Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

तो आणि ती.... यशोदा! (भाग 3)

ज
ज्योति अळवणी
Mon, 07/09/2018 - 13:54
💬 1 प्रतिसाद

Book traversal links for तो आणि ती.... यशोदा! (भाग 3)

  • ‹ तो आणि ती.... देवकी!
  • Up
  • तो आणि ती.... राधा! (भाग 4) ›
(खूप प्रयत्न करूनही पहिल्या दोन भागांचे दुवे जोडणे जमले नाही. क्षमस्व! दुवे कसे जोडता येतील यासाठी व्य. नि. कोणी केला तर खूप मदत होईल. धन्यवाद!) तो आणि ती............ यशोदा! "गोपाला.... प्रत्येक स्त्रीला बाळाला जन्म देतानाच्या वेदना कायम लक्षात राहातात आणि त्याहूनही जास्त लक्षात राहात ते बाळाचा जन्म घेताच पहिला आलेला रडण्याचा पहिला आवाज. मी  मात्र जन्म देताना पूर्ण ग्लानीत होते... जाग आली तेव्हा तू कुशीत होतास. जन्मतःच आपल्या उजव्या पायाचा अंगठा तोंडात घालून चोखत होतास. तुला पहाताच माझा उर भरून आला आणि काहीही कळण्याच्या आत मी तुला पदराखाली घेतला. तुझ्या त्या कोवळ्या ओठांच्या स्पर्शात परमोच्य सुख होतं. किस्ना, तू दिसामासाने वाढत होतास आणि तुझा खट्याळपणा देखील त्याच गतीने वाढत होता. बंसिधरा...... गोपींच्या तक्रारी... तुझं त्यांच्या घरात शिरून लोणी चोरण.... गोकुळातल्या सर्व गुरांना एकत्र करून आपल्या बासरीवर नादावण.... सर्वस्व मी मातेच्या हृदयाने आकंठ जगत होते..... तरीही......" "माते....आज इतक्या वर्षांनी विचारांच्या वेगाने आणि मातेच्या मनासोबत इतक्या दूर मला भेटायला आली  आहेस ते याच तरीही.... बद्दल सांगायला तर नव्हे?" "मनमोहना...... तुला माहीतच आहे रे माझ्या अंतरीच गुज. हो! आज इथे वृंदावनात असूनही मी द्वारकाधीशाच्या द्वारकेत त्याच्या प्रासादाच्या श्री आसनावर बसले आहे ते आई यशोदेच्या मनाने. तुझ कोमल... खट्याळ.... शूर आणि प्रेमळ शैशव मी आकंठ जगले यात वादच नाही. पण तरीही खोल मनात ही जाणीव होती की तू केवळ माझा पुत्र नाहीस... तू जगदउद्धारासाठी आलेला महापुरुष आहेस. मात्र ही जाणीव मी कायमच जाणून-बुजून दडपून टाकायचे. तुझ्याबद्दल कोणीही कितीही तक्रारी केल्या तरी तुला क्षणापुरते लटके रागावायचे... पण मग माझ्या पदराआड लपवून टाकायचे. नंदना, मला भीती होती की तुला मी रागावले आणि त्या रागाच्या भरात तुझ्याकडे पाठ केली तर कदाचित् मी वळून बघेन तेव्हा तू तिथे नसशीलच." "आई, मी शरीराने तुझ्यापाशी असलो किंवा नसलो तरी माझ बालमन कायमच तुझ्याभोवती रुंजी घालत राहाणार आहे; हे तुला माहित आहे न? तुझ्या मातृप्रेमाचे धडे घेतच मी मोठा झालो आहे. तू कायमच  माझा... फक्त माझाच काय पण संपूर्ण गोकुळाचा मातेच्या प्रेमाने सांभाळ केलास. मी तुझ्याच पावलावर पाउल ठेऊन आज द्वारकेचा सांभाळ करतो आहे." "मधुसूदना, तुझ्याशी बोलताना कोणी जिंकू शकेल का? तुझ्या मनात आजही माझी आठवण आहे हे समजून आज माझ्या जिवनाच सार्थक झालं. एक सांगू गिरिधरा, मथुरेचे राजमंत्री अक्रूर तुला घ्यायला आले तो दिवस मला तुझ्या माझ्या आयुष्यातून पुसून टाकता आला असता तर किती चांगलं झालं असत. मग तू कायमच माझ्याजवळ गोकुळात राहिला असतास." "माते, पण माझा जन्म..........." "नको वासुदेवा! नको आठवण करून देऊस... सगळ सगळ जाणून आहे मी. मृगनयना, तू मात्र हे विसरतो आहेस की माझ हृद्य आईचं आहे. तू एकदा पाठ करून गोकुळातून निघाल्यानंतर एकदाही वळून आला नाहीस रे. आजही मी सांजसमयी  तुझ्या वाटेकडे डोळे लाऊन बसते. वाटत कदाचित् खाद्यावर घुंगुरकाठी घेऊन एका हाताने बासरी वाजवत गुरांमागून येऊन तू आज देखील अचानक समोर उभा राहशील. पण आता मात्र माझे नेत्र दमले आहेत. म्हणूनच आज मी मनाच्या वेगाने आईच्या वात्सल्याने तुला भेटायला आले आहे. मुरलीधरा... आज माझ एकच मागण आहे." "माते यशोदे........ अस निर्वाणीच नको ग बोलूस. मी परत गोकुळाला परतलो नाही कारण गोकुळ सोडताना जे निष्पाप मन मी घेऊन निघालो होतो ते कुठेतरी हरवून गेलं. त्यांतर जो कृष्ण उरला तो तुला सहन झाला नसता. सांग आई....... मी काय केलं तर तुला बरं वाटेल?" "मुरलीधरा, मी देहाने गोकुळातल्या तुझ्या लाडक्या उखळापाशी बसले आहे. तू तुझ्या द्वारकेत बसून तुझ्या मधुर मुरलीचे स्वर आळव............. आता हृदयातल्या तुझ्या बाललीलांच्या आठवणींमध्ये आणि कानात गुंजणाऱ्या तुझ्या कृअलीच्या स्वरांच्या सानिध्यात मला माझा शेवटचा श्वास घ्याय्कॅं आहे........." "आssssssssई.......................... माते....................... यशोदे.......!!!"

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3092 views

💬 प्रतिसाद (1)
स
संजय पाटिल Wed, 07/18/2018 - 07:46 नवीन
ईतक्या सुंदर मालीकेवर एकही प्रतिसाद नाही?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा