडच्या नात्याला साक्ष ठेवून." "कृष्णे....मी तुझ्यासारख्या सम्राज्ञीला काय देणार?" "मोहना.......शब्दछल नको. थकले आता. सम्राज्ञीपद-राज्ञीपद काही नको मला. बस् एकच मागणं आहे. यापुढे मला कोणाचाही मृत्यू बघण्याची वेळ न येवो. नाहीतर तू माझी जी कणखर मनाच्या स्त्रीची प्रतिमा पुढील पिढीसाठी उभी केली आहेस ती ढासळून जाईल. माझ्यातील दुःखी, हताश आणि कमजोर स्त्रीच केवळ भारतवर्षाला लक्षात राहील. म्हणूनच हे मधुसूदना...मला एक वरदान दे...यापुढे मला कोणाचाही मृत्यू बघायची वेळ न येवो. कृष्णा तुझ्या कृष्णेच शेवटच....स्वतःसाठी मागितलेल दान तिच्या पदरात टाक. सखया...यापुढे माझा मृत्यु सर्वात अगोदर होईल इतकंच माझं मागण पूर्ण कर!" "तथास्तु कृष्णे! तथाsअस्तू!!!"

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4651 views

💬 प्रतिसाद (5)
प
प्रचेतस Tue, 07/17/2018 - 05:06 नवीन
ही सर्वच मालिका उत्तम झाली आहे.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Tue, 07/17/2018 - 09:46 नवीन
धन्यवाद प्रचेतस
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 07/17/2018 - 12:52 नवीन
आहा! खुप सुरेख.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Wed, 07/18/2018 - 08:00 नवीन
सुंदर!!! अजून पुढे भाग आहेत का?
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Wed, 07/18/2018 - 12:30 नवीन
हो आहेत न श्रीकृष्ण भगिनी सुभद्रा आणि त्यानंतर त्याच्या अष्टपत्नी सर्वांच्या मनीचे भाव माझ्या दृष्टिकोनातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात अष्ट पत्नीबद्दल फार काही वाचनात आलेले नाही. त्यामुळे तो संवाद तसा थोडा थोडक्यात लिहिला आहे. पुढचा भाग सुभद्रा आणि मग कदाचित कृष्ण पत्नी एकाच वेळी दोन असे मीपाकरांच्या पुढे ठेवणार आहे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा