Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अस्मिचे मनोगत (मी अस्मि बोलतेय

भ
भ ट क्या खे ड वा ला
Sun, 07/08/2018 - 17:21
💬 6 प्रतिसाद
*अस्मिचे मनोगत( मी अस्मि बोलतेय* नमस्कार, मी अस्मि. ही भाषा मला नवीन आहे, अर्थात हीच काय भाषा हे माध्यमच मला नवीन आहे. तसं माझं माहेर स्वीर्झलॅंड . इंजीनिअर ED Scott. हे आमच्या घराण्याचे मूळपुरुष, त्यानी म्हणे १९५८ साली प्रथम स्किइंग या खेळाची उपकरणे बनवायला सुरुवात केली व मग सायकल्स . कारखान्यात मी जेव्हा बनत होते तेव्हा यातलं काहीसं ऐकल होतं मी. मी झाले आणी माझी रवानगी भारतातील महाराष्ट्र या राज्यातील ठाणे या शहरात झाली. अर्थात ते मला समजले जेव्हा ,मी लाकडी खोक्यातुन बाहेर आले तेव्हाच. मग काही दिवस मी तेथेच होते. एकेदिवशी एक वेडा आला त्या दुकानात. मला पाहुन गेला परत , तसे या आधीही काही वेडे आले होते पण, त्यांच्या नजरेत मी आवडल्याचे भाव काही दिसले नाही मला. हा ही मला न घेताच परत गेला तेव्हा थोडीशी खट्टू झाले होते मी. पण काय करणार,आम्हाला तूम्हा माणसांसारखे आपल्या पायानी चालता येत नाही ना. नाहीतर तेव्हाच गेले असते त्याच्या मागुन. दोनच दिवसानी वेडा आला परत, यावेळी मात्र सरळ माझ्याकडेच पाहत राहीला होता. मागच्यावेळी इकडेतिकडे फार बघत होता, रागच आला होता खरतंर, पण काय करणार? आल्या आल्या माझ्याकडे पाहीलंन असे कि सगळा राग विसरुन गेले क्षणात. गाडी घेउनच आला होता मित्राची. थोड्याच वेळात,मी ज्या दुकानात होते त्या मालकाने काही कागद घेतले त्या वेड्याकडुन व वेड्याच्या हाती फक्त एक कागद व मला सोपवले. तरीही वेडा खूषच. मला तर त्या कागदी व्यवहारातले काही समजत नाही. Happy and safe riding असे काहीसे म्हणत दुकानदाराने आमचा निरोप घेतला, मी पण अशी वेडी कि कूठे जायचं कूठे रहायचं नाव गाव काय याची काहीही चौकशी न करता गेल्ये येड्याच्या पाठोपाठ. गाडीतुन आमची वरात निघाली ती थेट सातव्या मजल्यावर. अंबरनाथ असे काहीसे नाव होते शहराचे. मग सुरु झाला आमचा संसार. भरपूर फिरलो आम्ही एकत्र. एक लक्षात यायचं नेहमी, शहरातील रहदारी कमी झाली व थोडे दूर गेलो कि वेड्याची स्वारी खूष व्हायची. एक दिवस मला घेउन रात्री ची मुंबई ही दाखवली वेड्याने. अगदी नरीमन पॉइंट पासुन गेटवे एशियाटिक लायब्ररी व्हिटी स्टेशन असं बरच काही . मग आम्ही लोकल ट्रेन ने प्रवास करुन परत अंबरनाथ ला आलो होतो . मग पावसाळा सुरु झाला, आणी वेड्याला उतच आला. दर सुटीला आम्ही न चुकता फिरायला जाउ लागलो, काय मजा यायची म्हणून सांगू,जीकडे तीकडे हिरवेगार, थोडा चिखल उडायचा अंगावर पण घरी आलो कि वेडा त्याच्या आधी मला आंघोळ घालायचा,किती छान वाटतं म्हणून सांगू सर्वांगावर हात फिरवतो वेडा तेव्हा, अगदी मोहरुन जाते मी. त्या एका स्नानासाठी चिखलाचे हजारो सपकारे सहन करते मी. मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये सलग चार दिवस वेड्याच्या सहवासात होत्ये. वेगळ्याच घरी घेउन आला होता मला. मला घर आवडले होते, वेडा हळूच म्हणाला आता इथेच यायचय आपल्याला थोडे दिवसानी. काय मज्जा वाटली होती. परत गेलो अंबरनाथला,मध्ये बरेच दिवस गेले, वेडा पुन्हा खेड ला जायचे काही नाव काढेना, मी तर आतुर झाल्ये होत्ये, बहुधा वेड्याने खोटेच आश्वासन दिले आपल्याला असा ही विचार आला एकदोनदा मनात. एक दिवस वेड्याने काही माणसे बोलावली व घरातले सर्व सामान बाहेर काढायला सांगीतले. सर्व सामान एका मोठ्या गाडीत भरले त्या लोकानी.मला मात्र वेड्याने स्वतःच्या हाताने खाली आणले . माझे सर्व दागदागिने, मी व वेडा याना मात्र वेगळी गाडी होती, रस्ता तर परीचयाचा होता पण यावेळी खिडकितुन बघत होते फक्त. तसा हा माझा दुसराच मोटर प्रवास,अंग अगदी आंबुन गेलं होतं पण मोटर चा वेग भलताच, थोड्याच वेळात आम्ही खेड ला पोहोचलो. मग माझी रवानगी झाली एका हुक वर, अर्थात अंबरनाथला ही हेच होते माझे विश्रांती स्थान. पण इथे जी खुंटीवर जाउन बसल्ये ती बसल्येच. येडा काही हात लावायला तयार नाही. बरेच दिवस झाले, तशी एकदोन वेळा संधी मिळाली, पण मोठी राईड काही होत नव्हती, अंबरनाथला कसे बाहेर पडलो कि आणखी काहीजण भेटायचे, इथे आम्ही दोघेंच वेडा व मी. नाही म्हणायला १७ मार्च ला एकदा वेड्याच्या आजोळी जाउन आलो होतो. मग एप्रिल मध्ये एकदा. मे महीना तर पुर्ण खुंटीवर बसुनच काढला. वेडा सकाळी दिसायचा एकदा तो थेट संध्याकाळी एक नजर टाकून परत नाहीसा व्हायचा . जून उजाडला व माझे दिवस पालटले. आता हरएक सुटीला जातो आम्ही राईड ला. अंबरनाथ सारखी फार मंडळी नसतात पण दोन मित्र आहेत वेड्याचे ते असतात .. मजा येत्ये जरा मोठी राईड असली कि. माझं मूळगांव स्विझर्लंड असले तरी ते मी फारसे पाहीलेले नाही, जन्मच मूळी कारखान्यात, वेड्याकडुन ऐकलय थोडंफार तीतकिच माहीती. मला आता हे कोकण फार आवडायला लागलय रस्ते आहेत काहीसे दमछाक करणारे तरी आजूबाजूला छान दृष्य असतात व मेली गर्दी कमी माणसांची व गाड्यांचीही. हल्ली कूठे कूठे जात असतो आम्ही, मस्त पाउस असतो व हिरवागार निसर्ग, इकडचा चिखल ही आवडतो मुंबई/ अंबरनाथच्या चिखला पेक्षा . तीकडच्या चिखलात काय नको नको ते असायचं. घरी आलो कि विहिरीच्या थंडगार पाण्याने मनोसक्त स्नान घडते, माझी आजारपणं ही नाहीशी झाल्येत इथे आल्यापासून. एकदाही पंक्चर नाही झालय माझं चाक. वेडा ही खूष आहे व मी ही .. वेड्याच्या सहवासात अशीच सफर सुरु राहूदे असे साकडे घालत असते मी हल्ली खुंटीवर बसुन बसुन. अरे हो सांगायचच राहीलं , मला हल्ली माझ्या अस्मि या नावापेक्षा *भटकी खेडवाली* असं लांबलचक तरीही खेड शी नातं सांगणारे नाव आवडायला लागलय. *भटक्या खेडवाला* ०८ जुलै २०१८ *

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1889 views

💬 प्रतिसाद (6)
क
कंजूस Sun, 07/08/2018 - 18:17 नवीन
वेडी खुलली खेडला.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 07/08/2018 - 18:46 नवीन
एका वेडियाची दुचाकी बोलली आम्हाला कहाणी आवडली :)
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 07/09/2018 - 04:35 नवीन
ओके
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ गुरुवार, 07/12/2018 - 12:26 नवीन
:)
  • Log in or register to post comments
द
देशपांडेमामा Fri, 07/13/2018 - 10:42 नवीन
तुमच्या राइड्स आणि लेख दोनीही भन्नाट असतात !! _/\_ देश
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 07/13/2018 - 11:20 नवीन
तुम्ही कायमचे खेडमध्ये सेटल झाला आहात? रोचक. कोंकणप्रेमी दिसता. शुभेच्छा.. लेख छान.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा