Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

सेक्रेड गेम्स

ब
बार्नी
Sun, 07/08/2018 - 13:15
💬 25 प्रतिसाद
सेक्रेड गेम्स sacred games काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्स विक्रम चंद्रा च्या कादंबरीवर टीवी सिरीज बनविणार म्हणून समजले आणि मी उडालो. इंजिनीरिंग ला असताना मला विक्रम चंद्रा चे हे पुस्तक प्रचंड आवडलेले . इतका बारीक अभ्यास करून तरीही रियालिटी शी बांध ठेवून थ्रिलर लिहिण्याचे कसब फारच थोड्या लेखकांकडे असते. आणि त्यात अनुराग कश्यप , विक्रमादित्य मोटवाणे हे दोघे डायरेक्टर आणि वरून ग्रोव्हर ( गँग्स ऑफ वासेपूर , मसान, मोह मोह के धागे फेम ) सारखा लेखक व नवाझुद्दीन सिद्दिक्की , सैफ आली खान , राधिका आपटे सारखी स्टारकास्ट बघून होपफ़ुल होतो . नेटफ्लिक्स चे शोज हे इतर शोज पेक्षा अत्यंत वेगळे असतात कारण त्यांची क्वालिटी . मग तो नार्कोस असो की स्ट्रेन्जर थिंग्स असो की जर्मन शो " डार्क " असो . सतत काहीतरी नवीन देत राहण्यामुळे नेटफ्लिक्स छोट्या काळात प्रचंड यशस्वी झालेली आहे. तर दोन दिवसांआधी ही सिरीज रिलीज झाली आणि झपाटल्यासारखी बघून काढली . अँड इट वाज वर्थ इट . sacred games सरताज सिंग ( सैफ अली खान ) हा मुंबई मध्ये काम करणारा अंडर परफार्मिंग पोलिसवाला असतो . सोडून गेलेली बायको , डिपार्टमेंट मधील राजकारण ह्याने वैतागलेला . एक दिवस त्याला अंडरवर्ल्ड डॉन गणेश गायतोंडे ( नवाज ) चा फोन येतो आणि मुंबई वाचविण्यासाठी तुझयाकडे २५ दिवस असल्याचे सांगतो , मग सुरु होतो एक खेळ जो शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतो. कुठल्याही प्रकारची सेन्सॉर बोर्ड ची भीती नसली की काय होऊ शकत , हे अनुराग आणि विक्रमादित्य ने दाखवून दिले आहे . सॅक्रेड गेम्स हा भारताचा नार्कोस आहे असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही . राजीव गांधी पासून , शाह बानो प्रकरण , देव , धर्म , बाबरी मस्जिद प्रकरण , नंतरच्या दंगली , रामायण , महाभारत सारख्या विविध विषयांवर बेधडक कमेंट्री करण्याचे धाडस लेखकांनी दाखवलेले आहे. उदाहरणार्थ एपिसोडस ची नावं बघा . अश्वथामा , हलाहल , ब्रह्महत्या , रुद्र , आतापी वातापी , प्रत्येकल्प , आणि ययाती नावाचा अंतिम एपिसोड . शिवाय अभिनयाच्या बाबतीत ही कुठेच कमतरता भासत नाही . नवाजुद्दीन सिद्दिक्की तर संपूर्ण शो मध्ये भाव खाऊन गेलाय. navaaj सरताज म्हणून सैफ ने ही बर्याच वर्ष्यानंतर मस्त काम केलेले आहे . आणि काटेकर म्हणून जितेंद्र जोशीने काही काही सीन्स मध्ये सैफ लाही लाजवेल असा अभिनय केला आहे. तांत्रिक दृष्ट्या इतका सरस आजपर्यत कुठलाही टीवी शो झालेला नसेल , कुठेही आपण भारतीय शो बघतोय असं वाटत नाही. नेटफ्लिक्स ने ह्या शो द्वारे बेंचमार्क खूपच वर ठेवला आहे जो येणाऱ्या काही वर्षांत इतर शोज ना गाठणे कठीण ठरेल . त्यामुळे एकता कपूर च्या पांचट कार्यक्रमांना आपण कंटाळला असाल तर हा खेळ बघायलाच हवा . ( टीप : हा शो १८+ प्रेक्षकवर्गाला गृहुत धरून बनविला असल्याने फॅमिली सोबत किंवा लहान मुलांना दाखविण्यापूर्वी विचार करावा )

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9140 views

💬 प्रतिसाद (25)
ज
ज्योति अळवणी Mon, 07/09/2018 - 05:26 नवीन
Interesting.... नेटफ्लिक्स बद्दल बरच ऐकलं आहे. बघायलाच हवं एकदा हे प्रकरण
  • Log in or register to post comments
ब
बार्नी Mon, 07/09/2018 - 05:59 नवीन
पहिला महिना फ्री आहे, बघून टाका !
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 07/09/2018 - 05:41 नवीन
शो बघायला सुरुवात केलि आहे . नार्कोसची छाप जाणवली आहे. रहस्य आणि भूतकाळ यांची सांगड छान घातलि आहे . फॅमिलि शो मात्र अजिबात नाहि.
  • Log in or register to post comments
P
pawar.sujit Mon, 07/09/2018 - 05:58 नवीन
Kalach pahun zali... Baryach diwsani hindi madhe hatke serial pahili. Nawajuddin, Radhika, Jitendra Joshi yanchya pudhe Saif purn zakolalay
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Mon, 07/09/2018 - 08:42 नवीन
पहिला एपिसोड प्रचंड आवडला. पुढे पण पाहेन.
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Mon, 07/09/2018 - 13:37 नवीन
नेटफ्लिक्स ने ह्या शो द्वारे बेंचमार्क खूपच वर ठेवला आहे जो येणाऱ्या काही वर्षांत इतर शोज ना गाठणे कठीण ठरेल .
१००% सहमत
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 07/10/2018 - 19:08 नवीन
बार्नी, उत्सुकता वाढली आहे. याचा राशीप्रपात ( = टॉरेंट) वा तूनळीदुवा लाभेल काय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Wed, 07/11/2018 - 13:34 नवीन
व्यनि पहा
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 07/10/2018 - 19:41 नवीन
या मालिकेविषयी बरेच ऐकले आहे. पाहण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 07/10/2018 - 21:52 नवीन
अगदी आत्ताच याचा शेवटला आठवा भाग बघून उठून मिपावर येतो तो हा धागा. अत्यंत वास्तव आणि परिणामकारक. जवळ जवळ प्रत्येक संवाद शिव्यांनी भरलेला. अर्थात हे संवाद भाई-दादांच्या तोंडचे असल्याने ते तसेच असायला हवेत. शिव्या, हत्या, पिस्तुलांची ठोकाठोकी आणि सेक्स यातून वाट काढत जाणारी उत्कंठावर्धक कथा. अर्थात यातली कामुक दृश्ये मुद्दाम मसालेदार्पणासाठी-- म्हणजे तशी कथेच्या दृष्टीने फारशी आवश्यक नसूनही -- घातलेली वाटतात. सिनेमाटोग्राफी, संवाद, दिग्दर्शन, कास्टिंग वगैरे उत्तम. त्यातल्या त्यात सैफअलीच ठोंब्या वाटतो. सध्या पाऊण पाऊण तासाचे आठ भाग आलेत, पुढले केंव्हा येणारेत ? मलातरी फार गुंतागुंत असलेली कथा पटकन कळत नाही, त्यामुळे कोणते प्रसंग आधीचे, कोणते नंतरचे हे समजणे जरा कठीण गेले.
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Wed, 07/11/2018 - 13:35 नवीन
आठव्या भागाचा शेवट ( सीझन फिनाले ) अर्धवट किंवा कन्फ्युझिन्ग वाटला . १-३ एपिसोड वेग छान आहे कथेचा . ४-६ बोअरिन्ग होतो थोडासा आणि कामुक दृष्ये संपूर्णतः अनावश्यक वाटली . भाषा मात्र योग्य आहे . शिव्यांमुळे झणझणीत वास्तवता आली आहे शो मध्ये
  • Log in or register to post comments
ब
बार्नी Wed, 07/11/2018 - 15:49 नवीन
आजकाल सीजन क्लीफ हँगर ला सोडण्याची फॅशन झाली आहे ( मायला त्या गेम ऑफ थ्रोन्स च्या ) , ह्यामुळे फॅन थेरीज सुरु होतात आणि अजून प्रसिद्धी मिळते. .
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 07/12/2018 - 12:55 नवीन
"मायला त्या गेम ऑफ थ्रोन्सच्या.." ++++१ ...........वर्ष वर्ष वाट पाहायला लावतात... x(
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी Wed, 07/11/2018 - 16:26 नवीन
scared Games सारखी अजून कुठली वेब series आहे का? हि खूप आवडली. धागा वाचून उत्सुकता वाढली होती. कळावे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 07/12/2018 - 09:50 नवीन
इंग्रजी नार्कोस बघा
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 07/12/2018 - 14:07 नवीन
"ब्लॅक मिरर '' चे सगळे सिजन बघा
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 07/12/2018 - 17:32 नवीन
कॉग्रेस पार्टीने म्हणे या वेबसिरिज मध्ये राजीव गांधींचा अपमान केला म्हणून, नेटफ्लिक्स व नवाझुद्दीन सिद्धीकी विरुध्द एफआयआर दाखल केली आहे.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sun, 07/15/2018 - 02:30 नवीन
नक्की काय संवाद , माहिती आहे कुणी तरी सांगा ,सगळेच जण नेटफ्लिक्स वर पाहू शकत नाही हो !!!!!!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 07/15/2018 - 07:33 नवीन
Sacred Games चे सर्व ऐपिसोड तुम्ही ह्या साईटवर फुकट पाहू शकता.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 07/15/2018 - 07:33 नवीन
Sacred Games चे सर्व ऐपिसोड तुम्ही ह्या साईटवर फुकट पाहू शकता.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sun, 07/15/2018 - 08:38 नवीन
https://youtu.be/r3KV31CMeF8 हे ते वादा चे कारण
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 07/16/2018 - 05:18 नवीन
अशा ठिकाणी संपावलाय की दुसऱ्या पर्वाला पर्याय नाही. पण निर्माण प्रक्रियेतील सलगता व दर्जा जर राखला, तर तो कास्ट चांगला होईल असं वाटतं.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 07/16/2018 - 07:14 नवीन
तद्दन बकवास सीरीज आहे. पहिल्या भागात अश्वस्थामा ह्या भागात उत्कंठा जागृत होते पण नंतर तोच तोच पणा निर्माण होतो . कथेचा विषय जितका फास्ट आहे तितके पार्ट फास्ट नाहीत , त्यामुळे बर्‍आचसा भाग रटाळ वाटला. म्हणजे २४ मध्ये त्याच्या बावळट पोरीचे अन बायकोचे सीन होते किंव्वा ब्रेकिंग बॅड मध्ये त्याची बायको डोक्यात जायची तसे काहीसे रटाळ ! नवाजहुसेन म्हणजे अगदी गँग्स ऑफ वासेपुर पार्ट ३ करत आहे असे वाटते. बाकी ह्या सीरीजमध्ये " ड्रग्स , सेक्स , व्हायोलन्स , मनसोक्त शिव्या हे सारे दाखवणे म्हणजेच जणु काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य " असा काहीसा दृष्टीकोन दिसतो. असो. दाखवो बापडे ! एकवेळ ड्रग्स आणि सेक्स ठीक आहे , समजु शकतो , पण व्हायलन्स आणि शिव्या देणे " अभिजात " किंव्वा "नवीन प्रयोग" किंव्वा "अभिव्यक्ती स्वातंत्र्य" कसे असु शकते हे आमच्या आकलनाच्या पार आहे ! अवांतर : बाकी ह्या सीरीज मध्ये पहाता पहाता एक गोष्ट निदर्शनास आली , आपल्या रीसर्च अ‍ॅन्ड अ‍ॅनालिसिस विन्ग रॉ चा मोटो कि काय ते आहे - धर्मो रक्षति रक्षित: | धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः । तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत् । । ८.१५ । । हा मुळ कोणत्या ग्रंथातील आहे ? मिपावर शतकी धागा काढता येईल असे उत्तर आहे ! नो वंडर व्हाय रॉ इज सो सनातनी !! लोल !! =))))
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 07/16/2018 - 07:28 नवीन
मनुस्मृति मधील वचन आहे का ?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 07/16/2018 - 08:25 नवीन
हाहाहा, अगदी बरोबर. संदर्भ : https://drive.google.com/file/d/0B-ll6TtiictNWWpVVUpQaVhWbFU/view : पान १२२/३३२ -गा.पै.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा